Skip to main content

पुखेत-पट्टाया-बँकॉक टुर - दिवस पहिला-दुसरा/भाग १

लेखक दिपक.कुवेत यांनी मंगळवार, 26/11/2013 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, श्रीमती सोनाली मुखर्जी ह्यांचा "फुकेत-थायलंड" धागा पाहुन मी २०१२ साली मित्रासोबत केलेली टुर आठवली. त्या सफरीचे काहि निवडक फोटो येत्या काहि भागात देतोय. आशा आहे पाकॄ सारखाच हा धागाहि गोड मानुन घ्याल. फोटोंमधुन थायलंडचं सॄष्टिसौदर्य तुम्हि अनुभवाव हाच निखळ हेतु आहे त्यामूळे विस्तृत माहिती न देता फक्त फोटो देत आहे. १. बँकॉक एअरपोर्टवर उतरल्यावर जागोजागी असलेले मनमोहक ऑर्किड आपलं लक्ष वेधुन घेतात orchids २. वेलकम टु थायलंड welcome ३. बँकॉक एअरपोर्टवर २ तासाचा हॉल्ट घेउन लेगेच पुखेत कडे प्रयाण केले. पुखेतचं पहिलं दर्शन Phuket ४. हॉटेलच्या वाटेवर जाताना घेतलेल्या एका मंदिराचा फोटो Temple ५. पॅटाँग बीच Patong beach ६. उडान भरने के लीये तैयार (पॅरॅसेलींग)...... Udan ७. हॉटेलच्या (स्वच्छ) गल्ल्या gallya ८. ईबीस हॉटेलच्या आवारातील देउळ Deol ९. दुपारचा मेनु.......बीयर नी मात्र निराशा केली Menu 1 menu 2 १०. हे कच्च्या पपईचं सॅलेड अप्रतिम लागतं. जो पर्यंत बँकॉक मधे होतो तो पर्यंत अनेकदा मागावलं......छान जेवण झाल्यावर मस्त ताणुन दिली. Papaya salad

वाचने 12969
प्रतिक्रिया 34

प्रतिक्रिया

मस्तच आहेत्,सोनालीताईंच्या धाग्यातिल कसर भरुन काढलीत त्याबद्दल धन्यवाद.

अरे व्वा..! मस्तं छायाचित्रं. आता मला बँकॉकच्या सहलीची छायाचित्र टाकली पाहिजेत. बाकी, दिपक. कच्ची पपई फार 'गरम' हे लक्षात असू द्यावे.

In reply to by दिपक.कुवेत

उष्ण प्रकृतीच्या पुरुषांनाही लघ्वीस-शौचास आग होणे, तळपाय, डोळे ह्यांची जळजळ तसेच सर्वसामान्यपणे शरीराची उष्णता वाढून होणारे सर्व त्रास होऊ शकतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

अशा वेळी बियरचा उतारा योग्य ठरावा! ;) बार्ली बरी म्हणतात गर्मीला!! पण बियरने निराशा केली म्हणता, म्हणजे नक्की काय?

ती पपईच्या सॅलडची पाककृती लिहा आणि पॅरासेलींगचे फोटो (असतील तर) टाका. मस्त पोस्ट आणि पुढच्या भागाची प्रतिक्षा.

In reply to by संजय क्षीरसागर

हि बघा पपईच्या सॅलेडची पाकॄ. पॅरासेलींगचे अजुन एक/दोन फोटो आहेत ते टाकतो.

In reply to by सोत्रि

अहो बीयर म्हणजे नुसतं पाणी होतं त्यातल्या त्यात हेनीकन ब्रँड जsssssरा बरा वाटला. आपल्याकडे बीयर प्यायल्यावर निदान थोडा वेळ तरी जशी किक बसते तशी अजीबात बसली नाहि म्हणून मूड ऑफ झाला.

मस्त फोटो. थायलंड फिरायला मस्त जागा आहे. अजून फोटो आणि थोडेबहूत लिखाण करा की जरा वेळ काढून. मजा येईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

फोटो टाकतो पण लिहिण्यात आपला हातखंडा नाहि हो! तरी प्रयत्न करतो.

तिकडे जिकडे तिकडे चोहिकडे सर्व महत्वाच्या जबाबदार्या स्त्रिया हिरिहिरिने पार पाडतात? अगदी एखाद्या कुटुंबात अमुक ठिकाणचा पत्ता जरी पुरुषाला विचारला तरी पटकन घरातील स्त्री पुढे येउन मदत करते??? अन (बहुतांश)पुरुष फक्त दारु ढोस्तात? अन आराम फर्मावतात ?

यूं तो एकदम बढिया धागा डाल दिया आपने. फोटो भी मस्तच... ते पॅरासेलिंगबद्दल तेवढं विस्तृत लिहा आणि अजून फोटू टाका की..

फोटु बरेच आहेत टाकतो सवडिने. पॅरासेलिंगबद्दल काय सांगु महाराजा......अवर्णनीय असा अनुभव होता तो. तरी बरं फुकेत मधे तुमच्या पाठि त्यांचा माणुस असतो; पट्टाया मधे तुम्हाला एकटेच वरती पाठवतात. पण त्या माणसाची मात्र कमाल असते! आपल्याला एवढे लॉक्स/मजबूत बांधतात पण तो साधं लाईफ जॅकेटहि न घालता आपल्यासोबत वरती येतो. वरुन बघितल्यावर जो नजारा दिसतो......आह त्याला तोड नाहि. खाली निळशार पाणी, एका मुक्त पक्ष्यासारखे तुम्हि हवेत विहरताय......त्या आठवणी लाईफ टाईम लक्षात राहतील अशा आहेत. बाकि सगळ्यांचेहि धन्यवाद. तुमच्या प्रोत्साहनामुळे हुरुप वाढलाय. फोटो आणि वर्णन (लिहिता आलं तर) जरुर टंकतो.

एकाच वेळी इतक्या जणांच्या सहली अटेंड करून जीव दमला बाई माझा. बाकी फोटू मस्तच.

वर म्हटल्याप्रमाणे हे घ्या अजुन फोटो.....पॅटाँग बीच, त्याचा परीसर आणि पॅरेसेलींग. आवडले तर जरुर सांगा. १. Beach 1 २. 2 ३. 3 ४. 4 ५. 5 ६. 6 ७. 7 ८. 8 ९. 9 १०. 10 ११. 11 १२. 12 १३. 13 १४. 14 १५. 15 १६. 16 १७. ह्या टु व्हिलर घेउन तुम्हि फुकेत मधे अगदि बिनधास्त कुठेहि फिरु शकता. 17

ज्जे बात है ठाकूरजी.. बहोत खुब.. सभी तस्वीरे देख के, हमेंभी वहाँ जानेका मन कर रहा है.. अभी निकलती हूं धन्नो को लेके

पटायाच्या आठवणी पुन्हा जागवल्यात. मस्त स्वच्छ किनारा. हेनिकॅन आणि फोस्टर्स माझ्या आवडत्या बिअर्स. खाण्याच्या बाबतीत थाई फुड कांही दिवस आवडते पण आपल्या भारतिय जेवणाची आठवण येऊन पाय आपसुक पंजाबी उपहारगृहाकडे वळतात. पण एकूणात निवांत रजा उपभोगायला हे ठिकाण अतिशय नयनरम्य आणि उत्साहवर्धक आहे.