भ्रमण जर्मनी.. ०१ - म्युनिक
--------------------------------------------------------------------------
भ्रमण जर्मनी.. ००
भ्रमण जर्मनी.. ०१ - म्युनिक
भ्रमण जर्मनी.. ०२ - साल्झबर्ग (ऑस्ट्रिया)
भ्रमण जर्मनी.. ०३ - नॉयश्वानस्टाईन कॅसल
भ्रमण जर्मनी.. ०४ - कलोन
--------------------------------------------------------------------------
पहिला विकेंड - म्युनिक.
'न्युरेम्बर्ग' दक्षिण जर्मनीत आहे. या भागाला 'बवेरीया' म्हणतात. बवेरीयान स्टेटची राजधानी 'म्युनिक'चा दौरा ठरला. म्युनिकला जर्मन्स 'München- म्युन्शेन' म्हणतात. ऑक्टोबर्-फेस्ट इथे म्युनिकमधेच असतो.
४२ युरोत ५ जणांचा विकेंड पास मिळतो. रात्री १२ पासुन २१ तास पुढे जर्मनीत कुठेही ट्रेनने फिरता येते. युरोपात एकंदरीतच कनेक्टीव्हिटी उत्तम.ट्रेनचा प्रवास अत्युत्तम..
1.जाताना मस्त हिरवेगार नजारे, चर्च, आणी अशी घरे दिसत होती. या घरांवर खापर्यांऐवजी सोलार पॅनल आहे. व्हॉट अॅन ऐडीया सरजी..
2. म्युनिकमधे फिरायला आम्ही हा ऑप्शन सेलेक्ट केला.२० युरोत एका दिवसाचा पास होता. याला Hop-on-hop-off बस म्हणतात. अशा दिसणार्या कुठल्याही बसमधे कुठेही hop-on- कुठेही hop-off व्हा.
बाल्कनीत बसुन म्युनीक बघायची मजाच काही और..
हे पहा..
3. दुसरा ऑप्शन हा होता.. यांना सेगवे टुर्स म्हणतात. गावभर या मुंग्यांची रांग असते. मोटर बसविलेल्या, बॅटरीवर चालणार्या या गाड्या. आजकाल दिल्लीत पण हे चालु आहे असं ऐकलंय..
4. पण एक समजत नव्हतं.. स्साला, एवढी गर्दी का आहे? माणसंच्-माणसं चोहीकडे होती. असं वाटत होतं की, ज्योतीबाची जत्राच भरलीय.. सगळीकडे गाणी, बॅन्ड, नाच, धिंगाणा अन बियरचा तर महापूर..
शेवटी एकाला पकडुन विचारलंच, "काय रे बाबा.. का एवढी गर्दी ?"
तेंव्हा समजलं.. म्युनीक वॉज सेलेब्रेटींग इट्स 855th बर्थडे.
१५-१६ जुन.
काय भाग्य.. काय भाग्य.. गेल्या जन्मीचं पुण्य मोठं, म्हणुन म्युनिकचा 'बर्डे' साजरा करायला मिळाला..
५. एका परफॉर्मन्समधे 'बॉन्ड थिम' ऐकण्यात गुंतलेली चिमुरडी-
6. चौकात बियरची व्यवस्था अशा झोपड्यांत करण्यात आली होती.. खायची प्यायची चंगळ होती.
7. Angle of peace- इ.स. १८७० च्या फ्रॅन्को-जर्मन युद्धानंतर हे उभारण्यात आलं होतं.
8. एक चर्च-
9. जवळच्याच एका होटेलबाहेर हे कुत्रं बांधलं होतं.
German Shepherd तर फेमस आहेतच. जर्मनीत एखाद्या शिंगराएवढी (शिंगरु) कुत्री पहायला मिळाली.
तिथला प्रत्येक भिकारी १-२ कुत्री पाळतो. बेघर, की ज्याच्याकडे ते कुत्रं पाळण्याचा परवाना आहे त्यांना सरकार भत्ता देते असे समजले. ते काहिही असेल,पण त्या बिचार्या माणसाकडे आपलं असं, जीव लावणारं कुणीतरी आहे ना.. बास झालं..
