✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गायत्री मंत्राचा सोपा अर्थ

अ
अमित खोजे यांनी
Tue, 12/24/2013 - 01:49  ·  लेख
लेख
बायकोच्या घरी चहा प्यायला म्हणून गेलो. चहा पीत असताना मेहुण्यांनी मध्येच एक बॉम्ब टाकला. "गायत्री मंत्राचा अर्थ माहिती आहे का?" चहा सगळा नाकातोंडातून बाहेर, एवढा जोराचा ठसका लागला. मनात म्हटले चहा पिताना गायत्री मंत्र नदीवरच्या भटाने देखील म्हटला नसेल तर यांना कुठून आठवण आली? नवीनच लग्न झालेले. त्यामुळे बायकोच्या घरी आपली इज्जत जायला नको म्हणून म्हटले पहिले मंत्र तरी आठवतोय का? लगेच मनातल्या मनात त्या मंत्राची उजळणी करून बघीतली. तेवढ्यात मेहुणे रावांनीच खुलासा केला. "या प्रश्नचा उद्देश तुझे संस्कृत ज्ञान वगैरे तपासणे हा नसून सोप्या भाषेत त्या मंत्राचा अर्थ हवाय हा आहे." "वा रे बच्चू! मनात एक तोंडी दुसरे काय?" मी विचारले, "अशी वेळ तुमच्यावर का यावी?" उत्तर आले "आमचे चिरंजीव!" मी संभ्रमात पडलो. यांचे चिरंजीव मला चांगलेच माहिती होते. वय वर्षे ४. अतिशय चिकित्सक. तूफान धुडगूस. पण संस्कार चांगले. वडिलांचा म्हणजे आमच्या मेहुणेरावांचा त्यांना धाक. मग अशा मुलाला काय पडले आहे या गायत्रीमंत्राच्या अर्थाचे? तर पुढच्या उत्तराने शंकासमाधान झाले. "शाळेमध्ये यांना दररोज प्रार्थनेबरोबर गायत्री मंत्र म्हणायला लावतात. हा ते म्हणतो. परंतु गेले काही दिवस त्याने भुणभुण लावली आहे कि त्याचा अर्थ काय? मी नेट वर वगैरे शोधले परंतु त्याला समजावता येईल अशा सोप्या भाषेत तो काही मला सापडला नाही. " हे एवढे ऐकून मी सुद्धा विचारात पडलो. संस्कृत चे ज्ञान आमचे यथातथाच. ९ वी १० वी ला जेवढे काही संस्कृत विषय शिकलो होतो तेवढेच. त्यामुळे खालील मंत्र मनात १० वेळा म्हटला परंतु तरीही त्यात सोप्या भाषेत समजावण्यासारखे काहीच दिसेना. एवढेच कळले कि सूर्याची प्रार्थना केलेली आहे. ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं । भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॥ मग काही दिवस इकडे तिकडे हातपाय हलवल्यावर तसा अर्थ तर सापडला परंतु सोप्या भाषेमध्ये विशेषतः चिरंजीवांना समजेल असा कसा सांगणार? मिपाकरांनी थोडीशी मदत केली तर खरच छान होईल. एका ४ वर्षाच्या मुलाला याचा अर्थ त्याला समजेल अशा सोप्या भाषेत कसा सांगणार? शब्दाची फोड करून जर जमले तर अजूनच छान म्हणजे या शब्दच अर्थ हा असे सांगता येइल.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
28117 वाचन

💬 प्रतिसाद (73)

प्रतिक्रिया

हे संपूर्ण विश्व निर्माण

खेडूत
Tue, 12/24/2013 - 04:16 नवीन
हे संपूर्ण विश्व निर्माण करणारया परमात्म्याच्या[सूर्य] सर्वश्रेष्ठ तेजाचे आम्ही ध्यान करतो, तो सूर्यदेव आमच्या बुद्धीला [सत्कर्माची] प्रेरणा देवो." सौजन्य- चेपु. जरा गुगलले तर अजून सविस्तर माहिती मिलेल.
  • Log in or register to post comments

धन्यवाद खेडूत

अमित खोजे
Tue, 12/24/2013 - 21:53 नवीन
धन्यवाद खेडूत. तुम्ही दिलेल्या या अर्थाने शोधास चांगली दिशा मिळाली आहे. फक्त शब्दांचा मेळ घालायचा प्रयत्न करतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

अर्थ

पिवळा डांबिस
Tue, 12/24/2013 - 07:04 नवीन
ते सूर्याचे दिव्य तेज आम्ही सदैव चिंतितो.. ते तेज आमच्या बुद्धिला चेतना देवो!!! पिडां म्हणे आता, उरलो उपदेशापुरता!!! :)
  • Log in or register to post comments

कांही शंका...

