सावधान ! येत्या काही आठवड्यात सूर्य उलथतोय !!
लेखनप्रकार (Writing Type)
शात्रीय वर्तुळात सध्या चर्चेत असणार विषय म्हणजे येत्या काही आठवड्यात सूर्याच्या उत्तर आणि दक्षिण धृवांची अदलाबदल होणार आहे ! सूर्य म्हणजे अतिगरम उकळणाऱ्या वायूचा (पृष्ठभागवर ५,५०५ अंश आणि मध्यभागी १.५ कोटी अंश सेल्सिअस) गोळा आहे हे आपल्याला माहीत आहेच...
इतक्या गरम वायूंच्या कणांच्या अवस्थेत त्यांचे भारीत कणांमध्ये (plasma) रूपांतर होते आणि सूर्याचे चुंबकीय क्षेत्र तयार होते...
एवढ्या गरम स्थितितल्या वायुची वादळे आणि त्यामुळे होणारी चुंबकीय वादळे ह्या सुर्यावर होणाऱ्या रोजच्याच घटना असतात...
त्यातल्या मोठ्या वादळाचे पडसाद सूर्यमालेच्या पलीकडे पोहोचणाऱ्या भारीत कणांच्या आणि चुंबकीय परिणामांच्या रुपात सतत पडत असतात. पृथ्वीच्या धृवांच्या जवळ दिसणारे ऑरोरा बोरियालिस नावाचे प्रकाशाचे चमत्कार जसे यामुळे दिसतात तसेच त्यांच्यामुळे उपग्रहांवर आणि पृथ्वीच्या वातावरणावर दुष्परिणामही होतात.
सुर्याच्या चुंबकीय वादळांचा साठत जाणारा परिणाम म्हणजे सूर्याचे चुंबकीय धृव सरकतात. येत्या काही आठवड्यात त्यांची अशी अवस्था होणार आहे की ते एकमेकाच्या जागेची अदलाबदल (flipping of magnetic poles) करणार आहेत. या उलथापालथीकडे जगभरचे शात्रज्ञ बारीक लक्ष ठेवून आहेत.
मात्र यामुळे जगबूडी होणार नाही हे नक्की. म्हणजे आपल्याला घाबरून जायचे कारण नाही. किंबहुना ही सूर्याच्या आयुष्यात दर अकरा वर्षांनी येणारी गोष्ट आहे. आणखी एक गंमत म्हणजे ही अदलाबदल एकदम होईल असेही नसते... म्हणजे सूर्याचे उत्तर आणि दक्षिण धृव सतत एकमेकाच्या एकदम विरुद्धच असतात असे नाही. सुर्याचा उत्तर धृव त्याच्या नवीन जागी गेल्या वर्षीच (२०१२) पोचला आहे आणि आता दक्षिण धृव त्याच्या नवीन जागेवर पोचणार आहे !
थोडक्यात म्हणजे सूर्याच्या उकळणाऱ्या वायूंत सतत प्रचंड सावळा गोंधळ चाललेला असतो आणि शात्रज्ञांना सतत गोंधळात टाकून संशोधनात गुंतवून ठेवत असतो. पण तुम्ही आम्ही घाबरायचे कारण नाही... आपल्याकरिता बोलायचे झाले तर सूर्य लय म्होट्टा हाय... कुंभकर्णापेक्षाबी... आनं दर अकरा वरसांनी येका बाजूवर झोपाचा कट्टाळा आला की कूस बदलतो... यवढंच. बस. हाकानाका !
(सर्व चित्रे जालावरून साभार)

प्रतिक्रिया
आसं बी आस्तंय व्हंय...
धन्यवाद !
आयला! हे चुंबकीय साधनांचे घोळ
होकायंत्रातले पट्टीच्या
उत्तर तो दक्षिण
दर ११ वर्षांनी कूस बदलतो
दर अकरा वर्षांनी होणा-या या
धन्यवाद !
माहितीपूर्ण लेख पण बराचसा
धन्यवाद !
सविस्तर प्रतिसादाबद्दल
चुंबकीय वादळाने बाहेर फेकल्या
वरच्या माझ्या
धन्यवाद.
+१
अर्र र्र
हम्म
आत्ता तरी मला यायची काही गरज
>>आत्ता तरी मला यायची काही
आसं कसं?
त्ये निस्तंच थॉर म्हनायले ओ,
धन्यवाद !
*****
धन्यवाद !
काही भूतमूल प्रश्न
१. व २.
............
परिवलनाचा अक्ष आणि चूंबकीय क्षेत्राचा अक्ष जवळजवळ का असावेत?साधा उजव्या हाताचा नियम आहे . अर्थात ह्या प्लास्मा रुपी चुंबकीय वादळात चुंबकीय क्षेत्रा ची दिशा त्या प्लास्मात असणाऱ्या व फिरणाऱ्या प्रभारांच्या दिशेवर असणार आहे .पोल बदलतात म्हणजे मास डिसप्लेसमेंट होते का?सूर्य म्हणजे प्लाझ्माचा गोळा असल्याने घन असे तेथे काहीच नाही.प्लाझ्मा हि पदार्थाची चौथी अवस्था आहे व प्रत्येक पदार्थाला(घन , द्रव वायू , प्लास्मा ) मास असतेच असतेसोलर विंड मुळे जर व्हॉयेजरला त्रास होत असेल तर पृथ्वीवर प्रचंड थैमान होऊ शकते. नाही का?नक्कीच पण त्या साठी सूर्या वरील फिरणारे चुंबकीय वादळे हि कायम स्वरूपी अस्थिर व्यायला हवीत . असे जर झाले तर सूर्य हा एक महा प्रचंड फिरणारे अस्थिर चुंबक व विद्युत चुंबकीय तरंग प्रसारित करणारा अन्टेना बनेल व त्यामुळे पृथ्वीवर कोणतेही रेडीओ व सिलिकॉन वर आधारीत उपकरण निट कार्य करू शकणार नाही . अवांतर : स्पायडर मन -२ पहिला असेलच त्यात जसा त्या डॉक्टर चा फ्युजन कंट्रोल करण्याचा प्रयोग फसतो आणि पुढे अनर्थ घडतो तसे होईल :)>>>. ळय भारी ...:)
लय भारी
काहीतरी भानगड आहे
सूर्याच्या उलथण्याची
तेजस्विनावधितमस्तु
धन्यवाद !
काय की असली थोडीदेखील उलथापालथ आपल्याला (ऑल इन्क्लुझिव्ह) कायमचं पालथं करु शकते नाही का?येत्या काही कोटी वर्षांत तरी सूर्यात त्या ताकदीची उलथापालथ होण्याचे काही प्रयोजन दिसत नाही... तेव्हा काळजीचे कारण नाही. :)धन्यवाद !
सामान्य लोकांच्या जीवनात काही
सामान्य लोकांच्या जीवनात
मस्तच!
+१
माहितीपूर्ण लेख.
धन्यवाद !