Skip to main content

समाज बिघडायला कारणीभुत कोण आहे?

समाज बिघडायला कारणीभुत कोण आहे?

Published on 23/09/2008 - 15:10 प्रकाशित मुखपृष्ठ

याद्या 890
प्रतिक्रिया 19

वरील सर्व व तुम्ही आम्ही सगळेच. घडायला आणि बिघडायला देखील. प्रकाश घाटपांडे

समाज बिघडणे याचा कोणता अर्थ आपल्याला येथे अभिप्रेत आहे :? उदा : नीतीमत्ता ढासळणे, व्यसनाधीनता, शासकीय्/राजकीय गैरव्यवहार अन् घोटाळे इ.इ. या प्रत्येक अर्थाचे वेगवेगळे कारण असु शकते :)

पाश्चीमात्य संस्क्रुती पेक्षा "पाश्चीमात्य संस्क्रुती चे अंधानुकरण" म्हणायाला हवे

तुम्ही दिलेल्या पर्यायमध्ये चांगले वाईट असतेच की ? आणि मुख्य म्हणजे आपण स्वता घडलो पाहिजे समाज त्यानंतर............ हा मनुष्या स्वभाव आहे की तो वाईट लगेच घेतो..... नाही तर युरोपी संस्कृती पण वाईट नाही..........पण आपण मात्र !

या कौलात समाज बिघडलेला आहे हे गृहितक आहे. जे आम्हाला मान्य नाही.

In reply to by अवलिया

समाज बिघडलेला आहे हे गृहितक आहे. जे आम्हाला मान्य नाही. सहमत आहे. समाजात राहणारे लोकच ..बिघडलेले असतात, त्यांना समाजात सरळ राहता येत नाही...वाईट मार्गाला लागतात. आणि त्यांच्यामुळे समाजाचे नाव खराब होते.. राम दादा..

In reply to by अवलिया

समाज बदलला आहे, हे मानतो. तो बिघडला आहे हे गृहीतक सध्या मान्य नाही (पण पटवल्यास अमान्यही नाही.) प्रकाश घाटपांडे वर असेच काही म्हणतात - समाज घडतोही आहे, बिघडतोही आहे.

In reply to by धनंजय

तो बिघडला आहे हे गृहीतक सध्या मान्य नाही (पण पटवल्यास अमान्यही नाही.) सहमत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by अवलिया

या कौलात समाज बिघडलेला आहे हे गृहितक आहे. जे आम्हाला मान्य नाही. नानांशी १००% सहमत. माझ्या आवडत्या लेखकाचं, बर्ट्रांड रसलचं वाक्य आठवलं: Do not fear to be eccentric in opinion, for every opinion now accepted was once eccentric. प्रत्येक वेळी पुढची पिढी वाया गेलेली आहे असा आक्रोश ऐकता येतो आणि ही परंपरा अगदी अरिस्टॉटलच्या काळातही असल्याचं फार पूर्वी वाचलं होतं.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

असेच. काही बिघडले आहे असे वाटत नाही.

प्रत्येक कालखंडात पूर्वी च्या काळा च्या तुलनेने (त्याकाळातील व्यक्ती च्या मते) समाज बिघडलेलाच असतो. आमचे वेळी असे नव्हते , हे वाक्य सतत एकायल मिळते. कालाय तस्मै नमः.

---नितिन. (पैसाच सर्व काही नसते . हे वाक्य म्हनण्यासाठी आधी तुमच्याकडे भक्कम पैसा असावा लागतो.)

---नितिन. (पैसाच सर्व काही नसते . हे वाक्य म्हनण्यासाठी आधी तुमच्याकडे भक्कम पैसा असावा लागतो.)

आदरणिय गुरुजन सेवाभावि डॉक्टर त्यागि नेता इत्यादि आजकाल वरिल व्यक्ति शोधाव्या लागतात

In reply to by मराठी_माणूस

आजसुद्धा "ॠषीतुल्य आदरणीय गुरुजनांची" परंपरा सन्मानाने काही ठिकाणी टिकुन आहे ... सर्वसाधारण निष्कर्ष काढुन मी त्यांच्या त्यांगांची व कष्टांची किंमत कमी होऊ देणार नाही ... मोठ्ठ्या शहरात कदाचित नसतीलही पण अजुन काही ठिकाणी "निरपेक्ष भावनेने विद्यादान " करणारे "गुरु" आहेत. अवांतर : आमच्या गावात संस्कॄतची शिकवणी घेणारे एक आचार्य शिकवताना " शुचिर्भुत होऊन व सोवळ नेसुन " शिक्षण द्यायचे ... निवॄत्तीनंतर २० वर्षे त्यांनी हा उपक्रम चालवला ... त्याबद्दल त्यांनी कुणाकडुनही एक छदाम घेतयाचे माझ्यातरी ऐकिवात नाही ... असो. बाकीच्याला बर्‍यापैकी सहमत .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

आजसुद्धा "ॠषीतुल्य आदरणीय गुरुजनांची" परंपरा सन्मानाने काही ठिकाणी टिकुन आहे ... "काहि ठीकाणी" हेच म्हणतो . , प्रमाण खुप कमी झाले आहे

मी नक्कीच नाही. मी नाही कोणाला बिघडविले. :''( आता थोडे मुद्याचे... तुमच्या प्रश्नाचा संदर्भ कळला असता तर उत्तर देता आले असते. काय बिघडले त्यावर उत्तर अवलंबून आहे. बाकी वर प्रतिसादांत म्हटल्याप्रमाणे वेगवेगळी कारणे आहेत.