प्रभाकर पेठकर
Tue, 12/24/2013 - 10:26 नवीन
मला शिकविलेला गायत्री मंत्र अजून जरा मोठा होता. ॐ भूर्भुवः स्वः, ॐ महा:, ॐ जनः ॐ तपः, सत्यम तत्सवितुर्वरेण्यं । भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॥ तो लहान का आणि कसा झाला ह्या बद्दलही मला उत्सुकता आहे. तसेच पूर्वी, गायत्री मंत्र उच्चारण्यावर स्त्रियांना बंदी होती, ती का?
  • Log in or register to post comments

गायत्री मंत्र आणि स्त्रिया

सुनील
Tue, 12/24/2013 - 10:37 नवीन
पूर्वी, गायत्री मंत्र उच्चारण्यावर स्त्रियांना बंदी होती, ती का?
असे ऐकले आहे खरे. कारण माहित नाही! आयरनी अशी की, गायत्री मंत्राच्या अनेक CDs मध्ये कदाचित सर्वात लोकप्रिय CD अनुराधा पौडवाल यांची असावी! अवांतर - मात्र अनुराधा पौडवाल शेवटच्या प्रचोदयात् चा उच्चार प्रचोदया असा करतात, ते मात्र खटकते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

पूर्वी, गायत्री मंत्र

मनराव
Tue, 12/24/2013 - 11:17 नवीन
पूर्वी, गायत्री मंत्र उच्चारण्यावर स्त्रियांना बंदी होती, ती का?
याचं एक कारण हे असु शकेल.. गायत्री मंत्राच्या जपाने अंगात निर्माण होणारी उष्णता.. उष्णतेमुळे होणारे त्रास टळावेत म्हणुन ते तसं सांगितलं जात असेल. तो जस्त करुन उपाया पेक्षा अपाय होण्याची शक्यता जास्त. याचा अर्थ स्त्रियांनी गायत्री मंत्राचा जप करु नये असा होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

गायत्री मंत्राचा जाप करायला

ग्रेटथिन्कर
Tue, 12/24/2013 - 11:24 नवीन
गायत्री मंत्राचा जाप करायला स्त्रियांना बंदी आहे,परंतु गायत्री हे नाव सर्रास ठेवले जाते... हा हिंदू द्रोह आहे ..गायत्री नावाने तिची ,अथवा तिचे नाव घेणारे आई बाबा भावंडे मित्रमैत्रीणी यांची उष्णता वाढली तर त्याला जबाबदार कोण????....प्राचीन मुनींना याचे थर्मोडीनामिक्स माहित असणार ,उगाच का ते असं काहीबाही लिहतील!फक्त त्यांनी ते गुप्त ठेवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनराव

तुम्हाला कस्सं कळळं?

मारकुटे
Tue, 12/24/2013 - 12:23 नवीन
तुम्हाला कस्सं कळळं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

अरे वा !! म्हणजे थंडीच्या

बाळ सप्रे
Tue, 12/24/2013 - 12:02 नवीन
अरे वा !! म्हणजे थंडीच्या दिवसात गायत्री मंत्र म्हणायला हवा.. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनराव

ॐ भूर्भुवः स्वः, ॐ महा:, ॐ

अनुप ढेरे
Tue, 12/24/2013 - 10:49 नवीन
ॐ भूर्भुवः स्वः, ॐ महा:, ॐ जनः ॐ तपः, सत्यम
भु: - पृथ्वी भुवः - आकाश स्वः - सूर्य महः - तारे बाकीच्याचा अर्थ नाही माहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

कात्री

अमित खोजे
Tue, 12/24/2013 - 21:56 नवीन
नवीनच माहिती! खरंच आत्तापर्यंत हा पूर्ण श्लोक असा आहे हे माहीतच नव्हते. *SCRATCH* का कात्री लावतात श्लोकांना काय माहिती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

बायकोच्या घरी चहा प्यायला

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 12/24/2013 - 11:21 नवीन
बायकोच्या घरी चहा प्यायला म्हणून गेलो. ???
  • Log in or register to post comments

खिक्

सुनील
Tue, 12/24/2013 - 11:24 नवीन
खिक् त्यांना सासुरवाडी म्हणायचं असेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

