Skip to main content

सगळ्यात पहिला गडू कोणी बनवला असेल?

लेखक भाते यांनी बुधवार, 30/10/2013 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
घन निल यांचा लाडू झाला, ३_१४ विक्षिप्त अदिती यांचा झाडू झाला, खटासि खट यांचा खडूसुद्धा झाला. मा. श्री. विजुभाऊ यांनी सांगितल्याप्रमाणे साडू आणि भाडू राहीले आहेत. रडू आणि भिडू चे क्वापीराईट मा. श्री. ध्यानस्थ बगळा यांनी घेतले आहेत. च्यायला, गडू कसे काय विसरले सगळे? त्याचा क्वापीराईट कोणीही कसा नाही घेतला? मा. श्री. वटवाघुळ यांनी गडू संबंधी सुतोवाच केलेच आहे. तेव्हा आधी कोणी जिलबी टाकायच्या आधी आपणच बाराखडी पुर्ण करण्याचा प्रयत्न करूयात या सदविचाराने हा धागा काढत आहे. मला पडलेला प्रश्न म्हणजे सगळ्यात पहिला गडू कोणी बनवला असेल? तोच तो गडू, आपण पाणी पिण्यासाठी वापरतो तो. ज्याला, पेला, भांडे इ. अनेक नावांनी संबोधले जाते. विंग्रजीत त्याला ग्लास असे म्हणतात. मुद्दामुन पेला असे लिहित आहे, कृपया नीट वाचावे, प्याला नाही. प्याला म्हणल्यावर आम्हाला (च्यायला) फक्त ‘एकच प्याला’ आठवतो. ‘एकच प्याला’ यावर स्वतंत्र धागा निघु शकेल, कदाचित आधी निघालाही असेल. तोच तो गडू, आपण गुढीपाडव्याला गुढी ऊभारताना वापरतो तो. गुडीपाडवा, साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो असा हिंदूच्या दृष्टीने महत्त्वाचा सण. पुन्हा एकदा, गुढीपाडवा यावर स्वतंत्र धागा निघु शकेल, कदाचित आधी निघालाही असेल. तर गडू आपण सर्वसाधारणपणे पाणी किंवा तत्सम जलपेय पिण्यासाठी वापरतो. पाणी (H2O) हे हायड्रोजन व ऑक्सिजन या अणूंपासून बनलेला पदार्थ आहे. चला, यावर आणखीन एक धागा. दिवाळीच्या शुभमुहुर्तावर नविन मिपाकर म्हणुन एक जिलबी टाकायचे कार्य पहिल्यांदा पार पाडत आहे. पहिला प्रयत्न असल्याने पामराचे काही चुकले असेल तर समस्त मिपाकरांची आधीच माफी मागतो. जाणकार मिपाकर मंडळींच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत.

वाचने 2857
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

कच्चा माल जबरदस्त आहे....गडू का लपविता? =)) बाकी बोलायचे तर कमीतकमी हडप्पा काळापासून गडूसदृश भांडी अस्तित्वात आहेत.

In reply to by ध्यानस्थ बगळा

नीट नाही जमलं सुद्द्लेकन... पुन्हा प्रयत्न करा. :)

मिपावरील साखळी विडंबने कमी होताहेत अशी जरा कुठे काळजी वाटत होती तेवढ्यात 'लाडू' आणि 'झाडू'ला 'गडू'चे यमक जुळवणारे दंगेखोर विडंबन बोर्डावर.… असो, द्वेष्टे मित्र निळे यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत. त्यांचा प्रतिसाद नक्की येणार असे इतिहास सांगतो. प्रेमनाथ दळण्दळे प्रेरणा

In reply to by चैदजा

गडू कोण वापरला असा प्रश्न आहे. पाणीपुरीसाठी कोण गडू वापरला हा प्रश्न नाही ;)

धागा ज्या पदार्थावर आहे त्याचं नाव पुन्हा पुन्हा वाचलं आणि मग खात्रीच झाली कि शीर्षक निर्दोष आहे ;)