वा वा वा वा,
तात्या,
लई झकास. अस्सल लिखाण झाले आहे. असेच चालू दे. तथाकथित सभ्यतेची पुटे त्यावर चढवून त्यातला अस्सलपणा घालवू नकोस, वेदना मारू नकोस.
हा लेख वाचल्यावर लगेच नामदेव ढसाळांचे 'गोलपीठा' आठवलं. त्यात नामदेव ढसाळ म्हणतात -
"खद्र्या मैनांनो,
तुमच्या उद्ध्वस्त पुच्यांचा मी नि:पक्ष भाष्यकार"
समाजातल्या ह्या अतिशोषित वर्गावर लेखन करतांना हीच नि:पक्ष भाष्यकाराची भूमिका असली पाहिजे.
आपला,
(वाचक) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
<<तथाकथित सभ्यतेची पुटे त्यावर चढवून त्यातला अस्सलपणा घालवू नकोस, वेदना मारू नकोस.>>
"खद्र्या मैनांनो,
तुमच्या उद्ध्वस्त पुच्यांचा मी नि:पक्ष भाष्यकार"
ऑक्सफर्ड इंग्रजी -मराठी डिक्सनरीत (रमेश धोंगडे संकलित) cunt या शब्दाचा अर्थ पुच्ची असा दिला आहे. इथे सभ्यतेच्या मर्यादा पाळल्या नाहीत असे काही जणांना नक्की वाटेल. पण अर्थवैविध्याचा संकोच होउ नये म्हणुन ही "काळजी" संपादकांनी घेतली असावी.
बाकी ढसाळांच्या विद्रोहात सर्व गोष्टी "क्षम्य" असतात. सभ्य म्हणून गणले गेलेले प्रतिशब्द वापरले तर विद्रोहच संपून जाईल. विवेकवादी चळवळींमध्ये देखील विद्रोहाचे मान व भान राखावे लागते.
धोंडोपंतांशी सहमत आहे.
प्रकाश घाटपांडे
तात्या, 'रोशनी' भन्नाट होत आहे.
मावशी असूनही तिच्यातली सुसंस्कॄत स्त्री जिवंत आहे हे जाणवते.
चांगलं काय आणि वाईट काय याचं (तथाकथित?) सभ्य समाजानं केलेलं वर्गीकरण तिला मान्य आहे.
ती तुम्हाला त्या अर्थानंच 'सही आणि सीधेसाधे' समजते.
आता तिची कहाणी ऐकल्यावर मगच ती मावशी का झाली याचा उलगडा होईल.
प्रतिक्षेत.
एक प्रश्न उभा राहतो -
समाजाचे सांस्कृतिक मापदंड बदलत चालले आहेत का?
या व्यवसायात उतरणार्या स्त्रियांची दु:खे, त्यांची आगतिकता गेल्या पिढीत फार चर्चिली गेली आणि
या स्त्रिया केवळ परिस्थितीची शिकार होऊन हा 'धंदा' करतात असा सर्वसाधारण सूर होता.
आता मात्र अनेक तरूण मुली स्वेच्छेने, केवळ भरपूर संपत्ती कमी वेळात मिळवता येईल असा हिशोब
करून 'डान्स बार'च्या अथवा इतर नावांखाली हाच किंवा अशा प्रकारचा व्यवसाय करतात. इतकेच काय पण त्यांना यातून बाहेर
काढण्याच्या प्रयत्नांना - 'पण आमच्या आमदनीला धक्का न लावता' - ही पूर्वअट आहे.
असं का झालं आहे?(की त्यावेळीही अशीच परिस्थिती होती?)
आजची 'रोशनी' अशी आपल्या मैत्रिणीच्या मुलाचा उद्धार व्हावा याच्या तळमळीत असेल काय?
तात्या, याबद्दल तुमचा अनुभव/मत काय?
समाजाचे सांस्कृतिक मापदंड बदलत चालले आहेत का?
- समाजाचे सांस्कृतिक मापदंड हे काळानुसार बदलत असतातच. तेव्हा ते हल्ली आणि भविष्यात बदलत राहतील हे नि:संशय.
आपण शरीरविक्रय करणार्या आणि बारबालांचा उद्योग करणार्या मुलींना सहज या ठीकाणी पाहतो. थोडा विचार करून पाहा, आपल्या आजूबाजूलाही अशा मुली दिसतात पण समाजातील कनिष्ठ वर्गाकडे आपण सहज बोट दाखवतो. या प्रतिष्ठित घराण्यांतील मुलींपैकी काही चित्रपटांच्या वेडाने, नाट्य, टीव्ही शृंखला इ.च्या वेडाने झपाटलेल्या असतात. कधी जाहीरात क्षेत्राकडे तर हवाईसुंदरी, हॉटेलिंग व्यवसाय यांतील असतात. (सरसकट ठपका ठेवण्याचा हेतू नाही परंतु हवाईसुंदरी आणि मोठमोठ्या हॉटेल्समधील काही व्यक्तींशी ओळख असल्याने त्यांच्या "विचारांत आचारांत" अचानक आलेले बदल अनुभवलेले आहेत. दुर्दैवाने, हे बदल त्यांच्या पांढरपेशा पालकांतही पाहिलेले आहेत. तेव्हा येथे मावशी कोण असा प्रश्न पडतो.)
तरुण मुली सोडल्या तर हात आणि घरखर्चाला थोडे अधिक पैसे मिळावे म्हणून प्रतिष्ठीत घरांतील सुगृहिणीही असे 'पार्टटाईम' उद्योग करून असतात. ओम पुरी आणि रेखा अभिनीत 'आस्था' हा चित्रपट याच गोष्टीवर आधारित होता हे आठवते.
तात्या, रोशनीचा ४था भाग आवडला. पुढच्या भागांसाठी उशीर नको.
म्हणायचे होते. फक्त कनिष्ठ वर्गावर ठपका ठेवण्याचा हेतू नव्हता. इतकेच काय? तर रोशनीमध्येच मालिका अभिनेत्रीचे जे पात्र आले आहे त्यातून तात्यांना हेच (उच्चभ्रू म्हणवणार्या समाजाचे अधःपतन) दाखवावेसे वाटत असावे.
पण माझा मुद्दा एवढाच की -
पूर्वी वैयक्तिक फायद्यासाठी ऊर्ध्वगमन करण्याचे प्रयत्न चालत.
(उदा. रोशनी कृष्णाला गर्तेतून बाहेर काढू इच्छिते, शिकवून शहाणा, नीतीमंत करू पहाते.)
आता व्यक्तिगत अधोगतीतच फायदा दिसत आहे.
(उदा. आजची रोशनी कृष्णाला म्हणेल - शिकून काय मिळणार? त्यापेक्षा मस्त दारूच्या अड्ड्यावर काम कर. 'दल्ला'ली कर. डॉन-बीन हो!)
गेल्या दहा बारा वर्षात सांस्कृतिक मापदंडातला हा अमूलाग्र बदल (घूमजाव) पाहून भोवळ येते.
रौशनी भाग ४ आला.......
...थोडे तरी मार्गी लागलो.
आता जास्त वेळ वाट नका बघायला लावू...
हा भाग देखील नेहमी सारखा मस्त चकचकीत... नो डाउट...
आणि मला ती तिच्या पूर्वायुष्याबद्दल सगळं सांगणार होती!
हे शेवटचे वाक्य मात्र सुत्रधार/नायकाने/लेखकाने कसे टाकले ते समजले नाही. रौशनी ,"जेव आधी, मग सांगते." असे कदाचित म्हणाली असेल.
असो लवकर पुढचा भाग येऊ देत.
तात्या, इंतजार का फल मीठा होता है म्हणतात तसं वाटलं हा भाग वाचून. पुढच्या भागांबद्दल उत्सुकता लागली आहे.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
आपण किती सहजपणे आपल्या नेहमीच्या बोलण्याचालण्यात 'हरामी', 'हरामखोर' हे शब्द वापरतो! पण आज मी प्रत्यक्ष एका 'हरामी' माणसाला बघत होतो!
आवडले.
पुढ्यच्या भागांच्या प्रतिक्षेत!
-कोलबेर
आता कुठे गोष्टीला सुरुवात होते आहे. हा भाग आधीच्या भागांप्रमाणेच चांगला आणि पुढील भागांची उत्कंठा वाढवणारा. पुढचे भाग येऊ द्यात; आम्ही वाचत आहोतच.
(वाचक)बेसनलाडू
आताच कुठे कथा सुरू होते आहे, आधीच आवडलेली आणखीन आवडत आहे.
(अवांतर १: मागे मी दुसर्या एका चित्रणाच्या बाबतीत म्हटले होते की "नकल केल्यासारखे वाटले", यावेळी ती तक्रार साफ खोटी पाडून मला शर्मिंदा केलेत! आणि या शरमेत मला अधिक सुख आहे, ते सांगावे लागू नये.)
(अवांतर २: या कथेत एकही अश्लील शब्द किंवा वाक्य नाही. कारण "अश्लीलपणा" हा संदर्भाने होतो, शब्दाच्या उच्चाराने नाही. त्यामुळे उगाच माफी मागू नका बुवा - कोण्या अडाण्याला वाटेल की खरेच माफी मागण्यालायक काही आहे.)
राजे (verified= न पडताळणी केलेला)Tue, 12/04/2007 - 17:09नवीन
शी सहमत.
छान लेखन... आम्ही वाचतो आहोत.. पुढील भाग लवकर लिहा नाहीतर थांबाला चार-पाच महिने तो पर्यंत आम्ही सगळे विसरुन जाऊ व मग कोणीतरी चर्चा चालू करेल "रोशनी" चे काय ?
तर अशी वेळ येऊ देऊ नका, लवकर लिहा.
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
आहे. अजून लवकर येऊदेत पुढचे भाग.
रोशनीचे व्यक्तिमत्व कणखर दाखवले आहे... आवडले.
पांढरपेशा समजातला "हा उद्योग" माहिती होता. पण नवे आलेले २ चित्रपट
१. मुंबई सालसा
२. दिल विल एक्सेट्रा...
हे पाहून ही नवी फॅशन वाटते... कॉलेज जीवनात किवा शालेय जीवनातही.. १ पेक्षा जास्त व्यक्तींशी सबंध ठेवून.. त्यात काही गैर नाही अशी विचार सरणी असणे. किंवा त्यावर पैज लावणे.
मला हे चित्रपट झेपलेच नाहीत.
- प्राजु.
तात्या,
रोशनीचा हा भाग ही आवडला.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
(आम्हालाही या लेखाच्या निमित्ताने नामदेव ढसाळांच्या कवितेतील वेगवेगळ्या शब्दांची आठवण झाली)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
किमयागार (verified= न पडताळणी केलेला)Wed, 12/05/2007 - 04:34नवीन
अध्यक्ष महोदय,
लेख मालिका संपेपर्यंत आम्ही आमचे मत राखून ठेवत आहोत.
कळावे,
-कि'गार
********************************************
अल्कोहोलचा परिणाम दुसरे काय?
आपल्या मराठी लोकांना उर्दू विशेष समजत नसल्यामुळे हरामखोर आणि हरामज़ादा हे एकच किंवा जवळपासचे वाटतात. त्यातले वाईट नि जास्त वाईट (चुकून चागले-वाईट म्हणणार होतो) कळत नाही.
ज्यांना अचूक शिव्या देण्यात रस आहे त्यांच्यासाठी हा खुलासा -
खोर (ख़्वार) म्हणजे खाणारा -- हरामखोर म्ह. हरामाचे खाणारा, (धर्माला) निषिद्ध (असलेल्या) मार्गाने उदरनिर्वाह करणारा, स्त्रियांचा शरीरविक्रय करून जगणारा भडवा हा त्यापैकी एक;
ज़ादा म्हणजे जन्मलेला किंवा मुलगा -- हरामातून जन्मलेला, (धर्माला) निषिद्ध (असलेल्या) मार्गाने जन्मलेला, लावारिस, अनौरस, अक्करमासा/शा, मराठीत सांगायचे तर बास्टर्ड.
शिव्या देतांना हरामखोर ही काहीशी सौम्य तर हरामज़ादा ही तीव्र शिवी आहे, हे मराठी लोकांना कळले नाही तरी उत्तरेकडील लोकांना चांगले कळते हे ध्यानात ठेवावे व योग्य काळजी घ्यावी.
रौशनीला हरामी म्हणजे हरामज़ादा अभिप्रेत होता असे वाटते, हरामखोर नव्हे.
कथा आवडते आहे. अर्वाच्यता स्वाभाविकपणे आल्यासारखी वाटते. आधीचा एक लेख (व त्याखालील प्रतिसाद) केवळ अर्वाच्यतेसाठी लिहिल्यासारखा वाटला होता तसे येथे वाटत नाही.
पुढील भागाची वाट पाहतो आहे.
- दिगम्भा
प्रतिक्रिया