अनेकदिवसापासून नवरा मागे लागलेला की तू तुझी रेसिपी मिसळपाव वर लिही.पण लिखाण आणि वाचन याची मला फार आवड नसल्याने मी टाळाटाळ करत होते.पण त्यांच्या आग्रहाखातर ही माझी पहिली रेसिपी तुमच्यासाठी.
'Burrito Bowl' ही एक Mexican dish आहे. बाहेर गेल्यावर आमच्यासारख्या शाकाहारी लोकांसाठी एक मस्त पदार्थ आहे हा.
साहित्य:- १वाटी भात, १ वाटी black beans ( मीठ घालून उकडलेले ), १/२ सिमला मिरची , १कांदा, १टोमॅटो,१ वाटी स्वीट कॉर्न,१ लिंबू, १ avocado,lettuce, तिखट, मिरपूड,मीठ,चीज़ (मी healthy बनवायचे म्हणून नाही घातले),कोथिंबीर, थोडेसे तेल, sour cream.
कृती :- प्रथम सिमलामीरची आणि १/२ कांदा उभा चिरुन घ्या.
टोमॅटो आणि कांदा बारीक चिरुन घ्या.
avocado स्मॅश करून घ्या.
आता avocado मधे १/२ टोमॅटो,थोडा बारीक चिरलेला कांदा,मिरपूड, मीठ आणि १/२ लिंबू घालून
एकत्र करून घ्या.याला 'Guacamole' असे म्हणतात.
एका भांडयात १/२ टोमॅटो ,कांदा, थोडी कोथींबर,लिंबू,मीठ,मिरपूड, तिखट(optional) एकत्र करून ठेवा.
हा झाला salsa.
एका भांडयात कॉर्न,मीठ आणि मिरपूड घालून microwave मध्ये एक मिनिट गरम करा.
आता उभे चिरलेले कांदा आणि सिमलमीरची मीठ घालून कढई मधे थोड्या तेलात परतून घ्या.
एका कढई मधे तेल गरम करून त्यात कोथिंबीर घाला.
आत हे तेल भातावर घालून थोडी मिरपूड,लिंबू घालून एकत्र करावे.
ही झाली तयारी.
आता एका bowl मधे भात घ्या.त्यावर black beans,lettuce,कॉर्न,salsa,guacamole, सिमलामीरची
आणि कांदा घाला. वरुन sour cream आणि चीज़ घालून खायला द्या.
( भात मीठ घालून शिजवावा. Mexican dish मध्ये तिखठाच्या एवजी मिरपूड आणि jalapeno मिरची
जास्त वापरतात.)
English शब्दांचा वापर जास्त केला आहे पण त्यांना मराठीत काय म्हणतात ते मला माहीत नाहीए.
त्यामुळे क्षमस्व.
वाचने
10205
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरितो आवडला!!
धन्यवाद!!!
In reply to बरितो आवडला!! by लॉरी टांगटूंगकर
अरे वा...बर्याच दिवसांनी
ब्लॅक बीन्स म्हणजे काय? राजमा
कुठे पाहिल्या नाहीत.
In reply to ब्लॅक बीन्स म्हणजे काय? राजमा by आदूबाळ
राजमा !!
In reply to ब्लॅक बीन्स म्हणजे काय? राजमा by आदूबाळ
.
कोशरी.
हो का....
In reply to कोशरी. by प्रभाकर पेठकर
व्वाह
मस्त!
धन्यवाद !!
In reply to मस्त! by पैसा
मस्त!
मस्त!
स्स्स्स्स्स्स
धन्यवाद!!!
In reply to स्स्स्स्स्स्स by अविकुमार
बुरीsssतो !
कारण मेक्सिकोत बरितो मध्ये भात वापरत नाहीत.
In reply to बुरीsssतो ! by सोत्रि
Burrito wrap
In reply to बुरीsssतो ! by सोत्रि
येऊ द्या अजून.
अरे वा एकदम वेगळि