Skip to main content

खिम्याचे उन्डे

लेखक वासु यांनी सोमवार, 23/12/2013 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
जे लोक नोन्-वेज खातात त्यान्च्यासाठी साहित्य: १ किलो खिमा १ चमचा आल्-लसुण पेस्ट ३ चमचे लाल तिखट १/२ चमचा हळद १/२ चमचा गरम मसाला १/२ चमचा धने मसाला मीठ तेल कृती: प्रथम खिमा धुवून घ्यावा. नन्तर दगडी खलबत्त्यात(मिक्सर चालेल) खिमा चान्ग्ले बारीक वाटावे. नन्तर एका ताटात खिमा काढुन त्यात आल्-लसुण पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने मसाला आणि मीठ घालुन ते एकजीव करावे व त्याचे हाताने गोळे करावे. आता एका कुकर मधे थोड तेल, (जास्त तिखट खात नसल्यास १ कापलेला टोमाटो टाकु शकता) घालुन फ्राय करावे. मग त्यात हे गोळे टाकावेत. त्यात थोडेसे पाणी टाकुन(फक्त शिजण्यापुरते) कुकर ला २-३ शिटी द्यावी. एकदा का ते शिजले की मग एका पातेलात थोडे तेल घेवुन त्याला फ्राय करावे. नोटः चपाती बरोबर खाण्यासाठी खिम्याचे उन्डे हे रश्याचे पण बनवता येतात. अजुन एक की मी फोटो टाकायचा परत प्रयत्न केला पण असफल ....:-(

वाचने 9460
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

In reply to by प्रचेतस

@आता थोड्या वेळाने सांडगे घालाल.>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-smiley-face.gif आयायायायायाया... वेगळच चित्र आलं डोळ्यासमोर! =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

>>आयायायायायाया... वेगळच चित्र आलं डोळ्यासमोर! देवा!! भटजीबुवांना सद्बुद्धी दे !! *help*

मुगाच्या भजीच्या लेखात तर बरोबर टींब दिलेली आहेत...उदा. कोथींबिर, चिंच, किंवा, ई. आणि ह्याच लेखात मुद्दाम वगळ्लेले दिसते आहे विशेष टिप्पणी मिळाल्यावर... ताई, बराच त्रास झाला असेल ना असे करायला?

In reply to by शिद

तस नाहिये खर सान्गु तर मी वरचे शब्द (कोथींबिर, चिंच, किंवा) मिपा वरुन कॉपी केलेत.

एक अफलातुन चकणा डिश दिली आहे आणि तुम्हि त्यांना "आवरा' म्हणताय! छे नविन उमेदवारांचे असे "उंडे".......ते आपलं "पाय" खाली खेचताना बघुन एक मिपाकर म्हणुन शरम वाटली.

कश्मीरी पाककलेत जे साग्रसंगीत "वाझवान" चे जेवण असते त्यात असे उंड्यांचे कालवण असते, त्याला "रिस्ता" असे म्हणतात, त्याची आठवण आली

दु.दु. संपादकांचा नवीन सदस्यांना प्रोत्साहन न दिल्याबद्दल निषेध केल्या गेलेला आहे!!!! (बुवा आतातरी माझ्यावर रागावू नका, अगोबाला दुदु म्हटलोय बघा)