Skip to main content

संस्थानिकांच्या गढ्या... नेमक्या कुणाच्या?

लेखक उद्दाम यांनी शनिवार, 09/11/2013 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात पूर्वी काही संस्थाने होती . त्याना प्रिन्सली स्टेट असे म्हणत. इथे त्यांची यादी आहे. http://en.wikipedia.org/wiki/List_of_princely_states_of_India भारतातील लोकांचा आजही मुघल आणि इंग्रज यांच्यावर प्रचंड राग आहे. त्यान्नी देशाला लुटले हीच भावना आजही कायम आहे. पण १८५७ साली अखेरचा मुघल बादशाहा बहाद्दूर शहा जफर इंग्रजांविरुद्ध लढला . त्यात तो हरला. अखेर काही वर्षे तुरुंगात राहून मग तो त्यातच मेला. मुघल साम्राज्याचे इतर तुकडेही असेच नष्ट झाले.. म्हणजे इंग्रजांनी गिळले. लखनौ (अवध) चा नबाब साजिद अली हाही इंग्रजांपुढे पराभूत झाला. जेंव्हा त्याला इंग्रज पकडून घेऊन जात होते, तेंव्हा त्याने त्याच्या भावना व्यक्त करायला चार ओळी खरडल्या. सैगलपासून पार भिमसेनजींपर्यंत सर्वांनाच त्या ओळीनी भुरळ घातली. बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए चार कहार मिल, मोरी डोलिया सजावें (उठायें) मोरा अपना बेगाना छूटो जाए | बाबुल मोरा ... आँगना तो पर्बत भयो और देहरी भयी बिदेश जाए बाबुल घर आपनो मैं चली पीया के देश | बाबुल मोरा ... मुघल संपले. त्यांच्या इमारती, राज्ये, पैसा हे सर्व इंग्रजांच्या मालकीचे झाले. पुढे १९४७ साली इंग्रजही देश सोडून गेले आणि त्यान्नी इंग्लंडला नेलेलं जरी आपल्याकडून गेलं, तरी भारतातील गंगाजळी, भारतातील स्थावर मालमत्ता , इतर उद्योगधंदे , इतर शासकीय संपत्ती ही भारतातच आणि भारताच्या मालकीचीच राहिली. त्यामुळं मुघलानी आणि इंग्रजान्नी घेतलेलं काही अंशी तरी देशाला परत मिळालं. पण ज्या संस्थानिकांच्या गढ्या, राजवाडे , महाल होते, त्यातील मात्र बर्‍याचशा वास्तू संस्थानिक घराण्याच्याच राहिल्या आणि आजही त्या 'शासकीय ' मालकीच्या झालेल्या नाहीत. १९४७ साली संस्थानिकांनी आपली प्रजा लोकशाहीच्या मांडीवर बसवली , पण राजकोष आणि राजमहाल हे भारतात विलीन झाले का? उदाहरणार्थ, आमच्या गावचा कुरुंदवाडचा राजवाडा हा आजही संस्थानिकांचीच खाजगी मालमत्ता आहे. का, ही त्यांची अर्जित प्रॉपर्टी होती? इतर ठिकाणी काय परिस्थिती आहे? मुघलांचे वाडे सरकारचे झाले. शिवाजी महाराजांचे किल्ले सरकारजमा आहेत. इंग्रजांच्या वास्तूही सरकारजमा आहेत. पेशवाई शनिवारवाडा हाही पेशव्यांचा खाजगी राहिलेला नाही. मग संस्थानिकांच्या गढ्या, महाल, वाडे हे मात्र त्यांच्याच नावाने कसे राहिले?

वाचने 42984
प्रतिक्रिया 147

प्रतिक्रिया

पेशवे घराणे खालसा झाले. त्यामुळे त्यांची जवळपास सगळी प्रॉपर्टी खालसाच झाली. शिवछत्रपतींचे तथाकथित वारस इंग्रजांनी खालसा न करता ठेवले इतकेच. पण त्यांच्याकडून किल्ले इ. घ्यायला मुळात ते त्यांचे राहिलेच नव्हते. राहता राहिले संस्थानिक. ते लोक स्वातंत्र्य मिळेपर्यंत राजे तर होतेच, शिवाय प्रिव्ही पर्स नामक तनख्याचा प्रकार अगदी १९७२-७४ पर्यंत सुरू होता. शिवाय निगोशिएशन्स करताना वडिलोपार्जित संपत्ती विशेषतः जडजवाहीर सरकारजमा केले जाईल असे काही नव्हते. होते नव्हते तेवढे रेव्हेन्यू राईट्स तेवढे काढून घेतले अन काही प्रॉपर्टी. पण हाय ष्ट्यांडर्ड ऑफ लिव्हिंग मेण्टेन करता येईल इतकी चिकार प्रॉपर्टी त्यांच्या नावेच राहिलेली दिसते. इतर ठिकाणीही स्थिती फार वेगळी आहे असे नाही. थोड्याफार फरकाने हेच दिसते.

