भारत हा एक प्रगतीशील देश आहे ज्यामध्ये आधुनिक विज्ञान आणि प्राचीन संस्कृतीचा योग्य मिलाप झालेला दिसून येतो. या भूमीला तपस्वी आणि ईश्वरी अधिष्ठान प्राप्त संत महात्मांचा सहवास लाभलेला आहे. या महान संस्कृतीचा पाया हा बऱ्यापैकी श्रद्धेवरती वसलेला आपल्यास पहावयास मिळतो. मात्र काही काही वेळा ही आंधळी श्रद्धा आधुनिक विज्ञानावरती मात करताना दिसत आहे. उत्तर प्रदेश मधील उन्नाव मध्ये याचा आता प्रत्यय येतो आहे. या छोट्याश्या गावाला अगदी आमीरखानच्या "पिपली लाइव" चित्रपटासारखे स्वरूप आले आहे. 'मनी वसे ते स्वप्नी दिसे' असे म्हणतात मात्र कोणाच्यातरी (साधू ?) स्वप्नातील सोन्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा झाडून कामाला लागलेल्या आहेत. एकीकडे आपण जादूटोणा - अंधश्रद्धा विधेयक देशामध्ये लागू करण्याच्या बाता मारतो आणि दुसरीकडे अश्या गोष्टींना खतपाणी घालत आहोत हा किती मोठा विरोधाभास आहे. त्या (संधी) साधूचा शिष्य हा देशाचा कृषी राज्यमंत्री आहे तो त्या स्वप्नावर विश्वास ठेवून सरकारी यंत्रणा राबवताना दिसतो आहे. दुसरीकडे देशाचे कृषिमंत्री मा. पवार साहेब म्हणतात कि, अश्या गोष्टीने (अंधश्रद्धेला) बुवाबाजीला खतपाणी मिळेल आणि अश्या गोष्टी घडता कामा नये.
आपला समाज किती भ्रामक कल्पनेच्या पाठीमागे लागलेला आहे याची प्रचीती वरील सर्व प्रकरणातून दिसून येत आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ ज्याला म्हणतात ती प्रसारण व्यवस्था (media, news channels ) सुध्दा केवळ TRP वाढवण्याच्या नादात वस्तुस्थिती लक्षात न घेता याची बातमी रंगवून लोकांपुढे मांडत आहे.
विचार करण्याची गोष्ट आहे, ज्या इंग्रजांनी भारतामध्ये व्यापारी दृष्टीकोन ठेऊन राज्य केले ज्यांनी कोहिनूर सारखा हिरा आणि भारतातील बहुतांश सोने आपल्या देशात घेऊन गेले त्यांच्या नजरेतून हे एक हजार टन सोने कसे चुकले हा मोठा प्रश्न आहे ? शिवाय केवळ स्वप्नात दिसले म्हणून सोने शोधणे हे कितपत रास्त आहे ?
वाचने
2655
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
जावू द्या हो...
बाकी.....
सांगण्याचं तात्पर्य इतकंच....
असेल असेही असेल...
In reply to सांगण्याचं तात्पर्य इतकंच.... by psajid
बरोबर
हो ना अगदी अगदी.....
In reply to बरोबर by मंदार कात्रे
मला सुरुवातीला वाटलं...
जयगढ येथील खजिना
पद्मनाभन येतील सोन्याचे पुढे
In reply to जयगढ येथील खजिना by चित्रगुप्त