संकीर्ण : चौकशी ; मदत, सल्ला हवा
काही बाबतीत सल्ला हवा आहे. अगदि घरगुती वापरातील इएलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून ते अगदि नाव लावण्यापर्यंत.
इथे विचारण्यास संकोच वाटतो आहे. पण मदत मिळण्याची , निदान योग्य बाजूकडे अंगुलीनिर्देश होण्याची बरीच शक्यता वाटल्याने इथे धागा टाकतो आहे.
१. विवाहोत्तर मुलीने नाव आहे तसेच ठेवले, तर सरकारदरबारी कुठे अडचण येण्याची शक्यता आहे का? किंवा बँक, पासपोर्ट, व्हिसा ह्या ठिकाणी काही
त्रास होउ शकतो का?
एक काल्पनिक नावांनी उदाहरण घेउ. समजा, "अवनी महेश गणोरे " हिचं "नरेश सोपान आवळे" ह्याच्याशी लग्न झालं; तर आधीचं आहे तसच नाव तिला सुरु ठेवण्यास काय काय अडचणी आहेत?
पर्याय/शंका १:- विवाहापूर्वी आणि विवाहानंतरही अवनी महेश गणोरे हेच नाव ठेवायचं असल्यास खरं तर काही अडचण यावयास नको. पण परवा मी आणि माझी पत्नी
मतदारसंघातील नावनोंदणीच्या एका कामासाठी गेलो होतो. तिथे त्या व्यक्तीने तिचे नाव लिहून घेतले. विवाह प्रमाणपत्राकडे बघत मग पतीचे, म्हणजे माझे नाव लिहून घेतले. आणि अचानक
माझे first name तिचे middle name म्हणून लावले.
ती काहीतरी विचित्र केस होउ लागली. म्हणजे अवनी महेश गणोरे हिचे नाव अवनी नरेश गणोरे असे काय च्या काय लागले गेले.
"ते आहे तसेच ठेवायचे आहे" म्हटले तरी तेथील व्यक्ती ऐकेना.
आता ह्याबाबतीत कुणी सल्ला देइल का?
नाव जश्शाला तसं ठेवणं चूक आहे का? किंवा व्यवहारात काही अडचणी येउ शकतात का?
.
पर्याय/शंका २:- गणोरे - आवळे हे संयुक्त आडनाव लावायचं असेल तर मिडल नेम काय लावायची पद्धत आहे? पूर्वीचं "महेश" हेच मिडल नेम राहील की "नरेश" हे नाव लावायला लागेल? (खरं तर संयुक्त आडनावही लावायची इच्छा नाही; पण वेळ पडलीच, तर ठाउक असावे.)
.
.
पुढील शंका:-
घरात गीझर घ्यायचे घाटत आहे. कोणता बरा राहील? गीझर वापरण्याबाबत आपला अनुभव काय आहे?
गॅसवर चालणार्या गीझरपेक्षा विजेवर चालणारा गीझर बरा , सोयीचा असे वाटते.
कुटुंबाचा आकार लहान असेल, तर किती क्यापेसिटीचा गीझर पुरेसा ठरतो?
मुळात तो काहीतरी इन्स्टंट वाला अन् क्यापेसिटी वाला असे भेद आहेत ना त्यात? तर इन्स्टंट बरा की क्यापेसिटीवाला?
किती क्यापेसिटी neccessary and sufficient आहे लहान आकाराच्या कुटुंबात?
गीझरचा जीवनकाळ (लाइफ) व सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास कोणता ब्रॅण्ड बरा?
.
.
पुढील शंका :-
पुण्यात किम्वा पिंपरी चिंचवडात फिरत्या लायब्रर्या उपलब्ध आहेत का? त्यांचे नाव, पत्ते, संपर्क माहिती कुठून मिळेल?
.
.
पुढील शंका:-
पिंपरी चिंचवडात हिरो होण्डाची दुचाकी सर्व्हिसिंगला टाकण्यास चांगले ठिकाण ठाउक आहे का? एखाद्या चांगल्या , कुशल मेकॅनिकचा पत्ता देउ शकाल काय?
.
.
मंडळी, ह्या धाग्यावर थट्टा वगैरे करायला स्कोप दिसतो आहे. पण पुरेशी माहिती मिळण्यापूर्वी धागा भरकटावू नये ही विनंती.
"ह्या शंका इथे का टाकल्या" (गीझर, सर्व्हिसिंग वगैरे) हा प्रश्न उपस्थित होउ शकतो; पण जालावर उपलब्ध असलेली सर्वच माहिती खात्रीशीर वाटत नाही.
बाहेर paid articles, paid reviews असण्याची शक्यता असते. मराठी आंजावर ते नसते असे वाटते. म्हणून इथे ह्या शंका देत आहे.
इथे तुलनेने थोडाफार अंदाज असतो.
--मनोबा
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सल्ला दिला असता पण
विनोद
विवाहोत्तर नाव बदलणे
+१
+१
गॅसवर चालणार्या गीझरपेक्षा
वाट पहातोय
तपशीलवार माहिती
अजून नंबर नाय मिळाले रे. एक-
अरे असं का करतोय वल्ली?
अरे मी नाय दिले तरी मनोबा
........
गॅसवर चालणार्या गीझरपेक्षा विजेवर चालणारा गीझर बरा , सोयीचा असे वाटते.सरळ सोलर हिटर बसवून घ्या . ग्यास किंवा विजेच्या हिटर च्या फंदात पडू नका कारण दोघांचे दर सध्या वाढत आहेत .सावध
काय कळ्ळं नाय ब्वा. तुमाला
पुण्यात किम्वा पिंपरी
F१
माझ्या मते
नावाची चर्चा चाल्लीये बायांनो
येस!!! वन टैम सोलर बसवलेय आता
२ पैसे
लायब्ररी डिटेल्स आम्हाला पण
आयडी शोभेलसा घेतलाय मनोबापंत.
चौकशी आणि विचारणा
चौकशी आणि विचारणा
आभार...