✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

रणधुमाळीनंतरची निरीक्षणे, विश्लेषणे आणि आडाखे

व
विकास यांनी
Wed, 12/11/2013 - 08:17  ·  लेख
लेख
बघता बघता विधानसभा निवडणुका संपल्या, निकाल बाहेर आले आणि निकाल लागले देखील. ह्या धाग्याचा उद्देश हा आधीच्या धाग्यावर निकालांसर्भात चालू झालेल्या चर्चा संदर्भात तुमच्या लेखी/ तुम्ही वाचलेली निरीक्षणे, विश्लेषणे आणि आडाखे एकत्रीत मांडणे हा आहे. मला वाटलेली आणि मी वाचलेली काही निरीक्षणे: जर काही चुकीचे आढळले अथवा अपडेट्स असले तर अवश्य सांगा.
  1. या वेळेचे मतदान हे बर्‍यापैकी भ्रष्टाचाराच्या विरोधातले होते. बर्‍यापैकी अशासाठी कारण मध्यप्रदेशात काही मंत्र्यांवर आरोप होते तरी देखील भाजपाला जास्तच जागा मिळाल्या. कारण जनतेचा असलेला म.प्र. नेतृत्वावरील आणि त्यांच्या स्वच्छ प्रतिमेवरील विश्वास.
  2. वरील विधानातून जर मोदींचा प्रभाव नाही असे कोणी अनुमान काढू लागला तर ते तितकेसे बरोबर ठरेल असे वाटत नाही. राजस्थानात वसुंधरा राजे यांचा इतके मोठा प्रभाव नाही की त्यांच्यामुळे भाजपाची लाट यावी.
  3. त्याव्यतिरीक्त मोदींची इतकी बदनामी करून देखील जनता आता भिक घालत नाही हे स्पष्ट झाले आहे. मी स्वतः मोदींचा अथवा कुठल्याच नेत्याचा आंधळा फॅन नाही. पण मोदींच्या नावाने बागुलबुवा करून डाव्या विचारवंतांनी गेल्या दहावर्षात अक्षम्य अशी सामाजीक फूट पाडली आहे असे माझे स्पष्ट मत आहे. त्यांना यातून धडा मिळाल्यास आनंद नक्की वाटेल.
  4. राजस्थानात केवळ दोन मुस्लीम आमदार निवडून आले आणि दोन्ही भाजपाचे आहेत.
  5. मध्यप्रदेशात २२ मुस्लीम बाहुल्य असलेल्या मतदार संघांपैकी २१ ठिकाणी भाजपा अथवा कॉग्रेसेतर उमेदवार जिंकला/ली. फक्त काँग्रेसकडून अरीफ अकील हे पाचव्यांदा जिंकून आलेले मुस्लीम उमेदवार आहेत. त्यांना देखील नंतर म्हणावे लागले आहे की "काँग्रेस आता तरी मुस्लीमांकडे एक व्होटबँक म्हणून पहाणार नाही".
  6. वनवासी भागात देखील काँग्रेसची मते कमी झालेली आढळलेली आहेत.
  7. या निवडणुकीत सर्वत्र एकंदरीतच जातीवरून मतदान कमी झाले आहे असे वाटते.
  8. आपच्या उमेदवारांपैकी १३ उमेदवार हे काँग्रेस अथवा भाजपाकडून तिकीट न मिळालेले बंडखोर उमेदवार होते असे भाजपाचे नेते गोयल म्हणाल्याचे हिंदू मध्ये वाचले. (पण कुणास अधिक माहिती असली तर आवडेल)
काही परीणाम...
  1. भारतातील आणि अमेरीकेतील डाव्या (कम्युनिस्ट) विचारांच्या टोळ्यांनी आवाज केल्यामुळे ज्या कँडोलिसा राईसच्या अख्त्यारीत मोदींचा व्हिसा रद्द करण्यात आला होता, त्याच राईस आता (एनडीटिव्हीवर) म्हणू लागल्या आहेत की अमेरीकेने आता भूतकाळ विसरायला हवा. (जो भूतकाळ न्यायालयांनी देखील मानला नाही तो होताच कुठे हा वेगळा प्रश्न आहे). जस्ट इन केस मोदी आलेच तर अगदीच फजिती झाली असे वाटायला नको याची अमेरीकेने तयारी चालू केलेली आहे असे वाटत आहे.
  2. मणीशंकर अय्यर यांनी आपले तोंड उघडले आहे आणि आता ते पंतप्रधान मनमोहन सिंग यांना दोष देऊ लागले आहेत तर काही काँग्रेसजन हे पी चिदंबरम ना दोष देऊ लागले आहेत. ते पुढे म्हणाले, " He (म्हणजे राहूल) has revamped student and youth wings, started efforts to integrate panchayati raj representatives in the party system. 24 Akbar Road (Congress headquarters) was the biggest mortuary until he took charge. It is now very active." याचा अर्थ सोनीयांना नावे ठेवली जात आहेत हे त्यांच्या लक्षात आलेले दिसत नाही. मला वाटते काँग्रेसी संस्कृतीस गांधी घराण्याची इतकी सवय आहे की उद्या सोनीया-राहूल हरले तरी ते त्यांच्याच पाया पडण्यात कृतकृत्य होणे मानतील. वास्तवीक काँग्रेसमधे देखील नेतृत्वगुण असलेले कमी आहेत असे नाही पण गांधी कुटूंब एके गांधी कुटूंबच्या सवयीने पुढे काही चालू शकेल असे वाटण्यासारखी परीस्थिती आज तरी नाही.
  3. सीमांध्रच्या काँग्रेसमधील खासदारांनीच अविश्वासाचा ठराव आणला आहे. पण आजच्या घडीस तरी तो यशस्वी होईल असे वाटत नाही. ममतांनी त्याला विरोध केला आहेच.
काही आडाखे:
  1. काँग्रेसमधे फूट पडण्याची शक्यता नसली तरी काही उंदीर जहाजातून पळून जाऊ शकतात, त्यात काही आश्चर्य नाही.
  2. काँग्रेसचे नेते हे पारंपारीक पध्दतीने जिंकण्यात तरबेज आहेत, त्यांना "खोक्या"च्या बाहेरचा विचार करता येतही नाही आणि करवतही नाही. बाहेर घडणार्‍या बदलाला सामोरे न जाता परत परत तेच करणार - पॉप्यूलीस्ट निर्णय, कुणाची (मोदी, केजरीवाल आणि इतर कोणी) तेहेलका नसेल पण कोब्रापोस्ट वगैरेकडून बदनामी करता आली तर त्यास प्राधान्य, असे कुंपणाच्या आतले खेळच खेळले जातील असे वाटते.
  3. केजरीवाल आणि त्यांच्या टीमला नक्कीच पॉझिटीव्ह उर्जा मिळाली आहे. त्यातील एकाची मुलाखत बघत असताना त्याचे तरी पाय जमिनीवर दिसले. जर जमिनीवर राहून आणि आदर्शपणाचा आचरट शोऑफ न करता पुढे जायचे ठरवले तर ते अजूनही मोठी शक्ती होऊ शकतील आणि तशी ते झाले तर त्याचे दूरगामी परीणाम चांगले होऊ शकतील. पण अजून बैलामधली बेडकीच असल्याचे भान हवे...
  4. या निवडणुकांमधे इतर पक्ष नव्हते पण त्यांना देखील आता निर्णय घ्यावे लागतील की आघाडीत जायचे का एकटे राहून नंतरया पाठींब्यामधे घोडेबाजारात पैसा आणि सत्तासंपादन करण्याचा प्रयत्न करायचा.
  5. भाजपा चा आत्मविश्वास ४ विधानसभांमधे ७०% जागा मिळाल्याने अर्थातच खूपच वाढलेला आहे. एका बातमीत वाचल्याप्रमाणे आता मिशन २९३ जागा मिळवणे हा उद्देश आहे. मध्यप्रदेश आणि गुजरात मधे १००% (लोकसभेच्या) जागा तर महाराष्ट्र आणि वर एकूण ११ राज्यात जास्तीत जास्त मिळवण्याचा चंग बांधला आहे. या बातमीप्रमाणे याची पार्श्वभूमी ही ७७ ला जनतापक्षाने जिंकलेल्या जागा अशी आहे. खालील नकाशा रोचक वाटला म्हणून चिकटवत आहे.
Map
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17518 वाचन

💬 प्रतिसाद (77)

प्रतिक्रिया

+१

क्लिंटन
Wed, 12/11/2013 - 17:20 नवीन
याच जाळ्यात सचिन तेंडुलकर अडकून खासदार झाला. पण नंतर प्रचारासाठी त्याचे नाव यायला लागल्यावर तो सावध झाला व अजून खोलात रूतला नाही.
सचिनचे नाव मध्य प्रदेशात प्रचार करण्यासाठी वापरणार होते काँग्रेसवाले. ८ डिसेंबरला निकाल बघून आपण प्रचाराला गेलो नाही हा किती योग्य निर्णय होता हे त्याला कळले असेल :)
आजच वाचले. २०१४ च्या निवडणुकासाठी काँग्रेस नंदन निलेकणींना बंगळूर मधून उभे करून त्यांचे नाव भावी पंतप्रधान म्हणून जाहीर करणार आहे म्हणे. मोदींना टक्कर द्यायला त्यांच्यासारखा स्वच्छ चेहरा उपयोगी पडेल म्हणे.
मनमोहन सिंहांचे काँग्रेस पक्षाने ज्या पध्दतीने पोतेरे करून टाकले ते बघून निलेकानी या फंदात पडले नाहीत तर चांगले होईल. जे काही चांगले झाले असेल त्याचे श्रेय गांधी घराण्याचे आणि वाईट झाले असेल त्याचा दोष इतरांचा ही मायलेकरांची (विशेषतः लेकाची) रित लपून राहिलेली नाही.युपीए सरकारच्या कारिकिर्दीतल्या भ्रष्टाचाराचे खापर मनमोहनसिंहांवर फोडून ही मंडळी नामानिराळी राहणार हे बघून निलेकानी यात पडले नाहीत तर ते नक्कीच चांगले होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मनमोहन सिंगाना कोणी सांगितले होते ?

चौकटराजा
Wed, 12/11/2013 - 20:06 नवीन
आपण सी डी देशमुख हे नाव आठवून पहा ! मनमोहन सिंग यांच्या कडे जर खरोखरच काही व्हिजन होती तर त्यानी कधीच राजीनामा द्यावयास हवा होता. पोतेरे होण्यात त्यानी धन्यता मानली. नीलेकेणी यांनी संचलित केलेला आधार कार्डाचा कार्यक्रमच अत्यंत बेशिस्तीचा उत्तम नमुना होता. त्यावर न्यायसंस्थेनी देखील प्रश्न चिन्ह उभी केलीयत. ते आय डी प्रूफ आहे की अ‍ॅड्रस प्रूफ यात अजुनही एकवाक्यता दिसत नाही. त्याना राजकारणात ओढल्यास आणखी वाटोळे होईल. या देशाचे जर व्हायचे असेल तर देशमुख ( विलासराव किंवा अनिल नव्हेत ), भाटिया, केजरीवाल , शेषन यांच्या सारखे नोकरशहाना आपण निवडून दिले पाहिजे.मन्मोहन, यशवंत सिन्हा यांच्या सारख्याना नव्हे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

+१

क्लिंटन
Wed, 12/11/2013 - 21:08 नवीन
आपण सी डी देशमुख हे नाव आठवून पहा ! मनमोहन सिंग यांच्या कडे जर खरोखरच काही व्हिजन होती तर त्यानी कधीच राजीनामा द्यावयास हवा होता.
+१.अर्थातच पोतेरे होऊ देण्यात त्यांना काही आक्षेप नसेल तर त्यांचे पोतेरे व्हायचेच.
नीलेकेणी यांनी संचलित केलेला आधार कार्डाचा कार्यक्रमच अत्यंत बेशिस्तीचा उत्तम नमुना होता.
आधार कार्ड हे बँक खाते आणि बोटांचे ठसे लिंक करणे याबरोबरच ओळख, जन्मतारीख आणि पत्ता या तीनही गोष्टींसाठी एकत्र प्रूफ असणार असे सुरवातीला सांगितले होते.पण मग त्यात पूर्ण जन्मतारीख न लिहिता केवळ जन्मवर्ष द्यायचे प्रयोजन समजले नाही.तसेच त्या आधार कार्डाच्या फॉर्मवर पत्ता व्यवस्थित लिहायला जागा नाही--उदाहरणार्थ डॉ.रामकृष्ण परमहंस मार्ग यासारखे रस्त्याचे नाव पूर्णपणे त्या फॉर्मवर मावणे जरा कठिणच.तसेच "I have no objection to the UIDAI sharing information provided by me to the UIDAI with agencies engaged in delivery of welfare services" हा प्रश्न आणि त्याचे yes आणि no हे दोन पर्याय मनात थोडासा गोंधळ निर्माण करतातच. असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

+१

विकास
Wed, 12/11/2013 - 20:38 नवीन
१९८४ नंतर अमिताभचे काय झाले होते ते आठवत असेलच. गेल्या वर्षी अमिताभने कुठेतरी लिहीले-बोलल्याचे आठवते (आता मिळत नाही आहे). जेंव्हा १९८५ च्या निवडणुकांनंतर आणि मला वाटते बोफोर्स संदर्भात त्याचे नाव गुंतले होते, तेंव्हा तो बाळासाहेबांना भेटायला गेला होता. त्यांनी अमिताभला एकच प्रश्न अशा अर्थी विचारला की 'तू काही केले आहेस का' म्हणून. त्याने "नाही" म्हणून स्पष्टपणे सांगितले, नंतर ठाकर्‍यांनी त्याला एकच सल्ला दिला (जो इतर कोणिही त्याला दिला असता पण तसे वजन नसते...) "राजकारणात पडू नकोस.." त्याने तो अर्थातच ऐकला. हा किस्सा पुसटसा आठवत असूनही सांगायचे कारण इतकेच की योग्य (विचारांचा आणि वजनाचा) सल्लागार (मेंटर अर्थाने) असला तर चांगले होऊ शकते. कुठेतरी असे वाटते सचीनला अनेक बडे हितचिंतक आहेत. (आणि तसा देखील तो स्वतः जमिनीवर पाय ठेवून आहेच.) नीलकेणी इन्फोसिस सोडून आधार कार्डासाठी कसे आले ह्याचे कुतुहल आहेच. आधी नीलकेणी सोडतात, मग मुर्ती निवृत्त होतात, मग मुर्ती परत आपल्या मुलास घेऊन येतात... सगळेच एका कोड्याचे तुकडे म्हणून ठरवले तर रोचक ठरू शकतील. पण त्यांचा तो अंतर्गत मामला आहे. पण कुठेतरी वाटते की अशा लोकांसाठी सेफ बेट ही नियुक्ती असते अथवा सेफ निवडणूक. त्यामुळे कदाचीत पुढे-मागे ते राजकारणात आले तर राज्यसभेतून येतील आणि जर काँग्रेसचे राज्य परत आले (जी नक्की शक्यता आहे) तर पुढच्या राष्ट्रपतीपदासाठी त्यांचे नाव देखील घेतले गेले तर आश्चर्य वाटणार नाही. पण पंतप्रधानपदासाठी अगदी ते घोड्यावर बसले तरी काँग्रेसमन (मन- मराठी आणि इंग्रजीही!) मान्य करेल असे वाटत नाही. फार तर कात्रज दाखवण्यासाठी उपयोग करतील झालं. त्या ऐवजी काँग्रेस कुठल्या तरी गांधी घराण्याशी इमानदार नेत्याचे नाव जाहीर करू शकते आणि उद्या जर काँग्रेस सत्तेवर आली तर मग वय, तरूण रक्त वगैरे कारणे देत त्यांनाच बाजूस देखील होण्यास सांगू शकेल अथवा त्या व्यक्तीस उपपंतप्रधान (तसेच चूक झाल्यास बळीचा बकरा) करून राहूलबाबांना हँड्सऑन ट्रेनिंग देण्यासाठी आणि इमेज तयार करण्यासाठी करू शकतील. आठवते त्याप्रमाणे: १९८९ च्या निवडणुकांनंतर व्हिपी सिंग यांनी पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा अत्यंत हलकेच (sybtly) दाखवली होती, जणू काही "मला ते पद मिळाले नाही तरी फरक पडत नाही." कारण चंद्रशेखर यांना ती प्रचंड महत्वाकांक्षा होती. मग "सर्वानुमते" देवीलाल यांना पंतप्रधान म्हणून निवडले गेले आणि प्रोजेक्ट केले गेले. नंतर जेंव्हा शपथ घेण्याची वेळ आली तेंव्हा देवीलाल म्हणाले, "तरूण रक्तास मिळाले पाहीजे", आणि व्हिपी सिंग पंतप्रधान झाले तर देवीलाल उपपंतप्रधान! मला वाटते चंद्रशेखर यांनी फसवल्याचे कळल्यावर चिडून सभात्याग केला का असेच काहीसे झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

