✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कोणते हे "मुल निवासी नायक" दैनिक ज्याने स्वामी समर्थ, गजानन महाराज, आणि साईबाबा संत नव्हेत असे म्हटले

प
प्रमोद देर्देकर यांनी
Mon, 12/16/2013 - 13:49  ·  लेख
लेख
माझ्या वाचनात एक अनुदिनि आली की जिने फक्त ब्राह्मण ह्या जाती विरुद्ध लिहण्याचा जणु विडा उचलला आहे. या अनुदिनीने मला अजुन एक दैनिक "मुलनिवासी नायक" जे औरंगाबाद येथुन प्रसिद्ध होते या वृत्तपत्राचे एक पान डकवले ज्यात असे लिहले होते की , साईबाबा नेमके कोण होते, त्याच बरोबर श्री गजानन महाराज आणि अक्क्लकोट स्वामी महाराजाविषयी आक्षेपार्ह लिखाण केलेले आढळले त्या पानास इथे डकवले आहे. या पत्रा द्वारे ते म्हाणतात की १८५७ साली जे बंड झाले पण ते पुढे फसले. त्या बंडात सहभागी असलेले तात्यासाहेब टोपे, आणि नानासाहेब पेशवे हे भगवे वेष परिधान करुन भुमिगत झाले (इंग्राजांपासुन दुर पळण्याण्यासाठी) आणि त्यातील तात्या टोपे हे श्री गजानन महाराज म्हणून तर नानासाहेब पेशवे हे शिर्डीचे साईबाबा म्हणून प्रकटले असे म्हटले आहे. तर अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दुसरे कोणी नसून पानिपतच्या युद्धभुमी वरुन पळालेले सदाशिवराव भावु आहेत असा शोध लावाला आहे. तर वर उल्लेखलेल्या अनुदिनीचा पत्ता अनिता पाटिल.ब्लोगस्पॉट असा आहे. सदर अनुदिनीमध्ये सवर्णद्वेष सहज पणे दिसुन येतो. खालील काही लेखाचे फक्त शिर्षक मी उदाहरणे देत आहे. १). शिवरायांचा अवसानघात करणारा 'कु'मंत्री मोरोपंत २). रामदास संत नव्हे; तर स्वराज्यातील जंत होता ३). शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला ४). शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे ५). एका लेखातील हा उल्लेख "औरंगजेबाने राजांना धर्मांतराचा आग्रह धरला नव्हता व संभाजीराजांनी धर्मांतरासाठी मुलीची मागणी केली नव्हती. राजांची हत्या झाल्यानंतर ब्राह्मणांनी आनंदोत्सव म्हणुन गुढीपाडवा सुरु केला." ( हसायला येते). ६). शेफारलेले बाळे आणि बाळ्या ( इथे सचिन, माधुरी, आणि मंगेशकरांचा दद्वेष) ७). हिंदू नावाचा कोणताही धर्मच अस्तित्वात नाही! ८). या पहा पु ल देशपांडेच्या अश्लील कोट्या ९). ब्राह्मणांच्या अश्लिल शिव्या १०). सनी लिओनला भारतरत्न का नाही? Why Bharat Ratna Not Been Conferred On Sunny Leone (हसून हसून पुरी वाट :-))) ) ११). अटल अटल, बोलत सुटल (वाजपेयीं विषयी द्वेष) १२). लोकमान्य नव्हे भटमान्य ११). प्लँचेटसाठी सावरकरांनाच आवाहन का? सावरकर : फाळणीचे गुन्हेगार ही अनुदिनी संपूर्णपणे ब्राह्मणद्वेषी लिखाण करण्यास वाहलेली आहे. माझी आपल्या मी.पा.वरिल श्री. जयंत कुलकर्णी , श्री. इन्द्रजित पवार या इतिहासप्रेमी सदस्यांना विनंती आहे की त्यांनी यावर काही प्रकाश टाकावा. धन्यवाद
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
44727 वाचन

💬 प्रतिसाद (159)

प्रतिक्रिया

देवून देवाने बांधलेल नाहीये .

बॅटमॅन
गुरुवार, 12/19/2013 - 16:05 नवीन
देवून देवाने बांधलेल नाहीये . ते माणसाने बांधलेल आहे . तेव्हा देवळ वाचवण्याची जबाबदारी माणसांची आहे . देवाची नाही .
इन द्याट केस, काही क करता वर नुस्ता तमाशा बघत बसणार्‍या आणि भक्ती केली नाही म्हणून लहान मुलागत चिडणार्‍या देवाची उपासना करणे या भंपक फंदात लोकांनी का म्हणून पडावे? सगळाच भ्रामक अन भंपक प्रकार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस

हे लेखन ब्राह्मणद्वेष

अवतार
गुरुवार, 12/19/2013 - 22:55 नवीन
करण्याच्या उद्देशाने लिहिलेले नसून ब्राह्मणांना त्यांच्या ब्राह्मणत्वाची आठवण करून देण्यासाठी लिहिलेले आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही भारतीय संविधानाची आधारभूत तत्वे या देशात परंपरेने चालत आलेल्या वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था यांच्या मुळांवरच घाव घालत आहेत. ही प्रक्रिया थांबवून ती उलट फिरवणे हेच असल्या लेखनाचे उद्दिष्ट आहे. म्हणजेच वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था ह्यांची आधारभूत तत्वे असल्या प्रचारकी लेखनाच्या माध्यमातून जनतेच्या विचारप्रक्रियेत खोलवर रुजवून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्यांच्या मुळांवरच घाव घालणे हा खरा उद्देश आहे.
  • Log in or register to post comments

मनात ब्राह्मणांविषयी ज्या

म्हैस
गुरुवार, 12/26/2013 - 14:54 नवीन
मनात ब्राह्मणांविषयी ज्या काही बर्‍या वाईट भावना आहेत त्या तुम्च्या पाशीच ठेवा. इथे मळमळ काढु नका. अजुन बरेच धागे आहेत तुम्ची ब्राहणांविषयीची मते सांगायला. तिकडे बोला.
हा हा . झोंबल न. सत्य कटूच असतं . बरं असे कुठले धागे आहेत ते तरी जर सांगा . अहो तुम्हाला नुसतं बोललं तर एवढा राग येतो … मग ज्यांनी ते सोसलंय त्यांनी काय म्हणावं? आणि तुम्ही हाथ पाय आपटल्याने जे आहे ते बदलणार नहिये. मला दटावून तुम्ही गप्पं बसवलं हो पण सगळं जग बोलताय त्याचं काय करणार? बाकी तुमचा इतिहासाचा अभ्यास मला चांगलाच माहित आहे .
बाकी प्रत्येक धाग्यावर आपला आयडी सार्थ करुन दाखवायचं ठरवलंच असाल तर तुमचं चालू द्या.
मी कुठल्या धाग्यावर प्रतिसाद द्यायचा कुठल्या नाही हे तुम्ही सांगायची गरज नहि. तुम्हाला आवडत नसेल तर वाचू नका माझे प्रतिसद. @बॅटमॅन --- हाथी जाता हे जाने दो, कुत्ता भोकता हे भोक्ने दो :-)
  • Log in or register to post comments

म्हणजे माणसाने देवाच्या

बॅटमॅन
गुरुवार, 12/26/2013 - 14:56 नवीन
म्हणजे माणसाने देवाच्या भानगडीत पडू नये असंच ना =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस

तसं नाय काय !!

सूड
गुरुवार, 12/26/2013 - 17:25 नवीन
हाथी जाता हे जाने दो, कुत्ता भोकता हे भोक्ने दो, म्हैस हय लिखने दो !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अगदी अगदी!!! तिसरे क्रियापद

बॅटमॅन
गुरुवार, 12/26/2013 - 18:25 नवीन
अगदी अगदी!!! तिसरे क्रियापद अंमळ रेकलेसपणे सुचविल तर अजून बरें, कसें ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तेच लिहीणार होतो, पण हल्ली

सूड
गुरुवार, 12/26/2013 - 18:34 नवीन
तेच लिहीणार होतो, पण हल्ली त्या क्रियापदाने प्रतिसाद उडतात म्हणे. म्हणून थोडं डायल्युट केलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हल्ली कशाने प्रतिसाद उडतील

बॅटमॅन
गुरुवार, 12/26/2013 - 18:36 नवीन
हल्ली कशाने प्रतिसाद उडतील याची ग्यारंटी नाहीच्चे म्हणा तशी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हा हा . झोंबल न. सत्य कटूच

पिलीयन रायडर
गुरुवार, 12/26/2013 - 17:41 नवीन
हा हा . झोंबल न. सत्य कटूच असतं . बरं असे कुठले धागे आहेत ते तरी जर सांगा . अहो तुम्हाला नुसतं बोललं तर एवढा राग येतो … मग ज्यांनी ते सोसलंय त्यांनी काय म्हणावं? आणि तुम्ही हाथ पाय आपटल्याने जे आहे ते बदलणार नहिये. मला दटावून तुम्ही गप्पं बसवलं हो पण सगळं जग बोलताय त्याचं काय करणार? बाकी तुमचा इतिहासाचा अभ्यास मला चांगलाच माहित आहे .
शुभेच्छा..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा