Skip to main content

टोपण नावे

लेखक अत्रन्गि पाउस यांनी सोमवार, 30/12/2013 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीतील टोपण नावे आणि मूळ लेखकाचे नाव ह्यांची यादी करूयात का? १. कलंदर : अशोक जैन २. ठणठणपाळ : जयवंत दळवी ३. तंबी दुराई : ?? ४. ब्रिटीश नंदी : प्रविण टोकेकर

वाचने 20428
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

तंबी दुराई= (भौतेक) श्रीकांत बोजेवार. विभावरी शिरूरकर= मालती बेडेकर. ग्रेस= माणिक गोडघाटे. गोविंदाग्रज= रा.ग.गडकरी, कुसुमाग्रज= वि.वा.शिरवाडकर. बालकवी=त्र्यंबक बापूजी ठोंबरे, माधव ज्यूलियन= माधव पटवर्धन, बाकीबाब= बा.भ.बोरकर. कवी बी= बी.रघुनाथ की कृ.ब.निकुंब? बाकीही अनेक असतीलच. मला बरोबर आठवत असेल तर बहुतेक पुलंनीही त्यांचे "अण्णा वडगावकर" हे व्यक्तिचित्र टोपणनावानेच प्रकाशित केले होते.

In reply to by अमेरिकन त्रिशंकू

हायला, हा तर फुटात बारा इंचाचा फरक पडला की हो =)) धन्यवाद त्रिशंकू साहेब दुरुस्तीबद्दल.

टोपणनावांच्या जंत्रीपेक्षा त्याची गोष्ट द्या .उदा ठणठणपाळची सही मिळवायला आइडलपाशी लागलेली रांग आणि कोण ते उघड केल्याशिवाय वाचक जाईचनात .त्यांचे लेख बंद झाल्यावर धारवाडकरांचे (जीएंचे) आलेले खरमरित पत्र .