Skip to main content

पत्रिका एक बघणे....

लेखक ज्ञानव यांनी गुरुवार, 28/11/2013 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
खालील विषयावर तज्ञांकडून माहिती हवी आहे. जर जन्मवेळ, ठिकाण, जन्म तारीख दिली तर पत्रिका मांडून भविष्य कथन करता येते (हा ढोबळ भाग आहे खोलात शिरून वाद विवाद अपेक्षित नाही) म्हणजे विद्या, संतती, धन-संपत्ती, गंडांतर येईल नाही येईल वगैरे वगैरे. पण जर मृत्यू समय, मृत्यू तारीख, मृत्यू ठिकाण दिले तर त्या माणसाचा पुनर्जन्म होईल का?, केव्हा होइल?, कि होणारच नाही वगैरे सांगता येते का ? तसेच, दि : १/११/१९६७ वेळ: : ९.४५ सायंकाळी स्थळ : mumbai वरील माहिती वरून मृत्यूची दिनांक, वेळ, स्थळ, प्रकार (नैसर्गिक, अपघात, आत्महत्या वगैरे )कुणी सांगू शकेल का? इथे तज्ञांनी सकारण, सोदाहरण आणि मला पामराला समजेल अशा अतांत्रिक पद्धतीने मार्गदर्शन करावे हि विनंती.

वाचने 50665
प्रतिक्रिया 106

प्रतिक्रिया

In reply to by ज्ञानव

(लग्नी मिथुन आणि लग्नेश बुध पंचमात म्हणजे वायू तत्वाच्या तुळेला ह्याचा परिणाम माझ्या बुद्धीवर जास्त आहे. त्यात बुधाच्या व्ययात हर्शल आणि हर्षलाच्या व्ययात शुक्र - गुरु.....मान्यवरांना उमजेलच मला काय म्हणायचे आहे ते.) स्थान चुकले तर मारतील माझे ज्योतिषी मित्र....

In reply to by ज्ञानव

ज्योतिष आणि विज्ञानावतिरिक्त अजून एक गोष्ट अस्तित्वात आहे ज्याला 'आतला आवाज' किंवा 'इंट्यूशन' म्हणतात. हे प्रत्येका जवळ असतेच पण ज्याच्या बाबतील ह्याची तिव्रता पराकोटीची असते (तशी का असते ह्याला तार्किक उत्तर नाही) अशा माणसाला समोरच्या माणसाच्या आयुष्यातील (किंवा भूत - भविष्यातील) गोष्टी 'दिसतात'. अशा एका व्यक्तीला मी स्वतः भेटलो आहे. त्यांना 'दादा महाराज निंबाळकर' म्हणायचे. (आता ते हयात नाहीत). त्यांनी माझ्या आणि माझ्या मित्रांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी (घडलेल्या - घडणार्‍या) सांगितल्या होत्या. त्या पैकी ८०% खर्‍या निघाल्या. आमची भेट मस्कतमध्येच माझ्या एका मित्राच्या घरी झाली. आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो. आम्ही एकूण १०-१२ मित्र बसलो होतो. कांही जण भविष्य विचारत होते ते सांगत होते. मधे मधे माझ्याकडे पाहात होते. अचानक मला म्हणाले, 'तुम्हाला कांही विचारायचे आहे का?' माझा भविष्य कथनावर विश्वास नसल्याने (किंवा फार मर्यादीत स्वरूपात असल्याने) मी नकारार्थी मान हलवत म्हंटले, 'नाही मुद्दामहून विचारावे असे कांही नाही. पण तुम्हाला कांही सांगावेसे वाटत असेल तर जरूर सांगावे.' अर्धा मिनिट माझ्याकडे पाहात विचार करून ते म्हणाले, ' तुमची जी कार आहे ती खुप जुनी आहे. (८१चे मॉडेल होते) ती तुम्हाला खुप त्रास देते आहे. एक तर ती दुरुस्त करून घ्या किंवा विकून टाका.' नेमकी त्याच दिवशी मी माझी कार इंजिनच्या दुरुस्तीसाठी गॅरेजला पाठवली होती. मला वाटले एखाद दुसर्‍या मित्राजवळ मी कधी बोललो असेन आणि त्याने चुकली वगैरे केली असेल शिवाय आजच कार गॅरेज मध्ये मेजर दुरुस्तीसाठी गेली आहे हा निव्वळ योगायोग असावा. पण ते पुढे म्हणाले, 'त्या मेकॅनिकला गाडीचे ब्रेक तपासायला सांगा. तुम्ही ती गाडी कशी थांबवता मला समजत नाही.' गाडीचे ब्रेक नीट लागत नव्हते हे माझ्या व्यतिरिक्त ह्या जगात कोणालाच माहित नव्हते. मी माझ्या बायकोजवळही कधी ह्या विषयावर बोललो नव्हतो. तेंव्हा एकतर आर्थिक समस्या होती आणि ती उगीच घाबरून गेली असती. ब्रेकपॅड झिजले असावेत. ब्रेक थेट फ्लोअरपर्यंत दाबावा लागायचा आणि मुंबईतील जुनी डबलडेकर थांबावी असा आवाज यायचा. दुसर्‍या दिवशी सकाळी मी गॅरेजमध्ये जाऊन मेकॅनिकला भेटलो आणि ब्रेक बद्दल सांगितले. नंतर ऑफिस मधे गेलो. (तेंव्हा नोकरीत होतो). संध्याकाळी आल्यावर मेकॅनिकला भेटलो तेंव्हा त्याने गाडीची चारही चाके उघडून ब्रेक नामक यंत्रणेचा कोथळा बाहेर काढून ठेवला होता. मी त्याला विचारले, 'काय परिस्थिती आहे ब्रेकची?' मेकॅनिक म्हणाला, 'साहेब, ह्यात ब्रेक नामक कुठली गोष्टच नाहीए. (पॅड आणि डिस्क दोन्ही झिजून गेल्या होत्या). तुम्ही हे अवजड धूड कसे थांबवायचा हेच मला समजत नाहीए.. इथे दोन्ही, आयुष्यात एकमेकांना कधीच न भेटलेल्या, पाहिलेल्या, व्यक्तींचे शब्दही सारखेच होते. नोकरीबाबतही मी त्यांना विचारले की, 'मला स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे. मी काय करावे असे तुम्हाला वाटते? नोकरी की व्यवसाय?' त्यावर ते म्हणाले 'तू आयुष्यात व्यवसायच करणार.' शेवटी तेच खरे झाले. अशा त्यांच्या खुप कथा आहेत. एक वेगळा धागा होईल. पण ते स्वतः सुद्धा सांगायचे. मला भविष्य (फलज्योतिष, हस्तरेषा पत्रिका वगैरे वगैरे जे म्हणतात ते) कळत नाही. मी अगदी तुमच्या सारखाच सर्वसामान्य माणूस आहे. फक्त मला अचानक कांही गोष्टी 'दिसू' लागतात. ती व्यक्ती समोर असावी, किंवा त्या व्यक्तीचे छायाचित्र असावे किंवा त्या व्यक्तीचे हस्ताक्षर पाहावयास मिळावे. दरवेळी हुकमी सर्व कांही दिसते असेही नाही. कधी दिसते कधी नाही दिसत. पण जेंव्हा मला दिसते आणि मी बोलू लागतो तेंव्हा मला मध्येच प्रश्न विचारून डिस्टर्ब करू नका. माझी लिंक तुटली तर पुन्हा जुळेलच असे नाही. (ते कोणाकडूनही एकही पैसा घेत नसत.) दूसरे एक तामिळी गृहस्थ भेटले होते. (अजूनही हयात आहेत). त्यांनी मला एका कागदावर माझे नांव लिहायला सांगितले. नंतर कांही आकडेमोड करून एका फुलस्कॅप पेपरवर ते लिहू लागले. जवळ जवळ १० मिनिटे ते लिहीत होते. खोलीत आम्ही फक्त दोघेच होतो. शेवटी त्यांनी तो कागद बाजूच्या टीपॉयवर ठेवला आणि बोलायला सुरुवात केली. मी कुठल्या व्यवसायात आहे वगैरे विचारले. नंतर माझा आर्थिक भूतकाळ आणि वर्तमानकाळ ह्याबद्दल तंतोतंत माहिती दिली. तसेच आजच्या व्याधी, आईच्या आजच्या व्याधी (आई भारतात होती) आई आणि बायकोचे संबंध (सासू-सुन), दोघींचे स्वभाव विशेष, मुलाचा स्वभाव, इ.इ. परिपूर्ण माहिती तंतोतंत सांगितली. हे सर्व बरोबर आहे का ते विचारलं. मी होकारार्थी मान हलविली. त्या नंतर त्यांनी तो कागद माझ्या हाती दिला. माझे नुसते नांव विचारून त्यांनी जे जे लिहीले होते ते सर्व आमच्या नंतरच्या संभाषणाचा गोषवारा होता. आईच्या अंतकाळातील आरोग्याबद्दलही त्यांनी १००% बरोबर भविष्यकथन केले होते.
सर्व कांही तसेच घडले.
अजूनही माझा भविष्यावर विश्वास नाही पण ह्या दोन अवलीयांनी माझी बोलती बंद केली होती. ह्या जगात कांही घडणार्‍या गोष्टी आपल्या आकलनापलिकडच्या असतात त्यालाच कदाचित आपण चमत्कार म्हणत असू. (धागाकर्ता हा माझा सख्खा लहान भाऊ आहे. त्याला वरील गोष्टी माहीतही आहेत. आज सर्व मिपा सदस्यांसाठी इथे मांडल्या एवढेच.)

In reply to by टवाळ कार्टा

होय. नक्की भेटता येईल. माझ्या एका ओळखितल्या गृहस्थांच्या मार्फत माझी भेट झाली होती. त्याच्याकडे चौकशी करून सांगतो कुठे आणि कसे भेटता येईल ते. त्यांनी त्यांचा इमेल पत्ताही दिला होता. तो माझ्याकडून हरवला. असो. ते शुल्क आकारतात. म्हणजे अमूक इतके द्या असे सांगत नाहीत. पण त्यांची अपेक्षा असते. मी भेटलो होतो (६-७ वर्षांपूर्वी) तेंव्हा मी एका लिफाफ्यात १५००/- रुपये घालून दिले होते. (त्यांच्या हाती नाही तर, ते बसले होते त्या शेजारच्या टिपॉयवर मी ठेवले होते.) ते कांहीही मागत नाहीत. राजीखुशीने तुम्हाला कांही द्यायचे असेल तर द्यावे.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रतिसाद आवडला. रुचलाही. काही कळत नाही पण जेव्हा अश्या गोष्टींची वेळ येते तेव्हा ज्योतीषी पैसे का बरं घेत असावेत? पोटासाठी ज्योतीष सांगणारे पैसे मिळत आहेत म्हणुन किती खरं किंवा सांगत असावेत आणि पोटासाठी न सांगणारे पैसे का मागत असावेत असा प्रश्न नेहेमी पडतो. एकदा पैसे घेतले की काहीतरी सांगणे आलेच पण पैसे न घेता भविष्य बरोबर येवो न येवो तेवढी जबाबदारी (नैतीक का होइना) राहु शकत नाही असम वाटतं. तुम्हाला काय वाटतं?

In reply to by वाटाड्या...

हा त्यांच्या व्यवसायाचा भाग असतो. पैसे घेतले काय किंवा नाही घेतले काय. जर भविष्य बरोबर आले तर प्रसिद्धी (आणि त्या पाठोपाठ पैसा) मिळत जाते. भविष्य चुकीचे सांगितले की प्रसिद्धीला ओहोटी लागते (पैशांचा स्रोतही आटतो) त्यामुळे भविष्य अचूक सांगणे ही व्यावसायिक गरज असते. वैद्यकिय व्यवसायात कसे प्रत्येक रुग्णाला बरे करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. ज्या डॉक्टरच्या हाताला गुण असतो त्याची चलती असते ज्याच्या हाताला गुण नसतो तो माशा मारत बसतो. पैसे न घेता भविष्य सांगणारे हौशी, समाजकार्य करण्याच्या उद्देशाने भारीत वगैरे असू शकतात.

In reply to by ज्ञानव

प्रतिसाद आवडला. माझ्या ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी..... प्रश्नोत्तरातून सुसंवाद पुस्तकाच्या मनोगतात माझी भुमिका मांडली आहेच. तसेच दुसर्‍या आवृत्त्ती च्या निमित्ताने काही भर त्यात घातली आहे. मृत्यू या एका गोष्टी मुळे जगात अनेक तत्वज्ञान निर्माण झाली. ज्योतिषात मृत्यु चे भाकित सांगू नये असा संकेत आहे. सांगता येते कि नाही हा परत वेगळा मुद्दा आहे. बाकी आपले भविष्य आपल्या जिनोम मधे लिहिलेले असतेच. त्याप्रमाणेच आपली मनो शारिरिक वाढ होत असते असो तो वेगळा विषय आहे. पण आपले भविष्य आपल्या हाती हे देखील वैज्ञानिक सत्य नाही. गोफ जन्मांतरीचे हे डॉ सुलभा ब्रह्मनाळकर यांचे पुस्तक वाचताना ते जाणवते.

