✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कविता - एक खेळ

ज
जेपी यांनी
Mon, 12/02/2013 - 10:58  ·  लेख
लेख
आम्हाला कविता करन कधी जमलच नाही . पण कविता वाचायला भारी आवडत. काही गोड प्रसंगी इतरांच्या कविता स्वतच्या नावावर खपवायचा प्रयत्न हि केला . पूर्वी एका वर्तमान पत्रात कवितेचा एक खेळ यायचा . तोच खेळ येथे देत आहे . या खेळाचे नियम फार सोपे आहेत . मी तुम्हाला काव्याच्या दोन पंगती देत आहे . तुम्ही प्रतिसादात कमीतकमी दोन जास्तीतजास्त चार ओळी लिहा . नवरसा पेकी कुठल्या हि रसाच्या आसु द्या . फक्त वरच्याशी जुळणाऱ्या आणि खालच्याला पूरक आसु द्या . मी खाली माझ्या दोन ओळी देत आहे . " माझ्या मनात तुझे येणे -जाणे, कठीणनच आहे शब्दात पकडणे "
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8247 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

उदाहरण?

पैसा
Mon, 12/02/2013 - 11:11 नवीन
उदाहरण म्हणून तुम्हीच एक दोनोळी कविता द्या बघू!
  • Log in or register to post comments

ध्यानी, मनी, स्वप्नी तुच तु |

अनिल तापकीर
Mon, 12/02/2013 - 11:29 नवीन
ध्यानी, मनी, स्वप्नी तुच तु | माझी जीवनसाथी तुच तु | जमले की नाही माहीत नाही पण असेच लिहले आहे.
  • Log in or register to post comments

" कुणी मोजले तारे अनंत ,

जेपी
Mon, 12/02/2013 - 11:37 नवीन
" कुणी मोजले तारे अनंत , शिशीरांची पानगळ मोजलीय कुणी "
  • Log in or register to post comments

तथास्तु!

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 12/02/2013 - 11:46 नवीन
तथास्तु! :)
  • Log in or register to post comments

माझे २ पैसे.

आनन्दा
Mon, 12/02/2013 - 11:49 नवीन
माझे २ पैसे. या विश्वाचा जो निर्माता तुझा न माझा जीवनदाता त्याचे या सार्‍यातील असणे तसेच वाटे तुझे वाहणे त्या देवाला कुणी पाहिले मनात येता कैसे कळले विश्वच त्याचे, त्याचे सारे श्वासच त्याचे, शीतल वारे त्या श्वासांसम शीतल परि तू आनंदाची मंद झुळुकशी कसे न कळले मला तुझे पण श्वासांसोबत येणे जाणे
  • Log in or register to post comments

@मी तुम्हाला काव्याच्या दोन

अत्रुप्त आत्मा
Mon, 12/02/2013 - 11:52 नवीन
@मी तुम्हाला काव्याच्या दोन ""पंगती"" देत आहे >>> =)) ठ्ठो! =)) ठ्ठो! =))
  • Log in or register to post comments

आत्मुस

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 12/02/2013 - 11:55 नवीन
आत्मुस.. मेल्या समजून घे रे... :-|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

चला पंगतीला बसू या...

थॉर माणूस
Mon, 12/02/2013 - 11:59 नवीन
:)) चला पंगतीला बसू या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

=))

बॅटमॅन
Mon, 12/02/2013 - 14:11 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हे बघा कसं वाटतं...

वेल्लाभट
Mon, 12/02/2013 - 12:35 नवीन
असा धागा एका दुस-या काव्यविषयक संकेतस्थळावर बघितला होता. एक काफिया घेऊन त्यावर शेर जोडत महागजल झाली होती. हा काफिया बघा कसा वाटतो; त्यापुढे सुचल्यास आपले शेर जुळू द्यात. स्वतःला असे मी जपावे कशाला जगापासुनि मी लपावे कशाला ...
  • Log in or register to post comments

माझीच माती, माझीच नाती,

आनन्दा
Mon, 12/02/2013 - 13:00 नवीन
माझीच माती, माझीच नाती, पसार्‍यातुनी मी पळावे कशाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

वा!

