घसरता रुपया सावरण्यासाठीचे "साधे" उपाय
***********************************
१) दरमहा आपण फक्त एक लिटर पेट्रोल वाचवूया.
*कसे तेही सांगतो. फार काही नाही. सुट्टीच्या दिवशी जवळच
कुठे जायचे तर पायी किवा सार्वजनिक वाहतुकीने जावे.
(०.३ लिटर बचत नक्की.)
*पार्किंगमधेच गाडी चालू करून बाहेर काढण्या पेक्षा इमारती
बाहेर आणून सुरु करू. (०.३ लिटर बचत नक्की.)
*सिग्नल ला गाडी बंद ठेवू (०.१ लिटर बचत नक्की )
*रस्त्याने जाताना निष्कारण ब्रेकवर पाय दाबून ठेवल्याने
इंधन जास्त जळते. तुम्ही पहा ना, अनेक गाडीचे ब्रेक लाईट
कायम लागलेले असतात. गाडी तरी कडे avarage देणार?
हि सवय टाळूया. (०.२ लिटर बचत नक्की.)
*चाकात हवा वरचेवर चेक करावी. कमी हवेमुळे इंधन जास्त जळते. पाच रुपयाच्या हवेतून किमान दहा चे
इंधन वाचेल. (०.२ लिटर बचत नक्की.)
अशी एकूण एक लिटर बचत नक्की होईल. महिना सुमारे ७० रु. धरा.
--------------------
२) विदेशी टूथ पेस्ट बंद करून स्वदेशीपेस्ट एक महिना वापरून पहा.
नाही रुचले तर पुन्हा नेहमीची तुमची वापरा. पण त्या एक महिन्यात
तरी स्वदेशी पेस्ट वापरल्याने विदेशात जाणारा पैसा वाचेल.
एक पेस्ट सुमारे चाळीस रुपयाची, एका कुटुंबाला एक पेस्ट लागते,
तरी यातून स्वदेशी वापरली तर किमान दहा रुपये वाचतील.
----------------------
हे साधे दोन उपाय आहेत. पण यातून किती मोठे काम उभे राहू शकते पहा.
कल्पना करा... किती मोठे काम होईल हे !!
सगळ्या गोष्टी सरकारने कराव्या असे म्हणून केवळ
टीका करीत बसण्या पेक्षा आपल्या परीने आपण एक पाऊल पुढे टाकू !!
इंधन आणि पेस्ट मधून इतके काम होतेय.. यात तुम्ही अजून कोल्ड्रिंक, लिपस्टिक,
पिझ्झा अशा विविध वस्तू add करू शकता !!
उगीच वाद घालण्यापेक्षा.....पहा विचार करा..!!
टिप :-- मी कोणी अर्थतज्ञ नाही.. हा लेख मी लिहिलेला नसून facebook वर माझ्या वाचण्यात आला आणि मनाला पुष्कळ भावला… आणि हे उपाय जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहचावे हाच प्रामाणिक हेतू आहे. म्हणून इथे share करत आहे. "रुपयाचे dollar च्या तुलनेतील अवमुल्यन" हे आपण नुसतं वृत्तपत्रात वाचतो. आपण सामान्य जनता रुपयाचा भाव वाधारण्यात हातभार लावू शकतो. अजून काही साधे साधे उपाय आठवतात काय आपल्या मिपाकरांना…असतिल तर share करा इथे.
वाचने
5522
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
टाटा मोटारी विकत घ्या. मारुती
त्या पेक्षा टाटा आणि महिंद्रा
In reply to टाटा मोटारी विकत घ्या. मारुती by सुबोध खरे
करेक्ट...
In reply to त्या पेक्षा टाटा आणि महिंद्रा by प्रसाद१९७१
कशाला?
कशाला सावरायचा >>>> +१००००००
In reply to कशाला? by सुनील
स्वदेशी
स्वदेशी हा एम्वेच्या कॉपी टु
In reply to स्वदेशी by राजेंद्र मेहेंदळे
अजुन एक
फक्त एकच प्रयत्न
सहमत आहे ..........
In reply to फक्त एकच प्रयत्न by वासु
होय
मी पण
In reply to होय by मी_आहे_ना
रच्याकने, लॅप्टॉप कुठल्ला
In reply to मी पण by क्लिंटन
डेल कुठला आहे....स्वदेशी की
In reply to रच्याकने, लॅप्टॉप कुठल्ला by यसवायजी
खुप छान धागा आहे.
लिंक छान आहे पण….
थोडक्यात सांगायचे तर जर
लोढा नी ३२०० कोटी रुपयांना
फारसे पटले नाही
In reply to लोढा नी ३२०० कोटी रुपयांना by प्रसाद१९७१
लोढांनी किंवा इतर कोणीही जर
In reply to लोढा नी ३२०० कोटी रुपयांना by प्रसाद१९७१
बा किलंटना..
+१
In reply to बा किलंटना.. by उपास
सरळ दिगंबर व्हावं, रुपया अशी
खलीस्थान चळवल चालू होती