आजकाल गॅस लाच लाइटर असतो ते बरे आहे बुआ. काही दिवसांपूर्वी गॅस चा लाइटर सापडला नाही म्हणून शेजारणीने "सुमे जा ग जरा माझा लाइटर घेऊन ये पर्स मधून" असे फर्मावल्याचे आठवते.
त्या पुर्वी, शेजारच्या, निर्मला ताई, त्या एकदा म्हणाल्या होत्या, अरे जरे जरा बाबांचा लाइटर घेऊन म्हणून.
त्याचा आधीच्या सगूणा बाई "शिंदळीची काडेपेटी कुठे गेली काही कळत नाय!. ए पोर्या बापाची काडेपेटी आणा रे" असे म्हणाल्याचे ऐकिवात आहे.
पण त्याचा पूर्वीच्या बायका आग कशी लावत असत बरे? म्हणजे स्वयंपाक करताना हो! (बाकी आग लावायाच्या पद्धती बदलल्या नसाव्यात असे वाटते. तो विषय नंतर कधी तरी हाताळूयात).
तर सांगायचे काय होते, की, काडेपेटी यायच्या आधी आग लावणे हे महा कठीण काम होते. आणि म्हणून घरात आग चालूच ठेवत असत. पालोटे वैगेरे जळत असत म्हणे कायम. (म्हणजे नवर्याचा कामाचा पालोटा बायकांनी स्वयंपाक घरात आग लावायला पळवला अशा कुरबुरी तेव्हाच्या मिपा कट्ट्यावर ऐकू येत असाव्यात). अर्थातच नवरोबा अंधाराचा फायदा घेतात अशा कुरबुरी किचन मध्ये होत असाव्यात. खरे खोटे देव जाणे !!!
तर घरचे पालोटे गेले तर कुठून तरी आग आणावी लागत असे. शेजारणी कडे "थोडेसे विरजण अँड एक पालोटा द्या होत जरा" असे गार्हाणे जात असवेसे वाटते.
पण आग हमखास मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे अग्निहोत्र. असे आग लाबूनच ठेवणारे भट गावात मिळत असत.
तर अशीच आग आम्ही आमच्या घरात गेले काही दिवस लावून ठेवली आहे. म्हणजे आमचा ते संगणक, हां, तर तो रात्रंदिवस चालू असतो. मिपा वर पडिक असतो आम्ही.
बायकोला सांगून ठेवले आहे, की जरा काही बिनसले तर सरळ आत्मवृत्तांत खरडून काढेन. शेजारचा पण त्याच्या बायकोला म्हणाला आहे की आपला संगणक बंद असला तर विवा कडे जाऊन खरडेन.
आता सांगा हे अग्निहोत्र नव्हे तर आणखीन काय?
- विदेशि वचाळ
वाचने
7810
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
आयायायायायायाया
पेटवा च्यामायलान काय!
जळ्ळं मेलं लक्षण ते..
छान
नमस्कार मालक
In reply to छान by नीलकांत
शुद्धलेखन
मिपावर स्वागत!
माझं नशीब भारीच आहे म्हणून तर
In reply to मिपावर स्वागत! by पैसा
पालोटा हा पलित्याचा अवतार
___/\___
हायला ,हा लेख आला का ईथे .
आता लेखाचे कारण असे काही नाही आहे. आले मनाला म्हणून लिहिले.
अरे वा!
In reply to आता लेखाचे कारण असे काही नाही आहे. आले मनाला म्हणून लिहिले. by विदेशी वचाळ
स्त्री आय डी????
In reply to अरे वा! by पैसा
च्च च्च!
In reply to स्त्री आय डी???? by विदेशी वचाळ
??
In reply to च्च च्च! by पैसा
आताच!
In reply to ?? by बॅटमॅन
लाईक केल्या गेले आहे.
In reply to आताच! by पैसा
यकदम् आवाsssजी बंद ?!
In reply to आताच! by पैसा
हम जहांपर खडे होते है वहांपर
In reply to आताच! by पैसा
हम जहांपर खडे होते है वहांपर
In reply to आताच! by पैसा
हम जहापे खडे र्हयते ।हय
In reply to हम जहांपर खडे होते है वहांपर by विजुभाऊ
बाकी धीर दिलात त्या बद्दल आभारी आहे.
In reply to अरे वा! by पैसा
+१
In reply to अरे वा! by पैसा
अगदी अगदी
In reply to अरे वा! by पैसा
हे बघा
वचाळ की वाचाळ?
पाईंटाचा मुद्दा, पोटात गुद्दा
In reply to वचाळ की वाचाळ? by अनिता ठाकूर
च च, तसे नाही हो.
In reply to वचाळ की वाचाळ? by अनिता ठाकूर
अं ? कितवा पेग ? ?
वाश्या लेका?
In reply to अं ? कितवा पेग ? ? by सुहास..
हा हा हा
In reply to वाश्या लेका? by सोत्रि
विवा,
+1 सोत्री
@आता सांगा हे अग्निहोत्र
लेखन आवडल हो विदेशी वाचाळ.
सुंदर प्रतिसाद
In reply to लेखन आवडल हो विदेशी वाचाळ. by स्पंदना
छान अपर्णातै !!
In reply to लेखन आवडल हो विदेशी वाचाळ. by स्पंदना
आग धुमसवणे वेगळे. पण आग जर
आग पेटवायची असेल तर...
गारगोटी म्हणायचयं वाटत
In reply to आग पेटवायची असेल तर... by विनटूविन
यस यस
In reply to गारगोटी म्हणायचयं वाटत by युगन्धरा@मिसलपाव
एक विस्मरणात गेलेला शब्द
जुन्या काळात भटजी लोक