Skip to main content

बलिदान त्याविना हे ... (गझल)

लेखक अमेय६३७७ यांनी सोमवार, 30/12/2013 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
असते मनात काही उमजून येत नाही वाटे किती फुलावे उगवून येत नाही घनघोर मंथनाची आश्वासने फुकाची नुसतेच भोवरे पण घुसळून येत नाही कुंकू पुसून केली तलवार रक्तवर्णी बलिदान त्याविना हे उजळून येत नाही तू बोल ऐकतो मी माझेहि ऐक काही मौनात प्रेमगाणे उमलून येत नाही पेरून चिंतना घे शिंपून लेखणीला शब्दास अर्थ आता लगडून येत नाही -- अमेय
लेखनविषय:

वाचने 1675
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

ही रचना कशी काय सुटली ब्वॉ.. आवडले! :-)

सुरेख झालीय. शक्यतो सुट घ्यायचे टाळता आले तर बघा, त्याने गजल निर्दोष राहात नाही.