आगावू टीप :- या धाग्याला मीपा.भूत मंडळींनी उगीचीच फाटे फोडू नयेत. नाही तर अतृप्त आत्मा त्यांच्या मानगुटीवर बसेल .
माझी मुंज १९८८ साली आमच्या गावाला(विसापूर,गुहागर तालुका) झाली. माझ्या मुंजीच्या वेळेची गोष्ट,जे गुरुजी मुंज लावायला आले होते ते आमच्या मामीच्या दापोली तालुक्यातील टेटवली गावचे होते. मुंजीच्या दुसर्या दिवशी सत्यनारायण पूजा सांगून ते निघणार होते म्हणून ते आमच्या कडेच वस्तीला राहिले होते. मग रात्री गप्पांचा फड जमला. होता होता भुतांचा विषय निघाला तेव्हा गुरुजी म्हणाले आमच्या गावाला आहेत भुते आणि जर कोणाला पहायची असतील/ अनुभव हवा असेल तर माझ्या बरोबर चलावे. मी रात्री आमच्या गावच्या वेस कुसेवर घेवून जाईन. पण माझ्या बरोबर चालायचे आणि अजिबात काहीही आवाज झाला, कोणी दिसले तरी मागे वळून पहायाचे नाही. आम्ही तेव्हा लहान होतो असे विषय निघाले तर पुढे काय पुढे काय असे सारखे विचारात असायचो. आणि हा विषय तसा कधी न संपणारा असा. पुढे मग अनिस बद्दल वाचले आणि जंतर मंतर , झपाटलेपणा , अंगात येणे या विषयी वाचून मनात संभ्रम निर्माण झाला कि या जगात खरोखर भुते आहेत कि नाहित?. मला आलेले म्हणजे प्रत्यक्षात नाही पण ज्याना आले आहेत त्यांचे अनुभाव दाखल असे काही किस्से. १)१९९७/१९९८ साली मी दाभोळ वीज कंपनी ( पूर्वीची Enron Power proj.) ला कामाला होतो. शनिवार (अर्धा दिवस) आणि रविवार सुट्टीच्या दिवशी मी भाड्याच्या खोलीत न राहता (कंपनी पासून जवळच असल्याने मी एक खोली तिथे भाड्याने घेतली होती) माझ्या इतर नातेवाईकांकडे गावाला जायचो ते सोमवारी सकाळीच कामावर यायचो. तर असा एक दिवशी मी कुडली-जाम्भारी(गुहागर तालुका) येथे माझ्या सख्खी आत्या राहते तिथे गेलो. घर मोठे होते आणि आजुबाजुला खुप दाट झाडी होती. जेवणे झाली आणि आत्या , काका माझ्या बरोबर गप्पा मारायला बसले तेव्हा मी म्हणालो कि तुम्ही एवढ्या लांब ३ डोंगराच्या मध्ये आड बाजूला राहता तेव्हा भीती नाही वाटत. तर आत्ये म्हणाली भीती वाटून काय करतोस आणि या घरातच तुला काही अनुभव आला तर मला सांग. कारण माझे आजे सासरे खूप बिड्या ओढायचे; तेव्हा रात्री कधी कधी बिड्या ओढल्याचा वास येतो. तुला पण आज रात्री वास येतो का पाहा. मला तर लग्न होवून इथे आल्यावर यांनी सांगितले तेव्हा विश्वास बसला नव्हता पण नंतर जेव्हा खरोखर वास आला तेव्हा पटले. कारण एवढ्या मोठ्या घरात हे , मी आणी दुर्वास ( त्यांच्या मुलगा) एवढीच माणसे राहतो आणि यांनातर कसलेच व्यसन नाही. त्या रात्री मी पडवीत खाटेवर (बाज) झोपलो तर मला काहीच जाणवले नाही . मी तु दुसर्या दिवशी कामावर निघुन आलो. २) माझ्या आई ने आमच्या कळव्याच्या चाळीत राहणारे शेजारी पंडितकाकू यांना बहिण मानले. काही कारणाने त्यांनी चाळीतले घर सोडून १९९५ साली घोडबंदर रोडला पातलीपाडा येथे रहायला गेले. त्या वेळी घोडबंदर रोड म्हनजी जंगल चा भाग होता. आता तेथे खूप वृक्षतोड झालीये. तर या पंडितकाकूंना ४ मुली. एकेदिवशी त्यातील सर्वात धाकटी मुलगी हिला १८/१९ वर्षाची असताना म्हणे घरातच एक मळवट भरलेली बाई वर माडी वरून खाली माझ्या कडे बघतेय/ दिसते असे सागू लागली. त्या बाईला बघितल्यावर ह्या मुलीला ताप यायचा , खूप घाम यायचा. नानाविवध उपाय केले पण काहीच नाही ती मुलगी घरात एकटी थांबत नव्हती. मग आमच्या आईने माझ्या मामाला ही बातमी सांगितली. मामा लालबाग येथे श्रीकृष्ण दुग्धालयात (गणेशगल्ली) कामाला होता. त्याच दुकानात एक मंत्र तंत्र जाणणारा मान्त्रिक होता. त्याना घेवून आमच्या कडे आला. पुढे मीच त्यांना कळव्याहून पातलीपाडा येथे घेवून गेलो. त्यांनी काय केले हे माहित नाही पण त्या दिवसा पासून हे सगळे प्रकार झाले. आता त्या चारही मुलींची लग्न झाली व संसारात सुखी आहेत. मला कधी असले अनुभव आले नाहीत मी Enron कंपनीत असताना ज्या चाळीत खोली भाड्याने घेतली होती तिथे सगळे भाडेकरू गणपतीला आपापल्या घरी जायचे संपूर्ण चाळीत मी ५ दिवस एकटा राहाचो. आजूबाजुला बोंब मारले तरी कोणी येवू शकणार नाही अशी परीस्तिथी. पण मी मनात काहीच विचार नसल्याने बिनधास्त राहू शकलो. कोणी जर सांगितले की ती जागा बरी नाही तिथे जावू नकोस. तर मात्र मी त्या स्थानी जात नाही भिती म्हणुन समजा हवे तर. पण मुद्दाम म्हाणुन उगिचाच का या विषयाची परिक्षा घ्या. मधंतरी DISCOVERY CHANNEL वर भुतांविषयी एक सदर चालू होते. त्यात ३ जण वेगवेगळ्या कोनातून कॅमेरे लावून तसेच ghost detector का काही तरी तसेच यंत्र घेवून झपाटलेली स्थळ शोधून काढून भुतांचे छायाचित्र घेण्याच्या प्रयत्न करीत असत. रेकॉर्डिंग मध्ये काही सापडले तर ते एडिटिंग रूम मध्य जावून स्लो मोशन मध्ये ती चित्र फीत दाखवीत असत. तू नळीवर ज्या चित्रफीत उपलब्ध आहेत त्या मला तरी खर्या वाटत नाहित. तुम्हाला काही अनुभाव असतील तर येथे तसे सांगावे.
वाचने
31541
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
प्रतिक्रिया
आम्हाला काय माहित भुते आहेत
मस्तय पीजे.
In reply to आम्हाला काय माहित भुते आहेत by ऋषिकेश
फाटा क्र. १
होय
In reply to फाटा क्र. १ by मी_आहे_ना
ओके, फाटा क्लोज्ड
In reply to होय by प्रमोद देर्देकर
दर्दु काका मुंज म्हणजे काय
In reply to होय by प्रमोद देर्देकर
काय्च्या काई!
In reply to दर्दु काका मुंज म्हणजे काय by जेनी...
बर
In reply to काय्च्या काई! by प्रमोद देर्देकर
रागावु नाको पुजातै,
In reply to बर by जेनी...
ओ दर्दु काका काय तुमी पण
In reply to रागावु नाको पुजातै, by प्रमोद देर्देकर
बरं बरं
In reply to ओ दर्दु काका काय तुमी पण by जेनी...
पंचमहाभूतांना
जरा उपयुक्त अवांतर...
पुर्वी जगात भूते होती....
भुते
भुते
@नाही तर अतृप्त आत्मा
हे चेपु वर टाकलेलं ना?
In reply to @नाही तर अतृप्त आत्मा by अत्रुप्त आत्मा
मुळात हा मिपावर कोनत्या तरी
In reply to हे चेपु वर टाकलेलं ना? by प्यारे१
भुताचा हसरा चेहरा फार्फार
In reply to @नाही तर अतृप्त आत्मा by अत्रुप्त आत्मा
अरे हा मलापण ज्याम आवडायचा ..
In reply to भुताचा हसरा चेहरा फार्फार by बॅटमॅन
आणि पळायचा तेपण एक किलिंग
In reply to अरे हा मलापण ज्याम आवडायचा .. by जेनी...
आगदी आगदी
In reply to आणि पळायचा तेपण एक किलिंग by बॅटमॅन
म्या काढलेली चित्रं मात्र
In reply to आगदी आगदी by अभ्या..
किती तो सारखेपणा....
In reply to म्या काढलेली चित्रं मात्र by बॅटमॅन
कित्ती कित्ती म्हणून सारखेपणा
In reply to किती तो सारखेपणा.... by प्रभाकर पेठकर
घ्या. समदु:खी तर आम्हीही आहोत
In reply to कित्ती कित्ती म्हणून सारखेपणा by बॅटमॅन
धन्य आहे तुमची चित्तरकथा _/\_
In reply to घ्या. समदु:खी तर आम्हीही आहोत by मृत्युन्जय
पण या कारचे चित्र बाकी मला
In reply to धन्य आहे तुमची चित्तरकथा _/\_ by बॅटमॅन
अगदी अगदी
In reply to किती तो सारखेपणा.... by प्रभाकर पेठकर
हा हा हा अगदी अगदी
In reply to अगदी अगदी by इरसाल
@हा घ्या तुमच्यासाठी एक
In reply to भुताचा हसरा चेहरा फार्फार by बॅटमॅन
ओहो धन्स धनन्स बरं का आत्मूस
In reply to @हा घ्या तुमच्यासाठी एक by अत्रुप्त आत्मा
माबोवरचा धागा
झेपलं नाही
In reply to माबोवरचा धागा by भाते
धन्स अॅड्या
In reply to झेपलं नाही by आदिजोशी
धन्स अॅड्या मला हे सुचले नसते.
माफ करा
In reply to झेपलं नाही by आदिजोशी
होय. अन तुमचे उद्योग ते बघत आहेत!
इतके दिवस मिपावर वावरूनही हा
हो भुते असतात , आमच्या
बालिके.... तुला भूत दिसलं
In reply to हो भुते असतात , आमच्या by जेनी...
नाहि , माळराण ... भयानक
In reply to बालिके.... तुला भूत दिसलं by अत्रुप्त आत्मा
@आइगं ... भ्या वाटतय ....
In reply to नाहि , माळराण ... भयानक by जेनी...
(No subject)
In reply to @आइगं ... भ्या वाटतय .... by अत्रुप्त आत्मा
हे हे हे
In reply to @आइगं ... भ्या वाटतय .... by अत्रुप्त आत्मा
अगं जिभ्ले...पाणवठाच असेल,अन् रातीला तु त्यात स्वतःला पाहिलं आणी घाबरलीस !
बालिकेचं नवं नाव- ड्यांबिस हडळ!!!
हे बघा जमतय का?http://www
प्रतिक्रीया # २
जगाचं काय म्हैत नै
वन मोर
In reply to जगाचं काय म्हैत नै by पैसा
भुतं..
हवीत कशाला भुतं ?!?
जे जे भेटीजे भूत ते ते मानिजे
फुल स्कोप असल्याने इतका आनंद
भुते?
दोन भुते
अगदी अश्याच प्रकारे ऐकलेला
In reply to दोन भुते by क्लिंटन
आमच्याकडे घडलेला एक किस्सा