येसर आमटी
बर्याच दिवसांपासून ही पाककृती लिहायची राहून गेली होती. मागे महालक्ष्म्यांच्या लेखात उल्लेख केलेल्या येसर आमटीची ही पाकृ.
मराठवाड्यातली पारंपारिक आमटी. बर्याच लग्न कार्यात पाहुण्यांना जाताना शिदोरी म्हणून मसाला नि मेतकूट देतात. मराठवाड्यात येसर नि मेतकूट देतात. खूप भाज्यांची रेलचेल मराठवाड्यातल्या जेवणात अजूनही नसते. ग्रामीण भागात तर असेल ती पालेभाजी, घट्ट वरण आणि भाकरी हे जेवणच कॉमन आहे. अशा भागात चवबदल, चमचमीत झणझणीत काही खायचं असेल तर येसर करतात. लग्नकार्यात घरी पाहुण्यांची खूप गर्दी असे. आठ आठ दिवस आधी नि नंतर वर्हाडी मंडळी कामाला जुंपलेली असत. अशा वेळी पटकन होणारा हा 'कोरड्यास' फार महत्त्वाचा. कार्याच्या तयारीत मसाले भाजण्याबरोबर येसर भाजणे ठरलेलेच. मुहूर्त करायच्या वेळी आणि सूप वाजतं तेव्हा पानात येसर हवाच. पाहुणे परत जातानाही लाडू चिवड्यासोबत येसर नि मेतकुटाचे पुडे देण्याची प्रथा आजही आहे. मला वाटतं की कामाच्या गर्दीत कमी वेळात स्वयंपाक करायचा असतो तेव्हा करायला सोपा नि खमंग म्हणून या पदार्थाला येवढे महत्त्व असावे. महाल्क्ष्म्यांच्या दिवशी ज्यांच्या घरी रात्रीचा नैवेद्य असतो त्यांच्याकडे दुपारचे जेवण भाजलेले खावे म्हणून येसर नि भाजलेल्या डाळ तांदळाची खिचडी असते.
आजही माझ्या घरात खिचडी नि येसर हा झटपट होणारा नि सर्वांना आवडणारा हा प्रिय पदार्थ आहे. माझे तर हे कम्फर्ट फूड आहे. पावसातून भिजून आल्यावर किंवा बाहेर कडाक्याच्या थंडीत फिरून आल्यावर येसर ओरपणे म्हणजे स्वर्गसुख !
लहानपणी आजी बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत वाटीत येसर वाढायची. आम्हा मुलांना तो कमी तिखट लागावा म्हणून त्यात कच्च्या तेलाची धार. मग ते तेल येसरावर चांदण्यांसारखं चमकायचं. तयार व्हायची चांदण्यांची आमटी ! माझी लेकही ही चांदण्यांची आमटी आवडीने खाते.
तर हे पुराण पुरे करून मुख्य कृती आता लिहिते.
लागणारे साहित्य :
गहू - १ वाटी
चणा डाळ - १ वाटी
ज्वारी - १/२ वाटी
बाजरी - १/२ वाटी
धणे - १/२ वाटी
सुकं खोबरं / कीस - १/२ वाटी
जिरे - २ टे स्पू
मिरे - २ टे स्पू
लवंग - ७-८
मसाला वेलची - २
दालचिनी - बोटाच्या दोन पेरांएवढी
दगडफूल - २ टे स्पू
आमटीसाठी -
आमटी पीठ - २ टे स्पून
लसूण - ५-६ पाकळ्या किंवा एक मध्यम कांदा चिरून
लसूण घालणार असाल तर कढीलिंबाची ५-६ पानंही घालायची.
तेल
मोहरी,जिरे
हळद
४ वाट्या पाणी
कोथिंबिर वगैरे..
मीठ
क्रमवार पाककृती:
गहू, डाळ, ज्वारी बाजरी हे कोरडेच;वेगवेगळे मंद आचेवर रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे. मग मसाल्याचे पदार्थ थोड्या तेलावर घरभर घमघमाट सुटेपर्यंत भाजून घ्यायचे. एकत्र करून मिक्सरवर कोरडे बारीक दळून घ्यायचे. आता बरणीत भरून ठेवा. पुढचे ३-४ महिने जेव्हा जेव्हा झटपट पण खमंग आमटी खावी वाटेल तेव्हा करा.
आमटीची कृती
आमटीचे पीठ वाटीभर पाण्यात नीट मिसळून घ्या. पातेल्यात तेल गरम करा. जिरं मोहरी लसूण कढिलिंबाची फोडणी करा. त्यावर हे वाटीतलं पीठ घाला. वरून अजून ३ वाट्या पाणी टाका. साधारण ५ मिनिटे उकळू द्या. येसर तयार.
गरम भात, खिचडी किंवा भाकरी पोळी यात कुस्करून ओरपा. चव वाढवण्यासाठी लिंबूपण घाला.
वाढणी/प्रमाण:
मसाला साधारण १/४ किलो , २ टे स्पू आमटी पिठाची ४ - ५ वाट्या आमटी होते.
डाएटवाल्यांना गवार, दुधी, वांगे अशा भाज्यांमध्ये रस्सा करायचा असेल तर हे पीठ दाणे किंवा खोबर्याच्या वाटणाऐवजी वापरता येईल.
तळटीप : या आमटीचा फोटू नाही म्हणून चुकचुकणे म्हणजे सुरेल गाणं ऐकताना गायकाचा चेहरा दिसत नाही म्हणून चुकचुकण्यासारखे आहे ;)
वाचने
27847
वाचनखूण
प्रतिक्रिया
42
वाचनखुण साठवत आहे . बाकी येसर
In reply to वाचनखुण साठवत आहे . बाकी येसर by जेपी
हो
अनवट पाकॄ !!
नवीन पदार्थ कळला.
नवीनच पदार्थ!
In reply to नवीनच पदार्थ! by पैसा
हेच
'येसर मेतकुट' हे नाव ऐकलं होतं
मनापासुन धन्यवाद...
In reply to मनापासुन धन्यवाद... by मुक्त विहारि
आँ मुवि.....
वाह!!
नवीन पदार्थ समजला
छान पाककृती.
वेगळाच प्रकार. बाकी फोटो
आमटीचा नवीन प्रकार समजला.
बहुगुणी, तयार पीठे वापरून
In reply to बहुगुणी, तयार पीठे वापरून by मितान
लाल तिखट.
In reply to लाल तिखट. by प्रभाकर पेठकर
धन्यवाद काका
In reply to धन्यवाद काका by मितान
धन्यवाद.
माहित नसलेली पाकृ
In reply to माहित नसलेली पाकृ by प्रीत-मोहर
ए बयो, ट्राय 'मारू' नको प्लीज
अरे वा वेगळ्याच प्रकारच्या
भारी!!!
खाणे सोडा हे नावही
करून पाहते!
येसुर
In reply to येसुर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चला हा शब्द आलाय
In reply to चला हा शब्द आलाय by बॅटमॅन
व्याख्या
In reply to व्याख्या by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ओह अच्छा, धन्यवाद सर!!
In reply to ओह अच्छा, धन्यवाद सर!! by बॅटमॅन
कंदुरी... आह्ह्हा
In reply to कंदुरी... आह्ह्हा by अभ्या..
ओहो! येतोच थांब!!!
In reply to येसुर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एक नं. प्रतिसाद.....कारण.....
In reply to येसुर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर आम्हाला पण बोलवा ह. प्लीजच
In reply to सर आम्हाला पण बोलवा ह. प्लीजच by त्रिवेणी
मी डोंबिवलीला राहतो.....
In reply to मी डोंबिवलीला राहतो..... by मुक्त विहारि
डोंबोलीत कधी कट्टा झाला आता
बिरुटे सर, घरोघरीच्या गरम
मस्तच गं,मितान.
व्वा व्वा
मस्तच गं मितान
मी येसरची आमटी बनवली....
मस्त !
खंगरी !! मराठवाड्यातला
अहाहा...