शर्ट ची गोष्ट
मला एक लिनेन चा शर्ट चा कापड भेट म्हणुन मिळाले. देणाऱ्याने काहीतरी १५०० - २००० रु. चे कापड आहे हे सांगून, चांगल्या शिप्याकडे शिवायला टाक असा सल्लाही दिला. अर्थात असे महागडे कपडे भेट म्हणुन मिळाल्यावरच घालायला बरं वाटतं हा भाग निराळा. अर्थात मध्यमवर्गीय विचारसरणी मुळे ही असं वाटत असेल.
असो, तर मी काय सांगत होतो. कापड घेऊन मित्रा ने सुचविलेल्या नारायण पेठ पुणे येथील शिंप्याकडे गेलो. गडबड असल्याने ट्रायल न घेता मस्त पैकी शर्ट शिवून आणला, ज्या कार्यक्रमासाठी शर्ट लागणार होता त्या दिवशी शर्ट घातला तर तो बऱ्यापैकी मोठा झाला. अर्थात मी बारिक झाल्यामुळे शर्ट मोठा झाला की शिंप्याचे माप चुकले हा मोठा प्रश्न आहे.
परत शिंप्याकडे जाणे आले. तर तो म्हणाला आता दसरा आहे खूप लोड आहे तुम्ही परत या. मी हाटुन बसल्यावर मग म्हणाला की शर्ट घालून दाखवा , मग आपण बघू. शर्ट घातल्यावर म्हणाला हम्म. . . हे लिनेन चा कापड ना ? . . . मी मनामध्ये " अरे बाबा तूच शिवलासं ना ? . . . " पण वरकरणी हो म्हणुन टाकलं… त्या बरोबर त्याने " आता कसा सापडला" अश्या अर्थाने बघितले व म्हणाला ह्या लिनेन च्या कापडाचे असेच असते बघा साहेब, धुतला की आकसतो . . . तुम्ही धुवून आणला असेलच ना? मी म्हणालो नाही. . . अहो 'न' घातलेल्या शर्ट कसा धुणार? पुन्हा हे मनातच. . . आम्ही कायम मनामध्येच बोलणार. . वरकरणी मात्र 'नाही हो. . . नाही धुतला'. . . मग पुढचा सल्ला मिळाला 'तुम्ही असं करा. हा शर्ट तुम्ही ड्रायक्लिनिंग ला टाका, तुम्ही नेहमी कुठे टाकता?' पुन्हा प्रश्नार्थक चेहरा करून म्हणालो अहो, मी पाषाण ला राहतो, तिथे टाकतो. काय बावळट प्राणी आहे हा, अश्या अर्थाने बघून, साहेब, इथे 'सुपर' तर नाहितर ' डायमंड' ला टाका ना? माझा प्रश्नार्थक चेहरा बघून पुन्हा तो म्हणाला, इथेच आहे बाहेर पडला की डाव्या हाताला बघा. ९९% नीट होईल, नाहितर आहोतच नं. काय माझ्या चेहऱ्याचे वैशिष्ट्य आहे माहित नाही पण शिंपी व माझी बायको ह्यांचा मझ्या बावळटपणाबद्द्लच मत मात्र एकदम सारख निघेल असं वाटलं न्हवत, कदाचित योगायोग असावा. बघु, मी मात्र शर्ट दुरुस्त करून आणायला गेलेलो, कारण नसताना ड्रायक्लिनिंग ला टाकुन वर ड्रायक्लिनिंग चे ६० रु. देऊन आलोय. :)
याद्या
6428
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
वॉव!
मजा आली
तुमच्या बावळटपणाबद्दल एकसारखी
बरं ! नेमका उद्देश काय
नेमका उद्देश काय म्हणायचा
In reply to बरं ! नेमका उद्देश काय by शिल्पा ब
हाहाहा!
गोष्टीचा शेवट
In reply to हाहाहा! by पैसा
प्रत्येक शर्ट चा शेवट
हा हा...
मला
क्रमशः
भांडी बोहरणीकडे दिली..
In reply to क्रमशः by कपिलमुनी
छान अनुभव.
हॅ हॅ हॅ......
In reply to छान अनुभव. by धन्या
तुम्ही पहिल्यांदा शिंप्याकडे गेला...
In reply to छान अनुभव. by धन्या
काय जबरा लेख आहे...
अशा एकोळी धाग्यांचे मिपावर
In reply to काय जबरा लेख आहे... by मुक्त विहारि
@ हर्षद...
In reply to अशा एकोळी धाग्यांचे मिपावर by हर्षद खुस्पे
ग्यानबाची मेख
नारायण आणि सदाशिव या दोन्ही
In reply to ग्यानबाची मेख by पैसा
नानासाहेब पेशव्यांनी सदाशिव
In reply to नारायण आणि सदाशिव या दोन्ही by विजुभाऊ
आणि शनिवार पेठ विसरू नका -
In reply to नानासाहेब पेशव्यांनी सदाशिव by बॅटमॅन
अरे हो, ते राहूनच गेलं की
In reply to आणि शनिवार पेठ विसरू नका - by आदूबाळ
दुनियाँ में ***की कमी नही
विजुबौंकुन पँटीची गोष्ट अ
सै बोल्या तुम पुजा बै.
शर्ट मोठा झाल्याने साईंची
शर्ट मोठा झाल्याने
शर्ट मोठा झाल्याने
पण शिंपी व माझी बायको ह्यांचा
एक करा शर्टासकट सर्फ सर्फ ची