सासुरवाडीच हो

अमित खोजे
Tue, 12/24/2013 - 21:39 नवीन
सासुरवाडीच हो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

गायत्री मंत्र म्हणायला

बॅटमॅन
Tue, 12/24/2013 - 11:56 नवीन
गायत्री मंत्र म्हणायला स्त्रियांना बंदी असल्यास माहिती नाही. जर बंदी असेल तर ती तद्दन बिनडोक आहे. थंडीत बसून मंत्र म्हटला तर घंटा काही उष्णता वैग्रे वाढत नाही. ही असली मुक्ताफळे सनातन प्रभातसारख्या दैनिकांत छापून येतात आणि बिनडोकागत लोकही त्यावर विश्वास ठेवतात.
  • Log in or register to post comments

थंडीत बसून मंत्र म्हटला तर

मनराव
Tue, 12/24/2013 - 12:55 नवीन
थंडीत बसून मंत्र म्हटला तर घंटा काही उष्णता वैग्रे वाढत नाही.
गायत्री मंत्र एकदा म्हटला तर लगेच उष्णता वाढली अस नाहिये...... तसं असत तर सगळेच थंडीत गायत्री म्हणु लागले असते....... आणि मानवाने उत्तर दक्षीण ध्रुवावर सुद्धा वसती केली असती आणि १२ महिने तिथेच राहिले असते.... जप करुन बघा काहि लाख तरी आणि अनुभव घ्या. तसही असल्या गोष्टी स्वःताच्या अनुभवाने पटण्यासारख्या असतात. इतर कोणी कितीहि पटवून सांगितल तरी त्या पटत नाहीत.. असो.. धागा भरकटायला लागला....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

तुम्ही किती लाख जप केला?

बॅटमॅन
Tue, 12/24/2013 - 13:47 नवीन
तुम्ही किती लाख जप केला? त्याने अंगात किती किलोक्यालरी उष्णता वाढली? याचा विदा द्या मग पाहू काय ते. आणि तसेही अनुभवण्याच्या गोष्टी या नावाखाली वाट्टेल ते खपवता येते. इतर कोणी कितीही पटवून सांगितलं तरी ते पटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनराव

मी एकदा 'आचमन' करताना गायत्री

प्रकाश घाटपांडे
Wed, 12/25/2013 - 14:19 नवीन
मी एकदा 'आचमन' करताना गायत्री मंत्र म्हटला होता. मला शरीरातील कॅलरीज वाढल्याचे जाणवले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

त्यात चकणारुपी अक्षता घेतल्या

मारकुटे
गुरुवार, 12/26/2013 - 09:21 नवीन
त्यात चकणारुपी अक्षता घेतल्या असत्या तर "वजन" पण वाढले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

आमच्या

तिमा
Tue, 12/24/2013 - 13:42 नवीन
आमच्या वर्गातली वात्रट पोरं, जो मॉडिफाईड गायत्री मंत्र म्हणायची त्याने उष्णता वाढत असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

लेख

माहितगार
Tue, 12/24/2013 - 12:42 नवीन
* https://mr.wikipedia.org/wiki/गायत्री_मंत्र या दुव्यावर एक लेख उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments

आधीचा दुवा चुकला म्हणून पुन्हा

माहितगार
Tue, 12/24/2013 - 12:43 नवीन
* गायत्री_मंत्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

दुवा आता बरोबर यावयास हवा

माहितगार
Tue, 12/24/2013 - 12:47 नवीन
गायत्री मंत्र होय हा दुवा बरोबर आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

धन्यवाद

अमित खोजे
Tue, 12/24/2013 - 22:01 नवीन
खरंच मिपा वरती मदत मागितल्याचा आता मला अभिमान वाटतोय. किती तरी नवीन नवीन माहिती कळते आहे. गायत्री मंत्राची पूर्ण कहाणीच येथे वाचावयास मिळाली. आता चिरंजीवांना अगदी गोष्टीच्या स्वरुपात सुद्धा सांगता येईल! लिंकसाठी धन्यवाद माहितगार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

मग आधी गूगलून नक्की काय घं*

हाडक्या
Wed, 12/25/2013 - 02:57 नवीन
मग आधी गूगलून नक्की काय घं* माहिती मिळवली होती हो तुम्ही ? (लब्बाड!) उगी साध्या गोष्टीवरून मिपाकरांना हरभर्‍याच्या झाडावर टांगु नका राव.. ( वाईट दत्त्या.. ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमित खोजे

