Skip to main content

अतीलघुकथा स्पर्धेचे काय झाले

अतीलघुकथा स्पर्धेचे काय झाले

Published on 24/09/2008 - 17:04 प्रकाशित मुखपृष्ठ

याद्या 1412
प्रतिक्रिया 35

>>स्पर्धेत आलेल्या सगळे प्रतिसाद एकाहुन एक सरस होते त्यामुळे निवड करणे अवघड जात आहे माझे मत ----- नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.

माझ्या मताप्रमाणे.... धागा फार मागे पडला, त्यामुळे... निर्णय झाला नाही.... कारण ही "अतिलघुकथा-स्पर्धा"असल्यामुळे..... "लघुकथा" कुठली आणि तिच्या वरील प्रतिक्रिया कुठली.....तिचे विडम्बन कुठले.... हे मेंदुत सरमिसळुन गेले.... १ नम्र सल्ला : पुढच्या वेळी... अशा स्पर्धेसाठी एखादा ब्लॉग उपलब्ध करुन द्यावा...त्यामुळे मुळ कथा कोणाची आहे हे कळेल.. आणि कमेंटसही कळतील... :)

एका अफलातून डोक्यातून निघालेली कल्पना,पण क्षुद्र स्वभावामुळे लोकांची फसवणूक केली गेली.जाहीर निषेध !निषेध ! मि.पा.च्या संपादकमंडळाने ह्याची द्खल घ्यावी.

In reply to by बिन्धास्त बबनी

सर्किट नावाचा सदस्य स्पर्धा जाहीर करतो. त्यात मिसळपावाचे चालक, मालक, संपादक यांचा काहीच सहभाग नाही. सर्किट त्याला हवे ते परिक्षक निवडतो. त्यातही मिसळपावाचे चालक, मालक, संपादक सहभागी नाहीत. आणि कोणीतरी स्पर्धा जाहीर केली म्हणून सर्व मिपाकर त्यात भाग घेतात. आता न विचार करता केलेली गुंतवणूक आणि न विचार करता घेतलेल्या स्पर्धांतील भाग हा सारखाच वाटतो. मला तर हा एक संकेतस्थळावरील फ्लॉप रिऍलिटी शो वाटला.

In reply to by विकेड बनी

बनी आणि बबनी. प्रत्येक ठीकाणी शिव्या आणि लाथा झाडायला हव्याच का? तुम्ही सहभाग घेत नसाल / मिपावर काहीच लिहीत नसाल तर टीका कशाला करता? आणि कोणीतरी स्पर्धा जाहीर केली म्हणून सर्व मिपाकर त्यात भाग घेतात. आता न विचार करता केलेली गुंतवणूक आणि न विचार करता घेतलेल्या स्पर्धांतील भाग हा सारखाच वाटतो. सर्कीट /रामदास आणि मुक्त्सुनीत हे आम्हाला कोणीतरी वाटत नाहीत. त्यांच्या बद्दल सामान्य मिपा सदस्याना आपुलकी आहे. त्यानी स्पर्धा घेतली म्हणुन इतक्या जणानी भाग घेतला. काहीच न करता निव्वळ टीक करण्यापेक्षा तुम्ही एखादी नवी कल्पना लढवा .उत्तम असेल तर भरभरुन प्रतिसाद मिळेल.( अर्थात तुमच्यात एवढे धाडस असेल तर). मिपा सदस्याना उत्तम काय आणि फोलकट काय ते चांगले कळते. जळजळ झाल्यामुळे उगाच असले कुजकट/खवट प्रतिसाद टाकु नका. ( जळजळीवर काय औषध असते ते सर्वाना ठाऊक असेलच. डीलर कडे स्टॉक असेलच) डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

In reply to by विजुभाऊ

इजाभौंशी सहमत. इजाभौ, सर्किटराव बिजी असतील, थोडा येळ मिळाला की ठरवतील कोण जिंकला/ली ते!

In reply to by विजुभाऊ

सहमत. मनस्वी *डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

In reply to by विजुभाऊ

सर्कीट रामदास आणि मुक्त्सुनीत हे आम्हाला कोणीतरी वाटत नाहीत. त्यांच्या बद्दल सामान्य मिपा सदस्याना आपुलकी आहे. सहमत आहे. ता.क. फक्त सर्कीट यांच्या निकालाच्या विलंबाच्या धोरणामुळे, त्यांच्याविषयी या क्षणाला आम्हाला कोणतीही आपूलकी नाही. ( ह. घ्या ) अवांतर : आता हे बनी आणि बबनी कुठून आले. वेड लागायची वेळ आली आम्हाला.

In reply to by विजुभाऊ

विजुभाऊ आपल्या घोड्याला जरा लगम द्या आता. :)) "प्रत्येक ठीकाणी शिव्या आणि लाथा झाडायला हव्याच का?" हे वाक्य सर्कीट ला मझा मते जास्त लागू पडत , नाही का? सर्कीट /रामदास आणि मुक्त्सुनीत हे आम्हाला कोणीतरी वाटत नाहीत. त्यांच्या बद्दल सामान्य मिपा सदस्याना आपुलकी आहे. हे सामान्य मिपा सदस्य कोण? जरा सांगीताले तर बर होईल.

In reply to by बिन्धास्त बबनी

http://vipravani.wordpress.com/ ह्यांत क्षुद्र काय? हा काय आंतर राष्ट्रिय करार होता का? उगाच काही तर्री विनायक्प्रभु

http://vipravani.wordpress.com/ अफलातुन डोके अजुन काही तरी अफलातुन मध्ये अड्कलेले असेल. मुले पळ्वणारा पळ्वलेल्यांचा स्टॉक घेत असेल. तिसर्याबद्दल काही कल्पना नाही. वि.प्र. केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे. करुन सुद्धा झाले नाही तर काय करावे.

In reply to by विनायक प्रभू

केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे. करुन सुद्धा झाले नाही तर काय करावे. ओ भाव .... भरपूर उपाय आहेत ... शास्त्रिय आणि ऐतिहाशीक .. अमोल पालेकराने सोनाली बंद्रीला घेउन एक चित्रपट पण काढलेला काही दिवसांपुर्वी. बाकी बिंधास्त बबनी(२०९२) हा फेक आय डी आहे हे लिहून घ्या. आणि विकेड बनी (१००) ह्यांना आपण कधी पाहिलंय का ? यांना बोलायचा हक्क नाही.. नक्कीच काहीतरी कारण असेल ... नाही तर पब्लिकसिटी स्टंट असेल ... असे स्टंट करण्यात काही गैर नाही असं वाटतं ... बाकी गटणेचे कौलारू लोण पसरत चाल्लय अलिकडे .. गटणे-विजुभौ एकाच कपात चहा पितात म्हणे हल्ली (पेम वाढण्यासाठी) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

सर्कीट यांच्या सूचनेवरून , मी माझा भाग पूर्ण केला आहे आणि सर्कीट यांना तसे योग्य वेळेत कळवले आहे. सर्कीट व्यस्त असावेत आणि मुख्य म्हणजे या स्पर्धेबद्दलचा शेवटचा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत असावेत असा माझा अंदाज आहे. बिन्धास्त बबनी आणि विकेड बनी या मला आजतागायत माहीत नसलेल्या सदस्यांची विधाने प्रक्षोभक आहेत. त्यांचा आजवरचा मिपावरचा सहभाग काय हे माझ्या अननुभवी दृष्टीस आणि अल्पमतिस ठाऊक नाही. परंतु हे सदस्य नवे आहेत आणि तरी त्यांना इतरांना पटकन क्षुद्र ठरविण्यात भलताच रस आहे हे पाहून करमणूक झाली. असो.

In reply to by मुक्तसुनीत

बिन्धास्त बबनी आणि विकेड बनी या मला आजतागायत माहीत नसलेल्या सदस्यांची विधाने प्रक्षोभक आहेत. त्यांचा आजवरचा मिपावरचा सहभाग काय हे माझ्या अननुभवी दृष्टीस आणि अल्पमतिस ठाऊक नाही. परंतु हे सदस्य नवे आहेत आणि तरी त्यांना इतरांना पटकन क्षुद्र ठरविण्यात भलताच रस आहे हे पाहून करमणूक झाली. हम्म! बबनी आणि बनीचे 'बोलवते धनी' वेगळे असावेत! :) आपला, (अनुभवी संस्थळचालक!) तात्या. विजूभाऊंनी विचारलेला प्रश्न रास्त आहे. ठरल्या दिवशी निकाल जाहीर झाला असता तर बरे झाले असते... असो, अजून थोडी वाट पाहायला हरकत नाही! एक खुलासा : या स्पर्धेच्या आखणीत मिपा व्यवस्थापनाचा काहीही सहभाग नाही... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बबनी आणि बनीचे 'बोलवते धनी' वेगळे असावेत! तात्या, 'बोलावते' आणि 'बोलविते' दोन्ही धनी बरं का... ;) बिपिन.

मुक्तसुनित जर निकाल जाहिर होईल इतक्या निर्णयापर्यंत आले असतील तर निकाल जाहीर करावा असेही वाटते. अर्थात चर्चा प्रस्ताव त्यांचा नसल्यामुळे तसं करणं योग्य ठरणार नाही, पण... सर्किटचा कारभार पाहता, सर्किटला कधी वेळ मिळायचा, कधी निकाल जाहीर व्हायचा....कधी त्यांचे बक्षीस मिळायचे. तो पर्यंत जगबुडी होऊन जाईल. :)

In reply to by मुक्तसुनीत

स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद !!! आपण निर्णय जाहिर करावाच असे म्हटले नाही, वाटले हो तसे, आणि वाटणे गैर नाही. अंतिम निर्णयाची जबाबदारी माझी नाही. ती सर्किट यांची आहे. या प्रक्रियेतील मुख्य अडचण हीच आहे की, आमचे मित्र ती जवाबदारी कधी पूर्ण करतील. :)

मुक्तसुनीत यांनी गुण कळवलेले आहेत. सध्या रामदासजींच्या गुणांची वाट पाहतो आहे, ते मिळाल्यावर निकाल प्रकाशित करण्यात येईल. विलंबाबद्दल क्षमस्व. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आज माझे गुणांकन पाठवले आहे. स्पर्धकांना झालेल्या मानसीक त्रासाबद्दल दिलगीर आहे. http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

हे विकेड बनी , कशाला वेळ घालवतेस इथे ? आणि बिन्धास्त बबनी, कसला क्षुद्र स्वभाव आणि काय काय बोलताय ? भरभरून लिहिलेल्या कथांना, प्रचंड प्रतिसाद मिळालेल्या स्पर्धेला तुमच्यात फ्लॉप शो म्हणतात वाटतं ?? खिखिखि खिखिखि .... मस्त करमणूक झाली राव आमची... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

स्पर्धा आवडली बुवा! झाला थोडा उशीर निकालाला तर कुठं बिघडतयं? ज्यांना विंट्रेष्ट नाही त्यांनी काड्या करू नयेत. (समजूतदार)रेवती

एका विधानावर एवढ्या प्रतिक्रिया ! आपणा सर्वांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल सॉरी हं! पण सांगितलेली वेळ न पाळणे हे आपल्या भारतीयांची खासियत सगळीकडे दिसलीच पाहिजे कां? नवीन आहे म्हणून सांभाळून घ्या की जरा !

In reply to by बिन्धास्त बबनी

पण सांगितलेली वेळ न पाळणे हे आपल्या भारतीयांची खासियत सगळीकडे दिसलीच पाहिजे कां?
मात्र लघुकथास्पर्धेचा निकालाला उशीर होणे ह्या संदर्भात ही अपेक्षा जरा जास्तच होते आहे असे नाही वाटत बि.ब तुला? अवांतर- वेळ न पाळण्याविषयीचे विधान डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे. परदेशातून जेव्हा भारतात कामाच्या निमित्याने जावे लागते तेव्हा ही खासीयत सगळीकडे दिसते. खूप वाईट वाटते. आपण स्वतः दिलेली वेळ काटेकोरपणे पाळली तर त्याचे कौतुक होण्यापेक्षा "कोठून इथल्या पद्धती न समजणार्र्या मुर्खाशी पाला पडला" अशीच रीऍक्शन येऊ शकते. वेळ पाळणे हे प्रोफेशनॅलिझमचे एक महत्वाचे अंग आहे हे आपल्याला केव्हा कळणार आहे कोण जाणे.

In reply to by अरुण मनोहर

अपेक्षा जास्त होते असे क्षणभर मानले तरी आयोजकाने तसे ,निकाल जाहीर होणार होता त्या दिवशी कळविणे आवश्यक होते असे आपल्याला वाटत नाही कां? की आपण सारखेच गप्प बसणे पसंत करायचे?

In reply to by बिन्धास्त बबनी

मला असे वाटते की ह्या स्थळावर सर्कीट ह्यांनी प्रोऍक्टीव्ह भुमीका घेऊन एक मजेदार स्पर्धा जाहीर केली आहे व त्या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला ही महत्वाची गोष्ट लक्षात घेऊनच निकाला संबंधीची तुमची दुसरी अपेक्षा देखील ताडून पहायला हवी. मिपावर केलेले काम हे विनामुल्य आणि केवळ मराठी विषयी प्रेमभाव असलेल्या मंडळींनी जालावर नेटवर्क करावे म्हणून असते. कित्येक सदस्य इथे उद्योगाचे नेहमीचे व्याप सांभाळून योगदान करतात. ते सांभाळतांना कदाचित काही गोष्टी राहून गेल्या तर त्याचा येवढा बाउ करु नये असे वाटते. हा थॅन्कलेस जॉब आहे. थॅन्क्सची अपेक्षा नसली तरी केवळ चुका काढून उत्साहाने काही चांगले करु पहाणार्र्यांना हाणू तर नये! जर निकाल एका आठवड्यानंतर मिळाला तर काय असे आकाश कोसळणार होते? तुमचा मुद्दा भावला होता तो इतर प्रोफेशनल फील्ड मधल्या बाबतीत. म्हणून अवांतर लिहीले होते.

मला वाटते की स्पर्धेत आलेल्या सगळे प्रतिसाद एकाहुन एक सरस होते त्यामुळे निवड करणे अवघड जात आहे. श्री. सर्कीट ह्यांचाबाबत श्री. अरूण मनोहर ह्यांचामताशी सहमत. शेखर

रामदास नी ही निकाल दिलेले आहे सर्कीट चे निकाल तयार आहेत. आणि मुक्त्सुनीतनी सुद्धा निकाल दिलेले आहेत. एकुण काय मौसी भी तय्यार बसंती भी तय्यार और धन्नो भी. निकाल लौकरच जाहीर होणार. :) ( मौसी बसंती आणि धन्नो .... हे क्रमानुसार लावले गेले नाहीय्ये. कृपया बादरायण संबन्ध जोडु नये ही विनन्ती) डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत