~आज मला शब्द व्हायचय~
आज मला शब्द व्हायचय
पुस्तकात बसून अर्थात न्हायचय
मग अरण असो कि सल असो
सगळ्यांनी फक्त मलाच पहाचय
……. आज मला शब्द व्हायचय
कधी कोणाच्या आठवणीत
तर कधी कोणाच्या बातवणीत
खरच मला कवितेत जायचंय
शब्द बनून ओठांवर रहायचय
……. आज मला शब्द व्हायचय
भूक माझी फारच थोडी
फक्त मला अर्थांना खायचय
रेघा रेघांचे शरीर फक्त
सल्लज्ज अश्या एका ओळीत रहायचय
……. आज मला शब्द व्हायचय
प्रेम पत्र असो मी मृत्यूपत्र असो
मला कुन्या काळजात शिरायचं
गेलो जरी मी पाण्यात वाहून
एक अर्थ म्हनून मला उरायचं
…….आज मला शब्द व्हायचय
~वैभव कुलकर्णी ~
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1322
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
(No subject)
भावना आवडल्या
'अरण'
छान कविता...........