पहिल्या भागाच्या प्रतिसादानुसार जास्त वर्णन करायचा प्रयत्न केला आहे.
कारवार च्या समुद्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी चालते. असेच एका कोळियाने टाकलेल्या जाळ्यात काय काय घावलय बघूया:
इथे दिसणारा खेकडा हा प्रेग्नंट आहे असे कोळ्याने सांगितले. लाल भाग हा बीज दर्शवतो. या नंतर सहल संपली आणि विशेष काही बघायचे राहिले नाही अशी समजूत करून परत निघालो. परत येताना मुद्दाम येल्लापूर मार्गे न येता दांडेली चा रस्ता पकडला. फार पूर्वी लोकांकडून वर्णन ऐकले होते कि दांडेलीच्या जंगलात असा बराच भाग आहे जिथे सूर्यकिरण जमिनी पर्यंत पोचू शकत नाहीत. कारवार गाव सोडून दांडेलीचा रस्ता पकडला कि हळू हळू जंगल दाट होऊ लागते आणि घाटाला सुरुवात होते. जंगल इतके दाट होते कि फोटो पण काढता येत नाहीत पण या जंगलात कर्नाटक सरकार ने जागोजागी चौथरे उभे करून सिनिक स्पॉट बघायची सोय केली आहे. फक्त या स्पॉटला थांबले तरच लांबचे दिसू शकते अन्यथा जंगलात ५-५० फुटाच्या पलीकडे काही दिसत नाही.
जन्गलाचा दाट्नेस् :
या जंगलाचे २ भाग पडतात. पहिला अंशी नेशनल पार्क आणि दुसरा दांडेली अभयारण्य. गूगल नकाशा मध्ये गोव्याच्या बाजूला जे घनदाट जंगल दाखवले आहे त्याचा पश्चिम भाग हा अंशी नेशनल पार्क आहे आणि पूर्वेचा भागात दांडेली आहे. अंशी चे जंगल अतिशय दाट आहे. त्या मानाने दांडेली मध्ये घनता कमी आहे म्हणून सगळे जंगल कॅम्प हे दांडेली मध्ये होतात. माझी १० वि ची परीक्षा झाल्या नंतर दंडेलीचा जंगल कॅम्प केला होता. कोर एरिया मध्ये वाघासकट सगळे जंगली प्राणी नक्की दिसतात. तेव्हा वाघाने एक गवा मारून त्याला एका धबधब्याच्या गाळात रुतवून ठेवला होता आणि साहेब वरच्या दगडावर बसून आम्हाला खास दर्शन देत होते. गव्याच्या मानेतून रक्त पिवून मारला होता बाकी बोडी ला खरचटले सुद्धा नव्हते.
शहाण्या माणसाने अंशी च्या जंगलात जाऊ नये. दुरून डोंगर साजरे करावेत. तसेच संध्याकाळी ६ नंतर गाडीवरून जायचा विचार पण करू नये. इथे किंग कोब्रा पैशा पासरी आहे. वाटेत एक धबधबा लागला म्हणून थांबलो. तिथे उतरायच्या बेतात होतो पण वाटेत नागराज पहुडले होते.
वनखात्यची अनेक चेक पोस्त लागतात. या जंगलात आमच्या गाईड ने काळे वाघ पण पहिले आहेत. आंबोली, कोयना मध्येपण काळ्या वाघाचे दर्शन होते. एस. टी वाले रात्री गाडी नेतात म्हणून आपण पण जावे अशी परिस्तिथी नाही. शेवटी जो फोटो पाहून मला या ट्रीप ची भुरळ पडली होती तो स्पॉट आला.
तिथून पुढे अप्रतिम असे सीन मिळाले.
पुढे काळी नदीचे विस्तीर्ण पात्र लागले. याचा रंग खरच काळा आहे. मागे स्व. श्री. बाळासाहेब ठाकर्यांच्या एका पुस्तकात या नदीचा उल्लेख होता. यात कोयना नदी पेक्षा जास्त पाणी आहे आणि कारवार-बेळगाव भाग महाराष्ट्रला मिळाल्यास कोयने सारखेच वरदायिनी धरण बांधता येईल असे लिहिले होते. कर्नाटकने हे पाणी पूर्ण वापरले नाहीये असे वाटले. वाटेवरच एका बाजूला कैगा अणुभट्टी कडे जाणारा रस्ता लागतो.
एवढ्या मस्त ट्रीप मध्ये काय कमी पडले होते तर पाउस. शेवटी तो हि आला आणि रस्ता भिजवून सलामी देऊन गेला.
दन्डेलिहुन परत जाताना सरळ बेलगाव मार्गे कोल्हापुरला जाता येते. कराड भागात दान्डेलिचे जन्गल माहित असणारे काहि वाटाडे(गाइड नव्हे "वाटाडे")आहेत. असे लोक बरोबर असतील तरच जन्गल पाहता येते. केवळ गाडितुन फिराल तर जास्त अपेक्शा ठेवु नका.
वाचने
9595
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
सापाविशयी माहिती द्यावी.
धामण
In reply to सापाविशयी माहिती द्यावी. by पुतळाचैतन्याचा
मस्त...........
हा भागही आवडला .छान फोटो
नाही.
In reply to हा भागही आवडला .छान फोटो by कंजूस
काळी नदीत व्हाईट वॉटर
नाही.
In reply to काळी नदीत व्हाईट वॉटर by स्पंदना
दुसर्या फोटोतला माकुळ
स्क्विड?
In reply to दुसर्या फोटोतला माकुळ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
पूर्ण सहमत!!!!
In reply to स्क्विड? by स्पंदना
जाणारंच.
लय म्हणजे लय म्हणजे लय भारी !
मस्त!
काळे वाघ हे काय प्रकरण असतं??
काळे बिबटे ...
In reply to काळे वाघ हे काय प्रकरण असतं?? by सूड
काळे बिबटे ...
In reply to काळे वाघ हे काय प्रकरण असतं?? by सूड
दोन्ही भाग आवडले.
कमी आहे
In reply to दोन्ही भाग आवडले. by त्रिवेणी