10. मेरीयनप्लाट्झ. Marienplatz- इथे सर्वात जुना चौक आहे. सेंट मेरी'ज/ ओल्ड लेडी'ज चौक. सायकल रिक्षा सुद्धा मिळतात इथे..
11. बवेरीयन नॅशनल मुझीयम-
12. लुडविग-I
13. जर्मन पारंपारीक वेशभूषेतले आजी-आजोबा
14. आणी या पारंपारीक पोरीला 'फोटु काढु का?' म्हणताच लगेच मॅडमने ही पोज दिली..
15. कदाचीत फेस्टिवलमुळे जागोजागी असले जिवंत पुतळे दिसत होते.. आणी मागे 'जत्रा'..
16. आणी रस्त्यांवर सुद्धा कला बहरली होती. यातला पहिलं चित्र ज्या कॅसलचं आहे, तो Neuschwanstein castle आमचं पुढचं टारगेट ठरलं. जगातला सर्वात जास्त भेट दिला जाणारा कॅसल आहे हा..
17. Nymphenburg Palace- बवेरीयन राजांचं गतवैभव. मोठं पॅलेस आहे.. १६६४ ला बांधण्यात आलं होतं.
वेळ अपुरा पडल्याने जास्त पाहता नाही आलं.
18. त्यावेळेस एक राजेशाही लग्न चालु होतं. त्यांची गाडी-
19. ऑलिंपिक स्टेडियम- इथे १९७२ चे आयोजन झाले होते. इथेच एक अॅक्वेरीयम पण आहे. BMW village च्या अगदी जवळ आहे हे.
20. BMW Headquarters- अप्रतीम.
'बालाजी मोटर वर्क्स' नाही हां.. बवेरीयन मोटर वर्क्स. जगातल्या काही ३-४ लिडिंग कार्सपैकी एक..
21. या इमारती समोरच त्यांच्या 'कार' आणी 'बाईक्स' शो साठी ठेवल्या आहेत. मी BMW च्या 'बायका' पहिल्यांदाच पाह्यल्या.
शोरुम मधील Phantom car-
22. BMW, फोक्स्वॅगन, 'मर्सी'वाली जर्मनी.. फरारी, पोर्श, लॅबोर्गिनी.. सगळ्या डोळं भर्रुन बघितल्या..
..
यातली एखादी घ्यायचा विचार केला होता.. पण यांचा ग्राउंड क्लियरंस एवढा कमी होता की पुण्यात चालणार नाहीत म्हणुन..
नाहीतर असल्या बाबतीत मी खर्च करायला मागे-पुढे बघतच नाही.. होऊ दे खर्च. ;)
23. FC Bayern Munich च्या 'जर्सी' वाली जर्मनी..
Allianz Arena football stadium. (हे एकच चित्र जालावरुन साभार)
24.घरी/शेजारी फोटु दावताना म्हटलं, बघा किती स्वच्छ आहे पाणी.. तुमच्यासारखं निर्माल्य टाकत नाहीत ते लोक..
तर बायकांचं उत्तर- "असायचंच.... देवाला फुलं वाहुन माहित आहे काय त्यांना??"
बायका रॉक.. SYG shox..
25. लास्ट बट नॉट द लिस्ट..
आपल्याकडे ट्रॅक्टरचा उपयोग माल वाहुन न्यायला करतात. आणी जर्मनीत पण?? :D
या मुलींनी नुसता उच्छाद मांडला होता.. एका म्हातार्याला 'बकरा' करुन छुपं व्हिडिओ शूटींग चाललं होतं.
--------------------------------
जर्मन कलीग रिसिव्ह करायला आला होता.. आज 'आवडी'त बसायची हौस पुर्ण झाली. सुरुवात चांगली झाली.पुढे.. थोड्या वेळामागे पाउस झाला होता. 'क्षणात येते सरसर शिरवे…' टाईप वातावरण होते. तशी हिरवळ तर वर्षभर असतेच म्हणा.. थोड्याच वेळात कुकरच्या शिट्ट्यांनी हॉटेल Maximilian दणाणून गेले. मसालेभाताच्या आणी पंजाबी तडक्याच्या घमघमाटाने Nuremberg चा Gostenhof परिसर दरवळून गेला. जेवल्यावर मस्त झोप लागली. पहाटे ४.३० ला सूर्योदय, अन रात्री ९.३० ला सुर्यास्त व्हायचा. त्यानंतरही प्रकाश असायचाच. म्हणजे १७-१८ तासांचा दिवस. सहीच ना?. सोमवारपासुन ऑफिसची गडबड सुरु झाली. आठवड्याचा Travel पास २१ युरो मध्ये होता. महत्वाचं म्हणजे हाच पास कोणत्याही लोकल-बस, ट्राम, मेट्रोला चालतो. लगेच दुसर्याच दिवशी जाम उकडायला लागले होते. आणी प्रॉब्लेम असा होता, की हॉटेलात किंवा ऑफिसमध्ये 'हिटर' तर होते, पण AC किंवा Fan यातले कुठेच, काहीच नव्हतं. जर्मन लोक्स 'समर' एन्जोय करत होते. पण आम्हाला ३०-३२ डिग्रीत कासावीस व्हायला लागलं होतं. Room service ला फोन करून AC ची व्यवस्था करायला सांगितलं, पण त्यांनी चक्क नकार दिला. आम्ही चौघेही अगदी तिसर्या महायुद्धाच्या तयारीत रिसेप्शनवर जाऊन धडकलो. पण तिथल्या सुबक ठेंगण्या बघताच आम्ही शरणागती पत्करली. दोघीतली १ सु.ठें. बाजूलाच कळफलक बडवत होती. दुसरीने आमची समस्या ऐकून घेतली आणी "२ मिनिट" म्हणुन ती फोनवर व्यस्त झाली. आता आमचा बेंगॉली बाबू वैतगलाच. तीला उद्देशुन हिंदीतच म्हणाला, "साला एक तो तेरी ये जर्मनी इतनी गरम.. और उपरसे तू इतनी गरम.. चोलबे ना.." आम्ही लगेच "ख्या..ख्या..ख्या.." तेवढ्यात कळफलकवाली समोर येत म्हणाली "We have arranged table fan in your room" अक्सेंट ओळखीचा वाटला, चौघांच्याही माना सिंक्रोनाईझ होउन तीच्याकडे वळल्या. अरे ही तर आपल्यातलीच.. नेमप्लेट-"दिव्याराणी".. गरमी अजुनच वाढली. ऊ तेरी.. ये तो सब समझती है यार.. आम्ही फक्त Danke म्हणालो आणी कलटी मारली. (थॅन्क्यु) च्यायला हे इंडियन्स ना.. कुठेही भेटतात. ;) १ चित्र हजार शब्द बोलून जातं म्हणे.. तर तिथला Summer काहीसा असा होता..
पहिला विकेंड - म्युनिक.
'न्युरेम्बर्ग' दक्षिण जर्मनीत आहे. या भागाला 'बवेरीया' म्हणतात. बवेरीयान स्टेटची राजधानी 'म्युनिक'चा दौरा ठरला. म्युनिकला जर्मन्स 'München- म्युन्शेन' म्हणतात. ऑक्टोबर्-फेस्ट इथे म्युनिकमधेच असतो.
४२ युरोत ५ जणांचा विकेंड पास मिळतो. रात्री १२ पासुन २१ तास पुढे जर्मनीत कुठेही ट्रेनने फिरता येते. युरोपात एकंदरीतच कनेक्टीव्हिटी उत्तम.ट्रेनचा प्रवास अत्युत्तम..
1.जाताना मस्त हिरवेगार नजारे, चर्च, आणी अशी घरे दिसत होती. या घरांवर खापर्यांऐवजी सोलार पॅनल आहे. व्हॉट अॅन ऐडीया सरजी..
2. म्युनिकमधे फिरायला आम्ही हा ऑप्शन सेलेक्ट केला.२० युरोत एका दिवसाचा पास होता. याला Hop-on-hop-off बस म्हणतात. अशा दिसणार्या कुठल्याही बसमधे कुठेही hop-on- कुठेही hop-off व्हा.
बाल्कनीत बसुन म्युनीक बघायची मजाच काही और..
हे पहा..
3. दुसरा ऑप्शन हा होता.. यांना सेगवे टुर्स म्हणतात. गावभर या मुंग्यांची रांग असते. मोटर बसविलेल्या, बॅटरीवर चालणार्या या गाड्या. आजकाल दिल्लीत पण हे चालु आहे असं ऐकलंय..
4. पण एक समजत नव्हतं.. स्साला, एवढी गर्दी का आहे? माणसंच्-माणसं चोहीकडे होती. असं वाटत होतं की, ज्योतीबाची जत्राच भरलीय.. सगळीकडे गाणी, बॅन्ड, नाच, धिंगाणा अन बियरचा तर महापूर..
शेवटी एकाला पकडुन विचारलंच, "काय रे बाबा.. का एवढी गर्दी ?"
तेंव्हा समजलं.. म्युनीक वॉज सेलेब्रेटींग इट्स 855th बर्थडे.
१५-१६ जुन.
काय भाग्य.. काय भाग्य.. गेल्या जन्मीचं पुण्य मोठं, म्हणुन म्युनिकचा 'बर्डे' साजरा करायला मिळाला..
५. एका परफॉर्मन्समधे 'बॉन्ड थिम' ऐकण्यात गुंतलेली चिमुरडी-
6. चौकात बियरची व्यवस्था अशा झोपड्यांत करण्यात आली होती.. खायची प्यायची चंगळ होती.
7. Angle of peace- इ.स. १८७० च्या फ्रॅन्को-जर्मन युद्धानंतर हे उभारण्यात आलं होतं.
8. एक चर्च-
9. जवळच्याच एका होटेलबाहेर हे कुत्रं बांधलं होतं.
German Shepherd तर फेमस आहेतच. जर्मनीत एखाद्या शिंगराएवढी (शिंगरु) कुत्री पहायला मिळाली.
तिथला प्रत्येक भिकारी १-२ कुत्री पाळतो. बेघर, की ज्याच्याकडे ते कुत्रं पाळण्याचा परवाना आहे त्यांना सरकार भत्ता देते असे समजले. ते काहिही असेल,पण त्या बिचार्या माणसाकडे आपलं असं, जीव लावणारं कुणीतरी आहे ना.. बास झालं..
10. मेरीयनप्लाट्झ. Marienplatz- इथे सर्वात जुना चौक आहे. सेंट मेरी'ज/ ओल्ड लेडी'ज चौक. सायकल रिक्षा सुद्धा मिळतात इथे..
11. बवेरीयन नॅशनल मुझीयम-
12. लुडविग-I
13. जर्मन पारंपारीक वेशभूषेतले आजी-आजोबा
14. आणी या पारंपारीक पोरीला 'फोटु काढु का?' म्हणताच लगेच मॅडमने ही पोज दिली..
15. कदाचीत फेस्टिवलमुळे जागोजागी असले जिवंत पुतळे दिसत होते.. आणी मागे 'जत्रा'..
16. आणी रस्त्यांवर सुद्धा कला बहरली होती. यातला पहिलं चित्र ज्या कॅसलचं आहे, तो Neuschwanstein castle आमचं पुढचं टारगेट ठरलं. जगातला सर्वात जास्त भेट दिला जाणारा कॅसल आहे हा..
17. Nymphenburg Palace- बवेरीयन राजांचं गतवैभव. मोठं पॅलेस आहे.. १६६४ ला बांधण्यात आलं होतं.
वेळ अपुरा पडल्याने जास्त पाहता नाही आलं.
18. त्यावेळेस एक राजेशाही लग्न चालु होतं. त्यांची गाडी-
19. ऑलिंपिक स्टेडियम- इथे १९७२ चे आयोजन झाले होते. इथेच एक अॅक्वेरीयम पण आहे. BMW village च्या अगदी जवळ आहे हे.
20. BMW Headquarters- अप्रतीम.
'बालाजी मोटर वर्क्स' नाही हां.. बवेरीयन मोटर वर्क्स. जगातल्या काही ३-४ लिडिंग कार्सपैकी एक..
21. या इमारती समोरच त्यांच्या 'कार' आणी 'बाईक्स' शो साठी ठेवल्या आहेत. मी BMW च्या 'बायका' पहिल्यांदाच पाह्यल्या.
शोरुम मधील Phantom car-
22. BMW, फोक्स्वॅगन, 'मर्सी'वाली जर्मनी.. फरारी, पोर्श, लॅबोर्गिनी.. सगळ्या डोळं भर्रुन बघितल्या..
..
यातली एखादी घ्यायचा विचार केला होता.. पण यांचा ग्राउंड क्लियरंस एवढा कमी होता की पुण्यात चालणार नाहीत म्हणुन..
नाहीतर असल्या बाबतीत मी खर्च करायला मागे-पुढे बघतच नाही.. होऊ दे खर्च. ;)
23. FC Bayern Munich च्या 'जर्सी' वाली जर्मनी..
Allianz Arena football stadium. (हे एकच चित्र जालावरुन साभार)
24.घरी/शेजारी फोटु दावताना म्हटलं, बघा किती स्वच्छ आहे पाणी.. तुमच्यासारखं निर्माल्य टाकत नाहीत ते लोक..
तर बायकांचं उत्तर- "असायचंच.... देवाला फुलं वाहुन माहित आहे काय त्यांना??"
बायका रॉक.. SYG shox..
25. लास्ट बट नॉट द लिस्ट..
आपल्याकडे ट्रॅक्टरचा उपयोग माल वाहुन न्यायला करतात. आणी जर्मनीत पण?? :D
या मुलींनी नुसता उच्छाद मांडला होता.. एका म्हातार्याला 'बकरा' करुन छुपं व्हिडिओ शूटींग चाललं होतं.
--------------------------------
वाचने
18257
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
अप्रतिम वर्णन आणि अत्यंत देखणे फोटो
एका लेखात किती माहिती दिलीय
@ एका लेखात किती माहिती दिलीय
झक्कास
पहिल्या वाक्यापासून आणि....
मस्त :)
In reply to मस्त :) by Atul Thakur
धन्यवाद.
पहिला फोटू मंजे.. फ्रेश..
मस्त!
म्युनिकचे अजुन काही फोटु..
येनो यसवाञजी, खल्लास मजा
In reply to येनो यसवाञजी, खल्लास मजा by बॅटमॅन
@आणि आवडलेल्या फोटूंमध्ये
In reply to @आणि आवडलेल्या फोटूंमध्ये by अत्रुप्त आत्मा
अआ, धन्यवाद. फोटुबद्दल दखल
In reply to अआ, धन्यवाद. फोटुबद्दल दखल by यसवायजी
ओहोहो...... 'कै' से माडू
मस्त प्रवास आणि फोटो. माहिती
भन्नाटच! ऐश केलासा म्हणा की!
कसले सुंदर फोटो आहेत यार
भारीच रे एसवायज्या.
भा री ही !
In reply to भा री ही ! by आदूबाळ
दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.
In reply to भा री ही ! by आदूबाळ
संपूर्ण बवेरीया मध्ये एक लिटर
In reply to संपूर्ण बवेरीया मध्ये एक लिटर by निनाद मुक्काम …
आभार...
In reply to आभार... by यसवायजी
तुम्हाला खरड केली आहे.
बोले तो एकदम झकास
नेत्रसुखद ...
उत्सुकता वाटते आहे ...वाढते आहे !
In reply to उत्सुकता वाटते आहे ...वाढते आहे ! by चौकटराजा
धन्यवाद.
वा वा मस्त फोटू यसवायजी ,
एकदम भारी.
पुभाप्र !!
छान
फोटो नि लेख दोन्ही छान
फस्कलास!
रिफ्रेशिंग !!
फोटु
मस्त !
मस्तचं...वाचनखुण साठवली आहे..
In reply to मस्तचं...वाचनखुण साठवली आहे.. by शिद
जीवन्सत्वाचे = जीवनसत्वाचे