Skip to main content

राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे असे तुम्हाला वाटते का?

लेखक राम दादा
Published on सोमवार, 22/09/2008

वाचन संख्या 5263
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर "मी मराठी" ची लढाई चालू रहाण्यापेक्षा खुर्चीची लढाई चालू होईल आणि मराठी माणूस पुन्हा एकदा नको तिथे हाणामारी करत बसेल.

In reply to by अनिरुध्द

"मराठी माणूस पुन्हा एकदा नको तिथे हाणामारी करत बसेल' हे वाक्य आक्षेपार्य आहे.... उलट महाराष्ट्राच्या "राज"कारणा नविन विखारी चढेल. बदल हि कालाची गरज आहे!!! ५७ वर्षे हुकुमशाहासारखे राज्य केले. नविन रक्ताला वाव हवाच..... बदल झल्यावरच सगळे कळेलच....

राम राम राम दादा, इतरांचा कौल मागण्यापूर्वी तुम्ही तुमचे मत सांगितले असतेत तर बरे झाले असते. असो, सध्या राज ठाकरे हे मराठीसाठी दबावगट म्हणून काम करीत आहेत. लक्षात ठेवा, निकोप लोकशाहीसाठी असे दबाव गट असणे अत्यंत गरजेचे असते. आणि राज यांचे काम बर्‍याच अंशी चांगले चालले आहे, असे माझे मत आहे. परंतु, सरकार चालवणे हा एक वेगळाच बॉल गेम आहे. मनसेच्या स्थपनेच्या वेळी राज यांनी आपल्याकडे महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा ब्लू प्रिन्ट आहे, असे जाहीर केले होते. तो ब्लू प्रिन्ट एकदा जाहीर होउदे, मग त्यावर विचार करता येईल. सध्या सांगू शकत नाही हे मत दिले आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

I personally appreciate Raj Thakare's initiative for "Marathi Manus" and i am his BIG FAN however problem is different when you come into power. Everytime speech will not resolve or provide solution of basic problem, so Raj still need to spend lot of time in politics.

In reply to by नाम्या झंगाट

काय कल्ला नाय तुमी काय लिवला त्यो, आवंदा पावूस किती पडंल ते लिवला का तुमी? अवांतर: पण तुम्ही मराठी नाही दिसत! राजसाहेबांना कळलं तर येतील हो त्यांची माणसं काठ्या घेऊन .....

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अगं यमे ... त्याचं नाव पाहिलं का ? उद्धवराज .... उद्धब्+राज =)) =)) =)) काय काँबिनेशन आहे -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

In reply to by टारझन

आता पुर्ण नाव देतो. उद्धवराज छगन टेमकर मूळ - अहमदनगर. सध्या वास्तव्य - हाँग काँग

In reply to by नाम्या झंगाट

काय बे ? मी फुल नाव कुठे विचारलं ? फक्त तो योगायोग दाखवला !! खालील माहीती हायलाइट करून वाचा ----------------------------------------------------------------------------- नाव : टारझन मुळ : पुणे सध्या वास्तव्य : अफ्रिकन जंगल अजुन (आघाउ) माहिती : ६.२",१६"(दंड)-४४"(छाती),९६किलो चा म्हराटी सांड ------------------------------------------------------------------------------ अवस्थी अस्थी-दंत विमा एजंसी प्रो.प्रा. टारझन ऊर्फ खवीस . ऑन द स्पॉट विमे काढून देतो, कागदपत्रांची आवश्यकता नाही, शाखा : केनिया, युगांडा, इथोपिया,टांझानिया, रवांडा,घाना,नायजेरिया,बुरूंडी,मालावी,मादागास्कर. आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

In reply to by नाम्या झंगाट

हाँग काँगी है का भाऊ तू? नंबर दे रे लवकर.... महाराष्ट्र मंडळात कधी भेट नाही झाली. नंबर दे रे लवकर, तूला फोन करतो. - (कपाशी वरील बोंड अळीचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल याचा विचार करणारा) शिवा जमदाडे भोकरवाडी (बुद्रुक)

In reply to by नाम्या झंगाट

personally appreciate Raj Thakare's initiative for "Marathi Manus" and i am his BIG FAN however problem is different when you come into power. Everytime speech will not resolve or provide solution of basic problem, so Raj still need to spend lot of time in politics. ह्ये म्हराटीत लिवता येत नव्हटे का? तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर जाडी कमी झाल्याची तारीफ करू नका, हे मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरलात

In reply to by विजुभाऊ

विजुभाऊ , आज मिपावर पहिला दिवस आहे, माफि असावि. आता २४/७...., मराठी, मराठी, मराठी आणि फक्त मराठी.

