Skip to main content

उपवासाचे आप्पे

लेखक अनन्न्या यांनी बुधवार, 13/11/2013 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः दोन वाट्या वरी तांदूळ, अर्धी वाटी साबुदाणा, मिरची पेस्ट, आले पेस्ट, जिरे पावडर, कोथिबिर, दाण्याचे कूट, मीठ, आले पेस्ट, खायचा सोडा, तेल किंवा तूप. कृती: आप्पे करायचे असतील त्याच्या आदल्या दिवशी वरी तांदूळ आणि साबुदाणा वेगवेगळे भिजत घालावे. ७-८ तासांनी दोन्ही एकत्र मिक्सरवर वाटावे. मिश्रण इडलीच्या पिठाइतपत असावे. रात्रभर झाकून ठेवावे. सकाळी आप्पे करण्यापूर्वी या मिश्रणात अर्धा चमचा आले पेस्ट, अर्धा चमचा मिरची पेस्ट (आवडीनुसार प्रमाण घ्यावे.), मीठ, अर्धा चमचा जिरे पावडर, २-३ चमचे दाण्याचे कूट, चिरलेली कोथिंबिर मिसळावी. पाव छोटा चमचा खायचा सोडा घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. आप्पेपात्रात नेहमीच्या आप्प्याप्रमाणे आप्पे करावे. नारळाच्या दही घातलेल्या सैलसर चटणीसोबत खावे. हे आप्पे गरमच छान लागतात.Appe

वाचने 12289
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

काल टाकली असती तर आज करुन पाहिली असती . आता पुढच्या उपवासापर्यंत फोटो पाहुनच समाधान मानावे लागणार .

एकादशी नि 'आप्पे' खाशी! मस्तच. फोटो बघून जळजळ झालेली आहे. - आज निरहंकाराच्या प्रयत्नात ;) फलाहारी प्यारे

In reply to by अनन्न्या

फोटू सेटिंग बहुधा प्रायव्हेट झालेय. पब्लिक सेटिग करा मग दिसेल फोटो सर्वांना.

खान/पान धागा निघे सारखा,सुवास दरवळ चहूकडे पाक कृती वेगळी आहे तरी गं तै....गेले फोटू कुणीकडे? :)

मस्त पाककृती अनन्या! जो फोटो अल्बम आहे त्याला जोवर ओपन फॉर पब्लिक हे सटींग देत नाहीस तोवर फोटो दिसणार नाही, तेव्हढ कर.

In reply to by अनन्न्या

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआअ........! आता बरं वाटलं! :)