हिरवाई
सध्या मला डॉक्टर ने जेवणात दुधी खायला सांगितला आहे.
तर सध्या माझा दुधीवर संशोधन चालु आहे.
आजच सकाळी एक मॉकटेल दुधीपासुन केला.
खर सांगते दुधीपासुन एवढ छान मॉकटेल होवु शकत अस कधी वाटल नव्हत.
फ्रेश फ्रेश हिरवाई तुमच्यासाठी खास.
दुधी १/४ किलो साल काढुन आणि उकडुन
काकड्या २ बारीक तुकडे करुन
१५/१६ पुदिन्याची पान
४/५ मिरी
१/२ इंच आलं
काळ मीठ चवीनुसार
लिंबु रस ३/४ चमचे
सर्व एकत्र मिक्सर मध्ये गुळगळीत वाटुन घ्यायच.
मग ते सर्व पाणी घालुन सारख करुन परत मिक्सर मध्ये फिरवुन घ्यायच.
आणि मग ग्लास मध्ये घालुन थंड करुन प्यायच.
सजावटी साठी पुदिन्याची पान बारिक चिरून वर घाला
आणि काकडीचे बारीक तुकडे पण घाला पिताना मस्त लागतात.
दुधी आणि पुदिना हे ह्रुदयरोगा साठी चांगला असतो.
त्यांनी हे जरुर प्यावे. अगदी रोज सुद्धा.
याद्या
4810
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
छान
अरे वा..
काहीतरी वेगळा आहे प्रकार...
हिरवाई
धन्यवाद..
मस्तच
>>बुधवार-शन
In reply to मस्तच by विसोबा खेचर
औषधी दुधी....
दुधी
करून बघायला हवी