कारल्याची भाजी
साहित्यः
४ मध्यम आकाराची कारली (बिया काढून, जरा जाडसर काचर्या कराव्या.)
२-३ हिरव्या मिरच्या
८-१० कढीपत्याची पाने
फोडणीचे साहित्य (मोहोरी, हिंग, ह्ळद या क्रमाने फोडणीत घालावे)
मीठ (चवीप्रमाणे)
गूळ (१/४ कप)
कोथिंबीर (बारीक चिरलेली १/४ कप)
तेल १/४ कप (ह्या कृतीत तेल जरा जास्त लागते)
कृती:
१. तेल जरा जाड बुडाच्या पातेल्यात गरम करुन फोडणी करावी. फोडणीत हिंग नेहमीपेक्षा जरा जास्त घालावा.
२. फोडणीत मिरच्या व कढीपत्याची पाने घालून जरा परतून घ्यावी.
३. आता त्यात कारल्याच्या काचर्या घालाव्या. वर मीठ घालून नीट परतावे. ही भाजी करताना पातेल्यावर झाकण अजिबात ठेवायचे नाही.
४. भाजी शिजली की त्यात गूळ घालून तो पूर्ण वितळेपर्यंत परतावी. त्यात चिरलेली कोथिंबीर घालून वाढावी.
हि भाजी पुरी, पोळी, भाकरी किंवा दहिभाताबरोबर छान लागते.
जेवणे झाल्यावर फोटो काढायची आठवण झाली.....


वाचने
8806
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
कारल्याची भाजी अत्तिशय आवडती.
माझीपण आवडती भाजी.
In reply to माझीपण आवडती भाजी. by त्रिवेणी
भाजी एवढी हिरवी कशी दिसते आहे?
करून पाहतो.
आमची पद्धत
वरील पद्धतीत कारळ्याचा कूट
वरील पद्धतीत कारळ्याचा कूट