In reply to by अर्जुन

ईमेल आय डी कांही मिळाला नाही. पण कांही संपर्क क्रमांक सापडले आहेत. ते पुढील प्रमाणे. नांव - श्री. शिवकुमार.
दूरध्वनी क्रमांक - +९१ ४८४-२७८५०६६ भ्रमणध्वनी क्रमांक - +९१ ९३८८८९१६४७

ज्योतिषाचा छंद व मटक्याचा नक्की फॉर्मुला शोधणे हे दोन्ही छंद सारखेच आहेत. माझ्या वडिलांनी निववृतीनंतर पाच सहा वर्षे पहिला केला मी तीन चार महिने दुसरा केला. तात्पर्य - मृत्यू ही एक घटना आहे. निसर्गातील परिहार्य असे ते एक रूपांतर आहे. जे कधी ना कधी तरी होणारच त्याची तारीख अगोदर काढून काय मिळणार. तात्विक रित्या - जो पर्यंत जगण्यात मजा आहे तो पर्यंत मरण्यात हशील आहे.

In reply to by चौकटराजा

भौतिक जबाबदार्‍यांच्या विविध टप्प्यांवर त्या त्या जबाबदार्‍या यशस्वीपणे पार पडल्या/पाडल्या असतील तर, शेवटी मन कांहीसे शांत असावे. पण जर ह्या जबाबदार्‍या पार पाडण्यात आपण काळाच्या मागे पडलेले असू तर, 'मृत्यू अचानक आपल्याला गाठेल' अशा काळजीपोटी 'तो' कधी आपल्याभेटीला येणार आहे ह्याची भितीयुक्त उत्सुकता लागून राहते. तरीपण, तरीपण, मृत्यूचे भाकित जाणून घेण्याचा प्रयत्न करू नये, ह्याच पक्क्या मताचा मी आहे

In reply to by चौकटराजा

एक कोमन फ़ॉर्म्युला आहे. बरेच जणांना माहिती असेल. असो! मट्क्यात 1ते9 या एकेरी अन्कावरही पैसे लावता येतात व आपण लावलेला आकड़ा लागला तर एक रुपयाचे आठ रूपये मिळतात. मग आता यात हमख़ास यशाचा मार्ग सोपा आहे. केवळ एकाच ठरवलेल्या आक्ड्यावर रोज पैसे लावत जायचे आज ना उद्या आपण निवडलेला आकडा हमखास लागणार फक्त एक मेख आहे जोपर्यंत आपण ठरवलेला आकडा लागत नाही पैसे आदल्या दिव्शिपेक्षा डबल करत जायचे ज्या दिवशी मटका लागेल आता पर्यन्त गुन्तवलेले सर्व पैसे परत मिळुन वरती भरगोस नफा मिळेल...... मग ? आहे आठ दिवस गुंतवनुकिचि तयारी? एकदम सिस्तिमेटिक इन्वेस्टमेंट प्लान ?

In reply to by चौकटराजा

एक कोमन फ़ॉर्म्युला आहे. बरेच जणांना माहिती असेल. असो! मट्क्यात 1ते9 या एकेरी अन्कावरही पैसे लावता येतात व आपण लावलेला आकड़ा लागला तर एक रुपयाचे आठ रूपये मिळतात. मग आता यात हमख़ास यशाचा मार्ग सोपा आहे. केवळ एकाच ठरवलेल्या आक्ड्यावर रोज पैसे लावत जायचे आज ना उद्या आपण निवडलेला आकडा हमखास लागणार फक्त एक मेख आहे जोपर्यंत आपण ठरवलेला आकडा लागत नाही पैसे आदल्या दिव्शिपेक्षा डबल करत जायचे ज्या दिवशी मटका लागेल आता पर्यन्त गुन्तवलेले सर्व पैसे परत मिळुन वरती भरगोस नफा मिळेल...... मग ? आहे आठ दिवस गुंतवनुकिचि तयारी? एकदम सिस्तिमेटिक इन्वेस्टमेंट प्लान ?

