नायिका भेद
मध्ययुगीन यादवकालीन मंदिरांमध्ये आपणास सुरसुंदरी आणि नायिकापट्ट आढळतात. सुरसुंदरी म्हणजे नृत्यमुद्रेतील अथवा वाद्यमुद्रेतील स्त्री प्रतिमा. ह्या एकतर विविध वाद्ये तरी वाजवत असतात किंवा नर्तन तरी करत असतात. तर नायिका म्हणजे वाद्यविरहित स्त्री प्रतिमा. ह्या बहुतांशी नृत्यमुद्रेत दिसत नाहीत. नायिका ह्या विविध शृंगारमुद्रेत किंवा काही विशिष्ट क्रिया करताना आपणास आढळतात. उदा. वेणी घालणे, भांग पाडणे, पुत्र सांभाळणे इ. तत्कालीन जनजीवनातील एकूण चालीरितीच ह्या शिल्पांद्वारे प्रकट होतात असे मला वाटते.
खजुराहोची मंदिरे ह्या नायिकापट्टांबाबत परिपूर्ण आहेत असे मी मानतो. येथे जवळपास सर्वच प्रकारच्या नायिकांची शिल्पे शिल्पकारांनी मोठ्या विलक्षण नजाकतीने कोरलेली आहेत. अर्थात खजुराहो मी अजून पाहिलेले नाही. पण पुणे, नाशिक, कोल्हापूर परिसरातील काही प्राचीन मंदिरे धुंडाळतांना विविध प्रकारच्या नायिकामूर्ती पाहण्यात आल्या त्यापैकीच काही येथे मांडत आहे. यांतील बहुतेक सर्वच मूर्ती त्रिभंग प्रकारातल्या आहेत.
१. पुत्रवल्लभा.
ह्या नायिका म्हणजे वात्सल्याच्या मूर्तीच. ह्यांचा हातात अथवा कडेवर ह्यांचा पुत्र दाखवलेला असतो व ह्या ममतेने त्याचे लाड करत असतात.
ही सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील पुत्रवल्लभा. हिने आपल्या तळहातावर पुत्राला तोलून धरले आहे.
सिन्नरच्याच गोंदेश्वर मंदिरातील ही अजून एक पुत्रवल्लभा. हीने आपल्या पुत्राला एका हातावर घेतले असून दुसरा हात आधारासाठी चौकटीवर ठेविला आहे.
ही रांजणगावजवळील पिंपरी दुमाला नावाच्या लहानशा गावातील सोमेश्वर मंदिराच्या भिंतीवर असलेली पुत्रवल्लभा. हीने दोन्ही हातांनी पुत्राला तोलून धरले असून त्याचे मस्तकाचे ती अवघ्राण करीत आहे.
२. पत्रलेखिका.
ह्या नायिका पत्र लेखन करताना दिसतात. ह्यांच्या अत्यंत सुडौल मूर्ती खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात आहेत.
खिद्रापूर कोपेश्वर मंदिरातील हे सौष्ठवपूर्ण पत्रलेखिका. नीट निरखून पाहिल्यास हीने अंगंठा आणि तर्जनी यांमध्ये लेखणी हाती धरिली आहे तीही स्पष्टपणे दिसून यावी. हिने चेहरा मात्र पत्राकडेच वळवला असल्याने आपल्याला हिचा चेहरा मात्र दिसत नाही.
खिद्रापूर कोपेश्वर मंदिरातीलच अजून ही एक पत्रलेखिका. ही मात्र आपल्याला हीचा चेहरा दाखवतेय.
कोपेश्वर मंदिरापासून अगदी जवळच असलेल्या खिद्रापूरच्या जैन मंदिरातील ही एक अजून पत्रलेखिका.
३. आलस्यसुंदरी.
ही नुकतीच झोपेतून उठलेली असल्याने दोन्ही हात डोक्यावर नेऊन आळोखेपिळोखे देऊन आलेला आळस दूर करायचा प्रयत्न करत असते.
पेडगावच्या लक्ष्मीनारायण मंदिरातील ही आलस्यसुंदरी पहा.
४. कर्पूरसुंदरी
ह्या नायिका आपला प्रचंड केशसंभार खांद्यावरून शरीराच्या पुढच्या भागावर घेऊन त्याची वेणी घालायचा प्रयत्न करीत असतात.
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील ही कर्पूरसुंदरी
खिद्रापूरच्याच जैन मंदिरातील ही अजून एक कर्पूरसुंदरी.
५. दर्पणसुंदरी अथवा दर्पणा.
मध्ययुगीन मंदिरात या नायिकांचे प्रकार बहुधा सर्वात जास्त दिसत असावेत. ह्यांच्या हातात बहिर्वक्र आरसा असतो. तत्कालिन कालखंडात काचेचे आरसे नसल्याने शिसे गुळगुळीत दगड घासून घासून गुळगुळीत केले जात आणि जास्तीत जास्त दृश्य दिसावे म्हणून हे आरसे बहिर्वक्र केले जात. ह्या नायिका आरशात बघून त्या भांग पाडणे, शृंगार करणे, कुंकूम रेखाटणे इत्यादी क्रिया करीत असतात.
पिंपरी दुमाला येथील सोमेश्वर मंदिरातील ही दर्पण सुंदरी
आरशात बघून आपल्या डोईवरचे केस ही नीट निरखून सजविते आहे.
सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील ही एक दर्पणा.
गोंदेश्वरातीलच अजून ही एक दर्पणा.
खिद्रापूरच्या जैन मंदिरातील ही अजून एक दर्पणसुंदरी.
भुलेश्वरातील ही एक दर्पणा
हे शिल्प माझ्या सर्वाधिक आवडीचे. किती निगुतीने ही आपले सौंदर्यप्रसाधन करीत आहे. हे ही शिल्प भुलेश्वर मंदिरातलेच.
६.
ह्या प्रकाराला नक्की काय म्हणतात ते मला माहित नाही. पण ही शिल्पे फार मजेशीर आहेत. आपला साजशृंगार आटोपून आपल्या प्रियकराची वाट बघणार्या अथवा त्याच्या भेटीसाठी निघालेल्या ह्या सुंदरी. ह्या नखशिखांत आवरून तयार असतानाच एखादे चावट मर्कट ह्यांचे वस्त्र अलगद वर उचलून अथवा ओढून ह्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करते आणि ह्या नायिका पणे सलज्जतेने त्यांना चापट मारतांना आढळतात. मनुष्याचा चावटपणाच ह्या मर्कटांच्या रूपाने येथे चित्रित केलाय की काय न कळे.
पिंपरी दुमाला येथील ही नायिका. एक मर्कट तिला त्रास देत असून ती एका हाताने माकडाला दूर करण्याचा प्रयत्न करीत असून दुसरा हात चापट देण्याच्या आविर्भावात तिने वर उचलला आहे.
ही खिद्रापूर कोपेश्वर मंदिरातील अत्यंत देखणी सुंदरी मर्कटला कसे हाकलीत आहे पहा.
ही खिद्रापूरच्या जैन मंदिरातील दोन नायिका. दोहींचेही वस्त्र मर्कटाने उचलले असून सुंदरी चपेटदान आविर्भावात आहेत.
--
ही सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील सुंदरी. हिला दोन्ही बाजूंनी दोन मर्कटे छळत आहेत.
७.
हा अजून एक वेगळा प्रकार.
हा स्त्रीचे सामर्थ्य दाखवणारा. हीने आपल्या एका हातात मुंगूस तर दुसर्या हातात साप धरीला असून त्या दोघांनाही ही झुंजवत आहे. जणू माझी तुमच्यावर पूर्ण हुकूमत आहे असेच ती दर्शवीत आहे.
खिद्रापूरच्या जैन मंदिरातील ही तशा प्रकारची प्रतिमा.
८.
हा सुद्धा एक वेगळाच प्रकार.
ह्या नायिकेच्या पायात रूतलेला काटा हीची बुटकी सखी दूर करीत आहे किंवा हीचे पैंजण ती नीट बांधत आहे.
पेडगावच्या मंदिरातील हे शिल्प
सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील अशाच प्रकारची ही एक नायिका.
९. शुकसारिका.
हा शिल्पाचा प्रकार अतिशय दुर्मिळ. हा मला फक्त पेडगावच्या मंदिरात बघायला मिळाला. भुलेश्वर मंदिरात शुकसारिका नक्कीच असावी मात्र तिकडील शिल्पे मूर्तीभंजकांच्या तडाख्यात सापडून प्रचंड प्रमाणात भग्न झालेली असल्याने ओळखू येत नाहीत.
ह्या प्रकारच्या शिल्पात नायिकेने एका हातात आंबे असलेली डहाळी पकडली असते तर दुसर्या हातात पोपट असतो.
पेडगावच्या मंदिरातील ही शुकसारिका बघा.
हीने आपल्या डाव्या हातात आंब्याची डहाळी पकडलेली असून उजव्या हातात पोपट आहे. तो पोपट तिच्या भरीव उरोजालाच आंबे समजून त्यांना आपल्या चोचीने स्पर्श करू पाहात आहे. अर्थात मूर्तीभंजकांच्या हल्ल्यांमुळे हीचा उजवा हात त्यावरील शुकासह भग्न झालेला असून आपल्याला केवळ तिच्या हातातील आंब्याच्या डहाळीमुळे व उजव्या हाताच्या स्थितीवरून ही शुकसारिका असल्याची कल्पना येते.
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील ही शुकसारिका
१०. विषकन्या.
तत्कालीन कालखंडात शत्रूला संपवण्यासाठी विषकन्यांचा सर्रास वापर होईल. शत्रूला आपल्या सौंदर्याने भुलवून विषप्रयोगाद्वारे ह्या त्याचा मृत्यू घडवून आणत.
शिल्पांमधले ह्यांचे चित्रण सहजी ओळखता येते. अतिशय सुंदर, सुडौल, पूर्णतया नग्न, मस्तकी अथवा गुढघ्यावर सर्पांचा वेढा ही यांची प्रमुख लक्षणे. काही वेळा ह्यांच्या पायांत पादत्राणे सुद्धा आढळून येतात.
पिंपरी दुमाला मधील ही विषकन्या. हिने आपल्या मस्तकी काहीतरी धरीले असून पायांत सर्पांचा वेढा आहे.
भुलेश्वर मंदिराच्या बाह्यभिंतीवरील ही विषकन्या पाहा. हीने आपल्या मस्तकी सर्प धारण केला आहे.
सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील ही विषकन्या. हीने आपल्या खांद्यावरून सर्प धारण केला असून ही आपले विभ्रम दाखवीत आहे. हिच्या पायांकडे पहा. चक्क चपला/ सॅन्डल्स दिसत आहेत.
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातल्या बाह्य भिंतीवरची ही अत्यंत सौष्ठवपूर्ण विषकन्यका. हीने आपल्या कमरेवरून सर्प गुंडाळलेला असून ती आपले नानाविध विभ्रम दाखवीत आहे. हिने सुद्धा पादत्राणे परिधान केलेली आहेत.
२. पत्रलेखिका.
ह्या नायिका पत्र लेखन करताना दिसतात. ह्यांच्या अत्यंत सुडौल मूर्ती खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात आहेत.
खिद्रापूर कोपेश्वर मंदिरातील हे सौष्ठवपूर्ण पत्रलेखिका. नीट निरखून पाहिल्यास हीने अंगंठा आणि तर्जनी यांमध्ये लेखणी हाती धरिली आहे तीही स्पष्टपणे दिसून यावी. हिने चेहरा मात्र पत्राकडेच वळवला असल्याने आपल्याला हिचा चेहरा मात्र दिसत नाही.
सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील ही एक दर्पणा.
ही खिद्रापूर कोपेश्वर मंदिरातील अत्यंत देखणी सुंदरी मर्कटला कसे हाकलीत आहे पहा.
भुलेश्वर मंदिराच्या बाह्यभिंतीवरील ही विषकन्या पाहा. हीने आपल्या मस्तकी सर्प धारण केला आहे.
वाचने
35457
वाचनखूण
प्रतिक्रिया
129
अतिशय अभ्यासपूर्ण नि संयमित
In reply to अतिशय अभ्यासपूर्ण नि संयमित by प्यारे१
>>> अतिशय अभ्यासपूर्ण नि
In reply to अतिशय अभ्यासपूर्ण नि संयमित by प्यारे१
मी पण लाईन तोडणार
मस्त रे..
In reply to मस्त रे.. by मोदक
+१
सुंदर. खूपच छान.
In reply to सुंदर. खूपच छान. by विजुभाऊ
+१
मस्त ओळख... कशा ओळखायच्या
In reply to मस्त ओळख... कशा ओळखायच्या by पिशी अबोली
तुमचे लेख अभ्यासपूर्ण असतात.
In reply to तुमचे लेख अभ्यासपूर्ण असतात. by त्रिवेणी
पिशी अबोलीचे लेख का?
भेदक नायिका (चित्र) पट!
सुंदर
व्वा . . .
साला...
बहुमोल माहिती !
In reply to बहुमोल माहिती ! by मदनबाण
प्रत्यक्ष आणि मूर्ती
In reply to बहुमोल माहिती ! by मदनबाण
ही सो कु (ज्यु) आहे ना?
ल य
नायिका
In reply to नायिका by चित्रगुप्त
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by प्रचेतस
त्रिभंग
In reply to त्रिभंग by चित्रगुप्त
मी दिलेल्या चित्रातील शेवटची
In reply to त्रिभंग by चित्रगुप्त
चित्रे
फारच सुंदर धागा. लेणी किंवा
In reply to फारच सुंदर धागा. लेणी किंवा by डॉ सुहास म्हात्रे
खरेच!
वा!
In reply to वा! by पैसा
धन्यवाद.
सुंदर विवेचन, अभ्यासपूर्ण लेख
अबब, किती या नायिका....
In reply to अबब, किती या नायिका.... by चित्रगुप्त
अबबबबब. किती हे प्रकार.
In reply to अबबबबब. किती हे प्रकार. by प्रचेतस
हे सर्व प्रकार खजुराहोत
In reply to हे सर्व प्रकार खजुराहोत by चित्रगुप्त
गूगल शोध घेतला असता येथे
In reply to अबब, किती या नायिका.... by चित्रगुप्त
जवळपास सर्वच नावांचा
In reply to जवळपास सर्वच नावांचा by बॅटमॅन
तुला समजेल रे सगळं.
In reply to तुला समजेल रे सगळं. by प्यारे१
सगळ्याचे अर्थ दे की जरा
लैच जब्री लेख-टिपिकल वल्ली
In reply to लैच जब्री लेख-टिपिकल वल्ली by बॅटमॅन
हं
In reply to हं by पैसा
तरी ती नवोढा का काय म्हणतात
In reply to तरी ती नवोढा का काय म्हणतात by बॅटमॅन
थिअर्या बास
In reply to थिअर्या बास by पैसा
आम्ही पाहतो काय ते. चिंता
In reply to थिअर्या बास by पैसा
पैसातै, खिक्क्क! ___/\___
In reply to थिअर्या बास by पैसा
मार्जारबै पंजात लेखणी धरून
In reply to मार्जारबै पंजात लेखणी धरून by प्रचेतस
हाहाहा!
In reply to मार्जारबै पंजात लेखणी धरून by प्रचेतस
अय हय........काय शीन बे तो.
In reply to अय हय........काय शीन बे तो. by बॅटमॅन
पंखांची फडफड ऐकू यायला लागली
In reply to पंखांची फडफड ऐकू यायला लागली by प्रचेतस
तूर्तास
In reply to तूर्तास by पैसा
धन्यवाद. पण आम्हाला ही जास्त
In reply to धन्यवाद. पण आम्हाला ही जास्त by बॅटमॅन
भक्त भाविकांना सूचना...
In reply to भक्त भाविकांना सूचना... by प्यारे१
शिल्प-नायिकेचे भाव पाहून
In reply to भक्त भाविकांना सूचना... by प्यारे१
कृपया सल्ले आवरा आणि अंमळ मजा
In reply to धन्यवाद. पण आम्हाला ही जास्त by बॅटमॅन
भक्त भाविकांना सूचना...
In reply to भक्त भाविकांना सूचना... by प्यारे१
प्यारे काका, जुन्या
In reply to प्यारे काका, जुन्या by बॅटमॅन
अरे वो क्या हय ना, की वो
In reply to अरे वो क्या हय ना, की वो by प्यारे१
णम्र इणंती
In reply to णम्र इणंती by पैसा
नायिका कुठल्या?
In reply to णम्र इणंती by पैसा
सहमत
In reply to सहमत by बॅटमॅन
या बघा
In reply to हं by पैसा
मिपावरचा अमिट खजिना !!!!
सार्या शिल्पा छान आहेत.
वल्ली, सुरेख धागा. फार छान
नायिका कश्याला म्हणायचे?
In reply to नायिका कश्याला म्हणायचे? by चित्रगुप्त
नायिका म्हणजे शब्दशः हिरोईन.
In reply to नायिका म्हणजे शब्दशः हिरोईन. by प्रचेतस
>>>जी आपले विभ्रम आपल्या
वल्ली ,
भारी !
भारी..
खजुराहोची चित्रे..
सुंदर लेख वल्ली
In reply to सुंदर लेख वल्ली by एस
धन्यवाद स्वॅप्स.
In reply to सुंदर लेख वल्ली by एस
भारतीय आणि पाश्चात्त्य चित्रकलेतील भेद
In reply to भारतीय आणि पाश्चात्त्य चित्रकलेतील भेद by चित्रगुप्त
धन्यवाद
In reply to भारतीय आणि पाश्चात्त्य चित्रकलेतील भेद by चित्रगुप्त
लेखाची वाट पाहत आहे. बरेच
In reply to भारतीय आणि पाश्चात्त्य चित्रकलेतील भेद by चित्रगुप्त
येउद्या लेख लवकर ! जरा जमलं
In reply to भारतीय आणि पाश्चात्त्य चित्रकलेतील भेद by चित्रगुप्त
येउद्या लेख लवकर ! जरा जमलं
In reply to भारतीय आणि पाश्चात्त्य चित्रकलेतील भेद by चित्रगुप्त
येउद्या लेख लवकर ! जरा जमलं
In reply to येउद्या लेख लवकर ! जरा जमलं by डॉ सुहास म्हात्रे
>>>आम्ही एक
In reply to >>>आम्ही एक by प्यारे१
हे कसं झालं? मी तर एकदाच
In reply to हे कसं झालं? मी तर एकदाच by डॉ सुहास म्हात्रे
अहो धाग्याचीच इच्छा दिसतेय
In reply to अहो धाग्याचीच इच्छा दिसतेय by प्रचेतस
तसे असेल तर मग घ्या हा अजून
In reply to तसे असेल तर मग घ्या हा अजून by डॉ सुहास म्हात्रे
शतकाला हात भार!
In reply to येउद्या लेख लवकर ! जरा जमलं by डॉ सुहास म्हात्रे
करा रंगांची फेक, येऊद्या लौकर
In reply to सुंदर लेख वल्ली by एस
माझ्या मते..
In reply to माझ्या मते.. by चौकटराजा
मुळात एकाद्या संस्कृतीत
In reply to मुळात एकाद्या संस्कृतीत by चित्रगुप्त
होय ..
In reply to होय .. by चौकटराजा
चौरा,
नायिका भेद तर झाला, आता पुढे
मस्त लेख आहे !!!
In reply to मस्त लेख आहे !!! by धन्या
एक खिद्रापूर सोडले तर नायिका
In reply to मस्त लेख आहे !!! by धन्या
मस्त लेख आहे !!!
In reply to मस्त लेख आहे !!! by धन्या
असेच म्हणतो