पैसा
Mon, 12/02/2013 - 13:05 नवीन
मस्त चाललंय! इथे विडंबन चालेल का नाही?
  • Log in or register to post comments

चालेल हो ताई . नवरसापैकी

जेपी
Mon, 12/02/2013 - 13:11 नवीन
चालेल हो ताई . नवरसापैकी काहीही चालेल
  • Log in or register to post comments

कठीणनच आहे शब्दात पकडणे

यसवायजी
Mon, 12/02/2013 - 13:26 नवीन
कठीणनच आहे शब्दात पकडणे
'कठीणच आहे' का 'कठीण नच आहे' मला एकंदरीतच कठीण वाटतंय.
  • Log in or register to post comments

ऐयो काय श्लेष बे तोऽ, भाळ छंद

बॅटमॅन
Mon, 12/02/2013 - 14:11 नवीन
ऐयो काय श्लेष बे तोऽ, भाळ छंद अदं इदु!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

आमच्या दोन वीटा

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 12/02/2013 - 15:20 नवीन
माझ्या मनात तुझे येणे -जाणे, कठीणच आहे शब्दात पकडणे आज जरा भांडी नीट विसळणे रोज खपवुन घेणार नाही भांड्यांना पावडर तशीच रहाणे आता वेल्लाभटांचा काफिया स्वतःला असे मी जपावे कशाला जगापासुनि मी लपावे कशाला कंड सुटता हवे लाजणे ते कशाला मुठी घट्ट आवळीत बसावे कशाला काय म्हणावे अशा वागण्याला त्वरीत करावे सुरु खाजवायला
  • Log in or register to post comments

बुवा !!

सुहास..
Tue, 12/03/2013 - 19:51 नवीन
_/\_ दंडवत घ्या बुवा !! अरे क्काय दोन ओळीतच खाज काढली आहे ...लय भारी . असो @ तथास्तु .. तुमचा आजचा धागा, काही प्रतिसाद , व सही बघुन आम्हाला मच्या एक जुन्या मित्राची आठवण येत रहाते..असो .. @वेल्लाभट .. स्वतःला असे मी जपावे कशाला जगापासुनि मी लपावे कशाला पात्र असो वा नसो, मैदानात, उतरावे कशाला बोर्ड फुकाट म्हणुनी काय लगेच नाचावे कशाला हा घ्या ...पुढे स्टॅमिनाचा कस आजमावत पावसांत दोने रेनकोट घालुन टृकिंग ला जाणारा .. वाश्याकेष डिवचरकर ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

@सुहास जुन्या मित्रांची आठवण

जेपी
Tue, 12/03/2013 - 20:07 नवीन
@सुहास जुन्या मित्रांची आठवण ठेवली आमची पण ठेवा . सही -सही काय बदलत राहते . येथे सही विचारतात उद्या धनादेश पुस्तीका मागतील . ह घ्या . (once upon a time in ... ) हे शिर्षक चोरलेला -तथास्तु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

वेल्लाभटांच्या काफियाचा विस्तार

राजेंद्र मेहेंदळे
Mon, 12/02/2013 - 17:14 नवीन
स्वतःला असे मी जपावे कशाला जगापासुनि मी लपावे कशाला ====== भले किर्र अंधार वाटेवरी ह्या तरी मार्ग सोडुनी जावे कशाला असे रात्र थोडी आणि फार सोंगे तरी खिन्न होउनी गावे कशाला जरी भोवती गारठा भितीदायी उद्याची असुदेत आशा मनाला
  • Log in or register to post comments

स्वतःला असे मी जपावे कशाला

अभ्या..
Tue, 12/03/2013 - 19:30 नवीन
स्वतःला असे मी जपावे कशाला जगापासुनि मी लपावे कशाला . असता स्मार्टफोन उशाला. रात्रभर जागावे कशाला. . इन्फेक्शन कासवाच्या घशाला. काळजी का असावी सशाला. . है का अजुन कोणी यमक हराम ?;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

वाह

प्रसाद गोडबोले
Mon, 12/02/2013 - 18:00 नवीन
छान आयडीया !! अवांतर : ह्यावरुन आठवले गेल्या कित्येक दिवसात काहीच नवीन काव्य बिव्य सुचलं नाहीये :(
  • Log in or register to post comments

आता वेल्लाभटांचा काफिया

देशपांडे विनायक
Tue, 12/03/2013 - 19:22 नवीन
आता वेल्लाभटांचा काफिया स्वतःला असे मी जपावे कशाला जगापासुनि मी लपावे कशाला स्वतःस शहाणे मानावे कशाला मिपावरी जगावे कशाला
  • Log in or register to post comments

स्वता:स शहाणे मानावे कश्याला

जेपी
Tue, 12/03/2013 - 19:28 नवीन
स्वता:स शहाणे मानावे कश्याला , मिपावरी जगावे कशाला , प्रतिसाद तरी द्यावा कशाला , स्वता:चे हसे करावे करावे कशाला.
  • Log in or register to post comments

विचारी ?

देशपांडे विनायक
Tue, 12/03/2013 - 19:40 नवीन
माझ्या मनात तुझे येणे -जाणे, कठीणच आहे शब्दात पकडणे पाहुनी मित्रासवे तुझे बागडणे कठीणच आहे तुझा हाथ पकडणे
  • Log in or register to post comments

माझ्या मनात तुझे येणे -जाणे,

स्पंदना
Wed, 12/04/2013 - 04:39 नवीन
माझ्या मनात तुझे येणे -जाणे, कठीणच आहे शब्दात पकडणे नको वाटतो मज फेर आठवांचा नको लोभ पुन्हा त्या ओष्ठ्द्वयांचा नको रात्र सारी तू स्वप्नात माळु स्वप्नभंगात फिरुनी दुभंगुन जाणे नको खेळ पुन्हा त्या जुन्या बंधनांचा नको स्पर्शभास शरीरा तयाचा नको रे पुन्हा त्या विरहात जाळु नको पहाटेला दवथेंबात न्हाणे नको वाटतो वायु यमुना तिरीचा नकोच कदंब बिना सावलीचा नको सूर वाहू जळी बासूरीचा नको घटाचे दुभंगुन जाणे का घडवीशी पाषाण या राधिकेचा विसरली हास्य मधुर, विसर पडे जगाचा तरीही श्वास घेणे हा नियम या धडाचा ........ कुणीतरी मदत करा भाऊ/तायांनो.
  • Log in or register to post comments

वा मस्त!

पैसा
Wed, 12/04/2013 - 09:34 नवीन
इथे काही खरेच चांगल्या कविता वाचायला मिळताहेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

उरे कैद शिल्पी ते स्मित

स्पंदना
Wed, 12/04/2013 - 17:17 नवीन
उरे कैद शिल्पी ते स्मित जीवघेणे ॥ शेवटचे कडवे का घडवीशी पाषाण या राधिकेचा विसरली हास्य मधुर, विसर पडे जगाचा तरीही श्वास घेणे हा नियम या धडाचा उरे कैद शिल्पी ते स्मित जीवघेणे ॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

चारोळ्यांचे गोफ

ऋषिकेश
गुरुवार, 12/05/2013 - 15:56 नवीन
या निमित्ताने फार वर्षांपूर्वी इथेच मिपावर मी आणि प्राजु यांनी मिळून एक गमतीदार खेळ सुरू केला होता त्याची आठवण झाली त्याचे दुवे: गोफ-१ गोफ-२
  • Log in or register to post comments

अपर्णा तै __/\__

प्रीत-मोहर
Sat, 12/21/2013 - 14:42 नवीन
अपर्णा तै __/\__
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा