=======================
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४
=======================
दुपारची वामकुक्षी घेउन आम्हि फ्रेश झालो आणि मिनी सयाम बघायला बाहेर पडलो. मिनी सयाम म्हणजे प्रत्येक देशातील वर्ल्ड फेमस स्टॅच्यु/प्रतिक घेउन त्यांच्या छोटया प्रति बांधल्यात. येण्यार्या फोटोत त्या पुढे दिसतीलच. पण एवढया सगळ्या भाउगर्दित आपल्या भारताचं प्रतिनिधीत्व करणारं काहिचं नसाव ह्याचा खेद वाटला!
१. मिनी सयामचं प्रवेशद्वार. दारातच असलेला हा मस्याकॄती पुतळा लक्ष वेधुन घेतो
२. थाई रावण
३. जरा पुढे गेल्यावर हि फ्रान्सची वास्तु लागते
४. नाम डे मुन: कोरीया
५. आयफेल टॉवर आणि पॅरीस डि चॅलीओट: पॅरीस
६. सिंगापुर/ऑस्ट्रेलीया
७. रीओ-डि-जानीरो: ब्राझील
८. ऑटोमीयमः बेल्जीयम
९. टाइन-टॅनः चायना
१०. शेषाधीत विष्णु आणि लक्ष्मी; वरती ब्रम्हा
११. अमेरीकेचं काहि (च) नाहि असं कधी कुठे होईल का??
१२. ग्रीस; मागे ईजीप्त
१३. आता काहि थाई प्रतिकृती......ह्यातलं काहि काहि आम्हि बँकॉक मधे प्रत्यक्ष बघणार होतो
१४. ईतर असचं काहि. बागेत हिरवळ मात्र सगळिकडे आहे. बघुनच ईतकं प्रसन्न वाटतं ना. कोण त्या चालण्यार्या हिरवळिकडे हळुच बघतयं :D
१५. अशीच काहि ईतर थाई मंदिरे
१६. पिकासा (ईटली)
१७. लंडन ब्रिज
१८. ह्याला नक्कि काय म्हणतात माहित नाहि पण राज कपुरच्या "संगम" पिक्चर मधे पहिल्यांदा पाहिल्याचं आठवतय. पाण्यात पैसे टाकुन आपल्या मनातील ईच्छा पुर्ण होतात असं म्हणतात.
१९. ड्रायव्हरला यायला अजुन वेळ होता तेवढयात माझ्या मित्राचं लक्ष "गो-कार्ट" कडे गेले. मग अनपेक्षीतपणे चालुन आलेली संधी आम्हि थोडिचं सोडणार? चला कोणाला कोणती गाडि हवी आहे बोला??
२०. स्पीड चा थssssssर्रार अनुभवायला सज्ज......और येsssssssअपनी तो निकल पडि
२१. आमचं कार्टिंग झाल्यावर एव्हाना पोटात कावळ्यांनी पण "गो-कार्टिंग" सुरू केलेलं. मग काय पिझ्झा हटच्या गार्लिक ब्रेड, मेन पिझ्झा आणि ह्या अफलातुन चवीच्या मॉकटेलनी त्यांना ब्रेक लावला :D
२२. असचं टिवल्या-बावल्या करत, नाईट लाईफची मजा (दुरुनच बरं) पहात हॉटेलवर परतलो. उद्या दुपारी चेक आउट करुन फायनल डेस्टिनेशन आणि टुरचा थेवटचा थांबा बँकॉक कडे प्रयाण करायचं होतं
वाचने
4659
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
+ १
In reply to :) by कोमल
भारतीयांच्या अभिमानाचे प्रतीक ताजमहाल
फोटो मस्त आलेत. पण 'ताज' नाही
छानच.
ताज महालाला विसरले की काय हे
बनवायला जमत नाही हो, कठीण आहे
In reply to ताज महालाला विसरले की काय हे by रेवती
तसं नसेल, ताजमहाल बनवल्यानंतर
In reply to बनवायला जमत नाही हो, कठीण आहे by शैलेन्द्र
शैलेंद्र, प्यारे, सापडला हो
तुम्ही लेख नीट वाचत नाही नि
In reply to शैलेंद्र, प्यारे, सापडला हो by रेवती
अरेच्या कमाल आहे
अरे मिनि सियाम लिहीलेला फोटो
In reply to अरेच्या कमाल आहे by दिपक.कुवेत