अगदी अलिकडे पर्यंत गीतारहस्य म्हणजे लोकमान्य टिळकांनी लिहिलेला ग्रंथ एवढच सामन्यज्ञान होत.पण एकेकाळी ह्या ग्रंथाने विक्रिचे तत्कालीन विक्रम केले असावेत असे वाटते. लोकप्रभा साप्ताहीकातील एका लेखात डॉ.यशवंत रायकर यांनी, '१९१५च्या जून महिन्यात प्रसिद्ध झालेल्या गीतारहस्याच्या सर्व प्रती संपल्यामुळे लगेच सप्टेंबर महिन्यात पहिले पुनर्मुद्रण करावे लागले.' अशी माहिती दिली आहे.या ग्रंथाचा जो भाग (बहुधा शेवटील भाग) ऑनलाईन उपलब्ध झाला ते १९२४ सालचे पुर्नमुद्रण आहे त्यावर ५००० प्रती असा आकडा आहे.
लोकप्रभा साप्ताहीकातील डॉ.यशवंत रायकर यांचा हा लेख इतर बाबीकरता वाचनीय (आणि चर्चा करण्याजोगा) आहेच पण त्यात रायकरांनी एखाद्या विषयावर लेखन करताना एखादा परिपेक्ष,एखादी बाजू कशी सुटून जाऊ शकते याचा उहापोह केला आहे.
रायकरांचा लेख आणि गीतारहस्याचा ऑनलाईन उपलब्ध भाग वाचताना अजून एका गोष्टीकडे लक्ष गेल ते म्हणजे लोकमान्य टिळकांनी अवलंबिलेली संस्कृत ते मराठी अनुवादाकरता अवलंबलेली पद्धतपण उल्लेखनीय आहे.
गीतारहस्याचा ऑनलाईन उपलब्ध भाग मराठी विकिस्रोत प्रकल्पात या दुव्यावर उपलब्ध केला आहे.(मराठी विकिस्रोत प्रकल्पात पिडिएफ फॉर्मॅटचे वाचन करताना युनिकोडीकरण करत लिहिण्याची म्हणजे ग्रंथ बारकाव्याने अभ्यासण्याची संधी सुद्धा उपलब्ध होते)
गीतारहस्याचा उपलब्ध सदर ऑनलाईन भाग आणि रायकरांचा लेख याच्या वाचना नंतर काही प्रश्न पडले ते असे
१) गीतारहस्य ग्रंथाचे अधिकृत नाव श्रीमद्भभगवद्गीतारहस्य असे आहे का ?
२) गीतारहस्य ग्रंथाचे एकुण भाग किती ? (अर्काइव्ह डॉट ऑर्गवरून विकिस्रोतावर आणलेली मूळ प्रतीचे १९२४चे पुनर्मुद्रण गीतारहस्य ग्रंथ आहे पण पृष्ठ संख्या कमी आहे का हा गीता रहस्याशी संबंधीत ग्रंथ आहे आणि सुयोग्य आवृत्ती आहे यास दुजोरा/खात्री करून हवी आहे.कारण प्रथम पृष्ठावर ह्या ग्रंथाचा शेवटील भाग असा उल्लेख दिसतो आहे.)
*(कुणाकडे गीतारहस्याचे अजून भाग असतील तर ते मराठी विकिस्रोत प्रकल्पात युनिकोडीकरणाकरता पिडिएफ फॉर्मॅटमध्ये उपलब्ध करून देऊ शकल्यास हवे आहेत)
*(ऑनलाईन उपलब्ध (दुसर्या का शेवटच्या ?) भागात काही पृष्ठे रिकामी दिसताहेत.२रे, १६वे व १८वे पान रिकामे आहे ह्यातील एखादे पान गहाळ नसून मूळातूनच रिकामे असल्याची खात्री करून हवी आहे.)
३) उपरोक्त ग्रंथाच्या प्रथमपृष्ठावर "कर्मविपाकसिद्धांत" असा ग्रंथ नामोल्लेख दिसत नाही मग तो कुठून येतो ?
४) लोकप्रभेतील रायकरांच्या लेखात "मीमांसाशास्त्रातले ग्रंथतात्पर्य काढण्याचे सात नियम" असा उल्लेख येतो ते सात निय्म कोणते
इत्यादी माहिती हवी आहे.गीतारहस्य बद्दल इतर माहिती चर्चा झाल्यास स्वागतच असेल. उपलब्ध झालेली माहिती मराठी विकिपीडियावरील लेख लिखाणात वापरण्याचा मानस आहे.
येत्या वर्ष २०१४ करता आपण सर्व आणि मिपा परिवारास शुभेच्छा.
वाचने
57957
प्रतिक्रिया
106
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत
In reply to टिळकांचा कर्मयोग. by अर्धवटराव
काही मुद्दे
In reply to सहमत by माहितगार
टिळक आणि गीता
In reply to टिळकांचा कर्मयोग. by अर्धवटराव
उत्तम काम
प्रोत्साहनाकरिता धन्यवाद
In reply to उत्तम काम by विटेकर
योगवसिष्ठाचा गीतारहस्यात उल्लेख
In reply to प्रोत्साहनाकरिता धन्यवाद by माहितगार
गीतारहस्यातील "अथ समर्पणम" चा अनुवाद हवा आहे
In reply to प्रोत्साहनाकरिता धन्यवाद by माहितगार
श्लोक १.
In reply to गीतारहस्यातील "अथ समर्पणम" चा अनुवाद हवा आहे by माहितगार
खरोखरच अनमोल!
In reply to उत्तम काम by विटेकर
उपक्रम बंद आणि भोग मिपाला
अपेक्षित प्रतिसाद
In reply to उपक्रम बंद आणि भोग मिपाला by सुहास..
अभिनंदन.
धन्यवाद
In reply to अभिनंदन. by राही
अवांतर
कापूस, रेशीम व जर
मस्तच!
In reply to कापूस, रेशीम व जर by माहितगार
ना.सी.फडके
In reply to मस्तच! by विकास
गीता, कोहिनूर, आणि लोकमान्य
In reply to कापूस, रेशीम व जर by माहितगार
रोचक! हे पुस्तक कुठे उपलब्ध
In reply to गीता, कोहिनूर, आणि लोकमान्य by श्रीनिवास टिळक
पैलू पाडणे या रुपकात, मला
In reply to गीता, कोहिनूर, आणि लोकमान्य by श्रीनिवास टिळक
गीतारहस्यातील "अथ समर्पणम" चा अनुवाद हवा आहे
विकिस्रोत वरिल
शुभेच्छांकरता धन्यवाद
In reply to विकिस्रोत वरिल by डॉ सुहास म्हात्रे
अथ समर्पणम् ची टंकन खात्री आणि अनुवाद हवा आहे
ओ साहेब, धाग्यावरचे प्रतिसाद
In reply to अथ समर्पणम् ची टंकन खात्री आणि अनुवाद हवा आहे by माहितगार
पुरता अगदी अगदी ..
In reply to ओ साहेब, धाग्यावरचे प्रतिसाद by बॅटमॅन
अनुवाद पूर्णपणे मुक्त आहे,
In reply to पुरता अगदी अगदी .. by माहितगार
विकिस्रोतवर चढवले
In reply to अनुवाद पूर्णपणे मुक्त आहे, by बॅटमॅन
बहुतेक
In reply to अथ समर्पणम् ची टंकन खात्री आणि अनुवाद हवा आहे by माहितगार
एक राहिले. प्रत्नान्
In reply to अथ समर्पणम् ची टंकन खात्री आणि अनुवाद हवा आहे by माहितगार
प्रत्न हा शब्द बरोबर आहे.
In reply to एक राहिले. प्रत्नान् by राही
होय.
In reply to प्रत्न हा शब्द बरोबर आहे. by बॅटमॅन
धन्यवाद
In reply to होय. by राही
कर्म मीमांसा
१९१५च्या आवृत्तीच्या मुखपृष्ठातील मजकुर पडताळून हवा आहे
लोकमान्य टिळकांच्या जन्म