हे बदल आवश्यक वाटतात.चालेल राज मुख्यमंत्री..........जर विलास चालतो तर मराठी माणसा साठी लढणारा राजसाहेब का नको चालेल की राव ! आज मराठी ला विरोध करण्यारची मानासकिता फॅशन बनत चालली आहे. काही मराठी माणसे त्याला अधिक जबाबदार आहेत........ मुंबई-पुणे चा विकास हा मराठी माणसा साठी मारक च ठरला आहे.

आजून पर्यंट कोणत्याहि सरकारने फारसे दिवे लावलेले नाहित. तेव्हा याला चान्स द्यायला काय हरकत आहे? होय ला मत दिले आहे

विलासात रहात नारायणाचे नाम गात रहाणारांपेक्षा तरुणांसाठी काहितरी नवे करणारांना वाव मिळालाच पाहिजे. राज ठाकरेंकडे नवनिर्माणाचे कौशल्य आहे त्याना संधी मिळाली तर नवा महाराष्ट्र ते घडवु शकतात तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर जाडी कमी झाल्याची तारीफ करू नका, हे मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरलात

In reply to by विजुभाऊ

राज ठाकरेंकडे नवनिर्माणाचे कौशल्य आहे त्याना संधी मिळाली तर नवा महाराष्ट्र ते घडवु शकतात सहमत आहे होय या पर्यायाला मत दिले आहे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मी सुद्धा होय ला मत दिलेय !! कारण मुळात राज मध्ये गट्स आहेत अस च वाटतये , एक्दा सन्धी मिळाली तर प्रूव्ह सुद्धा होइल !! बाकी राजकारण हा आपला नावडता विषय !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

श्री. राम दादा, आधी आपले विचार जाणून घ्यायला आवडेल. मग देऊ प्रतिक्रिया. हे असे पोलीस स्ठेशनात जबानी नोंदविल्या सारखे नको. चर्चा हवी.

In reply to by प्रभाकर पेठकर

राज आज मराठी माणसाच्या मनामध्ये पुर्ण भरला आहे.....त्याच्यावर विश्वास आहे... तो हुशार आहे...कायदा जाणतो...तो कसा आमलात आणायचा हे पण जाणतो..कायदा मोडणारांना कसे उत्तर द्यायचे हे पण त्याला माहीत आहे.... मी होय पर्याय निवडला आहे...

In reply to by राम दादा

राज ठाकरे ह्यांची ही राजकारणातील, कोणाचेही बोट न धरता, पावले टाकण्याची सुरूवात आहे. भडक विधाने करून, भावूक आवाहने करून जनमत आपल्या बाजूला वळविता येईल. पण मुख्यमंत्री होण्यासाठी, महाराष्ट्राचे सर्वेसर्वा होण्यासाठी विचारांमधील बरीच परिपक्वता आवश्यक आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा काय आराखडा आहे, त्याला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काय करता येईल आणि काय नाही ह्याचा अंदाज बांधावा लागेल. मुळात महाराष्ट्राच्या गरजा काय आहेत, महाराष्ट्र कुठल्या आघाडीवर मागे पडतोय आणि त्यासाठी 'मनसे' काय करणार आहे आणि काय करू शकेल ह्या बद्दलची माहिती राज ठाकरेंनी जाहीर करावी. मराठी तरूणांना त्यांची व्यावसायिक कौशल्ये शिकण्यास भाग पाडले पाहिजे, आपला व्यावसायिक दर्जा वाढविण्यास भाग पाडले पाहीजे. परप्रांतियांना स्पर्धेत मागे टाकण्याची इच्चाशक्ती आणि कुवत दाखविली पाहिजे. नुसते परप्रांतियांना मारझोड करून मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा काय फायदा होणार? भावनिक आवाहनांनी लोकसंग्रह वाढून पक्षाला कदाचित बळकटी येईल पण मुख्यमंत्री होण्यासाठी वेगळे स्वभाव वैशिष्ट्य आणि हुशारी अंगी बाळगणे आवश्यक आहे. त्यामुळे आत्ता ताबडतोब तरी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री होऊ नये असे मला वाटते. सध्या ते करीत असलेले दबावगट निर्मितीचे कार्य त्यांनी करीत राहावे. मराठी माणसाचे योग्य ते प्रबोधन करावे. त्यांच्या इर्षा जागवून व्यावसायिकता शिकण्यास भाग पाडावे. महाराष्ट्राचा सर्वांगीण अभ्यास करून, जास्त परिपक्व भाषणे करून 'आपण मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार आहोत' हा विश्वास मतदारांच्या मनात निर्माण करावा नंतर मुख्यमंत्री पदासाठी दावा करावा. त्यामुळे आत्ता तरी मी 'नाही' हा पर्याय निवडला आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

खुप चांगला विचार मांडला आहे तुम्ही...

