आताच एक खूप सुंदर लेख वाचला लोकसत्ता मध्ये Dr राजीव शारंगपाणी यांचा . "लोढणी टाका " आयुष्य मजेत जाईल.
http://www.loksatta.com/lokrang-news/add-to-liability-190768/
खरच आपण कळत नकळत किती ओझी वाहत असतो नाही !! गणपती, गौरी अनेक गोष्टी फक्त पूर्वापार चालत आल्यात म्हणून करतो . आजच्या जीवनात त्याचा काही एक मेळ बसतो का ?
गणपती बसवणे लोकमान्य गंगाधर टिळकांनी ज्या कारणाने सुरु केला तो हेतू आता उरला आहे का ?
मात्र आता आपण गणपती बसवून फक्त पैशाची नासाडी करतो . प्रदूषण वाढवतो . loud speaker लाऊन धिंगाणा घालतो . काहीही समाज उपयोगी काम त्यात होत नाही . अपवाद सोडून . आजारी रुग्णांना , जेष्ठ नागरिकांना , विद्यार्थ्यांना त्रास मात्र होतो . आता त्यात गोकुळ अष्टमी , नवरात्र पण सार्वजनिक सुरु झाले आहेत . किती प्रदूषण , ध्वनी प्रदूषण ,पैशाचा अपव्यय . वेळेचा , शक्तीचा अपव्यय. मला वाटते कुठे तरी हे थांबायची वेळ आली आहे .
दिवाळीचे फटाके म्हणजे प्रदूषण आणि दुर्घटनांना आमंत्रण . आणि पैशाचा चुराडा . लोक म्हणतात आपली संस्कृती जपली पाहिजे . ते खरंच आहे पण गणपती ला नाचणे दारू पिउन धांगड धिंगा हि आपली संस्कृती नाही . आपले सण आपण शांतपणे त्याच पावित्र्य राखून पण करू शकतो . हि कुठली पूजा ज्यात सर्वाना त्रास होतो ?. पूजेमुळे शांत वाटले पाहिजे . मनामध्ये एक समाधान वाटले पाहिजे ती पूजा .
आपली संस्कृती जपायची तर सगळे सण साधेपणाने साजरे व्हावेत .
परंपरा बाबत एक गोष्ट वाचलेली आठवते .
हजारो वर्षांपूर्वी एक योगी एका जंगलात राहत होता . तिथे तो एक गुरुकुल चालवत असतो . वीस एक शिष्यगण त्याच्या जवळ राहून शिक्षण घेत असतात . एके दिवशी एक मांजर गुरु शिकवत असतांना येते . आणि मध्ये मध्ये करू लागते . त्यामुळे शिष्यगण विचलित होतात . मग योगी एका शिष्याला त्या मांजरीला बांधून ठेवायला सांगतो . मग दुसऱ्या दिवशीही असेच होते . परत योगी शिष्याला ,वर्ग चालू असेपर्यंत मांजरीला बांधून ठेवायला सांगतात. मग रोज असे सुरु राहते वर्ग चालू होण्याआधी मांजरीला बांधणे . मग अनेक वर्ष जातात जुने शिष्य गुरु होतात . ते पण मग मांजरीला बांधण्याचा कार्यक्रम चालू ठेवतात . मध्ये अनेक वर्ष जातात . आता ते मांजर पण राहत नाही ते गुरु आणि शिष्य पण राहत नाहीत .पण वर्ग चालू होण्यापूर्वी नवीन गुरु नवीन मांजर आणून दारात बांधतात शिष्य विचारतात हे मांजर का बांधले आहे ? गुरु सांगतो ते माहित नाही पण हि आपली परंपरा आहे .
या प्रमाणे आपण विचार न करता परंपरा पाळत असतो. .
गौतम बुद्ध यांनी सांगितलेले वचन मला खूप छान वाटते .
"मी काही सांगितलं त्यावर केवळ मी सांगितलंय म्हणून विश्वास ठेवू नकोस. केवळ परंपरा सांगते म्हणून तू काही ऐकू नकोस . कोणी प्रसिद्ध व्यक्ती सांगते म्हणून विश्वास ठेवू नकोस . जे तुझ्या सद्विवेकबुद्धीला योग्य वाटते त्यावर तू विश्वास ठेव व त्याच आचरण कर. "
वाचने
4543
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत
हस्तांतर.......
In reply to सहमत by भ ट क्या खे ड वा ला
विचार स्तुत्य आहे.
एका धनागाराकडे एक ओढाळ गुरु
In reply to विचार स्तुत्य आहे. by सस्नेह
बरोबर आहे मौताई. गुरे हे
In reply to एका धनागाराकडे एक ओढाळ गुरु by कवितानागेश
गुरु- गुरे
In reply to बरोबर आहे मौताई. गुरे हे by विश्वनाथ मेहेंदळे
"लोढणी टाका " आयुष्य मजेत जाईल
असेच चालायचे...
In reply to "लोढणी टाका " आयुष्य मजेत जाईल by रामपुरी
विचार चांगला आहे
गणपतीचं ओझे??
ओझे गणपतीचे नाही परंपरेचे आहे
In reply to गणपतीचं ओझे?? by कवितानागेश
मिपाच्या क्षितिजावर सहसा न
barobar
In reply to मिपाच्या क्षितिजावर सहसा न by सूड
कोणतीच लिंक उघडू नका फक्त
सुंदर लेख प्रत्येकाने आपल्या
सोपा उपाय्
'गणपतीउत्सवामधला खर्च होणारा
//स्पीकर्सच्या भिंतींचा त्रास
In reply to 'गणपतीउत्सवामधला खर्च होणारा by अनुप ढेरे
धन्यवाद ..
स्पीकर्सच्या भिंतींचा त्रास