थंडी, उष्णता इत्यादि

सुनील
Tue, 12/24/2013 - 13:55 नवीन
जर शरीरात उष्णता निर्माण झाली (गायत्री मंत्रामुळे किंवा अन्य काहीही कारणामुळे) तर तुम्हाला गरम वाटेल की थंडी वाजेल? जेव्हा शरीरात उष्णता निर्माण होते (उदा. ताप आला) तर खरे तर हुडहुडी भरते. स्वेटर घालावासा वाटतो. आणि जेव्हा शरीरातील उष्णता कमी होते ("थोडी" घेतल्यावर) तर गरम वाटू लागते. न्यूटन साहेबांनी याची कारणमिमांसा ४०० वर्षांपूर्वीच करून ठेवली आहे! तेव्हा गायत्री मंत्राने नेमके काय होते? जाणकारांनी प्रकाश टाकावा!!
  • Log in or register to post comments

जरा सोपे करून सांगा.

आनन्दा
Tue, 12/24/2013 - 14:20 नवीन
जरा सोपे करून सांगा. भरपूर पळाल्यावर आपल्याला घाम येतो तो कशामुळे हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

गायत्री मंत्रामुळे तरी नक्कीच

बॅटमॅन
Tue, 12/24/2013 - 14:22 नवीन
गायत्री मंत्रामुळे तरी नक्कीच येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

श्रद्धा वाढवा !! नक्की घाम

बाळ सप्रे
Tue, 12/24/2013 - 14:31 नवीन
श्रद्धा वाढवा !! नक्की घाम येईल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

णो ठँक यू!!

बॅटमॅन
Tue, 12/24/2013 - 14:40 नवीन
णो ठँक यू!! घामासाठी श्रद्धा ठेवणे म्हणजे द्विशेरदुग्धप्राशनार्थ महिषीपालन करणे आहे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

काठेवाड की कोकण?

सुनील
Tue, 12/24/2013 - 14:44 नवीन
द्विशेरदुग्धप्राशनार्थ महिषीपालन करणे आहे
म्हैस काठेवाडी की कोकणातील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

काठेवाडी असेल तर माझा

बॅटमॅन
Tue, 12/24/2013 - 15:16 नवीन
काठेवाडी असेल तर माझा प्रतिसाद आहे तस्सा लागू. कोकणातील असेल तर शेर=१ थेंब/१ वाटी इ.इ. मल्टिप्लायर अ‍ॅडजस्ट करून घेणे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

हसून हसून पुरेवाट

अमित खोजे
Tue, 12/24/2013 - 22:02 नवीन
हसून हसून पुरेवाट *ROFL*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

पळणे?

सुनील
Tue, 12/24/2013 - 14:29 नवीन
घाम येण्यासाठी पळायला कशाला पाहिजे? पंखा बंद करून आराम खुर्चीत बसलात तरी येईल हो घाम ;) शरीराची तपमान वाढल्यावर (उदा १०० च्या वर ताप) तुम्हाला गरम कपडे घालावेसे वाटतात की नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

काहीतरी गफलत होतेय.

आनन्दा
Tue, 12/24/2013 - 15:21 नवीन
काहीतरी गफलत होतेय. स्वेटर आपण घालतो ते आपल्या शरीरातील तापमान बाहेर जऊ नये म्हणून. जेव्हा त्या तापमानाची शरीराला गरज नसते तेव्हा शरीरच घामाच्या वाटे ते तापमान कमी करत असते. (माझ्या अल्प मतीप्रमाणे. चु भु दे घे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

आणि थंडी वाजयचीच असेल तर ती

आनन्दा
Tue, 12/24/2013 - 15:23 नवीन
आणि थंडी वाजयचीच असेल तर ती रजई मध्ये गुन्डाळून बसल्यावर पण वाजते. त्याचा बाहेरच्या तापमानाशी तेव्हढा संबन्ध नसून मज्जासंस्थेशी जास्त आहे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

जय मायमराटी

अव्यक्त
Tue, 12/24/2013 - 14:06 नवीन
धरती,गगन,स्वर्गोम्हरे, हम सूर्य को मनसे वरे ! प्रेरित करे जो बुद्धि को, उस तेज का चिंतन करे !! जय मायमराटी
  • Log in or register to post comments