राज ठाकरे मुख्यंमंत्री होण्यापेक्षा बाळासाहेब ठाकरेंसारखे म्हणजेच सत्ता आल्यावर रिमोट हातात घेऊन सत्तेवर कंट्रोल ठेवतील असे वाटते. येणार्‍या निवडणुकीत मनसे प्रबळ पक्ष असेल हे मात्र नक्की.

सध्यातरी राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत असे वाटत नाहि. एकतर राज ठाकरेंचे जे "मराठी" बद्दल आंदोलन चालले आहे ते ,मुख्यमंत्रीपदावर बसून कितपत चालवता येईल? आतापर्यंत मिडियाने राज ठाकरे ह्यांची बदनामीच जास्त केलेली आहे. ते जर मुख्यमंत्रीपदावर आले तर त्याचा मोठा गैरफायद राजकारणी घेतिल. महाराष्ट्रातच नव्हे तर समस्त भारतात जाणून बुजून मराठी-अमराठी असे दंगे केले जातील,महाराष्ट्रातीलहि वातावरण बिघडवले जाईल,त्याचा थेट फटका गुंतवणुकिवर होइल. राज्याच्या कारभारात केंद्रसरकारचा हस्तक्षेप वाढेल.हिंदि -मराठी असे वोटबँकचे राजकारण खेळले जाइल. मुंबईला केंद्रशासित करायचे जोरदार प्रयत्न केले जातील. ह्या सर्वांचा विचार करता,राज ठाकरे ह्यांनी सत्तेबाहेर राहुनच आपली उद्दिष्टे साध्य केलि पाहिजेत. अजून किमान दहा वर्षे तरि त्यांनि सत्तेबाहेर राहिलेलेच बरे. अभिज्ञ.

वैयक्तिक मत : दुर्दैवाने सद्यपरिस्थितीत मुख्यमंत्रीपदासाठी आवश्यक असणारे आक्रमक नेतृत्व अन् संयम यांचा मिलाफ राज ठाकरेंना घालता येत नसल्याने ते मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नाहीत! वस्तुस्थिती : आजच्या घडीला मनसे (अन् पर्यायाने इतर कोणताही पक्ष) महाराष्ट्रात स्वबळावर सत्तास्थापण करु शकत नाही! अशा परिस्थितीत मनसे कोणत्याही 'बड्या' पक्षाबरोबर हातमिळवणी करुन सत्तास्थापनेचा दावा करु शकतो, परंतु त्याकरिता मनसेला महत्वाच्या पदांना मुकावे लागेल. त्यामुळे येत्या काही वर्षाततरी मुख्यमंत्रीपदासाठी राज ठाकरेंना इतर उमेदवारांपेक्षा संधी कमी आहे असेच म्हणावे लागेल.

दुर्दैवाने सद्यपरिस्थितीत मुख्यमंत्रीपदासाठी आवश्यक असणारे आक्रमक नेतृत्व अन् संयम यांचा मिलाफ राज ठाकरेंना घालता येत नसल्याने ते मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नाहीत! टिंग्या, सद्ध्याचि परिस्थिती पाहता राज यांना आक्रमक होणे अपरिहार्य आहे. आणि संयमाचं म्हणशिल तर आक्रमक हिंदी भाषकांना तोंड देणे हे संयमाचे काम नाही. तिथे आक्रमकच व्हावे लागेल. जरा हिंदी न्यूज चॅनेल पहा.उत्तर प्रदेश, बिहार सारखी राज्ये जी भारतात गुंडगिरी साठी प्रसिद्ध आहेत तिथले पत्रकार ही सरळ सरळ 'गुंड', 'राज का गुंडाराज', राज ठाकरे की बदजुबानी' सारख्या शिव्या देत आहेत.जया भादूरी,अमरसिंह, कृपाशंकर सिंह, लालूप्रसाद, अबू आझमी, के. एल. प्रसाद सारख्या भिकारचोट माणसांना संयमाने उत्तर देणे हे त्यांचा अन्याय सहन करण्यासारखेच आहे. बाकी मनसे(किंवा इतर कोणताही पक्ष) आजच्या घडीला तरी स्वबळावर सत्तेत येऊ शकत नाही या मुद्द्याशी सहमत आहे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

तुझं म्हणणं पटलं......राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांविरुद्ध पुकारलेली आघाडी आक्रमकच हवी.....इट का जवाब पत्थरसे! तरीदेखील सदरहु धाग्याचा विषय हा राज ठाकरेंच्या मुखमंत्रीपदाविषयी आहे अन् त्या अनुशंगाने केवळ आक्रमक असलेला उमेदवार मुखमंत्रीपदासाठी "आजच्या घडीलातरी" योग्य नाही! राज ठाकरे आज जे राजकीय/सामाजिक कार्य करत आहेत ते स्तुत्य आहेच परंतु केवळ त्याच कार्यावर मुखमंत्रीपदावर नेमणुक होण्याची शक्यता फारच धूसर आहे!

In reply to by ब्रिटिश टिंग्या

सहमत -- नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.

महाराष्ट्रात मोठ्मोठ्या कंपन्या आहेत्...त्यामध्ये किती मराठी मुले काम करतात आणि किती परप्रांतीय आहेत याचा विचार केला तर्...खूप कमी मराठी मुले आहेत्...राजच्या मते..८० % नोकर्‍या महाराष्ट्राती ल मुलांना द्यायला पाहिजेत्..पण तसे आहे का....म्हणुन आक्रमक व्हावे लागते...झोपलेल्याना जागे करण्यासाठी.. पण यात महाराष्ट्राचा पैसा बाहेरचे लोक खात असतील तर कसा विकास होणार.आणि हे सगळे थांबवायची हिम्मत फक्त राज मध्येच आहे.. राज मध्ये अतिशय चांगले नेत्रुत्व कौश्यल्य आहे..

कणाहिन ,स्वाभिमानशुन्य ,हुजर्‍या पुढार्‍या पेक्षा राज ठाकरे नक्किच महाराष्ट्राचे नेतृत्व चान्गले करतील

नक्की सांगू शकत नाही. 'नायक' सिनेमाप्रमाणे त्यांना संधी मिळाली तर? ;)

आता तरी त्यांचे विचार पटतात.खुर्ची मिळाल्यावर काम करेल काय यात शंका आहे. ---नितिन. (पैसाच सर्व काही नसते . हे वाक्य म्हनण्यासाठी आधी तुमच्याकडे भक्कम पैसा असावा लागतो.)

In reply to by नि३

जर मराठी माणुस राज ला खुर्ची देत असेत तर्....राज महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला धोका देऊ शकत नाही... स्वतःचे मराठी माणसाच्या मनातले स्थान राखुन ठेवायचे असेल तर्..राजला खुर्चीसाठी नाही महाराष्ट्रासाठी प्रयत्न करावे लागतील.. राम दादा.

राज ठाकरे बाळासाहेबांच्या भेटिसाठी मातोश्रीवर पुन्हा एकत्र येतील अश्या अपेक्षेत व प्रतिक्षेत असलेली. 8> 8> "अनामिका" जय हिंद! जय महाराष्ट्र!

In reply to by अनामिका

ते मराठी माणसासाठी खुपच चांगले आहे. पण उद्धवचे आजपर्यंतचे धोरण पाहता तो राजशी मिळवून घेईन असे वाटत नाही. उलट बाळासाहेबांकडून राजलाच नमते घ्यायचा सल्ला देईल. कारण या निवडणूकीत मनसे शिवसेनेची बहूतांश मते खाणार हे निश्चित आहे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मराठी आणि मराठी लोकांकरीता काही तरी करायची तळमळ या मुद्या वरुन थेट मुख्यमंत्री करू नका कोणालाही. पेठकर काकांच्या 'वैचारीक परिपक्वता' या मताशी पुर्ण पणे सहमत आहे, सध्य परिस्थीतीत हे होऊ नये असेच वाटते. मराठीचा मुद्दा महाराष्ट्रात राहून ऊचलून धरणं फार सोप आहे पण महाराष्ट्रा बाहेरच्या मराठीभाषीकांचा ही विचार करायला हवा, याप्रकारची भडक विधानं आणि परप्रांतियांना मारझोड करण्या पुर्वी आपला मराठमोळा बेंगळूरु /(सद्या चंडीगड) वासी आर्य

मराठी माणुस बाहेर राहत असला तरि तो कोणालाही त्रास न देता जगतो..तेथिल संस्क्रती आत्मसात करतो..आणि भैयासारखा खराब तर मुळीच वागत नाही..महाराष्ट्रात राहुन हिंदी चे धडे शि़कण्यास आमचा मुळीच विरोध नाही..आम्ही पण शाळेत हिंदी विशय शिकतो..मग भैया लोक त्यांच्या मुलांना मराठी का शिकवत नाहीत्..महाराष्ट्रात हिंदी शाळा काढायची काय गरज होती..तिथे बंगळुरु मध्ये मराठी शाळा आहे का ज्या शाळेत बंगळुरु भाषा शिकवली जात नाही अशी एक तर मराठी शाळा आहे का तिथे....????? जय महाराष्ट्र. राम दादा.

बंगळुरु मध्ये मराठी शाळा आहे का ज्या शाळेत बंगळुरु भाषा शिकवली जात नाही अशी एक तर मराठी शाळा आहे का तिथे....????? काय रे ऍडी हाय काय तीथ मराठी शाळा काय रे ऍड्या हाय का? मराठी माणुस बाहेर राहत असला तरि तो कोणालाही त्रास न देता जगतो..तेथिल संस्क्रती आत्मसात करतो..आणि भैयासारखा खराब तर मुळीच वागत नाही..महाराष्ट्रात राहुन हिंदी चे धडे शि़कण्यास आमचा मुळीच विरोध नाही..आम्ही पण शाळेत हिंदी विशय शिकतो..मग भैया लोक त्यांच्या मुलांना मराठी का शिकवत नाहीत्..महाराष्ट्रात हिंदी शाळा काढायची काय गरज होती.. १००१% सहमत आहे मी अरे मुंबईत एखद्या परप्रांतीय टॅक्सी ड्राईव्हर ला विचारले की अमुक अमुक (जवळचे भाडे असनार्‍या) ठीकाणी येणार का तर सरळ नाही म्हणतो ही यांची मग्रुरी काय हे साले फुकट सोडनार आहेत का रुपये तर मोजुन घेणार ना मग यांचा माजोरडे पणा किति सहन करायचा मी तर आता सरळ मीटर डाउन करतो आणी म्हणतो चल मग काय बिशाद आहे नाय म्हनायची नाय म्हणला तर सरळ नाक्या वरच्या पांडुला सांगतो त्याची बिचार्‍याची तेव्हडीच सोय होते चहा पाण्याची काय बरोबर ना................ मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...

आमचे मत थोडे निराळे आहे. महाराष्ट्र नवमिर्माण सेनेची सत्ता यावी असे आम्हाला मनापासून वाटते. पण ती आल्यावर श्री. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वतःकडे घेऊ नये. श्री राज ठाकरे यांना लोकनेता म्हणून जो गौरव लाभला आहे, तो मुख्यमंत्रीपदापेक्षा मोठा आहे. खालून वर जाणे याला प्रगती म्हणतात, वरून खाली येणे ही अधोगती. श्री ठाकरे यांनी बैलगाडीचा कासरा स्वतःच्या हातात ठेवावा आणि बैलांना उधळू द्यावे. पर्‍हाणी कधी वापरायची आणि कासरा कधी वापरायचा याचे भान गाडीवानाला असेल तर बैल कितीही मस्तवाल असला तरी तो निमुटपणे शेतात जातो. आपला, (शेतकरी) धोंडोपंत आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

आमचे मत थोडे निराळे आहे. महाराष्ट्र नवमिर्माण सेनेची सत्ता यावी असे आम्हाला मनापासून वाटते. पण ती आल्यावर श्री. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वतःकडे घेऊ नये. श्री राज ठाकरे यांना लोकनेता म्हणून जो गौरव लाभला आहे, तो मुख्यमंत्रीपदापेक्षा मोठा आहे. खालून वर जाणे याला प्रगती म्हणतात, वरून खाली येणे ही अधोगती. श्री ठाकरे यांनी बैलगाडीचा कासरा स्वतःच्या हातात ठेवावा आणि बैलांना उधळू द्यावे. पर्‍हाणी कधी वापरायची आणि कासरा कधी वापरायचा याचे भान गाडीवानाला असेल तर बैल कितीही मस्तवाल असला तरी तो निमुटपणे शेतात जातो. आपला, (शेतकरी) धोंडोपंत आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

रामदादा, राज तरुण व आश्वासाक नेत्रुत्व ठरेल हे नक्की!!!! जय मराठी!!!