संपादकीय
नमस्कार मंडळी,
मिसळपाव संस्थळाकडून हा सलग दुसर्या वर्षीचा 'दिवाळी अंक' सादर करताना मनात अभिमान अन आनंद याशिवाय कोणत्याच भावनेला थारा नाहीये. हे संपादकीय जरी मी लिहीत असले, तरी या अंकावर आपल्या सर्वांचा हक्क आहे. कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस जागून, खपून, ठरवून केलेल्या कार्यक्रमाची गोडी या दिवाळी अंकालाही आहे. संपादक मंडळाने दिवाळी अंकाची जाहिरात केल्या दिवसापासून ते अगदी आजपर्यंत भरघोस लेखनाचा आशीर्वाद आम्हाला तुम्हा सदस्यांकडून लाभला, आणि या आशीर्वादाबद्दल, तुम्ही दाखवलेल्या या आत्मीयतेने आम्ही सर्वच जण अतिशय भारावून गेलो आहोत.
अन का नाही असणार आत्मीयता आपल्या सर्वांना? मिपा आहेच तसं! आपल्यातुपल्यातलं! जणू समोर बसून गप्पा हाणाव्या, अशा धारणेचं! आपल्या आयुष्यात रेडिओ, टी.व्ही. ही प्रसारमाध्यमं यायच्या आधी गप्पांमधूनच तर आपण आपल्याकडच्या माहितीची देवाणघेवाण करत होतो. आज मिपाकडे पाहिल्यावर एक वर्तुळ पूर्ण झाल्याची भावना दाटते. कारण पुन्हा फिरून आपण टी.व्ही.वरच्या पात्रांऐवजी खर्या खुर्या माणसांकडे आकर्षित होतो आहोत. मराठी संस्थळांना याचं जेवढं श्रेय जातं, तेवढंच मिसळपावच्या खेळकर धोरणालासुद्धा जातं. हलक्याफुलक्या गप्पांबरोबर येथे चर्चांचे फडही रंगतात. सुरेख सुंदर काव्याबरोबर विडंबनाची रांग लागते. पाककृतीच्या रसग्रहणात “आम्ही असंही करतो” असं अगदी बिनधास्त सांगितलं जातं. कथा मनापासून आवडली म्हणून सांगताना त्यात जरा भर घालायला पक्का मिपाकर कधीच नाही विसरायचा. एक अनौपचारिक सूर आहे मिपाला अन त्या सुराला धरूनच मी आज हे संपादकीय सादर करायचा प्रयत्न करते आहे.
तर, संपादक मंडळाने दिवाळी अंकाचा धागा काढल्यावर पैसाताईने मला “दिवाळी अंकाच्या संपादनाचं काम करशील का?” अशी विचारणा केली. नुकताच 'श्री गणेश लेखमालेला' अगदी भरघोस प्रतिसाद पाहून मलाही वाटलं, करू या! त्यात काय एवढं?
तर मंडळी, त्या ‘त्यात काय एवढं’चा नूर उतरला तो मागल्या वर्षीच्या यशस्वी दिवाळी अंकाचे संपादक गवि यांचे प्रतिसाद वाचल्यावर. आता गविंबद्दल मी तुम्हाला काय सांगावं? त्यांची लेखनप्रतिभा तर आपण जाणतोच! त्याही पलीकडे जाऊन गवि अनुभवविश्वाचा एक महासागर आहेत. अन ते अनुभव कसे आणि कोणत्या वेळी वाटायचे, याचं त्यांचं तंत्रही तितकंच वेगळं. बहुतेक वेळा एखादी कार्यशाळा अटेंड केल्यावर आपल्याकडे फीडबॅक मागितला जातो, जेणेकरून पुढील कार्यशाळेला हा फीडबॅक उपयोगी पडावा. पण आमची 'ही' कार्यशाळा वर्षांनंतर येणारी. मग जर गविंनी त्या वेळचा फीडबॅक तेव्हा दिला असता, तर आज तो विस्मरणात गेला असता. दिवाळी अंकाच्या सल्लामसलतीच्या धाग्यावर, गविंनी जवळजवळ चार मेगाबायटी प्रतिसाद टाकले. येणार्याय अडचणींचं त्या प्रत्येक प्रतिसादात पुरेपूर वर्णन होतं. नुसत्या अडचणींचं वर्णन करून थांबले तर ते गवि कसले? त्यावरचे उपाय अन काही अनुभवातून आलेलं शहाणपण त्यांनी अगदी खुल्या दिलाने आमच्याबरोबर शेअर केलं. काही नवीन उपाय सुचवले अन नीलकांतने त्याप्रमाणे ताबडतोब पावलं उचलून मदतीचा हात पुढे केला. आता यात माझा सहभाग किती?
लिखाणाचं काम तर तुम्ही लोकांनी अगदी भरभरून केलंच, पण मग प्रश्न आला तो मुद्रितशोधनाचा. याही वेळी गविंनी सुधांशु नूलकरांचा कॉन्टॅक्ट देऊन हेही काम सुलभ केलं. आता सुधांशु नूलकरांबद्दल सांगावं तेवढं थोडंच. अगदी पाठवलेला प्रत्येक लेख त्यांनी साफसूफ करून दिवाळी अंकासाठी मोलाची मदत केली. गवि अन सुधांशुजी यांनी अगदी वेळेवर बहुमोल मदत केल्याने आज हा दिवाळी अंक आपल्यापुढे सादर होतो आहे.
दिवाळी अंक हा मिपाचा आरसा असावा, असा संपादक मंडळाचा काहीसा दृष्टिकोन असल्याने, या वर्षीच्या दिवाळी अंकात ललित कथांबरोबरच मिपाचा ‘हॉट अॅ न्ड स्पायसी’ विभाग घेऊन येत आहे काही सुरेख पाककृती. त्यांचा आस्वाद घेत घेत तुम्ही कविमंडळाच्या काही कविता पाहाल. आरोग्य हाही एक आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असल्याने आपल्यासाठी दंतकथा घेऊन येताहेत डॉ. अजया. स्वतः सुरांच्या लहरींवर हिंदोळे घेता घेता आपणालाही त्यात ओढू पाहताहेत आपले चौरा, अन तुम्हाला चवदार पाककृती घेऊन येणारे पेठकरकाका या वेळी आपल्याला त्यांच्याबरोबर मस्कतची सफर घडवताहेत. टेक्नॉलॉजी, अध्यात्म, इतिहास, पुराणकथा अशा सर्व रसांनी भरपूर असा हा दिवाळी अंक तुमच्या हातात देताना मला अगदी कृतकृत्य वाटतंय. पण त्याहीपेक्षा मला आज या प्रसंगी मनापासून आभार मानायचे आहेत आपल्या संपादक मंडळाचे! पैसाताईचा खंबीर आधार, रेवतीताईंची अन यशोधराची मदत करण्याची तयारी, वल्ली, गणपा यांनी टेक्निकल गोष्टींसाठी वेळोवेळी पुढे केलेला मदतीचा हात. किसनदेवांचे सल्ले, लिमाउजेट अन बिरुटे सरांचे उत्साहवर्धक शब्द! अन आपल्या कलाकार अभ्या...ची हातसफाई॓, ज्यामुळे हा अंक आज इतका सुंदर दिसतो आहे. पीडीएफ अंकाच्या मुखपृष्ठासाठी अत्रुप्त आत्मा यांची फुलांची रांगोळी आपल्याला बघायला मिळेल. श्री. नीलकांत आणि श्री. प्रशांत यांनी त्यांच्या अतिशय बिझी शेड्यूलमधून वेळ काढून अगदी मोलाची मदत केली अन आज हा अंक आपल्या सर्वांपर्यंत पोहोचतो आहे.
मंडळी, दिवाळी अंकाच्या आकाराला एक मर्यादा आहे, अन हेच कारण आहे की आपण पाठवलेल्या लिखाणातील काही लिखाण आम्ही या अंकात प्रकाशित नाही करू शकलो. अर्थात जे लिखाण दिवाळी अंकात प्रकाशित नाही होऊ शकलं, त्याचा आस्वाद मिपावर आपण घेणार आहोतच.
शेवटी मला आज असा प्रश्न पडलाय की मी खरंच काही योगदान दिलं का या कार्यात? वेळोवेळी हाका मारणं एवढं एकच काम मी जोराशोरात केलं! पण हाकासुद्धा तेव्हाच मारल्या जातात, जेव्हा तुमच्या हाकेला उत्तर देणारं कोणी असतं. अन येथे अगदी 'घेशी किती दो कराने...'सारखी अवस्था झाली माझी तुम्हा सर्वांच्या सहभागाने अन मदतीने! तरीही मायबाप वाचकहो, जर या अजाण अपर्णाकडून या अंकात एखादी चूक राहिली असेल, तर मला माफ करा. जे काही उणं असेल, त्याची जबाबदारी माझी असेल अनं आहे.
तर मंडळी, सर्व मिपा परिवाराला दिपावलीच्या शुभेच्छा! शुभ दिपावली अन येणारे नववर्ष तुम्हा सर्वांना सुखसमृद्धीदायक अन भरभराटीचे जावो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी हे माझे संपादकीयचे दोन शब्द आवरते घेते.
धन्यवाद.
__/\__
अपर्णा
दिवाळी अंक वर्ष
वाचने
45527
वाचनखूण
प्रतिक्रिया
55
धन्यवाद!
छान
In reply to छान by ऋषिकेश
+१
उत्तम संपादकीय!
In reply to उत्तम संपादकीय! by अत्रुप्त आत्मा
+१
In reply to +१ by मिसळलेला काव्यप्रेमी
+२
हृद्य उपक्रम.
सुरेख संपाद्कीय!
छान !
सुरेख संपादकीय अपर्णाताई,
धन्यवाद
मिपाच्या दिवाळी अंकासाठी
एक मोठ्ठी जबाबदारी
किस मिट्टी के बने हो आप सब ?
अभिनंदन अपर्णा ताई आणि समस्त
उत्तम
दीपावलीच्या शुभेच्छा!
सुरेख संपादकीय.
In reply to सुरेख संपादकीय. by प्रचेतस
+१
You did it!!
सुंदर अंक!
मोठी जबाबदारी पार पाडलीस, आणि
धन्यवाद...
अभिनंदन.
आपातै, संपादक मंडळ, सल्लागार,
छान लिहिलयस अपर्णा! अगदी मस्त
In reply to छान लिहिलयस अपर्णा! अगदी मस्त by रेवती
धन्यवाद रेवतीताई.
अपर्णातै सुरेख संपादकीय!
In reply to अपर्णातै सुरेख संपादकीय! by चतुरंग
इतक्या थोडक्यात संपवू नका....
दिवाळी अंकाचं मनःपूर्वक
उत्तम
मस्त!
बाकी या निमित्ताने, मिपा मालक, संपादक, सल्लागार आणि सगळ्यात महत्वाच्या - समस्त मिपापरीवारास, दिवाळी निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा!
संपादकीय आवडलं
मस्तच... आता अंक वाचायला घेतो
सही रे सही...!!!
In reply to सही रे सही...!!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
अतिशय सुंदर आणि ग्रेट काम!
मुखपृष्ठ पाहूनच छान वाटले!
दिवाळी अंक
अभिनंदन, कौतुक आणि आभार
शुभ दीपावली
दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावरची
वॉव
सर्व संबंधितांचे मनापासून
संपादन कार्याबद्दल हार्दिक ....
धन्यवाद
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक
उत्तम दिवाळी अंकाबद्दल धन्यवाद!
मुखपृष्ठ
अंक सुंदर झाला आहे; अगदी भरल्या फराळाच्या ताटासारखा