In reply to by अग्निकोल्हा

या साळंचे आम्ही येच येम आहोत. एक आकडा २३ दिवस न आल्याचीही उदाहरणे आहेत. पाठसे सीख- संसारावरून नांगर फिरवायचा नसेल तर लक्षांत राहू द्या कोणतेच पर्म्युटेशन कोम्बेनेशन जूगारात आणि जगण्यातही हमखास यश देण्यासाठी त्रिकालाबाधित नसते. काही प्रमाणात मेहनत, काही प्रमाणात नशीब व काही प्रमाणात समाधान हे बरेचसे काम करून जाते.

In reply to by चौकटराजा

एक आकडा २३ दिवस न आल्याचीही उदाहरणे आहेत.
कितीही दिवस आकडा न येऊ दे. रोज आकड्यावर लावायची रक्कम आदल्या दिवसाच्या दुप्पट करत गेल्याने तेविसाव्या दिवशी गुंतवलेली रक्कम भरभक्कम असेल आणि मिळणारा परतावा त्याच्या प्रमाणात असल्याने मागचे सर्व नुकसान भरून निघून वर भरगोस फायदा होईल असा दावा वरील प्रतिसादात केला आहे. त्यात तथ्य असावे असे दिसते आहे. म्हणजे पहिल्या दिवशी १ रुपयाने सुरुवात केली तर आणि दर दुसर्‍या दिवशी आजच्या दुप्पट रक्कम त्याच आकड्यावर लावली तर २३व्या दिवशी ४१ लाख, ९४ हजार, ३०४ रुपये लावावे लागतील आणि २३ दिवसापर्यंतची गुंतवणूक होईल ८३ लाख, ८८ हजार, ६०७ रुपये. आता तेविसाव्या दिवसाच्या (४१ लाख, ९४ हजार, ३०४ रुपये) ८ पट रक्कम मिळणार असेल तर ती होते ३ करोड, ३५ लाख, ५४ हजार, ४३२ रुपये. त्यातून गुंतवणूक (८३ लाख, ८८ हजार, ६०७ रुपये) वजा केल्यास निव्वळ फायदा उरतो

२ कोटी, ५१ लाख, ६५ हजार, ८२५ रुपये.


In reply to by परिंदा

नाही नं! केंव्हाच बंद झाली (असं मला वाटतं). नाहीतर आम्ही काय मूर्ख आहोत का इमानेइतबारे नोकरी-धंद्यात गुंतून पडायला?

In reply to by प्रभाकर पेठकर

या दाव्याला गँबलर्स फॉलसी/रुईन म्हणतात. वरकरणी बरोबर वाटले तरी शेवटी तो हरतोच. कसे ते पाहू. प्रोबॅबिलिटी थिअरीमधील एक लै जुना रिझल्ट यामागे आहे. त्याचे थोडक्यात स्पष्टीकरण खालीलप्रमाणे. समजा एक जुगारी आहे आणि जुगार सुरू करण्याअगोदर त्याच्याकडे क्ष रुपये आहेत. प्रत्येक वेळेस बेट जिंकण्याची प्रोबॅबिलिटी समजा ५०% असली तर तो एक तर सरळ जिंकत तरी जाईल नैतर हरत तरि जाईल. प्रत्येक बेटमध्ये हरण्याची प्रोबॅबिलिटी काढली तर ती ०.५ + ०.२५ + ०.१२५ +.............असे करत शेवटी १ जवळ येते, त्यामुळे कधी ना कधी तो ब्रोक होणार हे निश्चित आहे. समजा बेट जिंकण्याची प्रोबॅबिलिटी अजून जास्त असली- उदा. ६०%- तर असे होणार नाही. पण जुगाराची रचना करणारे लोक असे होऊच देणार नाहीत, कारण तसे असेल तर त्यांचा धंदा बसेल, बाजार उठेल. त्यामुळे कुठलीही बेट जिंकण्याची प्रोबॅबिलिटी ही इन एनी केस ५०% पेक्षा कमीच असते- त्याशिवाय त्यांना आपला धंदा चालवता येत नाही. आणि असे असेल तर जिंकणे निश्चित नसतेच, हरणे मात्र निश्चित असते. त्यामुळे तुम्ही सांगितल्याप्रमाणे बेटिंग केल्यास कदाचित कुणीतरी जिंकेलसुद्धा-पण रिस्क ऑफ रुईन लै जास्त मोठी आहे शिवाय एकदातरी मोठा फटका बसणार हे निश्चित आहे.

