आप (आम आदमी पार्टी) ने सरकार बनवायचे मनावर घेतले आहे. पण कुणाही मंत्र्याला सरकारी बंगले देऊ नका असे सांगितले आहे. ह्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी महाराष्ट्रातील मंत्री आपल्या सरकारी निवासस्थानी काय दिवे लावत आहेत हे शोधले. तेव्हा उर्मट शिरोमणी, अर्वाच्यभाषाप्रभू अजितरावजीदादा पवार हे मंत्री सर्वात खर्चिक आहेत असे निष्पन्न झाले. एका वर्षात ३७ लाख खर्च. मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर ३३ लाख खर्च. अर्थात हे सरकारने दिलेले आकडे आहेत. कुण्या खाजगी कंत्राटदाराने खास कृपादृष्टी करुन "वरचा" खर्च केला असेल तर ते पकडले जाणे कठिण!
ह्या उधळपट्टीला मोठी प्रसिद्धी मिळताच हे मस्तवाल मगरुर मूग गिळून पत्रकारांना सामोरे गेले आणि बंगल्यावरील जास्तीचा खर्च झाला असेल तर त्याची भरपाई देऊ असे म्हणाले. महाराष्ट्राची जनता धन्य जाहली!
http://www.abpmajha.newsbullet.in/mumbai/103/39048
केजरीवालांचे बंगला नाकारण्याचे कृत्य (ज्याला अनेक बुजुर्ग मिपाकर आचरटपणा म्हणणे शक्य आहे) घडले नसते तर ही सरकारी उधळपट्टी उघडकीस आली असती का?
ह्याने सरकारी तिजोरीवर कितीसा भार पडणार आहे हे आणि असे प्रश्न उपस्थित होतीलच. पण ही वृथा गळती ही हिमनगाचे निव्वळ टोक आहे. उर्मटेश्वरांनी इतका खर्च केला की मग त्याने हुरुप येऊन त्यांच्या सचीवाने तेच केले, उपसचिवानेही तेच, बाकी राष्ट्रवादीचे पुढच्या फळीचे नेतेही ह्यांचाच आदर्श घेणार. वगैरे. मुळात गरीबांचे कैवारी, गरीब शेतकरी मित्र वगैरे टाहो फोडणारे असा आततायी खर्च का करतात?
आपल्या खर्चांवर आता लोकांचा डोळा आहे आणि निदान निवडणुका होईपर्यंत तरी असे खजिल करणारे खर्च उघडकीस येऊ नयेत असा प्रयत्न होईल.
आपने अप्रत्यक्षपणे ह्या गोष्टीची सुरवात करुन दिली त्याबद्दल त्यांचे कौतुक.
वाचने
4383
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपची
लै बेस ! कुठेतरी सुरुवात झाली
केजरीवाल नि बंगला नाकारला यात
आजितजादा पवार सोन्याचा विटा
आपने अप्रत्यक्षपणे ह्या
आपने अप्रत्यक्षपणे ह्या गोष्टीची सुरवात करुन दिली त्याबद्दल त्यांचे कौतुक+१परिणाम दिसायला लागला. खालील
अनेक वरकरणी समतोल लेखन करणारे
?
In reply to अनेक वरकरणी समतोल लेखन करणारे by मारकुटे
आमचे सर्व स्तरावर मित्र
In reply to ? by सुनील
ह्म्म्म...
खरच
आज झी न्युज च '
चाप?.....
यशाचे स्वरुप
आपाची खरा चेहरा कळेलच लवकर !