मिंटे..... खरच गं पुण्यात २-३ वर्षांपुर्वी आलेल्या पुराची आठवण झाली....
माझं आजोळ नाशिक चं आहे..त्या एरियातही पाणी शिरलय...
सुदैवाने.. आमचा वाड्याचं रुपांतर एका कॉम्प्लेक्स मध्ये झालय्...काही वर्षांपुर्वीच....
नैतर काही जुन्या वाड्यांच्या भिंती कोसळुन सामान वाहुन गेलंय.......
हे वरुणराजा..... थांबव आता हा रुद्रावतार!
:|
मिंटी आणि महापुराने व्यथित झालेल्या सर्व नाशिकवाल्या मिपाकरांना , त्यांनी या महापुराची वार्ता छायाचित्रांसकट मिपावर दिल्याबद्दल धन्यवाद.
मीही नाशिककरच आहे आणि या महापुरात यथाशक्ति मदतकार्यात होतो. १०७९ नंतरचा हा दुसरा महापूर. त्याही माहापूरात मी असाच धडपडलो होतो.
यावेळी अहिल्याबाई होळकर पूल व कन्नमवार पूल वगळता बाकी तीन पूल पाण्याखाली होते.
या निमित्ताने मिपावरच्या नाशिककरांची खानेसुमारी होऊन मिपाचा एक नाशिक कट्टा व्हायला हवा.
अरुण वडुलेकर
(एक नाशिककर)
प्रतिक्रिया
मिंटे.....
अनुभव
देवा वाचव
धन्यवाद!
बापरे..!
१०७९?
एवढं काही