In reply to by बॅटमॅन

पेशवे घराणे खालसा झालेले नाही. त्यांचे वंशज आजही पुण्यात आहेत. प्रभात रोड भागात त्यांचे घर आहे. नाना पेशव्यांचे वंशज बिठुर कानपुर भागात आजही आहेत. शिवाजी महाराजांचे वंशज आजही सातार्‍यात आहेत. सातार्‍याचा राजवाडा , जलमंदीर , अदालत वाडा , तेथील बर्‍याच जमिनी त्यांच्याच नावावर आहेत. किल्ल्यांबद्दल बोलायचे झाले तर शिवाजीचे सगळेच किल्ले सरकारच्या मालकीचे नाहीत. प्रतापगड आणि तेथील तुळजाभवानीचे मंदीर याची मालकी अजूनही सातार्‍याच्या छत्रपतींकडे आहे. भवानीतलवार , इतर शस्त्रे , दागदागिने हे अजुनही त्यांच्याच ताब्यात आहेत. तीच गोष्ट कोल्हापुरच्या भवानी मंडप राजवाड्याची. तीच कथा साम्गलीच्या गणपती मंदीराची.

In reply to by विजुभाऊ

खालसा होणे म्हणजे वंशविच्छेद नव्हे. राज्य गेले अशा अर्थी म्हटले आहे ते. शिवाजी महाराजांचे सातार्‍यातील सध्याचे वंशज हे त्या गादीचे वंशज म्हणता येतील फारतर, ती ब्लडलाइन शाहूनंतर तुटली आहे.

In reply to by मालोजीराव

'भवानी तलवारीचे गूढ' नामक लेख इथे वाचा: http://khattamitha.blogspot.in/2008/02/blog-post_23.html या लेखातील काही भाग: रियासतकारांच्या म्हणण्यानुसार, रायगड्या पाडावानंतर औरंगजेबाच्या हाती भवानी तलवार लागली. ती त्याने शाहू महाराजांना त्यांच्या विवाहप्रसंगी भेट दिली. याचा अर्थ असा होतो, की भवानी तलवार सातारच्या छत्रपतींकडे आहे. सध्या ती उदयराजे भोसले यांच्या ताब्यात आहे. 1974 साली बाबासाहेब पुरंदरे यांनी मुंबईत "शिवसृष्टी' प्रदर्शन भरविले होते. तेव्हा त्यांनी सातारच्या राजघराण्यातील तलवार भवानी तलवार असल्याचे सांगून मिरवली होती. परंतु ज्येष्ठ इतिहाससंशोधक ग. ह. खरे यांनी ही तलवार आधीच पाहिलेली होती. ती त्यावेळी त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्याबरोबर पुन्हा एकदा डोळ्यांखालून घातली. खरे यांनी पुरंदरे यांना त्यावरील कोरीव मजकूर दाखवून ही तलवार भवानी नव्हे असे स्पष्ट केले. त्या तलवारीवर "सरकार राजा शाहू छत्रपती कदिम' असा उल्लेख होता. 1875 मध्ये इंग्लंडचे राजपूत्र, प्रिन्स ऑफ वेल्स सातवे एडवर्ड इकडे आले होते. त्यावेळी कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींनी त्यांना कोल्हापूरच्या शस्त्रगारातील "तुळजा' व "जगदंबा' या दोन तलवारी नजर केल्या. यापैकी कोणतीही भवानी तलवार नव्हे. कोल्हापूरच्या राजघराण्याकडे अशी कोणती भवानी तलवार असती, तर ती त्यांच्या देवघरात पूजेत असती. ती त्यांनी कोणास नजराणा म्हणून दिली नसती. पण मुदलातच कोल्हापूर किंवा सातारा येथील राजघराण्यांच्या याद्यांमध्ये भवानी तलवारीचा उल्लेखही नाही. बकिंगहॅम राजवाड्यातील दोन्ही तलवारी पोतुगीज बनावटीच्या आहेत. इतिहासकार वा. सी. बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांनी त्या पाहून, त्यातील एकही भवानी तलवार नसल्याची खात्री दिली आहे. बाबासाहेब पुरंदरे यांना बकिंगहॅम राजवाडा व अन्य म्युझियम्समधील तलवारींची तपासणी करण्याची परवानगी नानासाहेब गोरे यांनी ते भारताचे इंग्लंडमधील हायकमिशनर असताना मिळवून दिली होती. त्या तलवारीवर अद्याप रोमन लिपीत "जे. एच.एस.' अशी अक्षरे आहेत. इतिहासकार ग. ह. खरे यांच्या मते, ती जीजस ह्युमॅनन साल्वादोर या पोर्तुगीज नावाची अद्याक्षरे आहेत. ब्रिटिश म्युझियमेच डेप्युटी कीपर डग्लस बॅरेट यांनी, इंग्लंडमधील कोणत्याही म्युझियममध्ये शिवाजी महाराजांची भवानी तलवार नाही, असे 1969 साली कळविले होते. भवानी तलवार कशी होती, हे कुणालाच माहित नाही. ग. ह. खरे सांगतात, ""भवानी तलवारीचे प्रमाणभूत वर्णन आजही उपलब्ध नाही. परमानंदाच्या शिवभारतात आणि हरि कविच्या शंभुराजचरित्रात हिचा निर्देश आला असला, तरी त्यात हिची लांबी, रुंदी, धार, मूठ, पाते, पोलाद, तीवरील चिन्हे, जडाव वगैरेचे काम इत्यादी तपशील दिलेला नाही. शिवाय परंपरागत अशीही माहिती उपलब्ध नाही. म्हणून आज एखाद्याने एखादी तलवार पुढे आणून ती "भवानी' असल्याचे सांगितले, तर त्याचे तोंड बंद करणे शक्‍य नाही. तरीही इतिहास हे पुराव्याचे शास्त्र असल्याने आणि असा पुरावा त्या व्यक्तीस देता येत नसल्याने तञ्ज्ञ त्याच्या शब्दास कधीच मान्यता दाखविणार नाहीत.'' या शिवाय मिपावरील खालील लेखात भवानी तलवारीबद्दल लिहिले आहे: राजा शिवछत्रपती - भवानी तलवार आणि जीवनपट ! http://www.misalpav.com/node/20743 या विषयावरील तज्ञ मंडळींनी याबद्दल खरे-खोटे काय आहे, याचा खुलासा करावा, ही विनंती.

