नमस्कार मंडळी,
आज परत फा......र दिवसांनी विडंबनाचा मूड जमून आलाय तो कितपत जमलाय हे तूम्हिच ठरवा. खालील विडंबनाचं मूळ श्री. वडापाव ह्यांच्या ह्या कवितेत आहे. सदर विडंबन श्री. वडापाव ह्यांची माफि मागुन.
प्रेमाचा त्रिकोण / एक फुल दो माली हि नेहमीच एखाद्यासाठि वेदनामय घटना. त्यातुन प्रेयसी आपल्या सख्ख्या मित्राची झाली तर अजूनच नैराश्य येतं. पण कालांतराने तीला मित्राच्या प्रेमातील फोलपणा जाणवतो आणि मग ती परत त्याच्याकडे येते........कायमचीच! आता पारड ह्याचं जड झालय!
तू आलीस त्याला सोडून
म्हणून मी जगायला लागलो
तू जवळ केलस मला मनापासून
म्हणून मी जवळ आलो
आता तुझ्यासोबतीने काय काय करायचं हे ठरवलं होतं
त्याचा माज उतरवयाचा हेच एक ध्येय होतं
मागेच हरवलेलं मन आता गवसलं होतं
तूझ्या मागे चंचल होउन भावविभोर झालं होतं
काय करायचय आयुष्यात ते आता आठवत होतं त्याप्रमाणे
मेंदू आता तल्लख होउन सगळ्या ऑर्डर पाठवत होता
नवनविन कल्पना उदयास येत होत्या आणि
तुझ्यारुपाने त्या मुर्त स्वरुपात येत होत्या
तु ह्सलीस कि मी हसायचो
आता तो रडेल आणि आपण ह्सायचं
त्याच्या डोळ्यातली आसवं आता मी बघणार आणि
आता तु माझीच आहेस हि जाणीव अधीकच मला सुखावणार
आता तो चिडला तरी आपण चीडायचं नाय
उलट त्याला अजुन चिडवायचं/पिडायचं
मुड आपला सदैव रोमॅन्टिक ठेवायचा
प्रेमाचा वर्षाव सतत एकदुसर्यावर करायचा
मी जरी कामात स्व:ताला जखडुन घेतलं
तरी प्रेमाच्या पाशाने तु मला ओढुन घे
भडकण्यार्या ज्वानीत, मदहोश कैफात,
स्वप्नील नजरांत आता आपण कायमचच गुंफून जाउ
हे सर्व बघुन कल्पना नाहि कि किती भेगा पडतील त्याच्या मनाला
खैर वो भी क्या याद रखेगा कि साला एक दोस्त एसा भी मीला था!
वाह विडंबन छान जमलय.. :)
वेड....
पेठकर काका....
=)
येक नुम्बर,...
मस्त
पेठकर काका