In reply to by बॅटमॅन

म्हणुन मटका लावण्या पेक्षा शेयर मार्केट खेळावे ...तिथे जिंकण्याची शक्यता अलबतच जास्त असते !! आणि आजकाल तिकडेही मुहुर्त काढुन आकडा लावतात म्हणे ...

In reply to by प्रभाकर पेठकर

२३व्या दिवशी ४१ लाख, ९४ हजार, ३०४ रुपये लावण्यासाठी कुठुन आणायचे ?

In reply to by इरसाल

साहेब, फक्त २३ व्या दिवशी नाही. २३ दिवसांपर्यंत एकूण ८३ लाख, ८८ हजार, ६०७ रुपये तुमच्यापाशी असण्याची गरज आहे. तेही २३ दिवशी 'तो' आकडा येईल असे गृहीत धरल्यामुळे. 'तो' आकडा लवकर आला तर कमी पैसे लागतील आणि २३ दिवसांपेक्षा जास्त दिवस लागले तर, मेलात, ८३ लाख, ८८ हजार, ६०७ रुपयांपेक्षा अजून जास्त रुपये लागतील.

जन्म आणि मृत्यूची तारीख आधीच का शोधा (कदाचित दोन्हीकडे सुटका आहे म्हणून) हा प्रश्न १००% बरोबर आहे पण इथे अप्रस्तुत आहे हा धागा मूलतः त्या लोकांबरोबर चर्चा व्हावी ह्या हेतूने टाकला होता जे ज्योतिष बघतात फलादेश सांगतात हं त्या मागचे कारण हे चिकित्सा किंवा कुतूहल किंवा विज्ञानाचे आणि ह्या विषयाचे काही जुळते का ते पाहणे हा आहे. जोपर्यंत पाणी नाका तोंडाशी येत नाही तोपर्यंत माकडीण हि पिलाला पायाखाली घेत नाही अर्थात जेव्हा माणूस अतीव अडचणीत येतो (हि अडचण शब्दात समजणार नाही ....स्वच्छतेचे अति भोक्ते सुद्धा सार्वजनिक मुतारी नको म्हणतात आणि अतीव अडचण आलीकी आपलेच नियम धाब्यावर बसवून मुतारीत जाऊन येतात किंवा जाऊ कि नको माझे तत्व जगाला माहित आहे त्या पेक्षा होल्ड करू का? पण ते हि आरोग्यदायी नाही मग काय करू ह्या द्विधा मनस्थित जातात मला ती द्विधा परिस्थिती म्हणजे ढोंग वाटते.)तेव्हाच ज्योतिष ह्याद्वारे आधार शोधण्याचा प्रयत्न करतो. ज्योतिषी हलकट असतीलही कारण त्या पठडीतल्या ज्योतिषांचे प्रमाण जास्त आहे. पण ज्योतिष थोतांड आहे किंवा आहेच असे म्हणणे कदाचित घाईचे होईल. अनेक फसलेले फलादेश आहेत अगदी उद्या हा माणूस मारणार तुम्ही नातेवैकाना बोलून घ्या असे डॉक्टरानी सांगितले आणि नाही हा माणूस काही आज मरत नाही असे ज्योतिषाने सांगितले तेव्हा कधी डॉक्टर तर कधी ज्योतिषी बरोबर आले आहेत प्रसुतीच्या डेट्स मेडिकल आणि प्रत्यक्ष ह्यात ६-७ किंवा जास्त दिवसाचा फरक आला आहे तर ज्योतिष द्वारे अगदी १ दिवसाचा फरक आला आहे त्यामुळे कुठलीही गोष्ट एकदम बरोबर म्हणून वाहवत जाऊ नये तसे ती चूकच आहे हे म्हणण्याचा आतताईपणा हि करू नये. तूर्तास हा धागा माझ्याकडून बंद करण्यात आला आहे.

