दान
दानं संविभाग:असा शंकराचार्यांचा दाखला देवून विनोबा भावे भूदानाचे समर्थन करीत (पक्षी: दान म्हणजे समान वाटप आणि म्हणून दान देणारा श्रेष्ठ नही आणि घेणारा कनिष्ठ नाही).. (संदर्भ : गुण गाईन आवडी)
दान देण्याचे अनेक फायदे तसेच ते देण्यास उद्युक्त करणारे अनेक दाखले आपल्याला सापडतात, दान देणारा 'दानशूर' म्हणविला जातो.
परंतु दान स्वीकारणारा कनिष्ठ का समजला जातो? "एक वेळ भिक्षा मागावी पण दान घेऊ नये" अशी काहीशी वाक्ये वाचली आहेत...
रक्त /विद्या/धन आदींचे दान स्वीकारलेच गेले नाही तर दात्याचा उद्देशच राहत नही...
एखाद्या गोष्टीची नितांत गरज असतांना समोरून देऊ केलेली तीच गोष्ट स्वीकारणे ह्यात गैर ते काय?
का काही मूलभूत गफलत होते आहे माझी?
प्रतिक्रिया
आपल्याकडे पुष्कळ आहे पण पुण्य
एक वेळ भिक्षा मागावी पण दान
ओहो! अतिशय कूट प्रश्न आहे मिपावर गविसर सोडून इतर कोणी
दान म्हणजे केवळ आभास
पटलं नाही