Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Profile picture for user धन्या
Submitted by धन्या on Mon, 10/14/2013 - 18:26
चल परत नव्याने सुरू करू सारे नांगरले नव्हते कधीच शेत असे पुन्हा नांगरु पाटाला येईलच पाणी वरच्या त्या पाण्या समेच आपलं बियाणं पेरुन टाकू खुप केले आपण नियोजनाने पीक घेणे त्या पल्ल्याड जाऊन फक्त पीकासाठी राबू असेल अजूनही सळसळता जोम आपल्यातही त्या रगेल पणाची थोडी चव चाखून पाहू चल बरोबर मिळून राबू जरासे भूगर्भातील अंकुरापर्यंत पर्यन्त असेच आपण पोहोचू शेतात असणारच उंचसखल थोडेसे खोलगट त्यातूनच आपल्या मेहनतीचा अर्थही नव्याने उमजू

Submitted by स्पंदना on Tue, 10/15/2013 - 12:09

In reply to जरा यादवकालीन मराठीत लिहा by विजुभाऊ

Permalink

हांगाश्शी! येक घाव दोन तुकडे!

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 10/15/2013 - 13:03

In reply to हांगाश्शी! येक घाव दोन तुकडे! by स्पंदना

Permalink

आयला, थोरची कुर्‍हाड म्हणायची

आयला, थोरची कुर्‍हाड म्हणायची का काय ही?
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 10/15/2013 - 14:21

In reply to आयला, थोरची कुर्‍हाड म्हणायची by बॅटमॅन

Permalink

कृहाड "थोर"ची असो किंवा नसो

कृहाड "थोर"ची असो किंवा नसो (बादवे, कोण हा थोर?) पण थोरली नक्कीच आहे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 10/15/2013 - 14:53

In reply to कृहाड "थोर"ची असो किंवा नसो by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

थोर हा स्कँडिनेव्हियन

थोर हा स्कँडिनेव्हियन पुराणांतील इंद्र. त्याचा हातोडा खरेतर फेमस आहे. त्याच्यावर पिच्चरही बनले आहेत. अ‍ॅव्हेञ्जर्स नामक पिच्चरमध्ये त्याचाही रोल आहे. http://en.wikipedia.org/wiki/Thor
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 10/15/2013 - 15:06

In reply to थोर हा स्कँडिनेव्हियन by बॅटमॅन

Permalink

माताय !!

फारच थोर दिसतोय तुमचा हा थोर !!
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 10/15/2013 - 15:38

In reply to माताय !! by सूड

Permalink

थोर अन थोरलाही आहेच.

थोर अन थोरलाही आहेच. :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Tue, 10/15/2013 - 15:44

In reply to थोर अन थोरलाही आहेच. by बॅटमॅन

Permalink

"व्यासोच्छिष्टं जगत सर्वम" ही

"व्यासोच्छिष्टं जगत सर्वम" ही ओळ बदलायची वेळ आलीय असं वाटतंय. :)
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 10/16/2013 - 17:24

In reply to "व्यासोच्छिष्टं जगत सर्वम" ही by धन्या

Permalink

असं कसं... आर्य तर

असं कसं... आर्य तर स्कँडेनेव्हियाचे रहिवासी (फक्त तिकडून इकडे आले की इकडून तिकडे गेले एवढाच काय तो घोळ आहे ;) )... आत्ता इंद्र म्हणजे देवांचा राजा. आता मग तो 'थोर'च नाही काय?
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 10/15/2013 - 14:39

Permalink

एक रम्य शेतकरीगीत

कवीला शेतीबद्दल असलेली आत्मियता आणि शेती सुरु करण्याबद्दलची ओढ शब्दाशब्दातून दिसली. एक रम्य शेतकरीगीत !!
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Tue, 10/15/2013 - 15:53

Permalink

कविता मार्गदर्शक आहे !

कवि हा परकायाप्रवेशाचा आशीर्वाद लाभलेला असतो. त्यामुळे वयाच्या सोळाव्या वर्षी देखील तो अलौकिक काव्यसंपदा निर्मू शकतो. या कवितेचे कवि बहुदा सोळावं ओलांडून गेले असावेत. त्यांच्या या काव्यात अनेक दृष्टांत आहेत.वा वा ! पण परकाया प्रवेशाचा आशीर्वाद मिळाला म्हणून काय अगदी अंकूरापर्यंत पोहोचायची काय गरज आहे. आपल्याला देण घेणं असतं ते नागरण्याशी व पीक हाती लागण्याशी ! बाकी अनेक निसर्ग कवि मराठीत वाचले. बा भ बोरकर, ना धो महानोर, बालकवि . पण धन्या यांचे निसर्ग कविचे घराणे यांच्या पासूनच चालू होते. हे घराणे फार अभिजात वाटले नाही तरी प्रत्ययकारी नक्कीच आहे !
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Tue, 10/15/2013 - 15:54

Permalink

श्रमाचे महत्व पटवुन देणारी

श्रमाचे महत्व पटवुन देणारी उत्तम कविता. कामकर्‍यांच्या चेहर्‍यावर दिवसरात्र श्रम करुन घाम गाळुन आलेले चैतन्य पदोपदी जाणवते आहे. उषेच्या गर्भात आदित्याने त्याची किरणे सोडल्यावर नव्या नव्हाळीचा जो उन्मेष जाणवतो तोच या गीतातुन प्रतीत होतो आहे. चला सगळे जण कामात स्वतःला झोकुन देउयात आणि या गीताला एक उन्नत सलामी देउयात.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Tue, 10/15/2013 - 15:59

In reply to श्रमाचे महत्व पटवुन देणारी by मृत्युन्जय

Permalink

सलामी देण्यात आली आहे!

सलामी देण्यात आली आहे! ( झैरात करणारा ;) ) मोदक
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 10/16/2013 - 12:56

Permalink

?

जसा गणपती नंतर पितृपंधरवडा असतो , तसा नवरात्री नंतर अश्लीलपंधरवडा असतो काय ??
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Wed, 10/16/2013 - 17:18

In reply to ? by प्रसाद गोडबोले

Permalink

तुमची अश्लील शब्दाची व्याख्या

तुमची अश्लील शब्दाची व्याख्या काय आहे तसेच या विडंबनात अश्लील काय आहे ते सांगू शकाल का?
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 10/16/2013 - 18:08

In reply to ? by प्रसाद गोडबोले

Permalink

आपल्याला कावीळ झाली की जग

आपल्याला कावीळ झाली की जग पिवळं दिसतं म्हणतात. अश्लील काय दिसलं ते आता जरा सांगाच !!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Sun, 10/20/2013 - 13:31

In reply to आपल्याला कावीळ झाली की जग by सूड

Permalink

कावीळ झाल्याचे कबुल करत आहे

कावीळ झाल्याचे कबुल करत आहे :D
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Sat, 10/19/2013 - 23:53

Permalink

मग याच न्यायाने हे नाथांचे भारुड ही अश्लील आहे का?

या कवितेत काहीही अश्लील नाही असे माझे प्रांजल मत आहे. जर ही कविता अश्लील वाटत असेल तर मग या संत एकनाथांच्या भारुड ला ही अश्लील च म्हणावे लागेल परंतु ते तसे नाही आहे. सद्‌गुरुमाय कुंटीण झाली माझी । व्यभिचारा ठेविलें साये आजी ॥ध्रु०॥ अद्वैताचा मज पांघरविला शेला । एकान्तासी तिणें चालविलें मला ॥ १ ॥ परपुरुषाचे शेजेवरी नेउनी घातली । मागल्याची सोय सोडविती झाली ॥ २ ॥ भ्रांति पदर काढुनी ओढिती झाली । आलिंगन घ्यावया सरसावली ॥ ३ ॥ वासनेचे कंचुक सोडियेले । मायामय कुच हे मर्दियेले ॥ ४ ॥ जीवशिव मिठी घाली धरी आवळून । करून ऐक्यता माझें चुंबिलें वदन ॥ ५ ॥ अलक्ष पदातींत घातलें आसन । देहातीत भोगिला भोग त्याणें ॥ ६ ॥ एका जनार्दनीं भोळी नारी । परपुरुष भोगी निरंतरीं ॥ ७ ॥
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sun, 10/20/2013 - 00:12

In reply to मग याच न्यायाने हे नाथांचे भारुड ही अश्लील आहे का? by मारवा

Permalink

खि: खि: खि: खि: खि:

खि: खि: खि: खि: खि: जोरदार +१ :)
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Sun, 10/20/2013 - 03:10

In reply to मग याच न्यायाने हे नाथांचे भारुड ही अश्लील आहे का? by मारवा

Permalink

मस्त आहे की. हे भारुड तर एकदम

मस्त आहे की. हे भारुड तर एकदम आरपार आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Sun, 10/20/2013 - 12:44

In reply to मग याच न्यायाने हे नाथांचे भारुड ही अश्लील आहे का? by मारवा

Permalink

वाह!

वाह! अप्रतिम. सुंदर भारुड. आता 'असं' काही वाचनात्/बघण्यात आलं की पटकन हे भारुड आठवेल.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Sun, 10/20/2013 - 13:28

In reply to मग याच न्यायाने हे नाथांचे भारुड ही अश्लील आहे का? by मारवा

Permalink

अश्लील अश्लील! काय हे दिवस

अश्लील अश्लील! काय हे दिवस आलेत. आदुगर अश्लिल लिवायच आन नंतर जीवशिवा ची भानगड आणून त्याला अध्यात्मिक टच द्यायचा! ही संतांची जुनी खोड आहे. अहो साहित्यात जरा चावट रस पाहिजेच ना? पण अशा साहित्याला प्रतिष्ठा नसल्याने संत तरी काय करनार बिचारे! मंग ओढून तानुन अध्यात्मावर गाड आनून सोडायच.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • Log in or register to post comments
  • 20974 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com