धन्यवाद अव्यक्त. हिंदीमध्ये

अमित खोजे
Tue, 12/24/2013 - 21:47 नवीन
धन्यवाद अव्यक्त. हिंदीमध्ये जरी हा भाषांतरित असला तरीही अगदी शब्दशः आणि समजण्यासारखा आहे हा अर्थ. आणि खरे सांगायचे तर त्या कार्ट्याला (म्हणजे ज्याच्यासाठी हा धागा काढला होता तो हो) हिंदी पण छान समजते. फक्त "स्वर्गोम्हरे" याचा अर्थ नीटसा कळला नाही. थोडी फोडाफोडी कराल का? संधीची हो! खूप खूप धन्यवाद. उत्तर मिळाले असे जाहीर करतो. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अव्यक्त

थंडी कशामुळे वाटते हे

विजुभाऊ
Tue, 12/24/2013 - 22:05 नवीन
थंडी कशामुळे वाटते हे पहाण्यासाठी हे गाणे पहा. त्याचप्रमाणे थंडी कशी कमी होते याचीही माहिती मिळेल http://www.youtube.com/watch?v=sdlOZxmOpBM
  • Log in or register to post comments

मी तर ऐकलय...

अर्धवटराव
Tue, 12/24/2013 - 22:54 नवीन
हा सवितृमंत्र आहे... गायत्री हा छंद आहे तो मंत्र म्हणण्याचा.
  • Log in or register to post comments

टेक्निकल मुद्दा बरोबर वाटतो

बॅटमॅन
Tue, 12/24/2013 - 23:26 नवीन
टेक्निकल मुद्दा बरोबर वाटतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

+१

प्रचेतस
Tue, 12/24/2013 - 23:41 नवीन
गायत्री मंत्र हे ऋग्वेदातील सूर्याला उद्देशून केलेले सूक्त आहे. ऋग्वेद मंडल ३, सूक्त ६२, श्लोक १० पण यात सुरुवातीचा ॐ भूर्भूवः स्वः ही ओळ मात्र नाही. बहुधा दुसर्‍या श्लोकातून घेतली असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

हा मंत्र जणू सर्व

अत्रुप्त आत्मा
Wed, 12/25/2013 - 00:42 नवीन
हा मंत्र जणू सर्व वेदमंत्रांचा मूलमंत्र असल्यासारखं महत्व आणी स्थान मिळालेला मंत्र आहे. याचे मूळरूप ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयात् ॥ एव्हढच आहे. दुसरं रूप ॐ भूर्भुवः स्वः , तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयात् ॥ हे प्राणायाम करताना सामान्यतः धार्मिकविधिंमधे सर्वत्र म्हटलं जातं. आणी त्रिकाल संध्योपासनेत आचमन होऊन चोविस नामांचा उच्चार झाल्यावर प्राणायाम करताना सर्व सप्तलोक आणी पुढे गायत्रीमंत्र ( ॐ भू: ॐ भुवः ॐ स्वः ॐ मह: ॐ जनः ॐ तपः ॐ सत्यम ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयात् ॥ असं म्हणून कुंभक,पूरक,रेचक असा प्राणायाम करण्याची पद्धत आहे. यातही ऋग्वेदी परंपरे नुसार कोणत्याही मंत्रपठणापूर्वी त्याचे छंद-ऋषी म्हणण्याची पद्धत आहे. जसे की.. गायत्रीमंत्राचे छंदर्षी- प्रणवस्य परब्रम्ह ऋषि:। परमात्मा देवता। दैवी गायत्री छंदः । गायत्री शिरसः । प्रजापर्तिब्रम्हाग्निवाय्वादित्या देवता:। यजु:छंदः , एतेषां प्राणायामे विनियोगः॥ आणी मग पुढे ॐ भू: ॐ भुवः ॐ स्वः ॐ मह: ॐ जनः ॐ तपः ॐ सत्यम असे म्हणून पुढे उजव्या नाकपुडी ने सावकाश दीर्घ श्वास घेऊन डावी नाकपुडी बंद करून मनातल्या मनात एकदा ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयात् ॥ असे म्हणून झाल्यावर डाव्या नाकपुडीने श्वास सोडतात. हा कुंभक झाला. पूरक आणी रेचकाला गायत्री मंत्र अनुक्रमे २ वेळा.. व ३ वेळा म्हटला जातो. आणी अर्थ तर वरती बर्‍याच जणांनी दिलेला आहे.. तो लहान मुलांना त्यांच्या भाषेत आणी त्यांच्या भावनेला पचेल/रुचेल असाच सांगावा. हे उत्तम! वेळ पडली तर अगदी इसापनिती/कार्टुन/सिनेमा यातल्या त्यांना अवडणार्‍या हव्या त्या व्यक्तिरेखेची उदा. द्यावी. त्यांना ऐकताना अवडत आहे की नाही? हे मात्र सतत पहावं. मी मुंजीच्या अनेक समरप्रसंगात :D हा उपद्व्याप जमेल तसा करत असतो. (तो इथे सांगायचा म्हणजे एक अख्खा लेख पडेल. :D असो! )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

व्वा...!

