
साहित्य- ५ मध्यम आकाराचे बटाटे, १ वाटी मक्याचे दाणे-अमेरिकन पिवळे मके असतील तर उत्तमच, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, साधारण २ पेराएवढा आल्याचा तुकडा,४ ते ५ लसूण पाकळ्या,४ ते ५ ब्रेड स्लाईस,मीठ, तेल, ४ते ५ चमचे रवा
कृती- बटाटे उकडून घ्या. मके जर कॅन्ड नसतील तर तेही बटाट्यांबरोबर उकडा.कॅन्ड मके उकडण्याची गरज नाही.चाळणीवर टाकून मक्यातले पाणी काढून टाका.कॅन्ड मके असतील तरी चाळणीवर टाकून नळाखाली धरा म्हणजे प्रिझर्वेटिवचा वास जाईल.बटाटेही चाळणीवर टाकून कोरडे होऊ द्या. साले काढून कुस्करा. वाटीने किवा पावभाजीच्या चेपणीने चेपून घ्या. नसल्यास किसून घ्या.
पावाचे स्लाइस पाण्यातून काढा व पिळून घ्या. हा गोळा किसलेल्या बटाट्यांत मिसळा.मके मिसळा.
आले,लसूण ,मिरची वाटून त्याची पेस्ट करा व ही पेस्ट वरील गोळ्यात मिसळा. मीठ चवीनुसार घाला. हे मिश्रण मळून सगळीकडे तिखट मीठ लागेल असे पहा.
एका ताटलीत रवा घ्या.गोल, लांबट हव्या त्या आकाराचे कटलेट वळा व हे कटलेट रव्यात घोळवा आणि पॅनमध्ये मध्यम आचेवर शॅलोफ्राय करा.
गरम गरम कटलेट टोमॅटो सॉस किवा स्प्रिंगरोलबरोबरच्या आंबटगोड चिली सॉस बरोबर खा किवा जोडीला भेळेची चिंचगूळ खजुराची चटणी असेल तर क्या केहेने!!
टीप- १. ह्या साहित्यात साधारण २० कटलेट्स होतात.
२. कॉर्नऐवजी किवा कॉर्न+ मटार घालूनही हे कटलेट्स छान लागतात.कॉर्न आणि मटार घ्यायचे असतील तर दोन्ही प्रकार अर्धी अर्धी वाटी घ्या.
३. (गणामास्तर व त्यांच्या सारख्या अनेकांसाठी) बटाटे उकडलेले असतील आणि कॅन्ड मके असतील तर हे कटलेट्स ३५ ते ४० मिनिटात होतात.
झक्कास!
छान आहे..
वा..मस्त
केले.. मस्त झाले होते..
In reply to वा..मस्त by लिखाळ
धन्यवाद
In reply to केले.. मस्त झाले होते.. by लिखाळ
वा वा
In reply to धन्यवाद by विसोबा खेचर
वा वा
In reply to केले.. मस्त झाले होते.. by लिखाळ
हा हा हा
In reply to वा वा by केशवसुमार
मस्त पाकृ!
स्वातीताई,
खाद्य
वा!!
स्वाती, पाक
स्वागत!!
In reply to स्वाती, पाक by विसोबा खेचर
अय भा$$$$$$$$$$$री..
आजच केले होते रात्री..
In reply to अय भा$$$$$$$$$$$री.. by प्राजु
मस्त
मस्त!
टेस्टी...
अवांतर,
अरे वा...
क्या बात है!!!!
अरे वा कटलेट!
मस्तच आहे
कालच केले!
खवय्यांनो..
स्वाती ताई