महाराष्ट्रात तरी राष्ट्रवादी

विजुभाऊ
Wed, 12/11/2013 - 20:11 नवीन
महाराष्ट्रात तरी राष्ट्रवादी चा संधीसाधुपणा सगळेजण जाणून आहेत. येथे तो शेतकर्‍यांचा नाही तर उद्योजकांचा पक्ष आहे. त्यांच्या स्पष्ट अओद्योगीक धोरणामुळे ते इथे तगून आहेत. मात्र त्यानी स्वतन्त्र पणे निवडणूक लढवली तर मात्र साधे बहूमत जाऊदेत पक्ष पुन्हा उभा राहील का हा प्रश नाहे. पवार पंतप्रधान होऊ शकतात फक्त एक्च गोष्ट व्हायला हवी. पिंपरी चिंचवड बारामती सह असलेला भाग वेगळा देश म्हणूण डिक्लेअर झाला तरच ते शक्य आहे.
  • Log in or register to post comments

किंवा...

अर्धवटराव
Wed, 12/11/2013 - 22:40 नवीन
प्रधानमंत्री पदाची ऑफर देऊन पवारांना एन.सी.पी. काँग्रेसमधे विलीन करण्यास पटवण्यात आलं तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

तर ...

चौकटराजा
गुरुवार, 12/12/2013 - 08:42 नवीन
तर पावर साहेब खालील वाक्य म्हणतील १) हिमालय संकटात असताना सह्याद्रीने स्वस्थ कसे बसावे ? २)मूळा रा का काय व का काय दोन्ही एकाच विचाराचे पक्ष आहेत. आमची भाउबंदकी नसून भावकी आहे. ३) धर्मनिरपेक्षता हा सर्व दारिद्र्यावरचा नामी उपाय आहे हे पटल्यावरून मी आता " स्वगृही " आलो आहे. ४)सोनिया या भारताच्या सूनबाई आहेत . शिवाजी राजानी नाही का एका सून बाईंचा सन्मान केला होता. अध्यक्षपदी त्याच राहतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

हा हा हा ,.......काहिहि सम्भव

नॉन रेसिडेन्षि…
गुरुवार, 12/12/2013 - 09:23 नवीन
हा हा हा ,.......काहिहि सम्भव असते,राजकारणात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

महाराष्ट्रात कॉंग्रेस

सचीन
Wed, 12/11/2013 - 21:37 नवीन
महाराष्ट्रात कॉंग्रेस राष्ट्रवादी युतीला ३० जागा मिळण्याची शक्यता वाटतेय. उरलेल्या १८ जागा ह्या शिवसेना मनसे नि भाजपा(७ +३+६ =१६ ) इतर २ जागा इतर.ह्यात विभागल्या जातील असे वाटतेय. मोदी लाटेचा प्रभाव महाराष्ट्रात अजिबात जाणवणार नाही कारण मुळात असली काही लाटच नाही.
  • Log in or register to post comments

महाराष्ट्रात भाजपा सेना

मृत्युन्जय
गुरुवार, 12/12/2013 - 18:00 नवीन
महाराष्ट्रात भाजपा सेना युतीला १३ पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मोदी लाट आहे असे मान्य करणार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचीन

अडवाणींना ‘मोदी लाट’ अमान्य

सचीन
Wed, 12/11/2013 - 21:45 नवीन
अडवाणींना ‘मोदी लाट’ अमान्य http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Advani-evades-giving-Modi-...
  • Log in or register to post comments

काँग्रेसचे आत्मचिंतन !

हुप्प्या
Wed, 12/11/2013 - 21:49 नवीन
ह्या पराभवानंतर काँग्रेसने गंभीर आत्मचिंतन केले असावे. ह्या विचारमंथनातून हे मौक्तिक प्राप्त जाहले! http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5005590422781410440&SectionId=28&SectionName=ताज्या बातम्या&NewsDate=20131211&Provider=- वृत्तसंस्था&NewsTitle=सोनिया गांधी संपूर्ण देशाच्या माता- खुर्शिद धन्य धन्य ते काँग्रेसजन गांधी घराण्याला तन मन धन! हा आणि असलेच धडे शिकणार असतील तर पुढच्या विलेक्शनला काय दिवे लावणार ते दिसतेच आहे! कॉंग्रेस ही गांधी घराण्याने चालवलेली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्याचा भास होतो आहे.
  • Log in or register to post comments

बापरे...

विकास
Wed, 12/11/2013 - 21:57 नवीन
"सोनिया गांधी या केवळ राहुल गांधी यांच्याच नाही तर आमच्यासह संपूर्ण देशाच्या माता आहेत.' खुर्शीद यांचे हे वाक्य भन्नाटच आहे. त्यांना प्रियांकाचा विसर पडलेला दिसतोय. तसेच असे राष्ट्रमाता वगैरे म्हणणे चूक वाटते. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

कॉंग्रेस ही गांधी

बाप्पू
Fri, 12/13/2013 - 23:08 नवीन
कॉंग्रेस ही गांधी घराण्याने चालवलेली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्याचा भास होतो आहे.
सहमत... येणाऱ्या निवडणुकांमध्ये " पप्पू " आणि " राणीसाहेब "काय दिवे लावतात ते पाहणे intresting असणार आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

खूशमस्कर्या खुर्शिदची बातमी अजून एक

हुप्प्या
Wed, 12/11/2013 - 21:51 नवीन
http://aajtak.intoday.in/story/sonia-gandhi-is-mother-of-entire-country-says-salman-khursheed-1-749334.html हिंदीतली.
  • Log in or register to post comments

हे अस का ?

lakhu risbud
Fri, 12/13/2013 - 09:08 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

काही त्रुटी आणि काही आशा

रमेश आठवले
Wed, 12/11/2013 - 23:18 नवीन
आपल्या नकाशात उत्तराखंड आलेला नाही. तेथे भाजपा ला ३-४ जागा मिळू शकतील. आणि कर्नाटकात येडीउरप्पा परत भाजपा मध्ये येणार असे जवळ जवळ नक्की झाले आहे. त्यामुळे तेथेही १५ पर्यंत जागा मिळू शकतात. या शिवाय, आन्ध्रामध्ये कोन्ग्रेसचा बोर्या वाजणार हे नक्की आहे. तेथे जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाला व तेलुगु देशम ला २५ तरी जागा मिळतील असा अंदाज करता येईल. जयललिता यांच्याकडून ३० सदस्यांचे समर्थन मिळावे . बिजू जनता दल कडे सध्या १४ जागा आहेत्त. हे सगळे एकत्र झाले तर भाजपाचा आणि मोदींचा संघ काशीला ( २७३ जागा) पोहोचेल असे भाकित करावयास हरकत नाही.
  • Log in or register to post comments

(No subject)

सचीन
Fri, 12/13/2013 - 21:37 नवीन
*nea* *NO* *NO*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

झि २४ तास वाहिनिचा आजचा सवाल

देव मासा
गुरुवार, 12/12/2013 - 10:53 नवीन
झि २४ तास वाहिनिचा आजचा सवाल , निवड्नुकितल विजया मुळे अरविंद केजरिवाल हवेत गेले का? या वाहिनिने आसा का प्रश्न विचारावा ?
  • Log in or register to post comments