प्रभाकर पेठकर
Wed, 12/25/2013 - 01:03 नवीन
व्वा गुरुजी. उत्तम माहिती. गायत्री मंत्राच्या शास्त्रशुद्ध उच्चाराने (ॐ, विसर्ग, ओष्ट्य, तालव्य इ.इ.) गालांच्या, जीभेच्या, ओठांच्या स्नायुंना व्यायाम होतो आणि त्यामध्ये चापल्य येऊन स्पष्टोच्चारास मदत होते. तसेच, श्वासांचा व्यायाम होऊन प्राणवायूचा पुरवठा शरीराला खोलवर होतो ज्या योगे प्राणवायुचे वहन स्नायुंपर्यंत होऊन स्नायुंचे पर्यायाने आपल्या शरीराचे आरोग्य सुधारते, असे लहानपणी शिकविले गेले आहे. नाटकात काम करतानाही आमच्या गुरूंनी आम्हाला शब्दांच्या स्पष्टोच्चारासाठी, वाक्याच्या सहज चढउतारासाठी, संवादाची फेक सुधारण्यासाठी गायत्रीमंत्र आणि प्राणायामाचा सराव करायला सांगितले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मी हे हेच ऐकले होते एका

प्रकाश घाटपांडे
Wed, 12/25/2013 - 14:10 नवीन
मी हे हेच ऐकले होते एका व्हाईस कल्चर तज्ञ बाईंच्या भाषणात. त्यांना लहानपणच्या स्त्रोत्र मंत्र श्लोक यांचा त्यांच्या व्यवसायात खुप उपयोग झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

+१

राही
Wed, 12/25/2013 - 15:52 नवीन
छान माहिती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

+१

प्रसाद गोडबोले
Wed, 12/25/2013 - 00:47 नवीन
गायत्री हा छंद आहे प्रत्येक श्लोकात २४ अक्षरे असतात . अवांतर :अनिष्टुभ मध्ये ३२... बाकीचे आठवत नाही ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

अनुष्टुभ् मध्ये ३२ अक्षरे

बॅटमॅन
Wed, 12/25/2013 - 01:14 नवीन
अनुष्टुभ् मध्ये ३२ अक्षरे टोटल. ४ पाद, प्रत्येकात ८ अक्षरे. पहिल्या अन तिसर्‍यात ५वे अक्षर लघु पायजे इतकेच बंधन- अन्य अक्षरे कुठलीही असोत, तर २र्‍या व चौथ्यात ५वे ते ८व्या अक्षरांचा प्याटर्न लघु-गुरू-लघु-गुरू असा आहे. पहिली चार अक्षरे कैपण चालतात. अनुष्टुप हा वैदिक छंदांपैकी सर्वात जास्त पापिलवार छंद आहे. किंबहुना संस्कृतमध्ये सर्वांत जास्तवेळेस वापरला गेलेला हाच छंद आहे. कारण वापरायला अन गायला सर्वात सोपा अन सुटसुटीत आहे. गायत्री, उष्णिक वैग्रे छंद वेदांपुरतेच मर्यादित राहिले असे दिसते. पुढे कधी त्यांचे उदाहरण सापडल्याचे माहिती नै. अनुष्टुप मात्र पार रामायणापासून ते पुढे अगणित ग्रंथ व भीमरूपी महारुद्रा पासून थेट मिपावरील आमच्या जिलब्यांपर्यंत तितकाच पापिलवार राहिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अथर्वशीर्ष?

पैसा
Wed, 12/25/2013 - 10:25 नवीन
सैषा गणेशविद्या:। गणक ऋषि:। निचृद्वायत्रीच्छंद:। गणपतिर्देवता। हा गायत्रि छंद की "निचृद्वायत्रीच्छंद"? दोन्हीत काय फरक आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

तुमच्या बोलण्यात बिंदू आहे.

बॅटमॅन
Wed, 12/25/2013 - 12:39 नवीन
तुमच्या बोलण्यात बिंदू आहे. जरा इकडेतिकडे पाहून सांगतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा