Skip to main content

आंबोशीचे (सुखांबाचे) लोणचे

Published on शनीवार, 21/12/2013
साहित्यः एक वाटी सुकवलेल्या कैरीच्या फोडी, एक वाटी गूळ, पाव वाटी मोहरी, एक चमचा मेथी, मीठ चवीनुसार, तिखट दोन चमचे, पाणी, तेल पाव वाटी, हिंग, मोहरी, हळद फोडणीसाठी. कृती: प्रथम दोन-तीन वाट्या पाणी उकळावे. गॅस बंद करून या पाण्यात कैरीच्या फोडी घालून दहा मिनिटे झाकून ठेवावे.दहा मिनिटांनी फोडी पाण्यातून काढून चाळणीवर टाकाव्या. गूळ एका पातेल्यात घेऊन पाऊण वाटी पाणी घालून पाक करावा. गूळ विरघळला की गॅस बंद करावा. मोहरी पाणी घालून मिक्सरवर फेसून घ्यावी. मेथी तळून पावडर करावी. पाव वाटी तेलाची मोहरी, हिंग व हळद घालून फोडणी करावी. फोडणीत अर्धा चमचा तिखट घालावे, त्यामुळे छान रंग येतो. गुळाच्या पा़कात फेसलेली मोहरी, मेथी पावडर, तिखट, मीठ आणि तयार फोडणी मिसळावी. आता तयार मिश्रणात कैरीच्या फोडी मिसळाव्यात. दोन दिवसात लोणचे मस्त मुरते. चवीला एकदम तोंपासु!pickle

याद्या 8910
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

लय भारी .

In reply to by अजया

फक्त या सुकवलेल्या फोडी आहेत, ताज्या कैय्रा वापरून हे लोणचे केलेले नाही कधी! आमच्याकडे हापूस आंबे काढताना काही आंबे खाली पडतात. ह्या पडीच्या आंब्याच्या फोडी मीठ लावून वाळवून ठेवल्या जातात. पहिले ताज्या आंब्याचे लोणचे संपले की ही आंबोशी उपयोगी येते. याचा आमचुरही करून ठेवता येतो.

मस्तंच लागतं हे लोणचं. पाकृबद्दल धन्यवाद.

होय अनन्या यांनी सांगितल्या प्रमाणे आम्हीही कोकणात पडलेल्या आंब्याचे असेच लोणचे करतो. पण याला आम्च्याकडे उसरीचे लोणचे म्हणतात.