धर्मांतरे का होतात ?
जगाच्या इतिहासात अनेक धर्मांतरे घडली आपल्या भारत भूमीत हि अनेक धर्मांतरे घडली ह्याचे काय कारण असावे?
लोक धर्मांतर का करत असावेत?
माणूस हा आपल्या धर्मावर प्रेम करतो.त्याचा आदर करतो. धर्माने दिलेल्या रिती परंपरा, पाळतो आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे नि दुसर्याचा धर्म कसा टाकावू आहे ह्याबद्दल घसा सुकेपर्यंत चर्चा करतो वाद विवाद करतो प्रसंगी गुद्दागुद्दी हि करतो तरीही धर्मांतरे का होतात?.
धर्माबद्दल काही बोलले शंका घेतल्या कि माणूस रागावतो उत्तरादाखल दुसऱ्या धर्मातील चुका दाखवतो. काहीना आपला धर्म हा प्राचीन वाटतो काही जणांना तर तो माणसाने निर्माण केलाय असे वाटतच नाही. एरवी सामान्य असणारा माणूस धर्माच्या नावाने दंगली करायलाही मागे पुढे पाहत नाही आपला धर्म खतरे मे असे त्याला वाटू लागते नि तो दुसर्या धर्मियावर तुटून पडतो परधर्मीय बद्दल द्वेष हा त्याला स्वधर्माचा अभिमान वाटतो.
धर्मावर असे अनिर्बंध प्रेम करणारा माणूस धर्मांतर का करत असावा?धार्मिक दंगलीत तळहातावर शीर घेवून लढणारे धार्मिक लोक पाहिले तर त्यांच्या धर्मप्रेमाचे आश्चर्यच वाटते पण इतके होवूनही एक प्रश्न पडतो कि धर्मावर निरतिशय प्रेम करणारा माणूस धर्मांतर का करत असावा ? धर्मांतरे का होतात ???आपल्या भारतातही अनेक धर्मांतरे झालेली आहेत त्याचे काय कारण असावे?
प्रतिक्रिया
एक अवांतर शंका
नक्कीच!
>>>नास्तिक = 'देव' नामक
धन्यवाद !!!
काय घेऊन बसलात.....
अनुकरण ?
अनुकरण ? भाग -२
राजा कालस्य कारणम्?
-१
शक्य आहे
धर्मांतराची कारणे
सगळं वाचलं
अरे देवा!! या जिलबीवर अजून
वृत्तपत्रात नुकतीच एक २०१६
Pagination