अनेक फसलेले फलादेश आहेत अगदी उद्या हा माणूस मारणार तुम्ही नातेवैकाना बोलून घ्या असे डॉक्टरानी सांगितले आणि नाही हा माणूस काही लवकर किंवा उद्या मरत नाही असे ज्योतिषाने सांगितले तेव्हा कधी डॉक्टर तर कधी ज्योतिषी बरोबर आले आहेत असे वाचावे

ज्ञानव तसेच पेठकर काकांचे प्रतिसाद वाचनियच आणि मननियही. उत्सुकता शमनार्थ जोतिषाकडे जाणार्‍यांचे प्रमाणही बरेच आहे, पण ज्योतिषाच्या आहारी जाऊ नये ही खरंच. कुणाचाही जन्म आणि मृत्युची वेळ आपल्या हातात नाही हे अनुभवलय. अगदी इंडक्षन/ सिझेरियनच्या तारीख ठरवून केलेल्या केसेस सुद्धा ऐनवेळी पुढे/ मागे होत असलेल्या पाहिल्यात. तस्मात, जे आहे ते स्विकारुन आनंदाने पुढे नाण्यात शहाणपणा :)

"पण जर मृत्यू समय, मृत्यू तारीख, मृत्यू ठिकाण दिले तर त्या माणसाचा पुनर्जन्म होईल का?, केव्हा होइल?, कि होणारच नाही वगैरे सांगता येते का ?"--> ज्ञानवजी, माझ्यामते मृत्यू स्थान वेळेवरून पुनर्जन्माची वेळ नाही सांगता येत. ज्योतिषशास्त्र हे कर्माधिष्टीत आहे. माणसाचा पृथ्वीवरील जन्म हा पूर्वजन्मात केलेली काही फळे ह्या जन्मात भोगण्यासाठी होतो. तसे ते भोगण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती निर्माण करून देण्याचे कार्य हे ग्रह करत असतात. कुंडली म्हणजे ग्रहांची केलेली मांडणी ज्यावरून फलादेशाचा अंदाज बांधता येतो. हि मांडणी करण्यासाठी आवश्यक घटक म्हणजे जन्मस्थळ आणि जन्मवेळ. त्यामुळे फलादेशाचा अंदाज बांधण्यास मदत करणारे हे ज्योतिषशास्त्र पृथ्वीवरील जन्मानंतर मदतीस येते. हिंदू संस्कृतीतील वेद, शास्त्रे, पुराणे यातील मताप्रमाणे मानवी आत्म्याला ३ देहांची उपाधी लाभली आहे. स्थूलदेह, सूक्ष्मदेह, आणि कारणदेह. स्थूलदेह पडल्यानंतर सूक्ष्मदेहसहित आत्मा का सुक्ष्मलोकात जन्म घेतो म्हणजेच माणसाचा जसा स्थूलदेहसहित पृथ्वीवर जन्म होतो तसाच मृत्यूनंतर तो सुक्ष्मलोकात होतो. सुक्ष्मलोकात किती वर्ष राहायचे हे माणसाच्या सर्व जन्मातील केलेल्या कर्मावर अवलंबून असते. साधारणपणे जास्तीत जास्त हे आयुर्मान पृथ्वीवरील १००० वर्षाइतके असू शकते. (संदर्भ: Book Autobiography of a Yogi by Paramhansa Yogananda: Chapter 43: The Resurrection of Shri Yukteshvar). कोणत्या कर्माचे फळ भोगायचे हे निश्चित झाले कि त्याप्रमाणे पृथ्वीवरील एखाद्या स्थानावर ग्रहस्थिती निर्माण झाल्यावर माणसाचा जन्म होतो. सध्याचे पृथ्वीवरील ज्योतिषशास्त्र हे कर्मविपाकाचे गणित करण्यास असमर्थ असल्याने पूर्वजन्म केंव्हा आणि कुठे होईल हे नाही सांगता येत. यदाकदाचित सुक्ष्मलोकात पृथ्वीवरील ज्योतिषशास्त्रप्रमाणे काही असल्यास सुक्ष्मलोकात मृत्यू कधी होईल असे सांगता येईल व त्यावरून साधारण ८-९ महिन्यांनी पृथ्वीवर जन्म असेल असे भाकीत करता येऊ शकेल :D परंतु योगशास्त्रात अश्या काही क्रिया आहेत जेणेकरून आपण शोधात असलेल्या एखाद्या माणसाचा पुनर्जन्म झाला आहे किंवा नाही हे सांगता येऊ शकते. अर्थात तश्या क्रिया केवळ अतिउच्च योग्यांनाच करता येतात व आपल्यासारख्या सामान्य माणसाला नाही हे सांगणे आलेच. Autobiography of a Yogi मध्ये योगानंदांनी थोडक्यात त्याचा संदर्भ दिला आहे (chapter २३). तो जरूर वाचावा. बाकी मला पत्रिका पाहण्याचा अनुभव नाही. तुमच्या त्या प्रश्नावर जाणकार लोक प्रकाश टाकतीलच.