जे न देखे आम्ही...
लेखनविषय:
काही वर्षांपूर्वी आम्ही एका कॉर्पोरेट कार्यालयात काही कार्यकाजाच्या निमित्ताने गेलो होतो. "कार्यकाजाच्या निमित्ताने" हे शब्दोपयोजन येथे दोन अर्थांनी आहे. एक तर आम्ही त्यांच्यासाठी काही कार्य करणार होतो आणि दुसरे म्हणजे त्या बदल्यात ती लोकं आमची काही कार्ये करणार होती. त्या संबंधात आमचे त्यांच्याकरिता करावयाचे कार्य तसे "दुय्यम" होते. म्हणजे, त्या लोकांचे कार्यकाज आम्हांस पटले, भावले, आणि मुख्यत: त्यांची कार्यपद्धती आम्हांस तृप्तीकर झाली, तर शेवटी त्यांस आम्ही आमच्या एक प्रकल्पावर घेणार होतो. आमच्या प्रकल्पावर कार्य करणे हे बाजारात त्यांच्यासाठी भविष्यकालीन रोख उत्पन्नाचे चांगले साधन होणार होते.
कसेही करून आमच्या प्रकल्पात सहभागी होण्याची त्यांची मनिषा होती; आणि त्यामुळेच की काय, त्यांच्या कार्यालयातले अधिकारी आमची भारी बडदास्त ठेवून होते. कार्यालयाच्या प्रवेशद्वारापसूनच, आपले कार्य ह्याँव आरंभू आणि त्याँव संपवू अशी आम्हाला कानांत आश्वासने मिळू लागली. पुढे, गुलाबी पुष्पगुच्छांचे स्वागत काय, हस्तकलासंपन्न साडी परिधान केलेल्या रिसेप्शनिस्ट्स् चे हसऱ्या चेहेऱ्याने सुस्वागतम् काय, दवंडीफलकावर आमच्या आगमनाची वार्त्ता काय, त्यांच्या कार्यालयातील मुख्य एलसीडी प्रक्षेपकावर आमच्या लॉ फ़र्मच्या व्यक्तिरेखेचे प्रदीर्घ चित्रण काय, थंडगार कोक्काकोला काय, विविध थाळ्यांमध्ये नाना प्रकारच्या मिठाय्या काय, दुपारी राजस्थानी पद्धतीचे पूर्ण थाळीचे लंच काय... थोडक्यात काय, तर राजोपचारी ठाटामध्ये आमचे स्वागत होत होते..!
त्यांच्या चकचकीत स्वच्छ कार्यालयाच्या दर्शनी भागातील भिंतींवर सर्वदूर त्यांची मिशन् स्टेटमेंट्स्, व्हिशन् स्टेटमेंट्स्, तिमाही धोरणे, सहामाही लक्ष्यप्राप्ती, वार्षिक ताळेबंद, कार्यालयीन कर्मचारीगणांच्याबद्दल कार्यालयीन निर्देश तसेच धोरण, कार्यालयाची गुंतवणूक, विमायोजना इत्यादि इत्यादि "आम्ही ह्याँव आणि आम्ही त्याँव" बाबी रंगीबेरंगी बोर्डवर लटकाविलेल्या दिसत होत्या. प्रत्येकाखाली कार्यालय प्रमुखाची सुंदर लफ़्फ़ेदार स्वाक्षरी. हे सर्व पाहून झाल्यावर, माझ्या एका सहकाऱ्याने त्यांच्या प्रमुखास, "अरे वा! आमच्यासाठी तुमचे सगळे कार्यालय जणू काय रिनोवेटच केलेत वाटते?" असे थोडे गंमतीने म्हटले. त्यावर तो प्रमुख दचकला. "न...न... नाही हो सर, तसे काही नाही... काहीतरीच काय म्हणतांय आपण?" त्यावर माझा सहकारी कसा म्हणे, "पण हे सगळे बोर्ड् तर आजच सकाळी लटकावलेत नां?" ते ऐकून प्रमुखाने कपाळावरील घर्मबिंदु टिपत विषयाची चाल बदलली. मुख्य विषयावर गाडी आणली.
नंतर संध्याकाळी कॉफी ब्रेक दरम्यान मी माझ्या सहकाऱ्याकडे विचारले, "ते बोर्ड् सगळे नवे आहेत म्हणून त्यास कसे काय विचारलात हो? ह्या कार्यालयात ह्यापूर्वी तुम्ही कधी आला होतात की काय?" "नाही रे, गोविन्दा!" लाडक्या लहान बाळास समजावावे तसे सहकारी उद्गारला, "ते बोर्ड् तू नीट पाहिलास काय? एकाच्या बाजूस एक असे लटकावलेले ते बोर्ड... सकाळी आपण आलो तेंव्हा ह्याच कार्यालयाचे, इथलेच कर्मचारी त्या प्रत्येक बोर्डाकडे ७-८ च्या गटात उभे राहून आ म्हणून तोंड वासून; जसे काय कहीतरी अजबच पाहतो आहोत, तसे पाहत उभे होते नां?.. त्यावरूनच मला समजले हा सर्व प्रासंगिक खटाटोप असल्याचे..."
जे न देखे आम्ही...
-
हैयो! हैयैयो!!
वाचने
1989
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
अप्रासंगिक खटाटोप!
हे नवीन मिपाकर लिहायचा लईच
In reply to हे नवीन मिपाकर लिहायचा लईच by जेपी
हैयो यांचा सदस्यकाळ चेक
In reply to हैयो यांचा सदस्यकाळ चेक by आनन्दिता
नमस्कार
In reply to नमस्कार by हरवलेला
मला का बरे?.
In reply to मला का बरे?. by आनन्दिता
अय्यो अय्ययो...
अय्यो अय्ययो...
क्रमश:
खुप सुरेख किस्सा लिहलाय. मिश्किलतेचा झोत तर अप्रतिम
निरिक्षण उत्तम आहे!
@दवंडीफलकावर>>> हा शब्द लाइक
In reply to @दवंडीफलकावर>>> हा शब्द लाइक by अत्रुप्त आत्मा
दारु प्यायला सुरुवात करा हो......
मस्त. आवडेश.
मस्त किस्सा...