दिवाळीचे विष्णूपूजन !
आली दिवाळी ! आपण नेहेमीप्रमाणेच लक्ष्मीपूजन करणार. तसेही आपण एरवी लक्ष्मीचीच पूजा-अर्चना करत असतोच. लहानपणापासून ह्या ना त्या स्वरूपात आपलं लक्ष्मीपूजन सुरूच असतं. बालपणी आपण परीक्षेतल्या मार्क्सरूपी लक्ष्मीच्या मागे धावतो. मग चांगल्या कॉलेजच्या, मग नोकरी, प्रमोशन, चांगला जोडीदार, चारचाकी गाडी, ३ बीएचके फ्लॅट, मुलांसाठी प्रतिष्ठित शाळा, सेकंड होम... ही यादी न संपणारीच असते.
पण म्हणतात ना... लक्ष्मी चंचल असते. तिच्या मागे लागणार्याच्या हातात ती कधीच सापडत नाही. मग लक्ष्मी असते कुठे? लक्ष्मी असते भगवान विष्णूच्या चरणांशी. असं काय आहे विष्णूमध्ये की ज्यामुळे लक्ष्मी त्याचे पाय चेपते?
विष्णू जगाचा आणि जगातला सर्वश्रेष्ठ "मॅनेजर"! कधी गरूडावर बसून (far-sight) जग बघणारा तर कधी शेषावर निजून ground realities चा अंदाज घेणारा. विष्णूच्या एका हातात पांचजन्य शंख आहे (marketing / being heard), एका हातात सुदर्शनचक्र (remote control / reach), कौमुदकी गदा विष्णूची ताकद दर्शवते आणि शिक्षा करण्याचा अधिकारही (power / control). आणि विष्णूच्या एका हातात पद्म आहे (reward). आणि म्हणूनच विष्णू आपल्या (म्हणजे त्याच्या आणि जगाच्याही) आयुष्याच्या पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहे.
मग जर आपण विष्णूसारखं बनण्याचा प्रयत्न केला तर लक्ष्मी का नाही आपले पाय चेपणार?
बाबा रणछोडदास उगाच नाही सांगून गेले...."काबिलियतका (विष्णू) पीछा करो.. कामयाबी (लक्ष्मी) दौडते चली आयेगी |"
शुभ दीपावली ! :)
(प्रेरणा - देवदत्त पटनाईक)
प्रतिक्रिया
मजेशीर!
पै तै ... +१ ...
बुद्धीने सर्वही होते,
'हरि'च एक तारणहार!
(प्रेरणा - देवदत्त पटनाईक)
छापखाना टाईप
खरयं..
लेख आवडला
छान
छान लिहिलय.
आवडलं !!
कुल!
एक वेगळाच दृष्टीकोण!
सुन्दर
छान लेख!!!