मि.पा वर नवीन सोयींबाबत
नमस्कार. मि. पा. वर मी तसा नवीनच आहे. भटकंती करता करता मनोगतावरुन इथे आलो आणि इथलाच होतोय हळूहळू.
एक दोन सोयी मि. पा. वर असाव्यात असे वाटते.
१. शोध: एखादी कथा, कविता, लेख आवडला आणि चुकून वाचनखुणेत घालायचा राहिला तर काही दिवसांनी परत आल्यावर तो पुन्हा सगळ्या पानांवर शोधत बसावा लागतो. त्याऐवजी प्रत्येक विभागात अथवा संपूर्ण मि.पा. वर 'शोध'ची सोय ( Search Functionality) असल्यास त्याचा खूप उपयोग होईल. त्याचप्रमाणे, एखाद्या विषयावर मि.पा. करांनी किती लेख / कविता / चर्चा केल्या आहेत तेही शोधणे शक्य आणि सोपे होऊन जाईल. लेखाप्रमाणेच मि.पा.कराबद्दलही हे करता येईल. मि.पा कराला Tracker मध्ये घालण्यापूर्वी त्याचे सर्व लेखन एकत्रितपणेही बघता येईल.
२. संपर्कः मि.पा वर एकमेकांशी व्य.नि. द्वारा संपर्क साधणे शक्य आहेच. परंतु संपादक मंडळ अथवा तांत्रिक मंडळातील मंडळींशी संपर्क करावयाचा असल्यास त्या त्या मंडळींची नावे 'मदत पान' वरुन घेऊन त्यांना व्य.नि.पाठवावा लागतो. त्यापेक्षा 'तांत्रिक मंडळ', 'संपादक मंडळ' अश्या नावांनी नवीन संपर्क प्रतिनिधी नावे बनविल्यास दर वेळी मदत पानावर जाण्याचा त्रास वाचु शकेल. या प्रातिनिधिक नावांना पाठविलेला निरोप त्या मंडळातील सर्व सभासदांन मिळेल अशी व्यवस्था केली तर ते उपयुक्त ठरेल. जर या मंडळातील मंडळी बदलली तरी आम्हा सामान्य मि.पा.करांना नवीन मंडळींची नावे बघत बसण्यापेक्षा प्रातिनिधिक नावाला व्य.नि. पाठविला की काम सोपे होईल.
३. या प्रातिनिधिक नावांना मि.पा.वर आगमनाची वार्ता दिल्याशिवायही व्य.नि. पाठवण्याची सुविधा असावी जेणेकरुन मि.पा.चे सभासद अथवा मि.पा.चे सभासदोत्सुक यांना आवागमनात काही त्रास झाल्यास तांत्रिक मंडळाला त्वरीत व सोप्या रीतीने संपर्क करता येईल. तांत्रिक मंडळातल्या सर्व मंडळींना हे निरोप जातील व ते त्यांच्या वेळेप्रमाणे प्रश्न सोडवू शकतील. त्याद्वारे कोण्या एकावर हा भार पडणार नाही.
ही विनंतीवजा सूचना आहे. त्यावर मि.पा.करांनी त्यांचे अभिप्राय द्यावेत ही विनंती. माझे काही चुकले असेल अथवा एखादी सोय आधीच उपलब्ध असेल तर कळवावे. एक छान चर्चा-संवाद व्हावा आणि मि.पा.ला लाभ हीच इच्छा.
चूक्-भूल द्यावी घ्यावी. धन्यवाद.
-निरु
प्रतिक्रिया
***
तुम्ही ते थ्री स्टार प्रतिसाद देण्याचं थांबवत नाही
(No subject)
नवीन प्रतिसाद पाहताना...
हो ना! त्यातून दुसर्या तिसर्
काही उत्तरे
थोड्याशा मनमोकळ्या गप्पा...
धन्यवाद
माझी एक विनंती
+११११११११११
तस करणं सोपय. ज्याचं लिखाण
+१
संपादन-सोय
स्वसंपादन का नाही.
अनमोल सूचना
नोंद घेतली आहे