मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पौष्टिक मूग भजी

वासु · · पाककृती
काल रविवार होता आणि काहितरी चटक-मटक खाण्याचा मूड होता. मग मूग भजीची आठवण आली. मूग हे कडधान्य आहे आणि ते पौष्टिक पण आहे. घरात मिरची, कोथिंबीर, अदरक-लसूण, बेसन हे होतच. मग पटकन जाऊन भिजलेले हिरवे मूग घेउन आले.(भिजलेले हिरवे मूग नसल्यास मूगाची डाळ ३-४ तास भिजत घालावे) आता लगेच तयारीला लागले. साहित्य : २५० ग्राम भिजलेले मूग ४-५ हिरव्या मिरच्या (तिखट) आर्धी गड्डी चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा अदरक-लसूणची पेस्ट हळद जीरे बेसन मीठ आणि लाल तिखट तेल सौस / हिरव्या चटणी किंवा चिंच,गूळ,खजूराच्या गोड चटणी आता कृती: भिजलेले हिरवे मूग असल्यास बारीक वाटून घ्यावे. मूग डाळ / कच्चे हिरवे मूग असल्यास किमान ३-४ तास पाण्यात भिजत ठेवावे. नंतर त्यातील पाणी काढून टाकून पाणी न घालता बारीक वाटून घ्यावे. नंतर मिरच्या, कोथिंबीर, जिरे वाटून घ्यावे. आता एका पातेलात वाट्लेले मूग, बेसन, हळद, लाल तिखट(रन्ग येण्यासाठी, स्वादानुसार), मीठ(स्वादानुसार) आणि वरील वाटलेले मिश्रण एकत्रित करावे. मग कढईत तेल घ्यावे. मिडीयम हाय गॅसवर कढईत तेल तापत ठेवावे. चमच्याने किंवा हाताने डाळीचे मिश्रणाचे छोटे गोळे तेलात सोडावे. भज्यांना गोल्डन ब्राऊन रंग आला कि (अधिकचे तेल असल्यास थोडावेळ कागदावर) काढून टाकावे. सौस किंवा हिरव्या चटणीबरोबर किंवा चिंच,गूळ,खजूराच्या गोड चटणीबरोबर गरमागरम भज्या खाव्यात. :-) नोट : मला फोटो कसा टाकायचा हे माहिती नाही. :-( नाहीतर फोटो टाकला असता.

वाचने 17787 वाचनखूण प्रतिक्रिया 41

प्यारे१ Mon, 12/23/2013 - 13:24
हल्ली पाकृ अशीच असते. ;) शॅलो फ्राय, डीप फ्राय, प्युरी, मॅश वगैरे. -'आपण सारे खवय्ये' ते 'सुगरण सुगरण करते संसार' ते 'विष्णू मनोहर' ते अमुल मास्टर शेफ बघितलेला प्यारे शाला टुम लोग भजी खाने को आया के भाषा? काय ओ पेठकर काका, कधी किचन मध्ये तरी गेलाय का तरी तुम्ही सांगा तरी? ;) उगा आपलं.... (मरतंय आता प्यारे)

In reply to by प्यारे१

सूड Mon, 12/23/2013 - 13:36
काका!! भाषापण तितकीच महत्त्वाची!! आपणच असं हिंदाळलेलं किंवा इंग्रजाळलेलं रेशिप्यांमध्ये बोलत राह्यलो तर शिंची पुढची पिढी काय शिकणार आँ? पण काही म्हणा पेरभर आलं, उजव्या हातानेच तेल/ तूप घालणे, आधण. कांद्याच्या/ काकडीच्या अंगच्या पाण्यात पीठ भिजवणे असे शब्द हल्ली कमी ऐकू येऊ लागलेत हो !! आमच्यावेळी असं नव्हतं. ;) *JOKINGLY*

In reply to by प्यारे१

प्रभाकर पेठकर Mon, 12/23/2013 - 16:22
>>>>काय ओ पेठकर काका, कधी किचन मध्ये तरी गेलाय का तरी तुम्ही सांगा तरी? नाही ब्बॉ! आम्ही आपले स्वयंपाक घरातच लुडबुड करणारे.

In reply to by वासु

दिपक.कुवेत Tue, 12/24/2013 - 12:47
ईकडे अक्षरावर काय अक्षराखाली पण टिंब/टिंबे देता येतं/येतात........त्यासाठि मिपाचे नवकथाकार "जीवनभौ" चे धागे वाचा!

In reply to by वासु

मारकुटे Mon, 12/23/2013 - 13:43
तुमच्या इंग्रजीवरुन तुम्हाला कुणी काही बोलले असते तर तुम्ही मी इंग्लिश नाही तरी माझा प्रयत्न चालू आहे असे उत्तर दिले असते का? नाही. उलट आपल्याला इंग्रजी येत नाही याची शरम वाटून तुम्ही इंग्रजी सुधारले असते. अशीच शरम तुम्हाला मराठी येत नाही याची वाटू द्या आणि मराठी सुधरवा. अजूनही वेळ गेलेली नाही.

सुहास.. Mon, 12/23/2013 - 13:56
कृपया मराठीचा क्लास सुरु करावा ....( हि सुचना अर्थातच ज्याला कळायची त्याला कळली आहे ;) ) पाकृवर भाषासंबधी अजिबात धोरणे नसलेला, दिसले की खा म्हणणारा खादाड्या

In reply to by युगन्धरा@मिसलपाव

प्रभाकर पेठकर Mon, 12/23/2013 - 16:32
'काल येताना माझ्या गाडीत मला खाज आली.' शब्द जाऊ द्या आणि भावनाही राहू द्या बाजूला. एक अनुस्वार जरी चुकून पडला तरी घोर अनर्थ होऊ शकतो.

जेपी Mon, 12/23/2013 - 14:07
भजी आवडली आहेत . अवांतर :- युगंधरा @मिसलपाव यांचे बोलणे मनावर घ्या आणी 'मुरलेल्या' सॉरी उरलेल्या भजाच काय कराव यावर पुढचा लेख लगेच लिहा .

In reply to by सूड

या माणसाला कसला शिरीयसनेसच नाही. कुठेपण खिक करतो. अशाने प्रामाणीक पणे उत्तर देणार्‍याच्या मनात नको त्या शंका येतात. वरील प्रश्र्ण अतिशय गांभिर्यपुर्वक, जबाबदारीने, आणि कळकळीने विचारला आहे व त्याच्या तितक्याच प्रामाणीक उत्तराची अपेक्षा आहे.

देव मासा Wed, 12/25/2013 - 21:55
मूग भजि फार महाग मिळते गाडी वर, साधारण ३० रु. प्लेट, ति प्लेट पान इव्लि-इव्लिशि,खरच वर संगितल्या प्रमाने एवढे सोप्पे असेल तर, खटाटोप करायला हरकत नाहि, ताडी पिताना हा एक उत्तम चकना आहे.