सिरके वाले प्याज़
नमस्कार मंडळी,
आजची रेसीपी शॉर्ट अॅन्ड स्वीट असली तरी सगळ्यांच्या हमखास परीचयाची आहे. हॉटेल मधे स्थीरस्थावर झालो कि समोर येण्यार्या दोन गोष्टि म्हणजे मेन्यु कार्ड आणि हे प्याज़ विथ भाजलेला पापड-दहि/पुदिना चटणी! त्यातुन हे कांदे अगदि छोटे असल्याने मेन्यु ठरवता ठरवता कधी गट्ट्म होतात तेच कळत नाहि आणि त्यांचा गुलबट/लालसर रंग तर फार आकर्षित करतो (निदान मला तरी). चला तर मग वेळ न दवडता कॄती पाहुया:
साहित्यः
१. सोललेले छोटे किंवा मद्रासी कांदे - १५ ते २०
२. व्हिनेगर - २ मोठे चमचे (व्हाईट किंवा तत्सम कुठलहि)
३. १/२ बिटाचे लंबगोलाकार तुकडे (हे ऑप्शनल आहे पण त्या कांद्याना गुलबट छटा ह्या बिटामुळेच यते)
४. १ कप पाणी
५. चवीप्रमाणे मीठ
कॄती:
१. सोललेले कांदे स्वच्छ एका कोरडया (किंचीत ओल्या) फडक्याने पुसुन घ्या. कांद्याना हलकेच चीरा द्या म्हणजे रस आतपर्यत मुरेल
२. सोललेलं बीट १ कप पाण्यात उकडवुन घ्या. फार शीट्या देउन मेण होईस्त उकडु नका. साधारण मउ होईल ईतपर्यंत शीजवा. गार झालं कि त्याचे चौकोनी किंवा लंबगोलाकार तुकडे करा. उकडलेल्या बीटाचं पाणी फेकुन देउ नका.
३. आता वरील बीटाच्या पाण्यात व्हिनेगर, चवीप्रमाणे मीठ घालुन (व्हिनेगर मधेहि मीठ असतं) सारखं करा. एकदम दोन चमचे घालण्यापेक्षा थोडं थोडं करुन व्हिनेगरचं प्रमाण वाढवुन चवीचा अंदाज घ्या म्हणजे फार आंबट होणार नाहि
४. सोललेल्या कांद्या/बीटाचे तुकडे स्वच्छ/कोरडया अश्या काचेच्या बाटलीत भरा
५. तयार केललं पाणी/सिरका कांदे/बीट बुडतील ईतपत बाटलीत घाला आणि झाकण घट्ट लावुन फ्रिज मधे ठेवा
६. १-२ दिवसात कांदे छान मुरतील. बघता काय मग घ्या......उचला एक एक कांदा आणि करा गट्ट्म.
ताकः ईकडे मिडल-ईस्ट मधे चीकन शवरमा/हमुस/फिलाफिल बरोबर किंवा कधी कधी सँन्डवीचमधे अस व्हिनेगर मधे मुरवलेलं गाजर, मुळा, फ्लॉवर (ब्लांच करुन) देण्याची पद्ध्त आहे. त्यांना 'तुरशी' म्हणतात. खास करुन शोरमा खाताना ह्या आंबट/तुरट तुरशीचे छोटे छोटे तुकडे शवरम्याची लज्जत अजुन वाढवतात.
वाचने
14343
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
छान ...
छान टायमिंग साधलात डिशचा, अन
असे करतात होय
In reply to असे करतात होय by चित्रगुप्त
चित्रगुप्तजी
छान!
इकडे हरियाणात सुद्धा
वा!
In reply to वा! by पैसा
+१
मस्त रंगीत आणि फिलाफिल /
फिलाफिल बरोबर अशा प्रकारच बीट
In reply to फिलाफिल बरोबर अशा प्रकारच बीट by त्रिवेणी
फलाफल म्हणायचय का?
In reply to फलाफल म्हणायचय का? by स्पंदना
फलाफल पण चालेल....
अय्या दिपूकाका , काकुने एवढे
In reply to अय्या दिपूकाका , काकुने एवढे by जेनी...
काय सांगू पूजा आज्जी
आता येथे लहाण कांदे शोधणे आले
सॉरी लोक्स
In reply to सॉरी लोक्स by दिपक.कुवेत
रुमाल नको
रुमालाची वाट
छान पाकृ.
मस्त सोपी पाकृ.
मस्त रंग
हिरव्या देशातली हुच्च पाकृ !!
In reply to हिरव्या देशातली हुच्च पाकृ !! by सूड
मायला...
In reply to मायला... by नानबा
मी सांगते ना!
काय पैसतै
In reply to काय पैसतै by दिपक.कुवेत
कस्टम्सवाले?
In reply to कस्टम्सवाले? by पैसा
फिकिर नॉट पैसातै
भारीच...
मस्त