In reply to by चित्रगुप्त

पुरंदरे इतिहास संशोधक आहेत काय! त्यांच्याकडे इतिहासाची कोणती पदवी आहे? आर्किओलॉजी वगैरेची पदवी... आजपर्यंत शास्त्रीय पद्धतीने असा कोणता इतिहासातील शोध त्यांनी लावला आहे काय?असल्यास विदा द्या. दादोजी शिवाजींचे गुरु असल्याचा एकही अस्सल ,समकालिन पुरावा पुरंदरेंनी शासनाला अथवा इतिहासप्रेमींना दिलेला नाही...तरीही त्यांच्या कथाकादंबर्यात दादोजी सेंट्रल कॅरॅक्टर असतात..... मोले घातले रडाया' चालू करु नका

In reply to by ग्रेटथिन्कर

ग्रेटस्टिंकर, श्री शिवाजी महाराजांचे दोन गुरू होते. राजकीय गुरू दादोजी कोंडदेव आणि आध्यात्मिक गुरू श्री समर्थ रामदास स्वामीं. श्री समर्थ रामदास स्वामींनी "दासबोध" या नावाचा एक महान ग्रंथ लिहिला आहे. तुमच्या अत्यंत अतार्किक, बेताल व असंबद्ध प्रतिसादावरून असं दिसतंय की त्यात लिहिलेली "महामूर्खांची लक्षणे" तुम्हाला तंतोतंत लागू पडत आहेत. असो. बहुत काय लिहिणे.

In reply to by श्रीगुरुजी

दादोजींनी शिवाजीस राजकारण शिकवले याचा एकही समकालीन पुरावा नाही... रामदासांची आणि शिवाजीँची एकदाही भेट झाली नाही असे खुद्द पुरंदरेंनीच सांगितले आहे.

In reply to by ग्रेटथिन्कर

>>> दादोजींनी शिवाजीस राजकारण शिकवले याचा एकही समकालीन पुरावा नाही... रामदासांची आणि शिवाजीँची एकदाही भेट झाली नाही असे खुद्द पुरंदरेंनीच सांगितले आहे. ग्रेटस्टिंकर, दादोजींनी शिवाजीस राजकारण शिकवले नाही याचा एकतरी समकालीन पुरावा आहे का? दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू होते हे प्रत्यक्ष काँग्रेसच्या राजवटीत छापलेल्या इतिहासाच्या पुस्तकातून लिहिले आहे. ते खोटे कसे असेल? >>> रामदासांची आणि शिवाजीँची एकदाही भेट झाली नाही असे खुद्द पुरंदरेंनीच सांगितले आहे. हे जर खरं असेल तर दादोजी हेच शिवरायांचे गुरू होते हेही पुरंदर्‍यांनीच लिहिले आहे. मग तेही खरे असले पाहिजे. ज्या माणसाकडे इतिहास संशोधनाची एकही पदवी नाही त्याच्यावर काय विश्वास ठेवायचा? आम्ही काँग्रेसच्या राजवटीत निघालेल्या इतिहासाच्या पुस्तकांवर विश्वास ठेवणार. त्यात समर्थ रामदास स्वामी हे शिवरायांचे आध्यात्मिक गुरू होते असे स्पष्ट लिहिले होते. रायगड बांधताना एका खडकात बेडकी सापडते. त्याप्रसंगी श्री समर्थ रामदास व शिवाजी महाराज शेजारी उभे आहेत असे चित्रही इतिहासाच्या पुस्तकात होते. काँग्रेसने लिहिलेला इतिहास खोटा आणि ज्याच्याकडे इतिहासाची एकही पदवी नाही त्या पुरंदर्‍यांना इतिहास लिहिलेला खरा? कमाल आहे बुवा तुमची. काँग्रेसवाले भाजपवाल्यांसारखे इतिहास बदलणारे नाहीत. दादोजी कोंडदेव आणि श्री समर्थ रामदास हेच शिवरायांचे गुरू होते असे आम्ही काँग्रेसच्या राजवटीत लिहिलेल्या इतिहासांच्या पुस्तकावरून शिकलो आहोत. तेच आम्ही खरे मानणार. तुमच्यासारख्या भाजपवाल्यांनी स्वतःच्या सोयीकरता बदललेल्या इतिहासावर आम्ही अजिबात विश्वास ठेवणार नाही. असो. बहुत काय लिहिणे. तुम्हांस सद्बुद्धी आणि योग्य ती आकलन शक्ती देण्यास श्री समर्थ आहेत. आम्ही केवळ निमित्तमात्र.

In reply to by श्रीगुरुजी

असलेल्या गोष्टी सिद्ध करायच्या असतात, नसलेल्या गोष्टी सिद्ध करायच्या नसतात त्या करताच येत नाहीत. दादोजी गुरु नव्हते हे सिद्ध करुन दाखवा असे विधानच मुळात अतार्कीक आहे ईतिहास संशोधन असे नाही करता येत असो आपण त्याऐवजी डफली घेऊन शाहीर बना...वाटल्यास दाढी वाढवा... हे पण ऐका आणि प्रतिवाद करता येतो का बघा.

In reply to by ग्रेटथिन्कर

>>> असलेल्या गोष्टी सिद्ध करायच्या असतात, नसलेल्या गोष्टी सिद्ध करायच्या नसतात त्या करताच येत नाहीत. दादोजी गुरु नव्हते हे सिद्ध करुन दाखवा असे विधानच मुळात अतार्कीक आहे ईतिहास संशोधन असे नाही करता येत असो ग्रेटस्टिंकर, ज्या गोष्टी आहेत त्यात सिद्ध काय करावयाचे? त्यांचे अस्तित्व हीच त्यांची सिद्धता. उलट ज्या गोष्टी असतात पण त्या नाहीत असा ज्यांचा(गैर)समज झालेला (की हेतूपुरस्पर केलेला) असतो, त्या खरोखरच नाहीत/नव्हत्या हे त्यांनी सिद्ध करावयास हवे. यास्तव, दादोजी हे शिवाजी महाराजांचे राजकीय गुरू होते हे जगजाहीर असताना व हे निखळ सूर्यप्रकाशाइतके सत्य असताना, निव्वळ जातीद्वेषातून व हेतुपुरस्पर ते गुरू नाहीत असा जनतेचा गैरसमज करून देणार्‍यांना तसे सिद्ध करावयास हवे. गेल्या अनेक पिढ्या हे शिकत आल्या ही दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरू होते. काँग्रेसच्या राजवटीत चुकीचा इतिहास कसा व का शिकविला जाईल? >>> आपण त्याऐवजी डफली घेऊन शाहीर बना...वाटल्यास दाढी वाढवा...हे पण ऐका आणि प्रतिवाद करता येतो का बघा. त्याऐवजी तुम्हीच काळी टोपी, श्वेत सदरा, कृष्णवर्णी पदवेश व खाकी अर्धी विजार परिधान करून व हातात दंड घेऊन संचलन करत बसा. असो. बहुत काय लिहिणे. तुम्हांस सन्मार्गावर नेण्यास, सद्बुद्धी देण्यास आणि योग्य ती आकलन शक्ती व विचारशक्ती देण्यास श्री समर्थ आहेत. आमच्या हातून या कार्यास अल्पसा हातभार लागत असला तरी आम्ही केवळ निमित्तमात्र.

In reply to by श्रीगुरुजी

तसा मी बरेचदा भरकटतो , बरे झाले आठवण करुन दिलीत .माझी भजनाची वेळ झाली. चला रामनामाचा जप करु ||जय जय रघुवीर समर्थ|| ||जय जय रघुवीर समर्थ|| ||जय जय रघुवीर समर्थ|| ||जय जय रघुवीर समर्थ||

In reply to by ग्रेटथिन्कर

कोणता इतिहासातील शोध त्यांनी लावला आहे काय? यावरून सकाळ मधली ग्रॅफिटी आठवली, 'ते भविष्यातले शोध लावतात आणि आम्ही इतिहासातले'. असो.

भारतातील लोकांचा आजही मुघल आणि इंग्रज यांच्यावर प्रचंड राग आहे. त्यान्नी देशाला लुटले हीच भावना आजही कायम आहे. मग तुमच्या मते कोणी लुटले? पण ज्या संस्थानिकांच्या गढ्या, राजवाडे , महाल होते, त्यातील मात्र बर्‍याचशा वास्तू संस्थानिक घराण्याच्याच राहिल्या आणि आजही त्या 'शासकीय ' मालकीच्या झालेल्या नाहीत. ह्या विधाना मागे काही दुवा वगैरे ? त्यामुळं मुघलानी आणि इंग्रजान्नी घेतलेलं काही अंशी तरी देशाला परत मिळालं. =)) १ ० ० रुपये चोरले आणि शंभर वर्षांनी एक पैसा परत केला तर !! मग संस्थानिकांच्या गढ्या, महाल, वाडे हे मात्र त्यांच्याच नावाने कसे राहिले? दुवा वगैरे ?

In reply to by चेतनकुलकर्णी_85

भारतातेल संस्थानिकांनी राजवाडे , पैसा गिळंकृत करुन वर पुन्हा पेन्शन खाल्लेली आहे, हे भयाणच आहे. एकीकडे जे स्वातंत्र्यासाठी लढले त्यान्ना दीडकीभर पेन्शन आणि यान्ना मात्र वाडे, महाल, पेन्शन. भारतीय जनतेला वर्षानुवर्षे मूर्ख बनवण्याचे काम या संस्थानिकानी केले. देशभक्ती / प्रांतभक्तीच्या नावाने आम जनता यान्नी शताकानुशतके लढवली आणि त्याचा एंड प्रॉडक्ट काय? तर गोळा झालेली संपत्ती ही त्यांची खाजगी मालमत्ता ! म्हणजे 'देशप्रेम' हा त्यांचा फ्यामिली बिझनेस झाला नै का? :) याउलट, मुघल इंग्रजांविरुद्ध कडवेपणाने लढले आणि अखेर तुरुंगात जाऊन मेले. त्यांची संपत्तीही देशाला काही अंशी परत मिळाली. इतक्या पुण्याईवर मुघल हे प्रातःस्मरणीय ठरवायला हरकत नसावी , नै का? :)

In reply to by उद्दाम

तुम्ही मायबोलीवर "जागो मोहन प्यारे" असा आय.डी. घेतला होता का?

In reply to by उद्दाम

हहहहहहपुवा. त्या मुघलांच्लांअंगात औरंगजेब मेल्यावर, नादिरशहाने लुटल्यावर दम तरी राहिला होता का? 'दिल्लीचा पाटील' इतकीच लायकी उरली होती मुघल बादशहाची. संपूर्ण १८व्या शतकाचा उत्तरार्ध, उत्तर भारतावर मुख्यतः मराठ्यांचे वर्चस्व होते. इंग्रजांनी दिल्ली घेतली मराठ्यांकडून. १८५७ च्या उठावात लोकांनी वर चढवले आणि इंग्रजांनी पकडले इतक्या भांडवलावर जर गोडवे गाणार असाल तर चालूदे. तुमच्या जेएनयू मधल्या बच्च्यांना सुनवा असल्या गोष्टी , करमणूक होईल त्यांची. बाकी मुघलांमध्ये अकबराला मात्र आपण मानतो. सर्वच बाबींत तो ग्रेट होता.

In reply to by उद्दाम

बरोबर बरेचशे हिंदू संस्थानिक इंग्रजांना घाबरुन त्यांचे मांडलिक झाले होते, आज वंशज म्हणून मिशीला फूका पीळ मारणारे अश्या भेकडांच्याच रक्ताचे आहेत... मूघल असो वा टिपू सुलतान ..ते खरे लढवय्ये...बाकीचे संस्थानिक फक्त खवय्ये... पेन्शन खा, जमिनी खा, संपत्ति खा..

In reply to by ग्रेटथिन्कर

टिपुला खरा लढवय्या म्हटल्याचे बघुन गदगदुन आले. बाकी चालु द्या. (थेट-थुंकर) सौंदाळा

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

का ? भारतात युद्धामध्ये सर्वात पहिले क्षेपणास्त्र वापरण्याचे रेकॉर्ड टिपू सुलतानाचे आहे.

In reply to by उद्दाम

त्याच्या आधीही तसे दारूचे बाण वापरले जात. त्याला होके अशी संज्ञा होती. टिपूचे क्रेडिट हे की त्याने त्यात इनोव्हेशन केले. इन्व्हेन्शन त्याचे नाही हे लक्षात घ्यावे.

In reply to by उद्दाम

हा हा हा. सगळे सारखेच नाही. टिपूने इनोव्हेशन केले तरी त्याला प्रीकर्सर होता इतकेच सांगायचे आहे. टिपूचे महत्त्व कमी आजिबात होत नै त्याने. त्याचा धर्मवेडेपणा असला तरी एक राजा म्हणून आवश्यक असलेले बहुतेक गुण त्याच्यात होते हे कबूलच आहे.

In reply to by ग्रेटथिन्कर

शिवाजीमहाराज लढलेच नाहीत बहुतेक कधी. बाकी शिवाजीमहाराज आणि रामदास स्वामी ऊर्फ समर्थ यांची १६७२ साली भेट झाल्याचे अस्सल पत्र उपलब्ध आहे ते नजरेआड केल्याशिवाय चैन पडत नाही वाटते. तुम्ही आणि उद्दाम दोघेही निव्वळ ट्रोलिंग करण्यासाठी मिपाचा वापर करताहात हे लक्षात घ्या. जनता चिडते, कायबाय उत्तरे देते आणि तुम्ही मात्र चुकीच्या समजुती खर्‍या म्हणून सांगताहात. जनाची नाही तर मनाची तरी आहे की कसे ते एकदा कळूदे मग तुमच्या मतांना किती महत्त्व द्यायचे ते ठरेल. तुमच्या विधानांपैकी कितीतरी विधाने निव्वळ अभिनिवेशयुक्त आणि बिनबुडाची आहेत. तुम्हा दोघांची खरेच मूळ पुरावे पहायची तयारी आहे की नुसता टाईमपास चालला आहे? तुमच्याच भाषेत तुम्हाला उत्तर देता येईल पण ते गटारीत दगड टाकल्यासारखे होईल. काही झाले तरी टाईमपास तुमचाच.

In reply to by अनुप ढेरे

ब्रीगेदिंची जुनी सवय आहे वाट्टेल तसली विधान करायची, कोणाचेही अन कुठचेही संदर्भ द्यायचे, अन हवे ते निष्कर्ष काढून मोकळे व्हायचे. (हे सर्व जाणून बुजून ) सो यांना प्रतिवाद करण्यात काहीच हशील नाही. तुम्ही तर्काचा आधार घ्याल तर हे पुरावे पुरावे करीत उर बडवणार…। अन पुरावा वगैरे मांडाल तर नको तसले तर्क लढवणार. असले प्रकार करून यांनी बरीच मनं कलुषित करून ठेवलेली आहेत.

In reply to by बॅटमॅन

मी पुरावे द्यायला तयार आहे ,परंतु त्याआधी मला दाढी वाढवुन ती सफेद करायला पाहीजे मग ,भगवा टिळा लावुन ,उजव्या छावणीतल्या एखाद्या संघटनेच्या व्यासपीठावर कुणा ठाकरे ,मोदी, मंगेशकर यांची लुच्चेगिरी करायला शिकले पाहीजे. त्याशिवाय तूम्ही लोक माझ्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवणार??... गेला बाजार माझे आडनाव आपल्या कानाला 'सुसह्य' आणि लगेच 'ओळखु' येणारे करावे लागेल (ऐफेडेव्हीटचा खर्च आलाच) सफेद दाढ्या वाढवलेले इतिहासतज्ञ()? गेली अनेक दशके हिंदुत्ववाद्यांच्या मांडीला मांडी लावुन बसतात ,याचा अर्थ त्यांचे संशोधन हे 'पेडन्युज'सारखे 'पेडसंशोधन' आहे, हे कळण्यासाठी वटवाघळाचा मेंदूही पुरेसा आहे... (मेंदु नसलेला अनपेड थिन्कर)

In reply to by ग्रेटथिन्कर

>>> मी पुरावे द्यायला तयार आहे तुमचे पुरावे म्हणजे हरी नरके, संजय सोनवणी सारख्यांची भाषणे आणि संभाजी ब्रिगेडवाल्यांची पुस्तके. म्हणजे पूर्वग्रहदूषित, पक्षपाती आणि निरूपयोगी रद्दीच! असो. बहुत काय लिहिणे. तुम्हाला सन्मार्गावर नेण्यास, सारासार विवेकबुद्धी देण्यास व सद्बुद्धी देण्यास श्री समर्थ आहेत. या कार्यात आमचा खारीचा वाटा असला तरी कर्ताकरविता फक्त तोच आणि आम्ही केवळ निमित्तमात्र.

In reply to by श्रीगुरुजी

नरके हे पुणे विद्यापीठात महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख आहेत आणि पुराभिलेखाचे अभ्यासक आहेत. ते नियोजन आयोगाचे सल्लागारही आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल इतपत संशोधन त्यांनी केले आहे व त्यासाठीच्या शासकीय समितीचे प्रमुखही आहेत...सफेद दाढीच्या पात्रतेपेक्षा ही पात्रता नक्कीच मोठी आहे. सोनवणी हे इतिहास व भाषेचे अभ्यासक आहेत आणि ८० च्यावर पुस्तके लिहिली आहेत.

In reply to by बॅटमॅन

अय ब्याम्या, ते लई हुश्शार मानूस हाय बरका बराक ओबामामा! आनि शिरेस घेतंय सगळ. त्ये बार्क्या पोरीला सांगताना बगिटलास न्हवं, ह्यो तुजा बा न्हाय म्हनून... त्या थोबाडपुस्तकावर अस्तुया फोटु. उगा मिसळपाव वर डुप्लिकेट आयडी घिऊन काय त्ये स्पायिंग का काय करत असायचं आनि थो ड्या दिसांनी आमाला तुला खर्‍यानीच उलटं टांगल्यालं बगाय मिळायचं उगा. सांबाळून र्‍हावा. उगा लपडी नगो. कसं? ;)

In reply to by ग्रेटथिन्कर

८० पुस्तकांचे काय कौतुक सांगता? साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांना पुस्तकांच्या संख्येइतकीही मते मिळाली नव्हती. बाबूराव अर्ना़ळकरांनी तर तब्बल ५०० पुस्तके लिहिली होती. चंद्रकांत काकोडकरांनी देखील १०० कादंबर्‍या लिहिल्या होत्या. >>> त्यासाठीच्या शासकीय समितीचे प्रमुखही आहेत ते सुरूवातीपासूनच काँग्रेस-राष्ट्रवादीचे लाडके आहेत. छगन भुजबळ यांच्याशी विशेष जवळीक आहे. "ब्राह्मणांना लोकसंख्येच्या प्रमाणात ६०० टक्के जागा राखीव आहेत" हे यांचेच संशोधन. अनेक वर्षे संभाजी ब्रिगेडच्या व्यासपीठावर हे आणि आ. ह. साळुंखे असायचे. १-२ वर्षांपूर्वी ब्रिगेड अचानक यांच्या विरोधात गेल्यावर हे बाजूला झाले. हे इतिहास संशोधक कधीच नव्हते. एकंदरीत यांचे संशोधन म्हणजे काँग्रेस्-राष्ट्रवादी पुरस्कृत संशोधन.

In reply to by ग्रेटथिन्कर

>>> सफेद दाढ्या वाढवलेले इतिहासतज्ञ()? गेली अनेक दशके हिंदुत्ववाद्यांच्या मांडीला मांडी लावुन बसतात ,याचा अर्थ त्यांचे संशोधन हे 'पेडन्युज'सारखे 'पेडसंशोधन' आहे, हे कळण्यासाठी वटवाघळाचा मेंदूही पुरेसा आहे... गुंडगिरी करणारे ब्रिगेडी, सेवासंघी आणि संशोधनाचा आव आणणारे सरकारी इतिहास संशोधक अनेक दशके काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसतात, याचा अर्थ त्यांचे संशोधन हे 'पेडन्युज'सारखे 'पेडसंशोधन' आहे, हे कळण्यासाठी तुमचा मेंदूही पुरेसा आहे...

In reply to by बॅटमॅन

जाऊ दे हो ! खरा बॅटमॅन एका जोकर मुले हरला तर ह्या दोन जोकारांपुढे तुमचा तरी कसा टिकाव लागेल?

In reply to by बॅटमॅन

असल्यांशी वाद घालणे म्हणजे वराहाशी कर्दमात मल्लयुद्ध केल्यासारखं आहे. आपली वस्त्रे मलीन होतात आणि हे वराह मात्र कर्दमात परमानंद उपभोगत असते. ब्रिगेड, सेवा संघासारख्या फॅसिस्ट आणि जातीयवादी गुंडांच्या टोळ्यांचा उगम ९० च्या दशकात झाला. श्री समर्थ रामदास स्वामी व दादोजी कोंडदेव यांच्या गुरूपदावर शंका घेणे; स्वातंत्र्यवीर सावरकर, थोरले बाजीराव पेशवे, राणी लक्ष्मीबाई, इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे इ. वर चिखलफेक याच काळात सुरू झाली हा योगायोग नाही. १९४७ नंतर वेगवेगळ्या मार्गांनी गळचेपी करूनसुद्धा (राखीव जागा, कूळकायदा, जाळपोळ इ.) या वर्गाला नेस्तनाबूत करता आले नाही, उलट त्यांची प्रगतीच होत आहे या वैफल्यातून व नैराश्येतून या वर्गांचे योगदान नाकारण्याचा प्रयत्न या काळात सुरू झाला. थोरले बाजीराव पेशवे, दादोजी कोंडदेव, रामदास स्वामी इ. केवळ एका विशिष्ट जातीचे असल्याने अत्यंत हीन पातळीला जाऊन बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता शिक्षण प्रसारक मंडळी (स.प. महाविद्यालय), ज्ञानप्रबोधिनी इ. शिक्षणसंस्थांना छळण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यामागे हाच जातीयवाद आहे. ५० टक्के जागा आता राखीव आहेतच. आता उरलेल्या खुल्या ५० टक्क्यातही मुस्लिम, मराठा इ. ना आरक्षण देऊन याच वर्गाची अजून गळचेप करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अगदी १०० टक्के जागा राखीव केल्यातरी हा वर्ग नेस्तनाबूत होणार नाही व त्यांची प्रगती थांबविता येणार नाही याची यांना अजून कल्पना नाही.

In reply to by मालोजीराव

हाच हाच तो माज! ;) बघा बघा कसे धमकावत आहेत. तिकडे ते साखर कारखानदार भट्टीत घालतात नि इकडं हे तलवारबाजी करतात. मी देशच सोडून जातो कसा..... ;)

In reply to by बॅटमॅन

तुम्हा दोघांची खरेच मूळ पुरावे पहायची तयारी आहे की नुसता टाईमपास चालला आहे? कोण दोघे? शिवाजी - रामदास या विषयावर मी एकही कमेंट केलेली नाही. ------ रामदासनवमीला जन्मलेला उद्दामदास

सांस्थनिक गेले, ते स्वतःला राजे वैगैरे म्हणवून घ्यायचे, पण राजा सारखे लढणारे फारच कमी (तुम्हीही उदहरणे दिली आहेतच)शिवाजी राजे, महाराणा प्रताप राणी चेन्नम्मा अजुन अनेक पण एकुण संख्येच्या तुलनेत फार कमी. बाकी सगळे तथाकथीत महाराजे परकिय सत्तेचे मांडलीक होते ते कसले राजे? संपत्ती चा मुद्दा आहेच पण मुख्य मुद्दा हा की हेच तथाकथीत महाराजे १९५२ नंतर ही लोकशाही मार्गाने निवडुन आलेत, लोकांनी मते देउनच त्यांना निवडुन आणले , आणि आजही त्यांच्या वंशजांना तोच गर्व आहे. अन काही प्रमाणात (पूर्वी इतकी नसली तरीही)आजही लोक मान्यता आहेच आजही ब-याच प्रमाणात निवडुन येतातच. ह्या वरुन ह्याच विषया वरची प्रेमचंदांची शतरंज के खिलाडी ही कथा आठवली.

काहीच कळलं नाही. गढ्या शासनाच्या मालकीच्या व्हायला पाहीजेत असं का ? कपडे, जोडे, मंगळसूत्र, बादली, मग, टमरेल यांच्याबद्दल काय ?

In reply to by खटासि खट

गढ्या आणि त्यातील सर्व चीजवस्तू असाच विषय आहे. टायटलात गढ्या लिहिले तरी सगळ्याबाबत चर्चा अपेक्षित आहे.

गढ्या शासनाच्या मालकीच्या व्हायला पाहीजेत असं का ? कपडे, जोडे, मंगळसूत्र, बादली, मग, टमरेल यांच्याबद्दल काय ?
शंभर टक्के सहमत. तसा हा विषय फार मोठा आहे, आणि कुणाचा यावर अभ्यास असेल, तर त्याने अवश्य विवेचन करावे, असा आहे. आजमितीला सुध्द्धा, तेही तरूण पीढीपैकी, या राजेलोकांबद्दल प्रचंड आदर असणारे अनेक लोक आहेत. आणि त्यात काहीही गैर आहे, असे वाटत नाही. गढ्या, राजवाडे इ. पैकी प्रत्येक हकिगत वेगळी असणार. याबद्दल सरसकट विधान करता येणार नाही. सर्वच देशातील प्रासाद वगैरे त्या त्या देशातील मौल्यवान प्रमुख सांस्कृतिक ठेवा असून देशासाठी मिळकतीचा स्त्रोत आहेत. जे प्रासाद सरकार जमा झाले, त्यांची वाताहात झाली, उलट वंशजांनीच नीट जपणूक केली, असेही दिसते.

या संस्थानिकांनी विविध संस्था,ट्रस्ट स्थापण करुन त्या नावे हजारो एकर जमिनी वर्ग केल्या आहेत. त्यावर ट्रस्टी यांचेच बगलबच्चे असतात, कायदा करणारे हेच लोक असल्याने त्यात पळवाटा ठेऊन आपल्या गढ्या यांनी वाचवल्या आहेत.

In reply to by ग्रेटथिन्कर

कायदा करणारे हेच लोक असल्याने त्यात पळवाटा ठेऊन आपल्या गढ्या यांनी वाचवल्या आहेत.
कोणत्या कायद्याबद्दल बोलत आहात? का उगाच सामाजिक विषयावर लिहिण्याची खाज / कंड भागवून घेत आहात

In reply to by अन्या दातार

जाने दो... ते अद्याप नथु गुग्गूळ घेत आहेत. त्यामुळे चिंता नसावी....

अवांतरः अवध चा तो नबाब सजिद अली नाही... वाजीद अली शाह. गाण्याचा एकदम शौकिन... अमजद खाननी त्याचं काम केलं होतं 'शतरंजके खिलाडी' नावाच्या पिच्चरमध्ये.

भारत निर्माण झाले त्यावेळी सर्व स्न्स्थानीकावर इंग्रजांची suzerainty होती. त्यांनी सर्व संस्थानिकांना स्वतंत्र होण्याची किंवा भारतात अथवा पाकिस्तानात विलीन होण्याची मुभा दिली होती. त्यांतर भारत सरकारच्या ( म्हणजे वल्लभभाई पटेलांच्या ) हिकमती मुळे जवळ जवळ सर्व संस्थानिक भारतात विलीन झाली. त्यावेळी सर्व स्न्स्थानिकांच्या खालील अटी भारत सरकारने मान्य केल्या- १. त्यांचा राजमहाल अथवा गढी अथवा किल्ला (ल्ले ) त्यांच्याच ताब्यात रहावे. २. त्याना विजेचा उपयोग मोफत असावा. ३. त्यांच्या गाड्यांवर त्याना स्वत:च्या number प्लेट लावू द्याव्या. वगैरे वगैरे. या तहाच्या अटी प्रमाणे किल्ले अथवा महाल आज सुद्धा स्न्स्थानिकाञ्च्या मालकीचे आहेत. या शिवाय प्रत्येक संस्थानाच्या महसुलावर आधारित एक वार्षिक रक्कम ( privy purse ) देण्याचे करार झाले होते. नंतर इंदिरा गांधी यांनी one time settlement करण्याचे ठरवले आणि वार्षिक रक्कम देणे बंद केले.

In reply to by रमेश आठवले

अगागागा ! या सगळ्याची किंमत ५५ कोटींपेक्षा नक्कीच जास्त होईल .. म्हणजे पाकिस्तानपेक्षा हे संस्थानिकच देशाला डबर्‍यात घालणारे निघाले म्हणायचे. :)

In reply to by उद्दाम

होना! एकतर स्वतः काही पराक्रम केला नाही. नुसते आपले सातारकर भांडतायत कोल्हापूरकरांशी, कोल्हापूरकर भांडतायत सातारकर आणि नागपूरकरांशी, सगळे मिळून भांडतात शिंद्यांशी, शिंदे भांडतात होळकरांशी. बिनकामाचे लेकाचे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

हो. आणि वर हेच लोक एक्मेकांना धोतरबडवी सल्ले देणार आणि देश धर्माला खड्ड्यात घालणार. गण्या (शिर्के फेम. फुटु देत डोळे, सोलु देत जीभा वाले) पेक्षा हे काय वेगळे? सगळॅ एकाच जातीचे.

तुमचा हाच लेख मायबोली वर पण प्रसिद्ध झाला आहे..... http://www.maayboli.com/node/46232

संजीव पिल्ले ला महाराष्ट्रातील गढ्यांची काळजी लागुन राहिली आहे.केरळात मग काय त्यावेळी सर्व मालमत्ता लोंकाच्या मालकीची होती काय?

In reply to by वेताळ

वर लेखात मी संपूर्ण भारतील प्रिन्सली स्टेटची यादी दिलेली आहे. हा लेख केवळ म्हाराष्ट्रातील नव्हे, भारतातील सर्व संस्थानिकांना लागू आहे.

भारतातेल संस्थानिकांनी राजवाडे , पैसा गिळंकृत करुन वर पुन्हा पेन्शन खाल्लेली आहे, हे भयाणच आहे. एकीकडे जे स्वातंत्र्यासाठी लढले त्यान्ना दीडकीभर पेन्शन आणि यान्ना मात्र वाडे, महाल, पेन्शन. भारतीय जनतेला वर्षानुवर्षे मूर्ख बनवण्याचे काम या संस्थानिकानी केले. देशभक्ती / प्रांतभक्तीच्या नावाने आम जनता यान्नी शताकानुशतके लढवली आणि त्याचा एंड प्रॉडक्ट काय? तर गोळा झालेली संपत्ती ही त्यांची खाजगी मालमत्ता ! म्हणजे 'देशप्रेम' हा त्यांचा फ्यामिली बिझनेस झाला नै का? याउलट, मुघल इंग्रजांविरुद्ध कडवेपणाने लढले आणि अखेर तुरुंगात जाऊन मेले. त्यांची संपत्तीही देशाला काही अंशी परत मिळाली. इतक्या पुण्याईवर मुघल हे प्रातःस्मरणीय ठरवायला हरकत नसावी , नै का?
ही अख्खी पोस्ट आजच्या महान राजकारण्यांना अगदी जशीच्या तशी लागू होते. :)

तुम्ही उल्लेख केलेला कुरुंदवाड चा राजवाडा आज अस्तित्वात नाही. तीनशे, साडेतीनशे वर्षांपासुन दिमाखदार पणे उभा असलेला राजवाडा ह्या वर्षी एप्रिल मे मध्ये जमीनदोस्त करण्यात आला. अवांतरः राजवाडा पाडु नये म्हणुन मध्यंतरी एका पक्षाने आंदोलन केलेले, पण खाजगी मालमत्ता असले कारणाने काही होउ शकले नाही.आता त्या जागेवर घर संकुल बनवण्याचा पटवर्धन राजे साहेबांचा मनसुबा आहे असे कळाले. -आसिफ राजवाडयाच्या सर्व भागात मुक्त संचार केलेला आणि त्याला जमिनदोस्त होताना हळवा झालेला..