मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दुधी कोफ्ता करी

सानिकास्वप्निल · · पाककृती
. साहित्यः १ कोवळा दुधी २ टोमॅटो बारीक चिरलेले १ कांदा बारीक चिरलेला ३-१/२ टेस्पून बेसन १ टेस्पून काजू २-३ लसूण पाकळ्या आल्याचा छोटा तुकडा १/२ मिरची १/२ टीस्पून जीरे १ टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची १-१/२ टेस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी - जास्त) १ टेस्पून धणेपूड १ टेस्पून पंजाबी गरम - मसाला (नसल्यास रोजचा गरम - मसाला वापरावा) मीठ चवीनुसार १ टीस्पून कसूरीमेथी बारीक चिरलेली कोथींबीर तेल . पाकृ: प्रथम दुधीचे साल काढून किसून घ्या. हलकेच पिळून रस काढून घ्या. दुधीच्या किसात आता बेसन, थोडा गरम - मसाला, थोडे लाल तिखट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मीठ घालून कोफ्ते तयार करून घ्या. तुम्ही कोफ्ते डीप फ्राय करु शकता. मी आप्पेपात्रात कमी तेलात तळून घेतले आहे. . मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो, कांदा, आले + लसूण, मिरचीचा तुकडा आणी काजू घाला. थोडेच पाणी घालून मुलायम वाटून घ्या. कढईत तेल गरम करा व जीर्‍याची फोडणी करा. त्यात वाटलेला मसाला घालून चांगला परतून घ्या त्यात आता उरलेले लाल तिखट, गरम - मसाला, धणेपूड, मीठ, कसूरीमेथी चुरडून घाला व तेल सुटेपर्यंत परतून घ्या. त्यात दूधीचा रस व थोडे पाणी घालून १०-१५ मिनिटे मंद गॅसवर शिजू द्या. ( ग्रेव्ही कितपत दाट / पातळ हवी त्याप्रमाणे पाणी घाला.) . सर्व्ह करायच्या ५ मिनिटे आधी गरम ग्रेव्हीत तयार कोफ्ते घाला. खूप आधीपासून घातले तर कोफ्ते मऊ होऊन फुटू शकतात. वरून कोथींबीर पेरा व नान, रोटीबरोबर दुधी कोफ्ता करी सर्व्ह करा :) . दूधीचे कोफ्ते चटणीबरोबर ही नुसते खायला छान लागतात.

वाचने 17080 वाचनखूण प्रतिक्रिया 36

रेवती Sat, 11/16/2013 - 18:37
वाह! सुरेख फोटू. पाकृ माझ्याकडेही अशीच आहे पण मनासारखे कधी झाले नाहीत गं. आता अगदी हेच प्रमाण घेऊन करून बघते.

प्यारे१ Sat, 11/16/2013 - 20:06
कत्रिना कैफ सुंदर दिसतेच्च्च्च. सानिका ची पाकृ नेटकी नि देखणी असतेच्च्च्च्च. नथिंग न्यू. >>>मी आप्पेपात्रात कमी तेलात तळून घेतले आहे. हा बदल आवडला. :)

अजया Sun, 11/17/2013 - 15:59
सानिका,आजच केली होती. मस्त झाली. तुझे प्रमाणही अगदी परफेक्ट आहे! फोटोसाठी कॅमेरा आणेपर्यंत लेकाने कोफ्ते गट्टम करायला सुरुवात केली,त्यामुळे फोटो बाजुलाच रहिला,कोफ्ते वाचवता,वाचवता!!

मिपावर नवीन आहे परंतु याआधीच्या तुमच्या काही पाककृती करून पहिल्या आहेत. त्यामुळे ही प्रतिक्रिया सर्वच पाककृतींसाठी. कोफ्ते करून बघेन नक्की.

हासिनी Tue, 11/19/2013 - 17:26
खतरा फोटो आलाय शेवटचा.मस्त दिसतेय डिश अगदी. करून पहायची आहे. :)

In reply to by रेवती

प्यारे१ गुरुवार, 11/21/2013 - 01:07
दुधी उरला तर दुधी हलवा करा. पिस्ता बर्फी न घालता. कुठे गेले आद्य बल्लवाचार्य श्री श्री गणपा जी ठाकूर? माझ्या लक्षात बिचार्‍याची तीच पा कृ राहिली आहे.

In reply to by प्यारे१

रेवती गुरुवार, 11/21/2013 - 20:48
अहो प्यारेश्वर, दोन गदा आणाल्या होत्या दुधीच्या. एकाचा हलवा केलाय, पिस्ताबर्फी न घालता. दुसर्‍याची कोफ्ताकरी केली. गणपा सध्या सुट्टीवर असला म्हणून काय झालं, तो मिपा बघत असणारच! ;)

पैसा Wed, 11/20/2013 - 20:40
दुधीची खीर नाहीतर गोड भाजी एवढेच करत आले इतकी वर्षे. हे कोफ्ते एकदा करून बघितले पाहिजेत!

रेवती गुरुवार, 11/21/2013 - 20:46
कालच ही करी करून बघितली. पहिल्यांदा मला दुधी कोफ्ते जमले आणि एकूणच पाकृ छान झाली. नुसते कोफ्ते खायला चांगले लागले. आता येकदम कान्फिडन्स आलाय जणु!

सुहास.. Fri, 11/22/2013 - 20:15
भोपळ्याशी शालेय जीवनापासुन घट्ट नाते असल्याने भोपळा कधीच आवडला नाही ;) हा प्रकार मात्र मस्त आहे ..करके देखेंगे :)