टाईम पास

चौकटराजा
गुरुवार, 12/12/2013 - 18:15 नवीन
उद्याचा सवाल असाही असेल निवडणुकीतील पराभवाने गणपतीने शीला दिक्षिताना पाण्यात ठेवले आहे काय ? अहो, त्याना काय वेळ घालवायचा असतो. आता ते आव्हाड, चौधरी, अभ्यंकर, भंडारी, सावंत याना रेग्युलर मस्टरवर घेणारेत म्हणे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देव मासा

दिल्लीतले विजय आणि लोकसभेच्या जागा.

विकास
Fri, 12/13/2013 - 00:34 नवीन
आयबीएन वर आलेल्या बातमी नुसार लोकसभेच्या मतदारसंघानुसार आत्ताच्या विधानसभा मतदारसंघातली मते एकत्रीत केली तर (आत्ताच्या निकालाप्रमाणे) एकूण ७ जागांपैकी भाजपाला ६, आप ला १ आणि काँग्रेसला ० जागा मिळतील.
  • Log in or register to post comments

खुपच छान धागा अमोल केळकर

अमोल केळकर
Fri, 12/13/2013 - 10:17 नवीन
खुपच छान धागा :) अमोल केळकर
  • Log in or register to post comments

मोदींनी मतदानयंत्रात फेरफार केले म्हणून काँग्रेसचा पराभव

क्लिंटन
Fri, 12/13/2013 - 13:31 नवीन
मोदींनी मतदानयंत्रातील प्रत्येक पाचवे मत भाजपला जाईल असे सेटिंग केल्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला अशी धक्कादायक बातमी आता हाती आली आहे. या मतदानयंत्रांचे प्रोग्रॅमिंग अहमदाबादमध्ये होते. त्यामुळे अर्थातच मोदींना मतदानयंत्रात काहीही फेरफार करणे सहज शक्य आहे. अधिक माहिती इथे
  • Log in or register to post comments

छ्या! वर केलेल्या

ऋषिकेश
Fri, 12/13/2013 - 13:38 नवीन
छ्या! वर केलेल्या निरिक्षणातले एक खोटे ठरवलेच काँग्रेसने ;) आता दारू, पैसे घेतल्याचा आरोप आणि तेथील मतदारांना हे काँग्रेसी 'मूर्ख' कधी म्हणतात ते पहायचे :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

दारू कशाला?

विकास
Fri, 12/13/2013 - 16:58 नवीन
दारू बिरू काही नाही... आमच्याकडे "अफूची गोळी" आहेच की! ;) (अर्थात ती या वेळेस किती वापरली गेली कल्पना नाही!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

राजकीय चाल

विकास
Fri, 12/13/2013 - 22:58 नवीन
दिल्लीत अल्पसंख्य आहोत म्हणून सत्ता नाकारून भाजपाने चाल खेळलेली आहेच. आता काँग्रेसने देखील आप ला विनाशर्त पाठींबा जाहीर केला आणि तसे पत्र नायब राज्यपालांना दिले आहे. भाजपाने चांगली रीस्क घेतली तशीच काँग्रेसने नक्कीच चांगली खेळी खेळली आहे. त्याला उत्तर कसे दिले जाते यावर केजरीवालांचे नेतृत्व आणि राजकीय प्रौढत्व समजेल.
  • Log in or register to post comments

अहो कसलं काय.

अर्धवटराव
Sat, 12/14/2013 - 07:25 नवीन
काँग्रेसने हात दाखवुन अवलक्षण केलं. त्यांनी भाजपला घोडा बाजार करण्याची खुल्ली ऑफर दिली आहे असं करुन. काँग्रेसमधुन चार आमदार फुटुन भाजपाला जाऊन मिळतील तर आश्चर्य वाटायला नको. तसंही काँग्रेसला बाहेरुन पाठिंबा द्यायला लागणार म्हणजे एकही मंत्रीपद मिळ्णार नाहि नाहितर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा