Skip to main content

~देवा आता हार मान तू~

लेखक वैभवकुमारन यांनी शुक्रवार, 06/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
~देवा आता हार मान तू~ देवा आता हार मान तू बघुनी खालचे तांडव सारे दिलास जन्म मानवास तू पण झाले सगळे वानर साले उभा केला तुला देवळात अन उद्बत्तीचे सुवास वारे तुझ्याच पायावरती सजले मांसाचे ते ढेर सारे तुला छीनले दगडातुनी अन तुझे कोरले देह सारे हाती चिपळ्या नास्तिकांच्या मुखी मात्र तुझे नाव रे उद्गाता तू चराचराचा उरी तुझ्या हा विश्व भार रे तुला जमीनीत गाढण्याआधी देवा आता तू खाली धाव रे देवा आता हार मान तू गेले अस्तित्व राहिले नारे गाभारेही वाहून जातील वाहण्याआधी तू खाली धाव रे ~वैभव कुलकर्णी ~
लेखनविषय:

वाचने 1132
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

आत्ताच्या एकंदर परीस्थीतीचे यथार्थ परीक्षण...... हे कडवं विशेष आवडलं '' तुला छीनले दगडातुनी अन तुझे कोरले देह सारे हाती चिपळ्या नास्तिकांच्या मुखी मात्र तुझे नाव रे''

तुला छीनले दगडातुनी उभा केला तुला देवळात .................. म्हणजे "दिलास जन्म मानवास तू" च्या ऐवजी "दिला जन्म मानवाने तुजला" ...... असे हवे.